Tuesday, November 7, 2017

(शेतशिवार) ज्वारीचे नवे वाण एसपीव्ही-2307

     ज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे. ज्वारी हा गरिबांचा आहार असला तरी श्रीमंत मंडळी हटकून ज्वारीची भाकरी बाहेर कुठे जेवायला गेल्यावर मागून खातात. खरे तर आपल्या जेवणात आथवड्यातून चार-पाच वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा समावेश असायला हवा. संशोधन केंद्रे यात आणखी आरोग्यवर्धक आणखी गुणधर्म यावेत. पीक उत्पादन भरपूर यावे, त्याचबरोबर यातून जनावरांना चाराही भरपूर मिळावा,यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. सर्वाधिक पोषणमूल्य असलेल्या  ज्वारी या  शाश्वत पिकाची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-2307 ही ठोकळ दाण्याची जात नुकतीच विकसित करण्यात आली आहे.

     पोषणमूल्य सुरक्षा म्हणून, भारत आणि आफ्रिकेमध्ये उत्पादन घे तले जात असले, तरी ज्वारीमध्ये प्रथिने (काबरेहायड्रेड) सर्वाधिक असून, खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे. गहू, तांदळामुळे बद्धकोष्ठतेचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसते. ज्वारीत (फायबर) तंतूमय पदार्थ सर्वाधिक असल्याने ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. ज्वारीमध्ये असलेल्या निअॅसीनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय यात फायटो केमिकल्स असल्याने हृदयरोगही टाळता येतो. ज्वारीत असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे ब्लडफ्रेशर नियंत्रणात राहते.लाल पेशी वाढण्यास मदत होते.
     एसपीव्ही-2307 ही जात वैशिष्ट्यपूर्ण आहे. ठोकळ दाणे असलेले हे सरळ वाण असून  ज्वारीचे उत्पादन हेक्टरी 38 क्विंटल असून, पारंपरिक ज्वारी पेक्षा हे दीडपट आहे. या जातीपासून कडब्याचे उत्पादन 125 ते 140 क्विंटल आहे. उत्पादन, चारा भरपूर व भाकरीची प्रत उत्तम आहे. ही जात संपूर्ण देशासाठी प्रसारित करण्यासाठी कृषी विद्यापीठाने आयसीएआरकडे शिफारस केली आहे. अलिकडे दूध उत्पादन वाढवण्याकडे ग्रामीण शेतकरी भर देत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेती हा जुगार ठरला असल्याने निदान पुरक व्यवसायावर घरदार चालवण्याचा उद्देश लक्षात घेऊन शेतकरी दारात गायी-म्हैशी पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या चार्याचा प्रश्नदेखील सुटावा, हा दृष्टीकोन ठेवून पीक उत्पादन घेतले जात आहे. कृषी विद्यापीठेदेखील शेतकर्यांची ही गरज लक्षात घेऊन मानवी शरीराला ज्वारीची आणि त्याची वैरण जनावरांना उपयुक्त ठरावी, यासाठी नवी वाणांवर सतत संशोधन करत आहेत. यात अकोल्याचे कृषी विद्यापीठ आघाडीवर आहे.
     अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत 11 ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. आता जी एसपीव्ही-2307 ही जात विकसित केली आहे,ती राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस केली आहे. मागच्यावर्षीकल्याणीही जात प्रसारित केली गेली.  115 दिवसांत परिपक्व होणार्या  या ज्वारीचे हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. हेक्टरी 140 क्विंटल प्रथिनेयुक्त वैरणही मिळते. त्याचबरोबर याच कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सीएसएच-35 ज्वारीची जात अलिकडेच  भारतीय कृषी संशोधन परिषदेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केली. आणखी एक जात जीहुरड्याची लज्जत वाढविणारी ’ , ती पीकेव्ही कार्तिकीही जातदेखील या कृषी विद्यापीठाने महाराष्ट्राला दिली आहे.  82 दिवसांत हुरडा देणार्याकार्तिकीचे उत्पादन हेक्टरी 45 ते 48 क्विंटल आहेआणखी एक जात जी, रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे,ती एसपीएच-1801 जातही विकसित करण्यात आलीया ज्वारीचे उत्पादन 35 ते 38 क्विंटल आहे. तर वैरणाचे उत्पादनही 100 क्विंटल एवढे आहे.
     गहू,मका आणि तांदूळ यांची वाढती मागणी आणि त्यांचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन आता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक या ज्वारीच्या पिकाकडे आता वळू लागले आहेत. बिअरसारखी मद्ये तयार होत असतानाच ज्वारीपासून बिस्कीट, लाडू, पापड, ढिरडे असे अनेक उपपदार्थ बनविले जात आहेत. या पदार्थांचीही मागणी वाढत आहे.
आगामी काळातही ज्वारीकडे अनेकांचा मोर्चा वळणार आहे.

No comments:

Post a Comment