Thursday, February 9, 2017

ए फॉर अ‍ॅनिमेशन


     अ‍ॅनिमेशनचा  अर्थ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला स्वप्नांची दुनिया म्हणता ये ईल. अ‍ॅनिमेशन म्हणजे जो आपण विचार करतो, तो काँप्युटरवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून साकार करणे. ही एक कला आहे.यात कुठलीही गोष्ट  पहिल्यांदा आपल्या कुवतीप्रमाणे आर्ट पेपरवर रेखाटायची असते. नंतर मग ती  कॉम्पुटरवर साकारायची असते. सर्जनशीलपणे  आपण जितका वेगळा  आणि विलक्षण  विचार करू, तो आपण अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकू. हे फारच इंटरेस्टिंग आणि क्रिेएटिव क्षेत्र आहे. यात तुम्ही गाढवाला पंख लावून आकाशात उडवू शकता किंवा वाघाला पिझ्झा, बर्गर खायला घालू शकता...!
     ह्ी दुनियाच मोठी रंजक आहे. क्षणाक्षणाला ही रंग बदलत असते. कधी बार्बी डॉल्सची तर कधी सिंड्रेलाची गोष्ट सांगते. आणि कधी मॅन ,कधी सुपरमॅनसारखी अ‍ॅक्शन दाखवते. अ‍ॅनिमेशनच्या या दुनियेत जितकी अनोखी आयडिया तितकीच ती रंजक असते.  या अ‍ॅनिमेशन क्षेत्रात कुठली मर्यादा म्हणून नाही. कुठलाही विचार करा किंवा स्वप्न पहा, त्याला या क्षेत्रात आकार देऊ शकता, साकार करू शकता. आपल्या कल्पनेला  कुठली बाँड्रीच नसते, त्यावेळेला चौकार-षटकार लगावणार्‍या आयडियाजच  सुचत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हेच या अ‍ॅनिमेशन फिल्डमध्ये हवं आहे. आज आपल्या चित्रसृष्टीत 80 टक्के मुव्हीज, टीव्ही कमर्शियल्स वैगेरे गोष्टींमध्ये अ‍ॅनिमेशनचा आधार घेतला जातो. अ‍ॅनिमेशन मुख्यत्त्वे दोन विभागात येतात, एक म्हणजे 2डी आणि दुसरे 3डी. यातही काही प्रकार आहेत.   कार्टून अ‍ॅनिमेशन, रियलिस्टिक़ अ‍ॅनिमेशन, सेमी रियलिस्टिक अ‍ॅनिमेशन इत्यादी. आता या क्षेत्रात  रोज नवनवीन  तंत्रज्ञानाची भर पडत   आहे. 2डी, 3डी नंतर  3डी, 4डी आलं, आता 5डी सारखं तंत्रज्ञान आलं आहे.

2डी अ‍ॅनिमेशन
     याचा अर्थ टू डायमेंशन. ज्याला काही खोली वैगेरे  नसते. हा दिसायला एकदम प्लॅट असतो.या तंत्रज्ञानात पेपरवर चित्र काढून कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअरच्या मदतीने रंग दिला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मटॉम अँड जेरीङ्घ आणि ङ्गमिकी माऊसङ्घ ही कार्टून्स होय.
3डी अ‍ॅनिमेशन
     हा थ्री डायमेंशनचा प्रकार आहे. यात डेप्थही आहे. आणि कुठल्याही बाजूने पाहिलात तरी तो डेप्थच दिसतो. मआऐस एजफ, मेडागास्करफ, मरियोफ सारख्या मुव्हीजमध्ये हे तंत्रज्ञान पाहायला मिळते.
कार्टून अ‍ॅनिमेशन
     या अ‍ॅनिमेशनमध्ये कॅरेक्टरर्संना काही लिमिट नाही. यातल्या कॅरेक्टरला कुठलं असं बॉडी स्ट्रक्चर नसतं. ते कसंही असू शकतं. चेहरा मोठा असू शकतो, तर त्याचे शरीर छोटं असू शकतं. कार्टून कितीही लांव, उंच, मोठा किंवा बारीक हो ऊ शकतं. म्हणजे वास्तविक स्वरुपात त्याचे शरीर नसते. टॉम जेरीच्या मागे धावतो. तो कुठल्याही मशीनमध्ये घुसतो, आणि त्याच शेपमध्ये बाहेर पडतो. हीच या तंत्रज्ञानाची कमाल आहे.हेच टेक्निक 2डी किंवा 3डी मध्येही नंतर प्रेझेट करण्यात आले. 
रियलिस्टिक अ‍ॅनिमेशन
     या तंत्रज्ञानात कॅरेक्टर आणि त्याच्या भोवतीचं बॅकग्राऊंड एकदम रियल वाटतं. स्पायडर मॅन, सुपरमॅन, हल्क, एवेंजर्स, 2012 इत्यादी कित्येक  मुव्हीजमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात फायटिंग, ब्लास्ट, बिल्डिंग क्रॅशसारख्या गोष्टी एकदम रियल वाटतात. पण हे शेवटी एनिमेटेड आहे. तुम्ही चित्रपटात वास्तव दृश्य म्हणून पाहत असता, मात्र ते सगळं कॉम्प्युटरवर डेवलप करून बनवलेलं एनिमेशन असतं. ते 3डी मध्ये बनवून प्रेजेंट केलेलं असतं.   
3डी मुव्हीज
     या मुव्हीज दोन प्रकारच्या असतात. एक नॉर्मल डोळ्यांनी पाहिल्या जाऊ शकतात. दुसर्‍या मुव्हीज पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांवर विशेष प्रकारचा 3 डी गॉगल घालावा लागतो. गॉगल घालून पाहू शकणार्‍या चित्रपटांना 3 डी स्टिरियोस्कॉपिक मुव्हीज म्हटलं जातं. या मुव्हीज पाहिल्यावर आपल्याला आपणदेखील या मुव्हीज हिस्सा आहे, असे फिलिंग वाटायला लागते. मुव्हीजमध्ये घडत असलेलं सगळं आपल्या आजूबाजूला घडत आहे, असा भास होत असतो.
4डी मुव्हीज
     ये आणखी एक पाऊल पुढं असलेलेलं तंत्रज्ञान आहे. यासाठी थिएटरचा महोल अशा पद्धतीने डेवलप केलेला असतो की, त्यामुळे चित्रपटात घडत असलेल्या प्रत्येक घटनांचा  प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचे फिलिंग होते. चित्रपटात कॅमरा मुवमेंट होतो, तेव्हा थिएटरमधल्या खुर्च्यादेखील मुव होतात. मुवीमध्ये पाऊस कोसळत असेल तर आपल्याला थिएटरमध्येदेखील पाऊस कोसळत आहे, असा अभास होतो. 
5डी मुव्हीज
     हे 4 डी पेक्षाही अधिक पुढचे  तंत्रज्ञान आहे. यात कॅरेक्टर आपल्याला आपल्या अगदी जवळ असल्यासारखा दिसतो. पडद्यावर उठलेलं वादळदेखील आपल्याभोवती घोंगावतं आहे, असं दिसतं. 

No comments:

Post a Comment