Tuesday, January 2, 2018

ऎकोऐकी 2

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं
आपोआप बनत जात......‘!!
****
हॅलो सर, तुमची कुत्रा हरवल्याची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली. आपणास कळवू इच्छित आहे की
तुमचा  कुत्रा आमच्या वृद्धाश्रमात तुमच्या वृद्ध आईवडिलांबरोबर खेळत आहे.‘
****
काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला   

बघितलं...
ना लॅपटॉप वर काम करत होता,
ना व्हॉट्सअॅप बघत होता, ना मेसेज.
फोनवर पण बोलत नव्हता आणि  सेल्फी पण
घेत नव्हता...
...नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता...
गावंढळ कुठचा !!!
****
घरी खोकल्याचं औषध पिताना
मुद्दाम तोंड वेडंवाकडं करावं लागतं
म्हणजे
घरच्यांना खात्री पटते की
पोरगा अजून बिघडलेला नाही...
****
एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालण्याच्या वेळी तिला नवर्या मुलाच्या
टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते, ‘तिडा तिडा
त्या आवाजाला घाबरुन नवरा मुलगा अजून जोरात
ओरडतो..
तुताय तुताय?
*****
टेक्नोलॉजीचे दुष्परिणाम
एक    पत्नी    सकाळी    सकाळी
अंथरुणातून  उठल्या  बरोबर  मेकअप
करायला     लागली     तितक्यातच
नवर्याला जाग आली.
नवर्याने विचारले, ‘तुला वेड बीड तर
लागले  नाही  नाइतक्या  सकाळी
सकाळी मेकअप?
पत्नी :
गुपचूप पडून रहा, मला माझ्या
फोनचा लॉक खोलायचा आहे
मी पासवर्ड म्हणून माझा चेहराच ठेवलाय आणि आत्ता तो रॉँग पासवर्ड
सांगतोय.
*****
चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो
चिंगी (चंप्याला):
अरे 5 वा प्रश्न दाखव की?
चंप्या  (खूप  विचार  करून):
का  तुझ्या  प्रश्नपत्रिकेत  छापला  नाही
का?




No comments:

Post a Comment