Saturday, September 30, 2017

खेळा,मजा करा आणि फिट रहा

'तैने चारों खाने चित कर देगी,तेरे पुरजे फिट कर देगी। ऐसी धाकड है,धाकड है... ऐसी धाकड है।'
बरोबर ओळ्खलत तुम्ही.प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अमिरखानच्या दंगल चित्रपटातले गाणे आठवले ना! हा चित्रपट भिवानी जिल्ह्यातल्या बलाली गावच्या,हरियाणाच्या पराक्रमी मुलींच्या जीवनावर बेतलेला आहे. खर्या आयुष्यातही गीता फोगाट आणि बबीता फोगाट धाकडच आहेत. धाकड होण्यासाठी चांगले आरोग्य असावे आवश्यक आहे. गीता फोगाट हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी आहे. बबीता फोगाट हरियाणा पोलिस खात्यात सब इन्स्पेक्टर आहे. गीता आणि बबीता सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुली होत्या,पण त्यांच्या असामान्य जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्या आज सामान्यच्या खास बनल्या आहेत.

गीता आणि बबीता फोगाट
गीता आणि बबीता यांनी लहानपणापासूनच एकत्र कुस्तीचा सराव केला. त्यांचे वडील महावीरसिंह हेच त्यांचे पहिले गुरू. ते त्यांच्या काळातले प्रसिद्ध पैलवान होते.28 वर्षांची गीता आणि 26 वर्षांची बबीता दोघा बहिणींच्या आवडी-निवडीदेखील एकसमान आहेत.कुस्तीत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत.गीताने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावून ऑलिम्फिक क्वालिफाय करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.बबीताने 2014 मध्ये ग्लासगोच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिला पदकांचा वर्षाव होत राहिला. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
गीता आणि बबीता दोघी बहिणींना जंक फूड खाऊन कित्येक वर्षे लोटली आहेत. त्या मोड आलेली धान्ये, फळे,भाज्या,सोयाबीन,दही,चिकन आदी खातात. फारच इच्छा झाली तर आलू-पराठा खातात. गीताला नटायला,सजायला आवडतं. गेल्याच वर्षी तिचा विवाह पैलवान पवन सरोहाशी झाला आहे.
बबीताला सामान्यांसारखे राहायला आवडते.त्यांना भारतीय पोशाख आवडतो.तिला स्वयंपाक करायला आवडतं. गीता आणि बबीता लहानपणी भल्या पहाटे पैलवानकीचा सराव केला नसता तर त्यांना हे दिवस पाहायला मिळाले नसते.त्या स्वत:चं आणि देशाचं नाव कमवू शकल्या नसत्या. त्यांना आपल्या आजीचं फार अप्रूप वाटतं. शाकाहारी भोजन, दूध,दही,तूप आणि पौष्टीक अन्न खाणारी आणि खूप कष्ट करणारी त्यांच्या आजी 92 व्या वर्षीदेखील चष्मा वापरत नाहीत. त्यांचे दातही बळकट आहेत.दात पडले नाहीत.त्या चहा पित नाहीत. त्या आठ तासांची पूर्ण झोप घेतात.वय झालं असूनही त्या अद्याप स्वत:ची कामं स्वत: करतात.त्या कुणावरही अवलंबून राहात नाहीत.डाळ-भाजी उकडून टोमॅटो-कांदा घालून बनवलेला पदार्थ खातात. दूध पितात आणि रोटी,भात व सलाद खातात.
गीता आणि बबीताला कसल्याच गोष्टीची भिती वाटत नाही. मग ती आग असो, पाणी असो अथवा उंच भाग असो कारण त्या त्या शारीरिकदृष्ट्या अगदी मजबूत आहेत. त्या अज्नूनही पूर्ण जोशाने सराव करतात. कारण देशासाठी आणखी पदकांची लूट करायची आहे.
टेरेंस लुईस

डान्स गुरु आणि कोरियोग्राफर टेरेंस लुईसला पाहिल्यावर अंदाज बांधणं अवघड जातं की ते 42 वर्षांचे आहेत. डान्सच्या नियमित सरावामुळे मस्त आणि फिट आहेत. आजच्या काळात जो फिट तो हिट समजायचं. डान्स इंडिया डान्स ची 1,2 आणि 3 सत्रे तसेच नच बलिए मध्ये ते जज बनले होते. आता ते स्वत:ची डान्स कंपनी चालवतात. महत्त्वाची गोष्ट ते डान्स शिकवतात पण त्यांनी अगोदर डान्सचे प्रशिक्षण घेतले नव्हते.पुढे 26 वर्षाचे झाल्यावर त्यांनी अमेरिकेतून प्रशिक्षण घेतले. भारताकडून स्कॉलरशीप मिळाल्यावर त्यांनी प्रशिक्षण घेतले. ते स्वत: फिट आहेत, त्यामुळेच त्यांनी खतरों के खिलाडी या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होतात्यांना साहस खूप भावतं.
ख्रिश्चन कुटुंबातील टेरेंस लुईस प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्पष्ट करतात, त्यांना जे सांगायचे आहे, ते का सांगायचे आहे, हे त्यांच्या डोक्यात असते.त्यांनी मायक्रो बायलॉजीचे शिक्षण घेतले आहे.त्यांना डॉक्टर बनायचे होते. त्यांचं म्हणणं असं की, रात्री आठनंतर कुठलेही फळ खाल्ले जाऊ नये. रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट अजिबात नसायला हवं. नाश्त्याला किंवा दुपारच्या भोजनात भरपूर कार्बोहायड्रेट असले तरी चालू शकते.प्रोटीन, भाज्या आणि खूपच कमी मात्रेत फॅट घ्या. रात्रीचे भोजन रात्रीच्या दहापर्यंत कसल्याही परिस्थितीत घ्या, असा त्यांचा सल्ला आहे.
सकाळी कोमट पानी लिंबूसोबत घ्यायला हवं.मग 20 ते 25 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. सकाळी रिकाम्या पोटी फिरणे आणि व्यायाम यासाठी फायद्याचं आहे, कारण आपल्या शरीरातील प्रोटीन,विटामीन इत्यादी आपल्या शरीरात जमा होतात. सकाळी व्यायामाच्यावेळी शरीरात जो फॅट जमा झाला आहे, तो वापरला जातो. दिवसा व्यायाम करतो, तेव्हा आपण आपल्या रक्तात जमा झालेला ग्लुकोज वापरतो. त्वचेवर साचलेला फॅट वापरलाच जात नाही,त्यामुळे या वेळी केला गेलेल्या व्यायामाचा परिणाम दिसत नाही.नंतर मग नाश्ता करायला हवा. फिट राहायला जितका व्यायामावर लक्ष केंद्रित करतो, तितकेच लक्ष खाण्यावर असायला हवे.
पाणी खूप प्यायला हवे. आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते म्हणजे व्यायाम करण्यासाठी फ्लोरिंग चांगली असायला हवे. नाही तर गुडघे आणि पाठीला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.फिट् राहण्यासाठी मनाची तयारी करायला हवी.पण मोठमोठी स्वप्ने पाहू नका. आता एका महिन्यात सडपातळ होईन, असे म्हणायला जाऊ नका.लक्षात ठेवा, जादू वगैरे असे काही नसते.हळूहळू सगळ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. तुमचे वजन वीस किलो अधिक आहे, तर वीस किलो कमी करण्याचा विचार करून काही होणार नसतं.एका महिन्यात एक किंवा अर्धा किलो वजन कमी करण्याचे टारगेट ठेवायला हवे.
जंकफूड तर अजिबात खाऊ नये. फिजी ड्रिंक,ज्यूस,चिप्स आदी गोष्टी पाहिल्यावर स्वत:वर  ना बोलण्याची सवय घालून घ्यायला हवी.जंकफूड खाण्याची इच्छा झाली तर स्वत:लाच ना बोलण्याची सवय लावा, आरोग्य खूप चांगले राहील.प्रिजर्व केलेले पदार्थ घेऊ नका, जसं की,जॅम,मामलेट, सॉस इत्यादी. मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करायला हवे.मिठाईपासूनही दूर रहा.सोया मिल्क,ब्राउन राइस, अंडे, ब्राउन ब्रेड खाऊ शकता.घरी असे पदार्थच आणायला हवेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. घरात आवश्यकतेपेक्षा अधिक पदार्थ नसतील तर खाल्लेही जाणार नाहीत.
जर तुम्हाला चांगला डान्सर बनायचे असेल तर रोज तीन तास डान्सचा सराव करायला हवा. एखाद्या अनुभवी गुरुच्या देखरेखीखाली डान्स शिकायला हवे. कुठल्या हिरोला वगैरे पाहून सिक्स पॅक बनवण्याची सगळ्यानाच गरज नाही. तो त्यांचा पोटा-पाण्याचा प्रश्न आहे.त्यांचा व्यवसाय आहे.त्यामुळे त्यांना सिक्स पॅकची गरज आहे.
बजरंग पूनिया

हरियाणातील खुदान (झज्जर)चा राहणारा 23 वर्षांचा बजरंग याने आशियाई रेस्लिंग चॅम्पियनमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.नंतर अर्जून पुरस्कारासह अनेक पदके पटकावली आहेत. ज्यावेळेला तो सात वर्षाचा होता,त्यावेळेपासून त्याने कुस्तीचा सराव सुरू केला होता. आता तो हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी आहे. आता तो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी सराव करतो आहे.तो इतके मन लावून सराव करतो की, त्याला कधी कधी कळतच नाही की, कधी सण-उत्सव आला आणि गेला.सरावादरम्यान त्याला कशाचीच सुद राहत नाही.
बजरंग पूनिया फास्टच्या विरोधात आहे. त्याचं म्हणणं असं की, दूध-दही, भाजीपाला,चिकन,सुखा मेवा इत्यादी खायला हवे.प्रत्येक मुलाने रोज अडीच ते तीन तास बाहेर जाऊन आवश्य  खेळले पाहिजे.झोप पूर्ण घ्यायला हवी. मोठ्यांची गोष्ट ऐकली पाहिजे.सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेतली पाहिजे.त्यामुले व्यायामालादेखील वेळ मिळतो.नियमित व्यायाम केल्याने आणि खेळल्याने वेग वाढतो. शक्ती येते आणि स्टॅमिना वाढतो. त्यामुळे मेंदूही व्यवस्थित काम करतो.जगाला हरवायचे असेल तर कुस्ती खेळताना डोके वेगाने चालले पाहिजे,तरच समोरचा चीत होतो.
उन्मुक्त चंद

मूळचा पिथोरागढचा असलेला 24 वर्षाचा प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद अंडर 19 विश्वचषक विजेता आहे.दिल्ली रणजी चषक संघात कर्णधार राहिलेला उन्मुक्त दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजचा विद्यार्थी होता. चार वर्षाचा असल्यापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो मुख्यत्वे करून फलंदाज आहे.त्याने विश्वचषक जिंकून स्वत:ला सिद्ध केले.
उन्मुक्त चंदचे म्हणणे असे की, फिट राहण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या शरीराची क्षमता,ठेवण वेगवेगळी असते,त्यानुसार त्याने व्यायाम करायला हवा. क्रिकेटपटूला योग करण्याची आवश्यकता नाही. आपल्या इच्छेनुसार त्याने व्यायाम प्रकार करावा. काही का व्यायाम करा,पण फिट राहा, असा सल्ला तो देतो.
क्रिकेटमध्ये कित्येक तास फिल्डमध्ये खेळावे लागते. त्यामुळे पौष्टीक भोजनाची आवश्यकता असते. फिल्डमध्ये खेळताना द्रव पदार्थ अधिक मात्रेत घ्यायला हवेत. जंकफूडपासून दूर राहायला हवे.संपूर्ण दिवस फिल्डमध्ये फक्त उभे राहूनही चालत नाही. आपल्याला माहित पाहिजे की, आपण काय करतो आहोत? चांगला सराव कमी वेळेतदेखील होऊ शकतो.यासाठी एका चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला आठ तासाची झोप आवश्यक आहे.झोप पूर्ण झाल्याने रिकवरी होते. दुसर्यादिवशी चांगल्याप्रकारे खेळू शकता.क्रिकेटपटू बनायचे असेल तर किमान नऊ-दहा वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली पाहिजे. क्रिकेटपटू बनायचे असेल तर त्याच्याबरोबर दुसरा खेळदेखील खेळता आला पाहिजे. त्यामुले कौशल्य वाढते. खेळ कोणताही असो, काम कुठलेही करायचे असेल, स्वत:ला फिट ठेवणे सगळ्यांसाठी आवश्यकच आहे. मग उशीर कशाला आजपासूनच तयारीला लागा. खेळा,मजा करा आणि फिट राहा.

(बालकथा) जीवन जगण्याची कला

     चिन्मय आणि चिन्मयी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. चिन्मय सहावीत शिकत होता तर चिन्मयी सातवीत.त्यांचे बाबा एका खासगी कंपनीत नोकरीला होते,परंतु त्यांना पगार मात्र फारच कमी होता. त्यामुळे त्यांना घर चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. सगळा पगार घरच्या गरजा पूर्ण करण्यात खर्ची पडत असे. या दरम्यान कुणी आजार पडला तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी सतर्यांदा विचार करावा लागे.

     कमी पगार असल्याकारणाने बाबा मुलांच्या शाळेचा आणि शाळेला येण्या-जाण्याचा खर्च करण्यास असमर्थ होते. स्कूल बस किंवा अॅटोचा खर्च तर दूरची गोष्ट होती. तसे असते तर त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातले नसते.पण त्यांनी चिन्मय-चिन्मयीसाठी एक सेकंड हॅन्ड सायकल घेऊन दिली होती.दोघे भाऊ-बहीण याच सायकलने शाळेला जात-येत. त्यामुळे साहजिकच रिक्शा-बसचा खर्च वाचत होता.
     बाबांच्या पगारावर घरखर्च चालत नसल्याने आई घरी शिवणकाम करून घरखर्चाला हातभार लावत  होती. चिन्मय आणि चिन्मयी मोठे समजूतदार आणि हुशार होते.दोघेही एकाच सायकलवर बसून शाळेला जात-येत. शाळेला जाताना चिन्मय अगदी आनंदाने,मस्तीखोरपणे सायकल चालवायचा. तर घरी येताना चिन्मयी स्वत: सायकल घ्यायची.पण तिला दम भरायचा. परंतु, दोघेही सायकल चालवण्यात परफेक्ट झाले होते.चिन्मय सुट्टीच्या दिवशी भाजीमंडईतून भाजीपाला सायकलवरून आणायचा. बाबादेखील घरचे सामान सायकलवरूनच आणायचे. त्यामुळे कुटुंबासाठी सायकल मोठी उपयोगाची वस्तू ठरली होती.
     दिवाळीचा सण जवळ आला होता. आईचे शिलाईचे काम वाढले होते.एके दिवशी चिन्मय आणि चिन्मयी शाळेतून घरी आल्यावर आई म्हणाली, “ मुलांनो, आज मला शिलाईचे काम भरपूर पडले आहे. काम घेतले नाही तर गिर्हाईकं दुसरीकडे जातील. ती पुन्हा कधी परत येणार नाहीत. ” ती ब्लाऊजचे कापलेले तुकडे गोळा करत पुढे म्हणाली, “कुठलाही धंदा वाढवायचा असेल तर ग्राहकांना खूश ठेवले पाहिजे.त्यांना रिकाम्या हाताने माघारी पाठवायचे नसते. हा विचार करूनच मी काम घेते. त्यामुळे ग्राहकही तुटत नाहीत आणि दोन पैसे जास्त मिळतात.शिवाय समोर दिवाळी आली आहे.तुम्हाला कपडेही घ्यायचे आहेत. ”
पण आई, मला घरचा अभ्यास पुष्कळ दिलाय. ” चिन्मय काळजीच्या स्वरात म्हणाला. चिन्मयीदेखील म्हणाली,ङ्घ आई, मलाही अभ्यास भरपूर आहे. ”
हो बाळानों, शिकणार्या मुलांना घरचे काम लावणे, योग्य वाटत नाही, पण माझीही मजबुरी आहे. आज घरच्या कामाला मदत करा.उद्यापासून मी अडेजेस्ट करून घेईन. ” आई त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत पुढे म्हणाली, “चिन्मयी,तू भांडी घासून झाडून घे. आणि चिन्मयबाळा तू, कपडे इस्त्री कर आणि रात्रीच्या जेवणाची भाजी चिरून घे. नंतर दोघांनी गल्लीतल्याचे नळाचे पाणी भरून घ्या. बस्स एवढंच! ”
दोन्ही मुलं आनंदाने कामाला लागली. निश्चिंत होऊन आई आपल्या कामात इतकी गुंतून गेली की, तिला घरकामात डोकावून पाहायलादेखील वेळ मिळाला नाही.हो पण,घरात चाललेली खुटपूट मुले काम करत असल्याचा अंदाज देत होती.
     दोन- अडीच तासांनी शिलाईचे काम उरकले. आई मशीनवरून उठून आत आली तेव्हा ती आश्चर्यचकीत झाली. चिन्मय आणि चिन्मयी घरातले सगळे काम आटपून अभ्यासाला लागले होते. आणखी एक विशेष गोष्ट घडली होती,ती म्हणजे दोघा मुलांनी सहमतीने आपापल्या कामाची आदलाबदल केली होती.चिन्मयने भांडी घासली तर चिन्मयीने कपडे इस्त्री केले. झाडलोट चिन्मयने केली. तर भाजी चिन्मयीने चिरली.शेवटी दोघांनी मिळून पाणी भरले.
आईने याचे कारण विचारले तेव्हा चिन्मय म्हणाला, “ आई, आम्हाला सगळ्या कामांचा अनुभव असायला हवा. सगळी कामे करता आली पाहिजेत. कधी केव्हा कोणते काम करावे लागेल, सांगता येत नाही. ”
चिन्मयीदेखील सहमती दर्शवत म्हणाली, “ अशीच शिकवण आम्हाला आमच्या बाई देतात.ते आम्ही अंमलात आणतो. म्हणूनच आम्ही सायकलदेखील आलटून-पालटून चालवतो. कधी शाळेला जाताना चिमू चालवतो, कधी मी. अशा प्रकारे आम्ही दोघेही सायकल चालवण्यात एक्सपर्ट झालो आहोत. ”
     चिन्मय आणि चिन्मयीला शाबासकी देत आई म्हणाली, “ बरोबर आहे मुलांनो, आपल्याला सगळी कामे करता आली पाहिजेत. शिवाय एकमेकांना कामात मदत केली पाहिजे.त्यामुळे एकमेकांमध्ये मैत्री वाढते. जिव्हाळा वाढतो. मला फार आनंद झाला,तुम्ही एकमेकांची काळजी घेता आणि प्रत्येक काम आनंदाने करता. ”
     “मुलांनो, फक्त घरातच नाही तर बाहेरही मित्रांसोबत कुठल्याही कामात पुढे राहिले पाहिजे. अशी माणसे कठीणातले कठीण काम चुटकीसरशी सोडवू शकतात.कारण त्यांना मदत करायला माणसे असतात. साथ केली तर साथ मिळते.हीच जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची कला आहे. ज्याने ही कला शिकली, तो नेहमी आनंदी राहतो. ”

Thursday, September 28, 2017

रोजगार दिल्यास त्यांच्या हातात दगड कसे येतील?

     भारत सरकारकडून काश्मिर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, हे नाकारून चालणार नाही.पण काश्मिरमधील नागरिकांना ज्याची आवश्यकता आहे,तीच गोष्ट आपल्याकडून दिली जात नाही.त्यामुळे भारताकडून जे काही काश्मिर प्रश्नाच्या उकलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, ते व्यर्थ जात आहेत. सर्जिकल स्ट्राइक असो किंवा सैन्यांद्वारा आतंक-मुक्त काश्मिरचा निर्णय असो अथवा एक एक करून दहशतवाद्यांना टिपण्याचे प्रकार असोत, ही कामे धाडसाची आहेत. मात्र या गोष्टी वेळच्यावेळी होण्याची गरज होती. तसे झाले असते तर आज काश्मिरी युवकांच्या हातात दगड आणि सैनिकांचे बलिदान गेले नसते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगले प्रयत्न स्थायी स्वरुपाचे आहेत. काश्मिरी तरुणांच्या हातात दगड आणि त्यांचा आतंकवाद्यांशी वाढत चाललेला संबंध या समस्यांचे मूळ नष्ट करायचे असेल तर आपल्याला काश्मिरी युवकांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे.या भोळ्याभाबड्या युवकांना दहशतवादी पैसा देऊनच भडकवत आहेत. त्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.बेरोजगार तरुण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दगडफेक करून किंवा आतंकी कारवायांमध्ये भाग घेऊन आपल्या पैशांची गरज पूर्ण करत आहेत. मिडियावाल्यांनी ज्या ज्या वेळेला दगडफेक करणार्या काश्मिरी तरुणांशी संवाद साधला,त्या त्या वेळेला ही मंडळी फक्त पैशासाठी सर्व काही करत आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना ना स्वातंत्र्याचा अर्थ माहित आहे किंवा ना त्यांना दगडफेकी मागचा उद्देश माहीत आहे.त्यांना फक्त यासाठी आपल्याला पैसा मिळतो,हीच एक गोष्ट माहीत आहे.
     आपल्या केंद्र सरकारमधील अनेक विभागात लाखो पदे रिक्त पडली आहेत. या रिक्त पदांमुळे देशात विस्कळीतपणा आला आहे.अव्यवस्था निर्माण झाली आहे. लोकांची वेळेत कामे होईनात. अपघात होत आहेत.या विविध स्तरांवरील कामात सुसूत्रता येण्यासाठी नोकरभरती आवश्यक आहे.अलिकडेच जे रेल्वे अपघात झाले,त्यानिमित्ताने रेल्वे विभागात लाखो पदाच्या जागा रिक्त पडल्या असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या धावपट्ट्या दुरुस्ती,देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे खात्याला एक प्रकारची अवकळा आली आहे. अशीच अवस्था आपल्या लष्कराची आहे. सैन्यदलात तब्बल 52 हजार पदे रिक्त आहेत. पोस्ट कार्यालयातही काही हजार पदे रिक्त आहेत. एफसीआय आणि दूरसंचार विभागातही अशीच अवस्था आहे.या जागा फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभागाता आहे. राज्यांचा प्रश्नच वेगळा आहेजर केंद्र सरकारने मनात आणले आणि या जागांसाठी काश्मिरी युवकांना संधी देण्याला प्राधान्य दिले तर देश तोडण्याचा जो प्रयत्न पाकिस्तान किंवा दहशतवादी करत आहेत, त्याला आपोआपच आळा बसेल.
     काश्मिरी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला तर ते जे पैशासाठी देशात किंवा काश्मिरमध्ये आपल्या कार्यकृत्याने अशांतता निर्माण करत आहेत, आपल्याच देशाचे आर्थिक,सामाजिक,भावनिक नुकसान करत आहेत, ते आपोआप थांबेल. शिवाय नोकरभरती झाल्याने आपल्या देशातल्या विविध विभागात जी अव्यवस्था निर्माण झाली आहे,तीही कमी होईल आणि लोकांना तत्पर आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. नोकरभरती करताना काही मापदंड लावता येईल, पण काश्मिरी तरुणांना रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. काश्मिर अशांत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. काश्मिर आपल्या देशाचे नाक आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. तिथे पर्यटकांना सुरक्षा मिळाल्यास पर्यटन वाढणार आहे, शिवाय तिथल्या तरुणांना रोजगारही मिळणार आहे.काश्मिरी तरुणांच्या हाताला काम दिल्यावर त्यांच्या हातात दगड कसे येतीलप्रत्येकाला आपल्या पोटाची आग शमवायची आहे. ती आग चांगल्या कामातून, चित्त शांत ठेवून शमत असेल तर हे तरुण वाईट मार्गाला का लागतील?   

Tuesday, September 26, 2017

हृदयाच्या तंदुरुस्तीचा फॉर्म्युला मित्रांनाही सांगा

     29 सप्टेंबरला आहे वर्ल्ड हार्ट डे. याखेपेला याची थीम आहे, शेयर द पावर. म्हणजे आपण जो फॉर्म्युला हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी अंगिकरला आहे, तो फॉर्म्युला दुसर्यांसोबत शेयर करणे. यामुळे हृदय आजाराने पिडित आहेत,त्यांना त्याचा लाभ होईल आणि त्यांचेही आरोग्य चांगले राहिल.त्यामुळे या वर्षभरात आपण आपल्या हृदयाच्या तंदुरुस्तीसाठी जो फॉर्म्युला वापरला आहे तो शेयर करायला हवा. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंग आहे, ते म्हणजे आपल्या छातीत धडधडणारं हृदय.यात थोडी जरा गडबड झाली तर हृदयासंबंधीचे अनेक आजार जन्माला येतात. आजकाल ज्या प्रकारे लोकांची लाइफस्टाइल बदलली आहे,त्यात हार्ट डिजीजने होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.एका संशोधनानुसार जगभरात हार्ट अटॅकने मरणार्यांची संख्या ही अन्य आजाराने मरणार्यांच्या तुलनेत अधिक आहे. हृदयासंबंधी मोठ्या प्रमाणात संशोधन, अभ्यास केला जात आहे,त्याकडे जातीने लक्ष देऊन आपल्या हृदयाचे आरोग्य कसे चांगले राहिल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

     हृदय रोग व्हायला सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे, धुम्रपान. आज युवकांमध्ये हार्ट डिजीज व्हायला मुख्य कारण धुम्रपान आहे. मग त्यानंतर डायबिटीज, हायपरटेंशन, सिडेंट्री लाइफस्टाइल, लठ्ठपणा, डाइट, फॅमिली हिस्ट्री इत्यादी कारणांमुळे  हृदय रोग वाढतो. पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत हार्ट डिजीज होण्याची शक्यता अधिक असते. महिलांमध्ये मेनोपॉज झाल्याने मग याचा धोका वाढतो. विदेशातल्या तुलनेत भारतात दहा वर्षे अलिकडेच  लोकांना हृदय रोगाच्या समस्या पाहायला मिळत आहेत. याचे कारण म्हणजे डाइटमध्ये एंटी-ऑक्सिडेंटसची मोठ्या प्रमाणात कमतरता. जर विदेशात लोकांना 55 ते 65 वय वर्षाच्या दरम्यान हार्ट दिजीज होत असेल तर भारतात ते 45 ते 55 दरम्यानच्या वयात होते. महिलांनी  डायबिटीज आणि हायपरटेंशनसाठी रुटीन चेकअप करायला हवे. आपल्या भोजनात फॅटी फूड आणि हाय कॅलरीयुक्त आहाराचा समावेश केला जाऊ नये. यामुळे लठ्ठपणा वाढतो. ॅक्टीव्ह राहा. आठवड्यातून पाच दिवस जवळपास 40 मिनिटे चालत राहा. एक्सरसाइज करा. यामुळे हृदय रोगापासून तुम्ही लांब राहाल.
      तुम्ही नेहमी तणाव,चिंता, बैचेनी या समस्यांनी घेरलेले असाल तर सांभाळून राहा.जितक्या लवकर स्वत:ला या मानसिक समस्येतून बाहेर काढाल, तितके तुमच्या फायद्याचे आहे. कारण एका संशोधनानुसार तणावामुळे आपले हृदय वेगाने धडधडते. त्यामुळे हृदयसंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते.नियमित स्वरुपात असणारा तणाव महिलांच्या हृदयावर प्रतिकूल परिणाम करतो.सक्रिय जीवनशैली,पौष्टीक अन्नाचे सेवन आणि धुम्रपानापासून दूर राहून तणाव कमी करून हृदयाचे आरोग्य व्यवस्थितरित्या ठेवू शकतो.
     जर तुम्हाला आपले हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमितपणे पालकाचे सेवन करा. असे अमेरिकेच्या कोलोराडो स्टेट युनिवर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे. मेटाबॉलिक सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी जर नियमितपणे पालक खाल्ल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. संशोधनामध्ये 45 ते 65 वय वर्षे असलेल्या 50 जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात काहीजण मेटाबॉलिक सिंड्रोमग्रस्त होते. अभ्यासानुसार या रुग्णांचा रक्तदाब आणि हृदय यात बरीच सुधारणा झाली असल्याचे आढलून आले.
      जर तुम्ही रोज तीन-चार कप कॉफी पित असाल तर तुम्ही खरेच समजूतदार आहात असे म्हणावे ललगेल. पोर्तुगिजमधील एका विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार रोज तीन-चार कप कॉफी प्यायल्याने हृदयरोग(सीवीडी)ने मरण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. याच्या सेवनाने टाइप-2 डायबिटीजचा धोकादेखील जवळजवळ 25 टक्क्यांपर्यंत कमी होतो.डायबिटीज रुग्णांमध्ये हृदयरोगाने होणार्प्या मृत्यूची शक्यता  असते. हार्वर्ड युनिवर्सिटीच्या तज्ज्ञांनुसार कॉफी कार्डियोवॅस्कुलर रोगांपासूनही बचाव करते. मात्र अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन नुकसानकारक आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
     पांढर्या केसांकडे लक्ष ठेवा- आज अगदी कमी वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. याची अनेक कारणे असू शकतात मात्र इटलीच्या काहिरा युनिवर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार तरुणपणात केस पांढरे होत असतील तर ते हृदयासंबंधी रोगांकडेदेखील इशारा करतात. एथेरोस्केलेरोसिसची निर्मिती धमन्यांमधल्या सामग्रीमुळे होते आणि केस पांढरे होणे या दोन्हीत काही प्रमाणात समानता आहे. बिघडलेला डीएनए, ऑक्सीडेटीव तणाव, सूज,हार्मोनमध्ये बदल इत्यादी या दोन्हींची कारणे आहेत

Sunday, September 24, 2017

बॉलीवूडला भावताहेत छोटी शहरे

     गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड निर्मात्यांचे आकर्षण मेट्रो अणि मोठ्या शहरांपेक्षा जमशेदपूर, अलाहाबाद आणि वाराणशीसारख्या तुललेने छोट्या शहरांच्यां दिशेने वाढत आहे. या शहरांमध्ये राहणारे नॉर्मल कॅरेक्टर आणि त्या शहरांच्या आपलेपणामुळे प्रेक्षक असे काही गुंगून जातात की, त्यांना ते शहर नाही तर एक कॅरेक्टरच दिसायला लागते. याच वर्षी प्रदर्शित झालेला बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाची कथा झांशी आणि कोटासारख्या दोन छोट्या शहरांच्या भोवतीनेच फिरताना दिसते. चित्रपटात कोटाचा सेवन वंडर पार्क खास आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे आला. दहावी नापास झांशीच्या बदरीला कोटामधल्या वैदेहीवर प्रेम जडते. चित्रपटात हुंडा प्रथेला विरोध आणि लग्नानंतर आपल्या इच्छेनुसार आत्मनिर्भर होऊन महिलांचे जीवन जगण्याची इच्छा अगदी सहजपणे मोठ्या पडद्यावर चित्रित करण्यात आले आहे.

फार्म्युला नवा नाही
      बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने छोट्या शहरांवर बनवलेले चित्रपट प्रेक्षक आणि क्रिटिक्सद्वारा प्रशंसेस पात्र ठरले आहेत. याच कारणामुळे चित्रपट बनवले जात आहेत. 2010 मध्ये विक्रमादित्य मोटवानी यांनी उडान नावाचा चित्रपट स्टील सिटी जमशेदपूरमधील कठीण परिस्थिती आणि येथील प्रेरणादायी चरित्रांची कथा समोर ठेवली होती. हा चित्रपट कान फिल्म फेस्टिवलमध्येदेखील पाठवण्यात आला होता. दम लगा के हईशा ची छोट्या शहरातील मानसिकतेची कथा प्रेक्षकांनी खूपच पसंद केली होती. 50 च्या दशकातील प्रेमकथेवरील आधारित लुटेरा पश्चिम बंगालमधील माणिकपूर नावाच्या एका छोट्या शहरातील निसर्ग सौंदर्याशी परिचय करून देण्यात आला होता. रणबीर आणि सोनाक्षी सिन्हाद्वारा अभिनित हा चित्रपटदेखील छोट्या शहरातील चरित्र प्रेक्षकांसमोर आणण्यात यशस्वी ठरला.गोवा राज्याच्या बाहेरील भागावर प्रकाश टाकणार्या फाइंडिंग फैनी चित्रपटातील लोकेशन्स एका रात्रीत प्रसिद्ध झाली. असे लोकेशन पर्यटकांनीदेखील पाहिलेले नव्हते. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित 2013 मध्ये बनलेला काई पो चे हा चित्रपट अहमदाबादच्या पृष्ठभूमीवरचा तीन मित्रांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट आहे. यात गुजरातच्या धार्मिक दंगली चित्रपटाच्या कथानकाला गंभीर वळण देतात.
युपीमधील शहरे फेवरेट
   
 छोट्या शहरांवर चित्रपट बनवणार्या चित्रपट निर्मात्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये उत्तर प्रदेशातील शहरे टॉपवर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बनलेले चित्रपट याला पुरावा आहेत. उत्तर प्रदेशात ील कानपूरच्या पृष्ठभूमीवर 2011 मध्ये बनलेला तनु वेड्स मनु या चित्रपटात या शहरातील साधेपणा आणि इथले जीवन इतक्या रियलस्टिकपणे दाखवण्यात आले की, त्यामुळे यातील कॅरेक्टर अगदी सहज आणि नॅचरल वाटतात. चित्रपटाची दृश्येदेखील रीयल लोकेशनवर चित्रित करण्यात आली आहेत. रिचा चढ्ढा आणि विकी कौशल अभिनित मसान चित्रपटात दोन समसमांतर प्रेमकथा एकत्रित चालतात. वाराणशीला गंगेच्या काठाला राजा हरिश्चंद्र घाटावर जिथे लोक आपल्या मृत नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करायला येतात,त्यांच्या जीवन संघर्षाची कथा आहे मसान. वाराणशीच्या पृष्ठभूमीवर बनलेला रांझणा चित्रपट दोन वेगवेगळ्या सांप्रदायिकतेचे  स्थानिक चरित्र दर्शवतो. या चित्रपटात बोलण्यात आलेले डॉयलॉगदेखील या शहराच्या चरित्रावर शंभर टक्के फिट बसतात. 2005 साली आलेल्या शाद अली यांच्या बंटी और बबली चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा प्रवास मनोरंजक अंदाजात दाखवण्यात आला होता, जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या घरातून बाहेर पडलेले असतात. लखनौपासून सुरू झालेला प्रवास व्हाया आग्रा करत उत्तर प्रदेशातल्या अनेक छोट्या छोट्या शहरांनधून चालत राहतो. या चित्रपटाशिवाय 2003 मध्ये अलाहाबादच्या पृष्ठभूमीवर बनलेला तिग्मांशू धुलिया यांचा हासिल चित्रपट तिथल्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावर बेतलेला होता.चित्रपटात उत्तर प्रदेशातील छोट्या शहरांमधील लोकांचा जीवन संघर्ष अत्यंत सुंदररित्या चितारण्यात आला होता. 2007 साली आपल्या करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार्या माधुरी दीक्षितचा आजा नच ले चित्रपटातील कथा शामली या छोट्या शहराच्या भोवतीनेच फिरते.

ट्रेंड बदलाचे कारण
     बॉलीवूडमध्ये असा एक काळ होता, ज्यावेळेला फिल्म मेकर्स. चित्रपट निर्मितीसाठी विदेशी लोकेशन्सवर चित्रिकरण करण्यासाठी आणि प्रेक्षकांना तिथल्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी परदेशात किंवा मोठ्या शहरातल्या कथानकांनाच आपल्या चित्रपटांचा विषय बनवत होते. पण आता ट्रेंडमध्ये बदल झाला आहे. चित्रपट निर्मातेदेखील आता समजून चुकले आहेत की, विशाल आणि बहुरंगी देशातल्या महानगर आणि मेट्रो सिटींमध्ये नाही तर छोट्या शहरांमध्येसुद्धा जीवन वसलेले आहे. इथेही प्रेमकथा जन्माला येतात आणि शिखर गाठतात. चित्रपट निर्माते ओळखून आहेत की, भारतात सांस्कृतिक आनि भौगोलिक विविधता दाखवत एकापेक्षा एक चांगले चित्रपट बनवता येतात. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रपट निर्मितीत उतरलेली नवीन पिढी याच पृष्ठभूमीतून आलेली आहे. त्याचबरोबर बॉलीवूडला कळले आहे, आता लोकांना मसालेदार चित्रपटांची नाही तर रियल चित्रपट आवडू लागले आहेत.खरे तर छोट्या शहरांमधल्या लोकेशन्सवर चित्रपटांचे चित्रिकरण करणे तसे आव्हानात्मक असते.बॉलीवूडच्या ग्लॅमरमध्ये राहिलेल्या चित्रपट कलाकारांना चित्रिकरणादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागते,पण हेही खरे की छोटी शहरे, प्रेक्षकांना फ्रेश फिल करतात.

उलटे धावणे: व्यायाम आणि मनोरंजन

     वजन कमी करण्यासाठी एखादे रंजक व्यायाम प्रकार करायचा असेल तर रेट्रो रनिंग म्हणजेच उलटे धावणे चांगले आहे. यात तुम्हाला सरळ न धावता उलटे धावायचे असल्याने तुमचा व्यायाम तर होतोच, शिवाय मनोरंजनही होते. यामुळे तुमाचा फक्त स्टॅमिना वाढत नाही तर फिटनेसचा स्तरदेखील सुधारतो. एकाग्रता आणि शरीराचे संतुलन यावरदेखील उलटे धावण्याच्या प्रकाराने चांगला प्रभाव पडतो.
अलिकडेच झालेल्या एका संशोधनानुसार उलटे धावणे वजन कमी करण्यासाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्समध्ये झालेल्या एका संशोधनानुसार सरळ धावण्याच्या तुलनेत उलटे धावण्याने मांसपेशींवर अधिक परिणाम होतो. खास करून पोटाच्या मांसपेशींवर विशेष असा अधिक प्रमाणात प्रभाव पडतो. त्याचबरोबर अशा धावण्याने 30 टक्क्यांपेक्षा अधिक कॅलरी वापरली जाते. यामुळे वजन वेगाने कमी होते.

पोश्चरवर पडतो प्रभाव
उलटे धावल्याने कंबर आणि मान सरळ राहते,त्यामुळे शरीराचे पोश्चर बिघडत नाही. मागच्या दिशेने धावण्याने सरळ धावण्याच्या तुलनेत अधिक ताकद लावावी लागते. त्यामुळे जास्त कॅलरी जळते. याशिवाय एकाच प्रकारचा व्यायाम करत राहिल्याने एकाच मसल्सवर परिणाम होतो,पण पाठीमागे धावल्याने अशा मसल्सवरदेखील प्रभाव पडतो,ज्यांवर सामान्यपणे कोणताच परिणाम होत नाही.
गुडघ्यावर प्रेशर कमी
सरळ धावण्याच्या तुलनेत उलटे धावल्याने गुडघ्यावर ताण अधिक पडत नाही. एखाद्या गुडघे वाकण्याबाबतची समस्या असेल तर किंवा गुडग्यातून पाय वाकवताना त्रास होत असेल तर तो त्रास कमी होऊन गुडघा वर्कआऊट करू शकतो.उलटे धावण्याने शरीराच्या अशा भागावर सरळ चालण्याने किंवा धावण्याने मार लागला होता.जखम झाली होती.नेहमी जखमी खेळाडू अशाच प्रकारच्या धावण्याने आपला स्टॅमिना वाढवतात.
हृदयासाठी चांगला व्यायाम
उलटे धावल्याने कार्डियोवेस्कुलर क्षमता आणि स्टॅमिना दोन्हींमध्ये फायदा होतो. मागच्या बाजूने धावताना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाताना अडचण येते. यासाठी अधिक जोर द्यावा लागतो.मात्र हृदयासंबंधी समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उलटे धावण्याचा व्यायाम करावा.उलटे धावल्याने पोटाची चरबी कमी होते आणि एकाग्रतादेखील वाढते. विद्यार्थ्यांसाठी हा व्यायाम प्रकार अधिक फायद्याचा आहे.

नवरात्रात उपवास करा,पण आरोग्याची काळजीही घ्या

    नवरात्रात कुणी उपवास धरला असेल त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.नऊ दिवसाच्या व्रत काळात बेफिकिरपणा आपले आरोग्य बिघडवू शकतो.काही नियम आणि न्यूट्रीशियन्स डाइटसोबत नऊ दिवसाचा उपवास करणे म्हणजे शरीराचे डीटॉक्सिफिकेशन.पूर्णपणे शरीराची स्वच्छता.  बहुतांश आजार हे अनावश्यक आणि अनहेल्दी अन्न खाल्याने होतात. उपवासादरम्यान तेल-मसाले आणि अनहेल्दी अन्न खाण्यापासून दूर राहण्याबरोबरच फळे आणि काही भाज्यांचे सेवन आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारचे विटामिन,मिनरल्स, फायटोन्यूट्रीएंटस आणि फायबर असतात. परंतु,काहीजण बाहेरचे किंवा घरी बनवलेले नवरात्र स्पेशल पदार्थांचे सेवन करतात.हे पदार्थ हाय कॅलरीचे असतात. यात बटाटा चिप्स,साबुदाणा पकोडे किंवा वडे,तळललेले साबुदाणे अशा पदार्थांचा समावेश असतो. असे पदार्थ सलग नऊ दिवस खाल्ल्याने कॅलरी वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे कॅलरी वाढणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.

     काही लोक वेट लॉसचा उद्देश ठेवून नवरात्र व्रत करतात. नऊ दिवस उपवास केल्याने वजन कमी होते,मात्र ते कायम ठेवण्यात असमर्थ ठरतात. वास्तविक या दरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते,पण फॅटवर अधिक परिणाम होत नाही. उपवास सुटल्यावर म्हणजे नऊ दिवसांनंतर पुन्हा पहिल्यासारखे खाने सुरू होते,त्यामुळे पुन्हा वजन वाढायला लागते. व्रत केल्यानंतरही नियमित डाइट ठेवताना तेल-मसाले पदार्थ टाळायला हवेत. शिवाय एक्सरसाइज करून कमी झालेले वजन कायम ठेवता येते.
     नवरात्र डाइटमध्ये समावेश असलेल्या पदार्थांमधले सगळे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरत नाहीत.वास्तविक फास्ट फूडवाले बहुतांश फूड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटची मात्रा अधिक आणि प्रोटीनची मात्रा कमी असते.त्यामुळे न्यूट्रीशनिस्ट उपवासादरम्यान प्रोटीन डाइटवर फोकस करण्याचा सल्ला देतात.त्याचबरोबर कमी फॅट असलेले पदार्थ जसे की दूध,दही,नट्स आणि कडधान्ये खाण्यावर भर द्यायला सांगतात.कंडेंस्ड दूध किंवा जास्त फॅटचे दूध ज्यात सॅचुरेटेड फॅट आणि कॅलरीची मात्रा अधिक असते, अशा पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला देतात.
     जर तुम्हा तुमची त्वचा उजळवायची असेल आणि शरीराच्या टॉक्सिन्सपासून सुटका करून घ्यायची असेल तर अधिक प्रमाणात हलक्या पदार्थांचे सेवन करायला हवे.हे इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन बरे करण्याबरोबरच त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करतात.थोड्या थोड्या वेळाने हलके खाल्याने मेटाबॉलिज्मदेखील वाढते. दूध आणि दुधाच्या पदार्थांपासून कॅल्शियमची मात्रा मिळते आणि प्रोबायोटिकचे स्त्रोत दहीने पचनतंत्र सुधारते.
     उपवासदरम्यान बरेच लोक काही काही तास काहीच खात-पित नाहीत. अशी परिस्थिती डायबिटीज लोकांसाठी लो शुगर किंवा हायपोग्लाइसिमीयाचे कारण बनू शकते. याशिवाय उपवासदरम्यान काही लोक आपली नियमित औषधे घेण्याचे टाळतात.त्यामुळे ब्लड प्रेशर,थायएआइड,ब्लड शुगर इत्यादी संबंधित समस्या वाढतात.त्यामुळे आपली नियमित औषधे घेतली जायला हवीत व थोड्या थोड्या अंतराने काही ना काही खायला हवे.काहीजण व्रत काळात मीठाचे सेवन टाळतात.यामुळे बीपी सामान्यापासून खाली येण्याची शक्यता असते. अशा काळात सैंधव मीठाचा वापर करावा. अर्थात सैंधव मिठाची अधिक मात्रा शरीरासाठी हानिकारक असते. क्रॉनिक किडनीच्या रुग्णांनी आणि सीरम पोटॅशियमच्या लोकांनी याचे अधिक सेवन करू नये.
आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा
डायबिटीज,ब्लड प्रेशर,ॅनिमिक किंवा प्रेग्नेंट महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्रत करावे. उअपवासादरम्यान पाण्याची कमतरता भासवू देऊ नये. पाण्याच्या कमतरतेमुळे कॅल्शियम किंवा यासारखे पोषक तत्त्व जमा होतात. मूत्रपिंडामध्ये खड्याची समस्या होऊ शकते. लिंबूपाणी, अननसाचा रस, नारळाचे पाणी,विटामिन ए युक्त फळे आदींचे सेवन करायला हवे. हृदय,किडनी,फुफ्फुससंबंधित आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा. यादरम्यान अधिक आंबट फळांचे सेवन करू नये कारण यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. सैधव मीठ आणि साखरेची मात्रा मर्यादित ठेवा. शिवाय तळलेल्या पदार्थांपासून लांब राहा. शरीराची ऊर्जा कायम ठेवण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने काही ना काही खात राहा.
व्रत केल्याने फायदे अनेक
कधी कधी उपाशी राहणे किंवा उपवास करणे आपल्या शरीराला फायद्याचे असते. यादरम्यान अन्न न खाल्याने आपल्या पचन इंद्रियांना आराम, विश्रांती मिळते. त्याचबरोबर आपल्या शरीरात ऊर्जा साठवलेली असते,ती नियमित भोजनाने वापरली जात नाही. अशा वेळेला आपले शरीर फॅट सेल्सकरवी ती ऊर्जा घ्यायला सुरुवात करते. त्याचबरोबर आपल्या लिव्हरमध्ये साठलेले हिमोग्लोबीनदेखील या दरम्यान उपयोगात आणले जाते.उपवासादरम्यान संतुलित अन्न खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.व्रत काळात नियमानुसार खाल्याने कफ,गॅस,अपचन,डोकेदुखी इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर एकाग्रता आणि फिटनेस स्तरदेखील वाढते.

Saturday, September 23, 2017

कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी ...

     मोठमोठ्या कंपन्या आपल्या एंप्लॉइजला प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी अप्रेजल आणि बोनस देत असते. परंतु, खरच! एंप्लॉइजला चांगले प्रदर्शन करण्याच्या दिशेने प्रोत्साहित करण्यासाठी केवळ पैसाच कामी येतो का?अन्य कशाची गरज नाही का? असं नाही आहे, कारण असं असतं तर कमी बजेटच्या छोट्या कंपन्यांचे एंप्लॉइ कधीच मेहनत घेऊन केले नसते.अर्थात पैसा कर्माचार्यांसाठी महत्त्वाचा नाही असे नाही.पण दर महिन्याला त्यांच्या हातात मोटीवेट करण्यासाठी धनादेश दिला जाऊ शकत नाही.त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम करतं ते त्यांचं केलं जाणार कौतुक! त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक झाले तर एंप्लॉइ आणखी वेगाने चांगले काम करू शकतो. लोक कौतुकाचे भुकेले असतात,पैशाचे नाही.

एंप्लॉइजचे कौतुक करा
एकादी व्यक्ती आपल्या कामात निराश होते,त्याला अनेक कारणे आहेत. त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या कामाला ओळख न मिळणे. पूर्ण मन लावून काम करूनही त्याच्या कामाचे कौतुक झाले नाही तर तो निराश होतो. कौतुकाच्या दोन शब्दांची त्याला गरज असते. त्यामुळे मालकांनी आपल्या एंप्लॉइज मंडळींना अशा महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर ठेवू नये. त्यांच्या कामाचे अगदी मोकळेपणाने कौतुक करा.
जबाबदारी सोपवा
कर्मचारी अशा कामांवर अगदी जीव तोडून मेहनत घेतात,जे त्यांच्यावर सोपवलेले असते. त्यांना वाटत असते की, या आपल्यावर सोपवलेल्या कामाचे यश अथवा अपयश याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवा.जर तुम्ही जबाबदारीच सोपवली नाही तर तुम्हाला कसे कळणार की, कोणत्या कर्मचार्यामध्ये कोणती खुबी आहे.
निर्णय प्रक्रियेत घ्या
जर माणसाला फक्त आदेशच मिळत राहिले तर तो कंटाळतो, तो स्वत: ला बंदीवान समजायला लागतात,हा माणसाचा स्वभाव गुणधर्म आहे.असे एंप्लॉइ काहीही नवीन करण्याच्या फंदात पडत नाहीत. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीतून कंपनीला वाचवण्यासाठी आपल्या एंप्लॉइज मंडळींना कोणत्या ना कोणत्या स्तरावरच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या. त्यामुळे त्यांना आनंद वाटेल. आणि मोठ्या उत्साहाने काम करतील.
थोडी सवलत द्या
कडक नियम आणि कायद्यामुळे हुकूमशक्ती चालू शकते,मात्र वर्कस्पेसची क्रिेटीविटी अशा वातावरणात प्रभावीत होते. एंप्लॉइजना कंपनीमध्ये काही गोष्टीत सवलत द्यायला हवी. यात वर्क फ्रॉम होम, त्यांना सवलत देणारी शिफ्ट, आवडीचा वीकली ऑफ आदींचा समावेश आहे.
याशिवाय एंप्लॉइज मंडळींना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही त्यांच्या उर्वरित कुटुंबांच्या सदस्यांसमवेत एकाद्या पार्टीचे आयोजन करू शकता. आणि त्याठिकाणी चांगले काम करणार्या एंप्लॉइजला गिफ्ट देऊ शकता. आपल्या लोकांसमोर मिळालेला पुरस्कार त्यांना स्फुर्ती देऊन जातो. घरच्या लोकांसमोरही त्यांची इमेज सुधारण्यास मदत होते.

बदलाच्या दिशेने फॅशन फॅब्रिक इंडस्ट्री

      एक गोष्ट आपल्याला माहित आहे, पुढे जायचे असेल तर बदल गरजेचा आहे. जर एकादा माणूस एकसारखे जीवन जगू लागला आणि त्यात बदल झाला नाही तर त्याचा विकास,प्रगती थांबणार आहे. हीच गोष्ट बिझनेस आणि अन्य कोणत्याही बिझनेस इंडस्ट्रीजच्याबाबतीत लागू होते. जोपर्यंत कोणतीही बिझनेस इंडस्ट्री आपल्या कस्टमर्सच्या डिमांडनुसार स्वत:मध्ये बदल करत नाही,तो पर्यंत ती प्रगती करू शकणार नाही. आजच्या परिस्थितीत फॅशन फॅब्रिक इंडस्ट्रीदेखील अशाच एका बदलाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.जगात हळूहळू वीगन लेदरची म्हणजे जे लेदर जनावरांच्या कातड्यापासून बनवले जात नाही, याची मागणी वाढत आहे.लँड रोवर,टेस्ला,एचएंडएम आदी दिग्गज कंपन्यांदेखील जनावरांना वाचवण्यासाठी या नव्या बिझनेसचे समर्थन करत आहेत. लँड रोवरचे संचालक गॅरी मॅकगवर्न यांचे म्हणणे असे की, स्वत:पुरते म्हणाल तर आम्ही भविष्यात लेदरपासून दूर जाऊ इच्छितो.लेदरसाठी जनावरांना मारणे आपल्याला पसंद नाही.फॅशन जगतातला प्रसिद्ध रिटेलर एचएंडएमदेखील अशाच एका कंपनीसाठी फंड देत आहे,जी वाईनपासून लेदर बनवत आहे. आपण इथे वीगन लेदर स्टार्ट अप्सबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

द्राक्षे( ग्रेप्स)
वाईन लेदर एक लेटेस्ट इनोवेटीव मेटिरियलच्या रुपात उभा राहात आहे.याला द्राक्षांच्या सॉलिड रिमेन्सवर प्रोसेस करून बनवले जात आहे. हा पूर्णपणे नैसर्गिक आहे. वाईन बनवताना फेकून दिलेल्या द्राक्षांच्या साली,स्टॉक्स आणि बियांपासून लेदर बनवले जात आहे. हा लेदर बनवणारी एक स्टार्टअप्स  VEGAEA  कंपनी आता फर्निचर,बॅग्स,कपडे आदींचे सँपल बनवत आहे.
सफरचंद (ॅपल)
ॅपल लेदरमध्ये सफरचंदाच्या अशा भागाचा वापर केला जात आहे, जो साइडर प्रोसिंग प्रोसेसदरम्यान राहतो. हे मटेरियल शंभर टक्के बायोडीग्रेडेबल आहे. पेटाद्वारा स्वीकृत कंपनी THE APPLE GIRL ने ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या कोपनहेन साइडर फेस्टिवलसाठी अॅपल लेदरपासून रिस्टबँड्स बनवण्याची आपली पहिली ऑर्डर पूर्ण केली होती.हे प्रोडेक्ट पूर्णपणे नैसर्गिकरित्या नष्ट केले जाऊ शकते.नैसर्गिक नुकसानही होत नाही.
मशरुम
इटलीची GRADO ZERO ESPACE कंपनी वीगन टेक्सटाइल्स बनवते.ज्यात मशरुम लेदरचा (म्यूरिकन) समावेश आहे.हे मशरुम कॅप्सच्यामदतीने बनवले जाते,ज्यांना नॉन टॉक्सिक साम्रगीसोबत टॅन केले जाते. हे लेदर बायोडीग्रेडेबल असते.त्याचबरोबर सामान्य लेदरपेक्षा अधिक मऊ असते. पाण्याचा याच्यावर सहजासहजी  परिणाम होत नाही.याचा वापर बेल्ट,पर्स,शू सोल्स आदी वस्तू बनवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
पेपर
एक कंपनी अशी आहे, जिचे नाव PAPER NO.9 आहे,ही कागदापासून लेदर बनवत आहे. ही कंपनी कित्येक रंगांमध्ये,टेक्सचर्स आणि इफेक्टससह वीगन पेपर लेदर बनवित आहे. हा या कंपनीचा सिग्नेचर टेक्सटाइल आहे आणि पूर्णपणे नॉन-टॉक्सिक,फ्लास्टिक फ्री आहे. ऑर्डर दिल्यावरच लेदर बनवले जाते. हा पेपर लेदर रीसाइकल्ड पेपर,फॅब्रिक,नॅचरल ग्लू,वॅक्स,ऑयल आदीपासून बनवला जातो.
मका (कॉर्न)
फिल्ड कॉर्नच्यामदतीनेदेखील लेदर बनवले जात आहे. CORONET  नावाची कंपनी बायो पॉलियोल्स पॉलिमर बनवते. हे बनवताना डायऑक्साइड निघतो. यामुळे हा पर्यावरणाला हानिकारक नाही. फिल्ड कॉर्न मनुष्य खात नाहीत,त्यामुळे याचा परिणाम एडिबल कॉर्नवर पडत नाही.
कोमबुचा चहा
हा चहा फक्त हेल्दी ड्रिंक नाही तर याचा वापर वीगन लेदर बनवण्यासाठीही केला जात आहे. LOWA STATE UNIVERSITY च्या संशोधकांनी आणि जर्मन स्टार्टअप  SCOBYTEC च्या एंटरप्रेन्योर्स आता कोमबुचा चहाचा वापर करून वीगन लेदर बनवत आहे. या लेदरला TEATHER  म्हटले जाते. अर्थात या मटेरियलची अजून टेस्ट घेतली जात आहे. याशिवाय कोमबुचा बेस्ड मिश्रणापासून बनवण्यात आलेले हार्वेस्टिंग फायबर्स चांगले परिणाम दाखवत आहेत.
अननस (पायनापल)
यू के आणि स्पेनच्या  ANANAS ANAM कंपनीने एक असे खास मटेरियल बनवले आहे,ज्याचे नाव पिनेटेक्स आहे. हे मऊ आणि फेक्सिबल आहे. यावर प्रिंट केले जाऊ शकते. हे कापले आणि शिवलेही जाऊ शकते. यामुळे याचा वापर फुटवियर,फॅशन एसेसरीज,होम फनिंशिंग, ऑटोमेटीवसाठी इंटीरियर आणि र्यरोनॉटिक्स इंडस्ट्रीमध्ये केला जाऊ शकतो.हे मटेरियल अननसच्या पिकाच्या बायप्रोडक्टसपासून बनवले जाते.
कॉर्क
पोर्तुगालचे PELCOR चे एक ब्रँड कॉर्क स्किन बनवते. हे वजनाने हलके असते. त्याचबरोबर फ्लेक्सिबल,वाटरप्रूफ आणि इंस्यूलेटिंगही असते.ही कंपनी कॉटन बेकिंग्स,पॉलिएस्टर कोटेड पॉलियूरिथेन किंवा नॉयलॉनसह कॉर्क देते. या कॉर्क स्किनला बनवण्यासाठी कॉर्क ओकचा वापर केला जातो.
जर तुम्हाला फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये काही नवीन करायचे असेल तर तुम्ही वीगन लेदर बनवू शकता. बर्याच कंपन्या वेगवेगळ्या नैसर्गिक वस्तूंपासून हे लेदर बनवत आहे. भविष्यात अशाप्रकारच्या लेदरला अधिक मागणी वाढू शकते.

Thursday, September 21, 2017

आरोग्य कोंबड्यांचे!

     कुक्कुटपालन व्यवसाय किफायतशीर आहे.अंडी,मांस उत्पादन घेण्यासाठी उत्तम प्रतीचे पक्षी,त्यांच्या प्रकार आणि वयानुसार आवश्यक संतुलित खाद्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे   महत्त्वाचे आहे.  पक्षांचे आरोग्य    रक्षण आणि  त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेतसाफसफाई,  लसीकरण,जैविक सुरक्षा   याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  पक्ष्यांना त्यांच्या    प्रकाराप्रमाणे वयाप्रमाणेउत्पादनक्षमतेप्रमाणे  वेळोवेळी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे,त्या त्या गोष्टी वेळच्यावेळी करायला हव्यात.  महत्त्वाचे  म्हणजे योग्य व्यवस्थापनाने या गोष्टी करता येतात आणि त्यांचे आरोग्य सांभाळता येते. त्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्यांच्याकडून उच्चतम उत्पादन मिळते. फक्त रोगामुळे अकाली मृत्यू मात्र कुक्कुटपालकांना न परवडणारी गोष्ट आहे.

     ज्या परिसरात पोल्ट्री शेड आहे,त्या पाच मीटरपर्यंतचा परिसर मोकळा आणि स्वच्छ हवा. शेडच्या बाजूने पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही,याची दक्षता घ्यायला हवी.पोल्ट्री शेडच्या छपरास छिद्रे असल्यास ती मुजवून घ्यायला हवीत,म्हणजे पावसाचे पाणी आत येणार नाही.त्याचबरोबर खाद्याची भांडी कोरडी राहतील,यादृष्टीने लक्ष द्यायला हवे. पावसाळ्यात शेडमधील गादी (लिटर) दमट वातावरणामुळे ओलसर होऊन कडक होते. त्यासाठी नवीन गादी थर द्यावा.(उदा.लाकडी भुसा).लाइम पावडरचा वैगेरे वापर केल्यास लिटर कोरडे राहण्यास मदत होते,मात्र लिटरचा थर ओलसर राहिला तर शेडमध्ये दमट वातावरण तयार होऊन कोंबड्यांना कॉक्सिडिओसिस, जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा लिटर हलवून घ्यायला हवे.
आरोग्य व्यवस्थापन
कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगास कोंबड्या बळी पडतात.पिले तर लवकरच त्याच्या कह्यात जातात. हवा,पाणी आणि खाद्याच्या माध्यमातून बुरशी पक्ष्यांच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे पक्ष्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागतो.हे टाळण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता. शेडच्या आसपास डास,माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. शिवाय खाद्यदेखील कोरडे असायला हवे.शेडमध्ये पुरेशी जागा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हवा खेळती राहते.
आहार व्यवस्थापन
कोंबड्यांना दिले जाणारे खाद्य कोरडे असायला हवे. पावसाळ्यात आर्द्रता वाढते,त्यामुळे साठवून ठेवलेल्या खाद्यावर अफ्लाटॉक्सिन बुरशी वाढते. ओलसर किंवा भिजलेले खाद्य असेल तर त्यावर बुरशी लगेच वाढते.हे खाद्य कोंबड्यांना दिल्यास त्यांना अफ्लाटॉक्सिस बुरशीची आणि माईकोटॉक्सिसची विषबाधा होते.याचा परिणाम अंडी उत्पादन कमी होण्यावर होतो.मांसल पक्ष्यांची वाढ थांबते. तसेच लिव्हर ट्यूमरसारखे आजार होऊन कोंबड्या मरतात.
खाद्य गोणी जमिनीपासून काही अंतरावर उंचीवर ठेवावेत.त्यासाठी खास सोय केल्यास उत्तमच! साधारण एक फुट उंचीवर ती ठेवावीत. त्यासाठी लाकडी फ्लॅटफॉर्मवर तयार करावेत. साठवलेली जागा ओली होणार नाही,याची काळजी घ्यायला हवी. समजा दमट वातावरणामुळे खाद्य ओलसर झाल्यास ते बुरशी लागण्याअगोदरच उन्हात सुकवून घ्यायला हवे.ओल्या बॅगेचा वैगेरे वापर साठवणुकीसाठी करायला नकोमहत्त्वाचे म्हणजे खाद्यात योग्य प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट मिसळलेले असले पाहिजे. त्याचा परिणाम खाद्याची टिकवण क्षमता वाढण्यास मदत होते.पावसाळ्यात अधिक प्रमाणात खाद्याचे साठवण करू नका. खाद्यात गाठी झाल्यास ते कोंबड्यांना देणे हितकारक नाही.
पाणी व्यवस्थापन
प्राणी असो किंवा पक्षी त्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हायला हवा.त्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष द्यायला हवे.दूषित पाणी पिल्याने कोंबड्यांना कॉलरा,जुलाबसारखे आजार होतात.पावसाळ्यात पाणी निर्जंतूक करून त्याचा वापर करा. यासाठी तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घ्यायला हवा.