Wednesday, April 18, 2018

थर्माकोलचे शौचालय अवघ्या दोन तासात


     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानला देशभरातून अनेक माणसे साथसोबत करीत आहेत. यामुळे अभियानाला चांगलीच चालना मिळाली आहे. अभियान यशस्वी होण्यासाठी अगदी गरीब व्यक्तींपासून श्रीमंत,उद्योजक हातभार लावत आहेत. यात पुण्यातल्या रामदास माने यांचादेखील समावेश आहे. गावातल्या स्त्रिया भल्या पहाटे आणि संध्याकाळी शौचास बाहेर पडतात. हे चित्र त्यांच्या मनाला वेदना देऊन गेल्या. यासाठी काही तरी करायचा, असा चंग बांधला आणि त्यांनी महिलांसाठी अगदी स्वस्तातली शौचालये उभारून दिली. थर्माकोलला सिमेंट कोटींग देऊन त्यांनी शौचालये उभारली. अलिकडेच त्यांनी 25 शौचालये मुलींच्या लग्नात त्यांना आहेरात भेट म्हणून दिली आहे. थर्माकोल बनवणार्या मशीनची निर्मिती करणारे रामदास माने यांचा 40 कोटींचा बिझनेस आहे. 22 हजारात निर्माण होणारे शौचालय बनवायला फक्त दोन तास लागतात. ना नफा ना तोटा या धर्तीवर ते शौचालय बनवत आहेत. सुमारे 22 हजार शौचालये त्यांनी भारतभर पाठवून दिली आहेत. त्यांच्या या कामांमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2016 मध्ये त्यांनी सेनिटेशन लीडरशीप अॅवार्ड आणि 2007 मध्ये लिम्का बूक ऑफ रिकॉर्डसमध्ये त्यांच्या कामाची नोंद झाली आहे.

      रामदास माने मूळचे सातार्याचे! त्यांची परिस्थिती सामान्य होती. ते लहानपणी आपल्या घरातल्या महिला शौचास गावाबाहेर जात असल्याचे पाहात आले होते. पहाटे आणि संध्याकाळी अंधारात महिलांचा गट करून जंगलाच्या दिशेने जात. त्यांना ते पाहून वाईट वाटायचे. जर महिलांना दिवसा शौचास जाण्याची भावना झाली तर त्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागायची. अर्थात ही गोष्ट मोठी त्रासदायक असते. अर्थात अशी परिस्थिती काही फक्त त्यांच्याच घरची नव्हती तर आजूबाजूच्या घरांचीही होती. त्याचवेळेला आपल्या मनाशी खूणगाठ बांधली होती की, आपल्या पायावर उभा राहिल्यावर पहिल्यांदा घरी शौचालय बांधेन. घरच्या महिलांना शौचास घराबाहेर जायला लागू नये. त्याचबरोबर समाजातील अन्य महिलांसाठी शौचालये बांधण्याचा निर्धार त्यांनी केला.
     शिक्षण घेताना त्यांना बर्याच अडथळ्यांशी सामना करावा लागला आहे.काही वेळा त्यांनी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. काही दिवस त्यांनी कंस्ट्रक्शन साईटवर मजुरीदेखील केली आहे. नंतर त्यांना पुण्यातल्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीत नोकरी मिळाली. काही काळ त्यांनी अगदी शांतपणे फक्त नोकरी एक्के नोकरी केली. मात्र त्यांच्या मनात सारखी वेगळे काही तरी करण्याची वावटळ उठायची. शेवटी त्यांनी आपल्या मनातील अंदर की बात ऐकली आणि 1994 मध्ये नोकरी सोडली. आणि थर्माकोल मशीन बनवण्याची कंपनी बनवली. विशेष म्हणजे या कामात त्यांची इतकी आवड निर्माण झाली की, ते त्यात पुरते रमून गेले.  सर्वात मोठी थर्माकोल मशीन बनवण्याच्या कारणामुळे 2007 मध्ये लिम्का बूक ऑफ रिकॉर्डसमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. त्याच वर्षापासून त्यांनी आपल्या लहानपणीच्या इच्छेला पूर्ण करण्याच्या दिशेने सुरुवात केली.
      2007 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्वच्छता अभियानची सुरुवात केली होती. राज्यातील पहिल्यांदा हागणदारीमुक्त गाव होईल, त्या गावाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाईल. ही त्यांच्यासाठी मोठी सुवर्णसम्धी होती. दीड वर्षात त्यांनी त्यांच्या गावात लोकांच्या मदतीने 198 शौचालये बांधली.  पुढच्या आठ दिवसांत त्यांना आणखी दोन शौचालये बांधायची होती,पण ते काम कठीण होते. कारण वीट, सिमेंट, वाळू आणि दरवाजे यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे एक शौचालय बांधण्यासाठी काही दिवस लागायचे. त्यावेळेला लोकांनीच त्यांना स्मार्ट टॉयलेट बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. कमी वेळेत ती व्हावीत, हा यामागचा उद्देश होता. शेवटी त्यांनी थर्माकोलपासून स्मार्ट टॉयलेट बनवायला सुरुवात केली. यात पहिल्यांदा थर्माकोलचा शौचालयाचा साचा बनवला जायचा, मग त्यावर सिमेंट काँक्रिट लावायचे. मग त्याला सुखवू द्यायचे. सहा तासात स्मार्ट शौचालय तयार व्हायचे. यात फक्त नळाची सुविधा नाही, यासाठी पाण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे करावी लागते. विशेष म्हणजे हे शौचालय एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाता येते. त्यामुळे ग्रामीण भागात आणि कंस्ट्रक्शन साइट्सवर या त्यांच्या स्मार्ट टॉयलेटला मोठी मागणी आहे.
     वास्तविक एक शौचालय बांधण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये लागतात. मात्र थर्माकोलचे स्मार्ट टॉयलेट उभारणीसाठी फक्त 13 हजार खर्च येतो. पण जर शौचालयाला टाइल्स, वॉश बेसिन इत्यादी बसवायचे असेल तर मात्र आणखी थोडा खर्च करावा लागतो. यासाठी 22 हजार खर्च येतो. थर्माकोलचे स्मार्ट टॉयलेट असले तरी टिकाऊ असते. त्यांच्या गावात खुल्या जागेत शौचमुक्त आणि थर्माकोलपासून स्मार्ट टॉयलेट बनवायला सुरुवात केल्यानंतर आज ते पूर्णवेळ हेच काम करतात. त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओवर आज 40 कोटींचा आहे.स्मार्ट टॉयलेटला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी 25 असे शौचालय नवविवाहित जोडप्यांना मोफत देऊन टाकले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment