Saturday, February 18, 2017

चाळीस वर्षांनी पुन्हा येईन


     डॉक्टरांनी तिला सांगितले होते की, तिला कॅन्सर झाला आहे आणि तिच्याजवळ काही दिवसच उरले आहेत.त्यावेळेला ती अवघी 22 वर्षांची होती.पण तिने हार पत्करली नाही. आणि आता ती कोट्यवधी रुपयांच्या ई-कॉमर्स कंपनीची सीईओ आहे. ही आहे, -कंपनीची सीईओ कनिका टेकरीवाल तिची कंपनी विमान आणि हॅलिकॉप्टर भाड्याने उपलब्ध करून देते.तिचा फोर्ब्स मॅगझीनच्या 30 अंडर अचिवर्स यादीतही समावेश झाला होता.

     कनिका हिचा जन्म भोपाळमध्ये झाला. कनिका मॅरेथान धावपटू आणि चित्रकारही आहे. भोपाळ येथील जवाहरलाल नेहरू स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर ग्रॅज्युशनसाठी ती मुंबईला आली. मुंबईत ग्रॅज्युशन झाल्यावर तिने इंग्लंडमधून एमबीए डिग्री मिळवली. तिने सतराव्या वर्षातच एविएशन क्षेत्रात हात आजमावयाचा निर्णय घेतला. नंतर तिने या क्षेत्रातच आपली कंपनी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
22 व्या वर्षी कनिकाला आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. याबाबतमीने ती खचली नाही. उलट ती खंबीरपणे उभी राहिली आणि मार्गक्रमण करत राहिली.स्वत: कॅन्सरग्रस्त असतानाही तिने आपले स्वप्न सुरू केले. तिने जेटसेटगोला यशाचा शिखरावर नेऊन पोहचवले.इथे सांगायचा आणखी एक मुद्दा असा की, भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंह यानेदेखील कनिकाच्या जेटसेटगो या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

     जेव्हा डॉक्टरांनी कनिकाला सांगितलं होतं की, त्यांच्याजवळ अगदी कमी वेळ आहे. तेव्हा ती हसून म्हणाली होती की, ती 40 वर्षांनंतर पुन्हा त्यांना भेटायला येईन. पण उपचारासाठी नाही तर त्यांचे म्हणणे चुकीचे ठरवण्यासाठी! आपला आनंदीपणा आणि कधीही हार न मारण्याच्या जिद्दीनेच कनिकाने यश मिळवले आहे. तिचा आत्मविश्वास आणि कामाप्रतीचा वेडेपणा प्रेरणा देणारा आहे.

No comments:

Post a Comment