Monday, January 1, 2018

रजनीकांत अखेर राजकारणात

1 जानेवारी 2018
सामान्य प्रशासनाच्या एका परिपत्रकाने आता सरकारी नोकरीत राजकीय शिफारस शिस्तभंग ठरणार आहे. सरकारी सेवेत असलेल्या कर्मचार्यांनी त्यांच्या सेवेसंबंधीच्या कोणत्याही प्रकरणात वरिष्ठांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आणि त्यात तो सिद्ध झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणात प्रवेश केला. लवकरच नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली जाणार असून तामिळनाडू राज्यातल्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे तामिळनाडूच्या राजकीय पटलावर सत्ताधारी आणि विरोधक यांना तगडे आव्हान उभे राहणार आहे. सध्याची लोकशाहीची परिस्थिती काही चांगली नाही. राजकीय पक्ष यापूर्वीच स्थापन करून राजकारणात न उतरल्याने मी स्वत:लाच दोषी मानत आहे. लोकशाहीच्या नावे आमचे नेते आमच्याच जमिनीवर आम्हाला लुटत आहेत. आपल्याला मूळ सुधारावे लागणार आहे.मला जनतेचा 100 टक्के पाठिंबा मिळेल, असा विश्वासदेखील रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मात्र जाणकारांना तामिळ अस्मितेचा अडथळा येईल, असे वाटते. राज्यातील 234 मतदारसंघांमध्ये पक्षबांधणी करताना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात तरी रजनीकांत यांचा पक्ष दुसर्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याच्या तयारीत नाही. रजनीकांत यांनी पक्ष उभारला तरी कडवट तामिख अस्मिता आड येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.कारण तेथील बुद्धिवंतांचा एक वर्ग त्यांना तामिख मानत नाही.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, पाच प्रांत आणि दहा तहसीलदार कार्यालयातील सर्व शासकीय कागदपत्रे जनतेला ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी सुमारे 1 कोटी 6 हजार कागदपत्रांचे स्कॅन करण्यात आले आहे. लोकांना एका सेकंदात घरबसल्या ही माहिती उपलब्ध होणार आहे.

सांगली जिल्ह्यात डिसेंबर 2017 अखेर एकही पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू नाही. म्हैसाळ,टेंभू आणि ताकारी या उपसा सिंचन योजनांमधून जिल्ह्यातील 205 तलाव भरून घेण्यात आले आहेत

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या 850 ब्रास वाळूचा लिलाव काढून 51 लाख महसूल वसूल करण्यात आला आहे. वाळूला पर्याय म्हणून ग्रीड उपलब्ध होण्यासाठी दगड खाणींना तीन दिवसांत परवाना दिला जात आहे.
जलयुक्त शिवारची 2017 मध्ये 766 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. 161 प्रकल्पग्रस्तांना 104 हेक्टर जमीन देण्यात आली आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना 15 जानेवारीपर्यंत जागा देण्यात येणार आहे.

रॅपिड बुद्धिबख वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून सुवर्णपदक पटकावणार्या विश्वनाथन आनंदने वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबख स्पर्धेत कास्यपदक पटकावले.
आजचा सुविचार- आपली भिन्न मते सोदून विशिष्ट उच्च हेतूसाठी लोक एक होतात,तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात.-लोकमान्य टिळक

ॅपल बोरांना गोवा आणि अहमदाबाद या ठिकाणांहून मागणी आहे. सोलापूर,बारामती,सातारा भागातून पुण्याला या बोरांची आवक होत आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या बोरांना प्रतिकिलोला 15 ते 18 रुपये किलो आणि त्याहीपेक्षा कमी प्रतिच्या बोरांना प्रतिकिलो 12 ते 15 रुपये इतका भाव मिळत आहे. चमेली बोरास दहा किलोस 80 ते 110,उमराण बोरांना 35 ते 50 रुपये, चेकनट बोरास 280 ते 300 रुपये आणि चण्यामण्या बोरांना 350 ते 370 रुपये भाव मिळत आहे.पारंपारिक बोरांप्रमाणेच हिरवेगार, दिसण्यास आकर्षक, आकार मोठा आणि चवही चांगली असल्याने अॅपल बोर ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

सन 2016-17 मध्ये राज्यात 14 हजार 365 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 17 हजार 197 अर्भक मृत्यू पावले आहेत. या कालावधीत 1 हजार 217 मातांचाही मृत्यू झाला आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अहवालानुसार 61 लाख 11 हजार 450 बालकांचे वजन करण्यात आले. यापैकी सर्वसाधारण बालके 54 लाख 82 हजार 393 निघाली. तर मध्यम कमी वजनाची बालके 5 लाख 50 हजार 625 अढळून आली. 78 हजार 432 बालके ही धोकादायक अवस्थेतील निघाली.

No comments:

Post a Comment