Saturday, November 11, 2017

आताचे दिवस फार वाईट आले आहेत

     आज जगभरात निराशावाद आळवला जात आहे. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या एका सर्व्हेक्षणात एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे, तिथले फक्त पाच टक्के लोक सगळ्यादृष्टीने विचार करता जगात पहिल्यापेक्षा आता चांगलं चाललं आहे. प्रगती होत आहे, असे म्हणतात. हीच गोष्ट अमेरिकेच्याबाबतीतही म्हटली जाऊ शकते. इथलेही फक्त सहा टक्के लोकच म्हणतात की, जगात सुधारणा होत आहेत. बाकीचे लोक निराशेने घेरले आहेत.आता पहिल्यापेक्षा अधिक अमेरिकन लोक ज्योतिष आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवायला लागले आहेत.

     आज कुणाला वाटतं, आजच्यासारखी परिस्थिती पूर्वी कधी नव्हती. आज माणसे खूप प्रगती करत आहेत. लोकांचं आरोग्य पहिल्यापेक्षा सुधारलं आहे. असमानतेत घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत लोक आज चांगले सुरक्षित आहेत. वगैरे वगैरे... इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहिले गेल्यास गरिबी, अशिक्षित, बालकामगार,शिशु मृत्यू, कुपोषण इत्यादीच्या सर्व क्षेत्रात अगोदरच्या तुलनेत बरीच सुधारणा झाली आहे. प्रगती झाली आहे. युद्धाची शक्यता, हुकुमशाही लोकांचे कारनामे, नैसर्गिक संकटे आदींमध्ये पूर्वीपेक्षा घट झाली आहे. पण तरीही या गोष्टीवर कुणी पटकन विश्वास ठेवायला तयार नाहीआपण सुरुवातीपासूनच काहीसे शंकेखोर आणि चिडचिडे आहोत. भिती आणि चिंताच आपल्या अस्तित्वाची साधने झाली आहेत. पूर्वीचे लोक अचानक येणारी वादळे आणि जीवभक्षकांपासून स्वत:चा जीव वाचवत राहिले, ते नवनव्या संकटांना आणि आव्हानांना शोधत राहिले. ते कधीच आरामात बसून जगात काय चालले आहे, हे पाहात बसले नाहीत. त्यांचेच जीन्स आपल्या रक्तात आहेत. हीच कारणे आहेत की, आपल्याला अपघात, संकटांच्या कथा ऐकायला, वाचायला बर्या वाटतात. सरळ, सुख-शांतीच्या बाता मारणार्या कथांमध्ये आपल्याला रस नाही. जरा लक्ष देऊन बघा, ज्या पुस्तकात हे जग बुडणार, वादळे येणार अशा कहाण्या आहेत, तीच पुस्तके अधिक विकली जात आहेत.
     जोहान नोर्बर्गच्या प्रोग्रेस: टेन रीजन्स टु लुक फॉरवर्ड टु द फ्युचर या पुस्तकात मानवतेच्या विजयाच्याबाबतीत फारच विस्ताराने लिहिण्यात  आले आहे.हे पुस्तक एकप्रकारे लोकांना इशारा देण्याच्या उद्देशाने लिहिण्यात आले आहे, असे म्हणायला हरकत नाहीआपण जी प्रगती केली आहे, त्याबाबतीत आपण ज्यावेळेला डोळे मिटून विचार करतो, तेव्हा ज्या समस्या उरल्या आहेत, त्यासाठी बळीचा बकरा शोधायला लागतो. कधी कधी पूर्वी आणि आतादेखील आपल्या देशाला पुन्हा महान बनवण्यासाठी आपण जनभावना भडकवणार्या बाजारू नेत्यांच्या आश्रयाला जात आहोत. आणि ते सोडवण्यासाठी ही माणसे आपल्याला सोपा मार्ग सांगताहेत. मग ते अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण असो, आयातीवर निर्बंध असो किंवा अनिवासी प्रवाशींचे निष्कासन असो इत्यादी. जर आपण विचार करत असू की, असे केल्याने आपले कसलेच नुकसान होणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या स्मरणशक्तीला दोष द्यायला हवा.
शंभर-दीडशे वर्षापूर्वी संपूर्ण युरोपात भीषण गरिबी होती त्याकाळी युरोपातल्या सामान्य मुलांना जे खायला अन्न मिळत होते, ते आज आफ्रिका आणि आशियातल्या सामान्य मुलांपेक्षा अधिक आणि चांगले मिळत होते. कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं की, साम्राज्यवादमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातात. मार्क्सच्या मृत्यूपर्यंत सामान्य युरोपीय व्यक्ती मार्क्सच्या जन्माच्या वेळच्या तुलनेत तिप्पट श्रीमंत झाले होते. या अगोदर कधी लोकांच्या परिस्थितीत सुधारणा झाली नव्हती. त्यापुढे 1981 मध्ये पाहिले तर चीनमध्ये दहापैकी नऊ लोक कमालीचे गरीब होते. आता दहापैकी एक व्यक्ती अशा परिस्थितीत आहेत. त्यावेळेला जगातल्या निम्म्या लोकसंख्येला शुद्ध पाणी उपलब्ध होते. आता 51 टक्के लोकांना उपलब्ध आहे.
     वैश्विक व्यापाराचा विचार केला तर त्यामुळे जगातल्या संपत्तीमध्ये अमर्यादित असा विस्तार झाला आहे.जाणकारांचे म्हणणे असे की, गेल्या तीस वर्षात म्हणजे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगात जेवढी संपत्ती वाढली म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे जीडीपी जितका वाढला, तितका त्या अगोदर अडीच वर्षांमध्येही कधी वाढला नव्हता. अर्थात हा अजिबात योगायोग नाही की, या वृद्धीबरोबरच जगभरातल्या देशांमध्ये लोकांकडून लोकांसाठी सरकार चालवण्यामध्येदेखील वृद्धी झाली आहेएक चतुर्थांश देशात पूर्वीफक्त निम्म्या देशांमध्ये लोकशाही होती, आता दोन तृतीयांश देशांमध्ये आहे.
     अच्छे दिन वर फक्त भारतातलेच नाही, जगभरातले लोक प्रश्नचिन्ह लावताना दिसतात. असे करण्यात प्रामुख्याने असे लोक आहेत, जे आपल्या वर्तमानात असंतुष्ट आहेत. फक्त तीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता जगभरात  सर्वच क्षेत्रात अपूर्व अशी प्रगती झाली आहे, हे ते विसरतात. उलट यामुळे आपण पहिल्यापेक्षा अधिक आरोग्यपूर्ण, सुरक्षित आणि आनंददायी जीवन जगत आहोत. आज जरी आपली गंगा मैली झाली असल्याच्या गोष्टी आपण करीत असलो तरी जगभरातल्या सगळ्याच नद्यांची अवस्था अशी झाली आहे. पण आता पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ पाणी मिळते आहे. आपल्याला स्वच्छतेची भावना पहिल्यापेक्षा अधिक येत आहे. झाडे-झुडपे यांच्याबाबतीतली आपली भूमिका बदलली आहे. आता झाडे लावली पाहिजेत, याचा विचार करू लागली आहेतच, शिवाय लोक आपल्या घरासमोर, दारात आणि फ्लॅटमध्येदेखील छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये रोपे लावताना दिसत आहेत. भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये जंगलांविषयी जागरुकता वाढली आहे.जंगले पुन्हा वाढू लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने भूपृष्ठावरील तापमान कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे.
     आज छोट्या-मोठ्या युद्धाच्या, संघर्षाच्या घटना वर्तमानपत्राच्या, इतर प्रसारमाध्यमांच्या ठळक बातम्या होत आहेत. यामुळेच आपण विचार करतो आहोत की, जगभरात हिंसाचाराने थैमान घातले आहे. आपण आज फक्त गृह- युद्धांच्याच गोष्टी करतोय, पण त्या युद्धांच्या गोष्टी विसरत आहोत, ज्या कोलंबिया, श्रीलंका, अंगोला आणि चाडमध्ये संपल्या आहेत. निश्चितच आंतकवाद्यांचे धोके नवीन आहेत, पण ही गोष्ट खरी आहे की, आता अशा घटनांमध्ये पहिल्यापेक्षा कमी लोक मारले जात आहेतया तुलनेत युरोप आणि अमेरिकेत आज एका सामान्य माणसाकडून मारल्या जाण्याचा धोका पहिल्यापेक्षा तीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. याला भारतदेखील अपवाद नाही.
असे म्हटले जाते की, आज सगळ्याच दृष्टीने लोक पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित, स्वास्थ्यपूर्ण, संपन्न आणि दीर्घायुष्य जीवन जगत आहेत. हे प्रमाणित करण्यासाठी आकडेही उपलब्ध आहेत. मग असे काय कारण आहे की, लोक अगोदर पेक्षा अधिक तक्रार करताना दिसतात? त्यांना का आयुष्य दुष्कर झाले आहे किंवा होत आहे, असे वाटत आहे? लोक आज भीती, हत्या इत्यादी गोष्टींची चर्चा अधिक करतात. आता हे स्वाभाविक आहे की, माणसे चांगल्या गोष्टी लवकर विसरून जातात आणि वाईट गोष्टी लवकर पसरवतात.
     आज आपण ग्लोबल मिडियाच्या युगात जगत आहोत. आज जागोजागी स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी बातम्या जलदगतीने प्रसार करणार्या गोष्टी पाहायला मिळतात. यांमध्ये फेसबूक, वॉट्सअॅप आदी सोशल मिडिया कार्यरत आहेत. यामुळेच कुठे काही घडले, नैसर्गिक संकटे आली किंवा मारामार्या,खूनाच्या घटना घडल्या की, त्या लगेच आपल्याला कळतात. अशा घटना मुख्य बातम्या होतात. यामुळे आपल्याला असा विचार करण्याची संधी मिळते की,अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. शिवाय या गोष्टी वारंवार ऐकायला आणि पाहायला मिळत असल्या कारणाने  आता या गोष्टी सामान्य झाल्या आहेत, असेही वाटायला लागले आहे. पूर्वीही अशा आणि याहीपेक्षा मोठ्या मोठ्या घटना घडल्या आहेत,पण त्या आपल्याला माहिती होत नव्हत्या किंवा उशिराने कळत होत्या. अर्थात त्यावेळेला आजच्यासारखी प्रसारमाध्यमे नव्हती.
     जुन्या गोष्टी आठवत राहणंदेखील जीव-विज्ञानसंबंधीत आहे. जसंजसे वय वाढत जाते, तसतसे आपल्यावरची जबाबदारी वाढत जाते.मग आपण विचार करतो की, पूर्वी आपण किती निश्चिंत आणि सुरक्षित होतो.वास्तविक प्रत्येक समाज आणि संस्कृतीच्या लोकांचे म्हणणे असे की, आजच्या लोकांमध्ये आई-वडील आणि आजी- आजोबांसारखी गोष्ट राहिली नाही. प्रश्न असा आहे की, आताचा काळ फारच वाईट आला आहे, हे वाक्य पहिल्यांदा कुणी म्हटले याचा! ते आजच्या कुणा नेता, विचारवंत, ज्ञानी व्यक्ती किंवा समाज सुधारकांनी म्हटलेले नाही, तर एका शतकापूर्वी एका अमेरिकी प्रोफेसरने इस्तांबूलच्या एका संग्रहालयात एका शिलालेखात कोरले होते. पुरातत्त्ववेत्त्यांनी तो शिलालेख इसवीसन पूर्व 3800 चा असल्याचे  मानले होते.

No comments:

Post a Comment