Sunday, May 6, 2018

यशस्वी करिअरसाठी योग्य निर्णयक्षमतेची गरज


     तुमचा प्रत्येक निर्णय तुम्हाला काही ना काही शिकवतो किंवा तुम्हाला पुढे नेतो, मात्र हा निर्णय सर्वस्वी तुमचा असायला हवा. करिअरची निवडदेखील असाच महत्त्वपूर्ण निर्णय आहे, जो खूपच सावधपणे घेतला जायला हवा. आजच्या घडीला आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत आणि माहिती मिळवण्याची साधने आणि माध्यमेदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण तरीही करिअरच्या निर्णयाबाबत सर्वाधिक चुका होताना दिसत आहेत. जर तुम्हाला एकादे काम आवडते आणि ते करताना तुम्हाला आनंदही मिळत आहे,पण त्यामुळे म्हणावा असा पैसा तुम्हाला मिळत नाही, मग तुम्ही तेच काम करत राहणार का? खरे तर तुम्ही ते करू इच्छित नाही. ज्या कामामुळे तुम्हाला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करता येत नसतील तर ते काम का करावे, असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होईल. त्यामुळे हा निर्णय अगदी समजूरदारपणाने घेण्याची आणि यशाची पकड मजबूत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

करिअरचे लक्ष्य तुकड्यांमध्ये विभागा
तुम्ही ज्या दिशेने करिअर घेऊन जाऊ इच्छिता, त्याचे एक ध्येय निश्चित करायला हवे. हेच ध्येय तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील. तुम्हाला उत्साह देईल.त्या मोठ्या लक्ष्याचे छोट्या छोट्या लक्ष्यांमध्ये, ध्येयांमध्ये विभागणी करा आणि प्रत्येक लक्ष्याची एक वेळ निश्चित करा. हे सर्व त्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती घेऊन घेऊनच करायला हवे. त्यामुळे आपण हळूहळू ही छोटी छोटी ध्येये पूर्ण करत गेलो तर आपण स्वत: त्याने प्रेरित होऊ आणि तुम्हाला आणखी अधिक ऊर्जा मिळत राहील.
स्वत:चे आकलन पहिले पाऊल
स्वत:ला चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी एकट्याने काही काळ वेळ घालवा. सकाळी-संध्याकाळी किंवा शक्य असेल तेव्हा काही दिवसांसाठी तुम्ही स्वत: करता वेळ द्या. आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींसाठी तुमचे कौतुक झाले आहे? तुमचा स्वभाव कसा आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू इच्छिता? कोणत्या प्रकारची कामे तुम्हाला करायला आवडतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हा एका जागी किंवा वहीत लिहायला हवे आहे. आणि ते वारंवार स्वत: वाचायला हवेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वत:विषयी आणखी अधिक माहिती मिळू शकते.
निर्णयाबरोबरच उत्साह असायला हवा
माहितीच आपली शक्ती बनेल, ज्यावेळेला आपण निर्णय घेताना त्याचा योग्य प्रकारे उपयोग करू शकू. जो पर्याय आपण निवडणार आहात, त्यासोबत जाताना आपल्याला आनंद होईल, असेच क्षेत्र निवडायला हवे. तुम्ही क्षेत्रात जाणार आहात, तिथे यशाची शक्यता किती आहे, हे सर्व तुमच्या पक्क्या इराद्यांवर आणि त्याच्यासोबत उत्साह कायम ठेवणारी सवय निश्चित करेल.कोणताही निर्णय स्वत: महान असत नाही. काम करून त्याला महान बनवले जाते.
सखोल माहितीच यशाचा आधार
कोणत्याही क्षेत्राबाबतची माहिती त्याचा अभ्यास केल्याखेरीज कळत नाही. शिवाय त्याचा प्रत्यक्षात अनुभव नसतो.  यासाठी तुम्ही गुगल आणि काही चांगल्या वेबसाईटचा आधार घेऊ शकता.तिथे तुम्हाला करिअरला पर्याय, नवीन कोर्स आणि त्याचा अभ्यासक्रम याची माहिती मिळून जाईल.इथे तुम्हाला त्या कामाचा प्रकार कसा असेल आणि येणार्या काळात त्याबाबत काय काय शक्यता आहेत, या सगळ्यांच्या सखोल माहितीसाठी एकाद्या अभ्यासू, तज्ज्ञ लोकांशी संपर्क साधता येईल.
बदल आणि शिकण्याची कला
आजच्या घडीला बदल मात्र वेगाने होत आहेत.कोणताही करिअर विकल्प स्वीकारताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.येणार्या काळात त्यात काय काय शक्यता असू शकतील. पुढे जात असताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या बदलाची गरज भासेल, तेव्हा म्हणजे उदाहरणार्थ- त्यासोबतचा कोर्स, स्किल्स किंवा अन्य अॅडवान्स तंत्रज्ञान. तर अशा नव्या गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत. या क्षेत्रातील सेमिनार, वर्कशॉप,रिसर्च अशा गोष्टींशी सतत जोडले गेले पाहिजे.

1 comment:

  1. योग्य असे मार्गदर्शन केलेत..छान

    ReplyDelete