Monday, February 13, 2017

(बालकथा) कलाकाराचा सन्मान


     विजयनगरचा राजा कृष्णदेव दरवर्षी वर्षा उत्सवाचे आयोजन करीया उत्सवात विविध प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रम  वैगेरे व्हायचे. विजेत्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जायचा. एकदा पाऊस चांगलाच बरसला. सगळेच आनंदी, समाधानीराजाने तर या वर्षीचा उत्सव मोठ्या थाटामाटात , जल्लोषात  साजरा करण्याची घोषणा केली. हे ऐकून मंत्री राजाला म्हणाला, '' महाराज, या वर्षी आपल्याच राज्यातल्या एखाद्या कलाकाराचा सन्मान व्हायला हवा. ''
     तेनालीराम मधेच म्हणाला, '' महाराज, मंत्रिमहोदयांचं म्हणणं रास्त  आहे, परंतु सन्मान सच्च्या कलाकाराचा झाला पाहिजे.'' राजा म्हणाला,'' तेनालीराम, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? ''
     तेनालीराम म्हणाला, '' महाराज, सच्चा कलाकार याचा अर्थ असा कलाकार की, जो फक्त दुसर्यांना खूश करण्यासाठी काम करत नाही तर स्वत: च्या आनंदासाठी काम करतो.   माझ्या नजरेत  एक असा शिल्पकार आहे,   ज्याला मूर्ती बनवताना आपल्या आजूबाजूच्या जगाचेही भान राहात नाहीस्वत: च्या आनंदासाठी तो सतत कार्यमग्न असतो. ''
     राजा म्हणाला,'' त्याला मला पाहायचं आहे. ''

     दुसर्यादिवशी तेनालीराम राजाला घेऊन राज्याबाहेर असलेल्या काळ्या पहाडाजवळ घेऊन गेलातिथे एक गुहा होती. त्यातून छिन्नी-हातोड्याचा आवाज ऐकू येत होता. सगळे गुहेत गेले तर त्यांना तिथे सगळीकडे मूर्तीच मूर्ती दिसल्या. अत्यंत सुबक आणि जिवंत वाटणार्या मूर्ती पाहून सगळेच चकीत झाले.   त्या मूर्तींमध्येच   शिल्पकार बसला होता. आणि ध्यानमग्न हो ऊन मूर्ती बनवत होता.
     राजा मूर्तीकाराला म्हणाला, '' काय बनवतो आहेस?''
     '' वर्षाराणीची मूर्ती! खाली ही पिकं तर , वर हे  ढगआणि खाली वर्षाराणी नृत्य करीत आहे. '' शिल्पकार राजाकडे न पाहताच म्हणाला.
     राजा म्हणाला, ''तू या मूर्ती विकत नाहीस काय?''
     शिल्पकार म्हणाला, ''नाही, या मूर्ती मी माझ्या आनंदासाठी बनवतोय. काही लोक या मूर्ती घेऊन जातात, त्या मोबदल्यात जे काही  खायला-प्यायला देतात, त्यावर मी संतुष्ट आहे. तेवढं मला पुरेसं आहे. ''
     राजा मोठ्या आश्चर्यात पडला. वर्षा उत्सवात राजाने त्या शिल्पकाराचा सन्मान केला. आणि त्याने बनवललेली वर्षाराणीची मूर्ती आपल्या महालाच्या उद्यानात लावली. त्याने एका सच्चा कलाकराशी ओळख करून दिल्याबद्द्ल तेनालीरामचे आभार मानले.
                                                                                                                              

No comments:

Post a Comment