Wednesday, September 6, 2017

हसण्याने बात बनती है,बॉस!

     नेहमी लोकं म्हणताना ऐकला असाल की, लाफ्टर इज द मेडिसिन म्हणजेच तंदुरुस्त राहण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. हसणे ही एक  स्वाभाविक आणि नैसर्गिक क्रिया आहे. अर्थात याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. उलट काही संशोधन सांगतात की, मनमोकळ्याने हसल्याने एंडॉर्फिन नावाच्या हार्मिनची निर्मिती होते.एंडॉर्फिन एक नैसर्गिक वेदना निवारक आहे. एंडॉर्फिन आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका वटवत असते. एवढेच नव्हे तर याच्यामुळे चेहर्यावर तणाव किंवा चिंता यांच्याऐवजी हास्य फुलतं. आपला मूड चांगला राहण्यासाठी चांगला उपयोग होतो. रोगप्रतिकारक शक्तीदेखील बळकट होण्यास मदत होते.
19 प्रकारचे हास्य

सॅन फ्रांसिस्कोमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार  शोधकर्त्यांनी 19 प्रकारचे हास्य आपल्या चेहर्यावर उमटतात, असे सांगितले आहे.यातला पहिला महत्त्वाचा हास्यप्रकार म्हणजे सोशल स्माइल,ज्यामुळे हसताना काही मांसपेशींचा उपयोग होत असतो.दुसरा प्रकार म्हणजे फेल्ट स्माइल. यात चेहर्याच्या दोन्ही भागातील बहुतांश मांसपेशींचा उपयोग केला जातो.
जन्माच्यावेळीसच मुले हसायला शिकतात. बहुतांश डॉक्टरांचे म्हणणे असे की, चार ते सहा आठवड्याच्या मुलांचे हास्य आपल्याला तो झोपेतून उठल्यावर त्याच्या चेहर्यावर पाहायला मिळते. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे जन्माला आल्यावर लगेच झोपेत मूल हसायला लागते.
आपण आरसा पाहतो, त्यात आपल्याला आपली प्रतिमा पाहायला मिळते. जगातले वास्तव आहे, ते आरशात पाहायला मिळते. हे रिफ्लेक्शन आपल्या विचार, भावना आणि जाणिवांचे असते. ज्यावेळी तुम्ही हसता,त्यावेळी तुम्ही आजूबाजूलादेखील आनंद रिफ्लेक्ट करत असता. जो हसतो,तो सकारात्मक राहतो. त्याच्यासाठी मोठमोठ्या समस्या, अडचणी अगदी छोट्या छोट्या बनतात. उदास माणसे आपल्या आजूबाजूला उदासी पसरवतात. अशा लोकांशी संगत कोणालाच नको असते. आनंदी माणसांचा लोक आदर करतात.
काही आरोग्याच्या गोष्टी:
1.हसणे-हसवण्याने डायफ्राम प्रसरण आणि आंकुचन पावतं.यामुळे फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन सामावून घेण्यास मदत होते.यामुळे शरिरात सातत्याने प्रक्रिया होत असते आणि यामुळे हृदय रक्त वेगाने पंप करू शकते. अशा परिस्थितीत शरिरातील रक्ताचे अभिसरण योग्य प्रकारे होत राहतं.
2.हसण्याने इम्यून सिस्टिमला बळकटी मिळते.यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. ज्यावेळेला तुम्ही हसता,त्यावेळेला शरीर खूपच अधिक रिलॅक्सपणा अनुभवतं. यामुळे मानसिकदृष्ट्या बळकटी मिळण्याबरोबरच आत्मविश्वासदेखील वाढतो.
3.हसण्याने मेंदूचे डावे आणि उजवे दोन्ही भाग सक्रिय होतात.स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. चिंता आणि व्यग्रता कमी होते. मानसिकदृष्ट्या रिलॅक्स राहिल्याने माणूस अधिक आनंदी राहतो.
4. हसल्याने चेहर्याबरोबरच शरिरातील संपूर्ण मांसपेशी प्रसरण पावतात. यामुळे आराम मिळतो. एरीर रिलॅक्स होतं.
5. हसण्याने ब्लड वेसल्सची कार्यक्षमता सुधारते.रक्तप्रवाह वाढतो. यामुळे हार्ट अॅटॅक आणि अन्य कार्डियोवॅस्कुलरसारख्या समस्या निर्माण होत नाहीत. यापासून तुमची सुटका होते.
6. जिममध्ये तासनतास घाम गाळला जातो. घरीदेखील व्यायम केला जातो,तरीही वजन कमी होत नाही. पण थोडा वेळ हसून पहा. एका अभ्यासानुसार एका दिवसात 10 ते 15 मिनिटे हसल्यास जवळपास 40 कॅलरी कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की, तुम्ही एका वर्षात दोन ते तीन किलो वजन कमी करू शकता.
7. हा मोठ्या प्रमाणात कॅलरी खर्च करणारा एक नैसर्गिक व्यायाम प्रकार आहे. यामुळे मधुमेही लोकांनाही हसण्याने फायदा होतो.( स्त्रोत-अमर उजाला)

No comments:

Post a Comment