Thursday, April 20, 2017

(बालकथा) चांगलंच होईल


      दोघे मित्र होते.दोघांचे चांगले जमत होते, पण दोघांमध्ये एक मोठा फरकदेखील  होता.एक मित्र प्रत्येक गोष्टीला  नकारात्मक दृष्टीने पाहायचा मात्र दुसरा मित्र कठीणातील कठीण परिस्थितीमध्येदेखील काही ना काही चांगलं शोधून काढायचा.एके दिवशी दोघे मित्र शिकार करायला जंगलात गेले.वाटेत पहिल्या मित्राच्या हाताला काही तरी लागल्याने त्याचा अंगठा कापला गेला.यामुळे तो फारच दु:खी झाला. मात्र दुसरा मित्र म्हणाला,'यातूनही काही चांगलेच घडेल.टू काही काळजी करू नकोस.'

      हे ऐकल्यावर जखम झालेल्या मित्राला राहवले नाही.त्याने त्याला खूपच वाईट साईट बोलून गेला आणि एकटाच जंगलातून बाहेर पडण्यासाठी माघारी फिरला.वाटेत त्याला आदिवासी लोकांनी पकडले. त्यांनी त्याला आपल्या ठिकाणावर घेऊन गेले. त्यांनी त्याला बळी देण्यासाठी तयारी करू लागले. मात्र एका आदिवासी माणसाने त्याचा तुटलेला अंगठा बघितला आणि त्याला सोडून देण्यात आले.
शहरात परत आल्यावर दोघे मित्र परत भेटले.पहिला मित्र दुसऱ्याला म्हणाला,'टू बरोबर म्हणाला होतास. माझा अंगठा कापला गेल्यामुळे आज मी जिवंत आहे. पण आपल्या भांडणामुळे काय चांगले झाले? तेव्हा दुसरा मित्र म्हणाला,'आपल्यात भांडण झाले नसते तर  आपण एकत्र असतो आणि आपण एकत्र असतो तर बळी मला दिले असते.'पहिल्या मित्राला सकारात्मक दृष्टीकोण समजला.
मंत्र:जीवनात सकारात्मक रहा.


No comments:

Post a Comment