ये
जनता किंवा ग्राहक आपला पैसा सुरक्षित
राहावा म्हणून बँकेचा आधार घेतो. त्यामुळे त्यांच्या पैशांच्या
सुरक्षिततेची जबाबदारी बँकांची आहे. अलिकडच्या काळात ग्राहकांच्या
सोयीसाठी एटीएम बँकांनी सुरू केली आहेत. आणि त्यासाठी बँका नाममात्र
शुल्क आकारतात. परंतु अलिकडच्या काळात एटीएमची सुरक्षा धोक्यात
आली आहे. एटीएम फोडून पैसे लुटण्याचे, पासवर्डमध्ये
घोळ घालून अथवा अन्य
मार्गाने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. ग्राहकांसाठी ही योजना
लाभाची असली तरी त्याचे मोठे धोकेही दिसत आहेत. सुरक्षा गार्ड
असतानाही दिवसाढवळ्या चोर्या किंवा लुटीचे प्रकार होत आहेत.
ही बाब मोठी चिंताजनक आहे. आता या एटीएमची सुरक्षा
वाढवण्यासाठी म्हणजे सीसी टीव्ही बसवण्यासाठी वेगैरे लागणारा खर्च जो आहे तो बँका ग्राहकांच्याच
माथी मारणार आहे. यासाठी आता ग्राहकाला प्रत्येक व्यवहारामागे
6 रुपये मोजावे लागणार आहेत. खरे तर हा ग्राहकांवर
अन्याय तर आहेच पण उलट तो ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या मारलेला डल्ला आहे.
हा डल्ला मारण्याचे पाप बँकांनी करू नये.
ग्राहकाच्या पैशाच्या सुरक्षिततेची
संपूर्ण जबाबदारी बँकेची आहे. ग्राहकाला
आकर्षित करण्यासाठी बँका वाट्टेल त्या क्लृप्त्या करत असतात. योजना राबवत असतात. एकदा का ग्राहक जाळ्यात अडकला की,
त्या योजनांचा भुर्दंड बँका ग्राहकाच्या माथी मारत असतात. आताही हाच प्रकार सुरू आहे असे म्हणावे लागेल. प्रारंभी
काही काही बँकांनी नाममात्र
दरात तर काही बँकांनी शून्य बॅलेंन्सच्या दरात एटीएमची कार्डे दिली. नंतर मात्र त्यांनी ग्राहकांचे खिसे मारण्याचे धोरण स्वीकारले आहे.
याला ग्राहकांकडून कडाडून विरोध व्हायला हवा. एटीएम
केंद्राची सुरक्षा ठेवण्याची किंवा तिथे सुरक्षारक्षक वाढवण्याची अथवा सीसीटीव्ही कॅमेरे
बसवण्याची सगली जबाबदारी बँकीची आहे. बँका नफा कमवत असतात.
हा नफा स्टाफ वाढवण्याबरोबरच बँकांच्या भौतिक सुविधा आणि रक्षणासाठीच
वापरायला हवा.यातूनची याही गोष्टी कराव्यात. ग्राहकाच्या खिशातून पैसा काढणे,
हे प्रणत: चुकीचे आहे. एटीएमच्या
प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकाच्या खिशाला सहा रुपयाची कात्री लावण्याचा हा प्रस्ताव
रिझर्व्ह बँकेच्या पटलावर असला तरी रिझर्व्ह बँकेने त्याचा स्वीकार करू नये.
ग्राहकाला लुटण्याच्या या प्रकाराला आळा घातला जायला हवा. ग्राहकांनी या प्रस्तावाविरोधात आवाज उठवून आपली होणारी लूट थांबबावी.
आताच याला विरोध केला तर काळ सोकावणार आहे, याची
जाणीव सर्वच बँक ग्राहकांनी ठेवायला हवी.
No comments:
Post a Comment