Friday, February 3, 2017

आसारामविरोधातला खटला आणि समाज


     काही दिवसांपूर्वी आसाराम बापूचा जामिन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बाद ठरवला. इतकेच नव्हे तर न्यायालयाने त्यांना आपल्या आरोग्याबाबतची बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याबद्दल एक लाखाचा दंडदेखील ठोठावला आहे. आसाराम बापू यांनी आपली तब्यैत खराब आहे आणि आपल्याला आयुर्वेदिक उपचाराची गरज असून त्यासाठी केरळला जाण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.त्यांनी अशी विनंती गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केली होती. तेव्हा न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करवून घेतली होती.ऑक्टोेबरमध्ये त्याचा रिपोर्ट आला की, त्यांना कसल्याही प्रकारच्या उपचाराची गरज नाही. त्यांनी पुन्हा अर्ज केला आणि आपल्या म्हणण्याला पुष्ठी मिळावी म्हणून काही वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली. ही प्रमाणपत्रे बनावट निघाली, त्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आणि त्यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात यावा, असा आदेशही दिला. शिवाय न्यायालयाने अशीही  विचारणा केली आहे की, शेवटी आसारामवर चालणार्या खटल्याला विलंब का होतो आहे?

     आसाराम काही साधासुधा माणूस नाही. त्यांचे असंख्य भक्त आहेत. आणि ते अपार संपत्तीचे मालकदेखील आहेत. काही वर्षांपूर्वी आसाराम बापूंच्या ख्यातीबरोबरच त्यांच्या गैरवर्तणुकीचे किस्सेदेखील प्रसिद्ध होत. 2013 मध्ये एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने,जिचे आई-वडील आसारामचे भक्त होते,त्यांना सांगितले की, आसारामने तिला आपल्या खोलीत बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मग हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मुलीने दिल्ली पोलिसांसमोरही तसाच जबाब दिला. आणि मग आसाराम यांना अटक झाली.काही दिवसांनंतर त्यांच्या मुलालादेखील अटक झाली.त्याच्यावरही यौन गैरवर्तणूक आणि शोषण प्रकरणाचा खटला दाखल आहे.
     आसारामविरोधात जबाब देणारी मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे प्रकरण खूपच गंभीर बनले. ज्या शाळेत ती अगोदर शिकत होती, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने बनावट दाखला बनवला,त्यात तिची जन्म तारीख बदलली. या प्रकरणात त्यालाही अटक झाली आहे. इतकेच नव्हे तर मुलीकडील प्रमुख साक्षीदार कृपालसिंह याचा आसारामच्या अनुयायांनी खून केला. यामुळे मुलीची विधवा आई आणि तिची लहान मुलगी रस्त्यावर आले आहेत. आसारामविरोधात साक्ष देणार्या तीन लोकांना मारून टाकण्यात आले आहे. तसेच एकूण नऊ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पिडित मुलगी म्हणते की, तुरुंगात तर मी आहे. कुठे जाऊ शकत नाही, खेळू शकत नाही.माझ्या वडिलांची सगळी कमाई या खटल्यात चालली आहे. आसारामजवळ वकिलांची मोठी फौज आहे. पण तरीही वडील आणि मुलीने शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार केला आहे.
     या लढाईत सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत अखिल भारतीय महिला समिती उभी आहे. समितीच्या वकील किर्तीसिंह यांनी सातत्याने सर्वोच्च न्यायालयासमोर आसाराम बापू यांचा जामीन अर्ज बाद करण्यात मोठी भूमिका पार पाडली  आहे. आताचा जामीन अर्जदेखील  बाद ठरवण्यामागचे श्रेयदेखील त्यांचेच आहे. पिडित मुलगी आणि तिचे कुटुंब आपले कर्तव्य पार पाडत आहे. खटला साडेतीन वर्षांपासून चालत आला आहे. बाप-लेक खंबीरपणे उभ्या आहेत, मात्र यात सरकार आणि समाज आपले कर्तव्य निभावत आहे का असा सवाल उपस्थित होतो.
     ज्यावेळेला अमेरिकेतल्या ट्विन टॉवरवर आतंकवादी हल्ला झाला होता, त्यावेळी आसाराम म्हणाले होते की, ते बिन लादेनचे प्रशंसक आहेत. आणि त्यांनादेखील तशाप्रकारची अंध भक्तांची फौज हवी आहे, जशी बिन लादेनजवळ होतीआसारामच्या भक्तांची फौज तर त्यांच्याजवळ आहेच,पण त्या असहाय्य मुलीसोबत उभे राहायला कोण तयार आहे

No comments:

Post a Comment