Friday, September 28, 2012

'बंद'ची व्याख्या बदलतेय! भाग 2

     बंदच्या यशापयशाच्या दाव्या-प्रतिदाव्यात काँग्रेस व विरोधक दंग असले तरी यातल्या जनसहभागाचा, न सहभागाचा फारसा विचार केला जाणार नाही. त्याचे आकलन केले जाणार नाही. पण रिटेल व्यापारात परदेशी गुंतवणूक झाल्यास भारतातल्या व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल, या भीतीने व्यापारी संघटनांनी मात्र बंदला साथ दिल्याचे दिसते. त्यामुळे दुकाने बंद राहिली. वास्तविक राजकीय दिशेमुळे बंद किंवा हरताळ निश्चित होत नाहीत. ते दुसर्‍याच पातळीवर ठरतात. बंद यशस्वी होण्याला कारणेही स्थानिक पातळीवरची असतात.

     सध्या केंद्रीय पातळीवर राजकीय चित्र कमालीचे अनिश्चित आहे. काय घडेल याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. डिझेल, गॅस व एफडीआय लागू करण्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन देणार्‍या ममता बॅनर्जीनी पाठिंबा काढून घेतला आहे, पण ममतांच्या बाहेर पडण्याने काँग्रेस आघाडीचे काही बिघडणार नाही हे स्पष्ट आहे. मात्र खरी मदार मुलायमसिंग यादवांच्या 'सपा' आणि मायावतींच्या 'बसपा'वर अवलंबून आहे. तूर्तास सपाचा केंद्राला बाहेरून पाठिंबा आहे, तर मायावतीही आपले पत्ते 10 ऑक्टोबर रोजी खोलणार आहेत. मुलायमसिंग यादव कमालीचे चतूर आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी या पुढचा पंतप्रधान आघाडीचा असणार आहे, असे म्हटल्यापासून मुलायमसिंग यांची इच्छा उफाळून आली आहे. सर्वाधिक संख्येने खासदार असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या वाटय़ाला 40 जागा आल्यास आघाडीच्या कडबोळ्य़ात पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्य़ात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अगदी सावधपणे कुणालाही न दुखवता राजकीय गणित मांडण्याच्या कामाला लागले आहेत. त्यामुळेच त्यांचा 'वेट अँण्ड वॉच'चा पवित्रा आहे. आज जरी ते काँग्रेससोबत असले तरी निवडणुकीत किंवा निवडणुकीत त्यांच्यासोबत राहतील असे नाही. मात्र त्यांनी काँग्रेस विरोधकांनाही दुखवायचे नाही, असे ठरवले आहे. काँग्रेसचा लाभ तर घ्यायचा आणि उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा आणायच्या यावर मात्र त्यांचा भरवसा असल्याने आपले मन साशंकता निर्माण करणारेच ठेवायचे असा त्यांचा पवित्रा आहे. सध्या ते तिच भूमिका पार पाडत आहेत.

     महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता काँग्रेसविरोधात असली तरी त्याचा उचित लाभ भाजपाला घेता येईना. तिकडे तिसर्‍या आघाडीची मोट बांधण्याचे धाटत असले तरी तिथे मुलायमसिंह यादवांचीच प्रतीक्षा अधिक आहे. पण ते तर 'वेट अँण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे तिसर्‍या आघाडीची घडी बसते का? की विस्कटते याचा अंदाज बांधणे सध्यातरी शक्य नाही. भाजपा उसळी मारण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यात ताकदच उरली नाही. त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे ताकद क्षीण झाली आहे. भाजपाचा पंतप्रधानी चेहरा 'मोदीं'ना दाखवण्यावरून तिथे घमासान आहेच, पण एनडीएच्या घटक पक्षांनाही मोदींचा पंतप्रधानी चेहरा नको आहे. सध्या भाजपाच विस्कटलेली असल्याने त्यांना आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईनासा झाला आहे. म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारला जनता विटली असली तरी त्यांची जागा घ्यायला सक्षम पक्ष-आघाडी कोणीच नाही. अशा अवस्थेत मध्यावधी निवडणुका कोणाला हव्या आहेत. कारण भाजपाही पूर्ण क्षमतेने निवडणुकीला तयार नाही. या सगळ्य़ाचा अंदाज घेऊनच कदाचित काँग्रेस आघाडीने आर्थिक विकास धोरणांचे पत्ते फेकले असावेत, अन्यथा चारी बाजूंनी घेरलेल्या या पक्षात एवढी ताठरता, खंबीरपणा कसा आला, हे न उमजणारे कोडे आहे. बंद, हरताळपासून सामान्यजन लांब होत चालला आहे. यात त्यांचेच नुकसान आहे. त्याला महागाई, भ्रष्टाचार याची प्रचंड चीड आहे. पण ती व्यक्त करण्यासाठी वेळ नाही किंवा हवा तसा प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे भाजपाला बंद वगैरेच्या मागे न लागता सामान्यजनांना आपलेसे करताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांची गाडी सुटणार नाही, असे काही हिताचे निर्णय घ्यावे लागतील.

Thursday, September 27, 2012

'बंद'ची व्याख्या बदलतेय!

भाग 1
     केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णयांविरुद्ध बिगर काँग्रेस पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे तर बंदचा अक्षरश: फज्जा उडाला, तर ज्या राज्यांमध्ये भाजपासह काँग्रेसविरोधी पक्षांची सत्ता आहे, तिथे मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बिहार, उत्तर प्रदेशात तो कमालीचा यशस्वी झाला. याचा अर्थ आता 'बंद'सुद्धा लोकांच्या समर्थनावर नव्हे, तर राजकीय ताकदीवर अवलंबून राहू लागला आहे. मुळात सर्वसामान्यांना बंद वगैरेमध्ये अजिबात रस नाही. बंद पुकारण्यामागील कारण सर्वसामान्यांचे हित असले, तरी या बंदमुळे नुकसानही होते सामान्यांचेच! राजकीय लोकांना काय किंवा पक्षांना काय, बातम्यांमध्ये किंवा टीव्हीवर झळकायला मिळते इतकेच! यापुढे सर्वसामान्यांशी त्यांचे काही देणे-घेणे नसते. सत्ता मिळवणे आणि सत्तेचे लुप्त उठवणे, ही आता राजकीय पक्षांची फॅशन झाली आहे. देश, समाज विकास या केवळ गप्पागोष्टी झाल्या आहेत. नाहीत, तर कोळसा खाणी वाटपावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपाने काँग्रेसचे चर्चेचे प्रस्तावही फेटाळून संसदसुद्धा चालू दिली नाही. त्यामुळे देशहिताचे निर्णय पेंडिंग पडले. काँग्रेसही मुर्दाडपणे आपलाच हेका चालवत राहिली.
       वास्तविक या कोळसा खाणवाटपाची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. उशिराने का होईना यात अडकलेले मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, पण भाजपाने संसद अडवून काय साध्य केले हे मात्र कळू शकले नाही. संसद चालली नाही तरी देश चालत राहिला. आता डिझेल, गॅस आणि एफडीआयच्या विरोधात भाजपाने 'भारत बंद'ची हाक दिली. पण त्यांच्या राज्याव्यतिरिक्त अन्य कुठे भारत ठप्प झाला नाही. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने या बंदच्या काळात 'एफडीआय'संबंधी अधिसूचना काढून उलट भाजपाला झटका दिला. हा राजकीय खेळ चालवला असताना प्रत्यक्षात जनता इथे कुठेच नाही. जनता आपल्या रोजीरोटीसाठी धावाधाव करते आहे.

     'बंद' वगैरेसारख्या घटना म्हणजे सामान्य लोकांना 'मुसिबत'च ठरतात. यामुळे तोच अडचणीत येतो आणि सापडतो. आर्थिक फटकाही त्यालाच बसतो. ज्याच्यासाठी बंद पुकारायचा, त्यालाच वेठीस धरण्याचा प्रकार सामान्यांना कसा रुचणार बरे! रेल्वे किंवा सार्वजनिक परिवहन सेवा ठप्प झाल्याने गोची होते ती सर्वसामान्यांची! त्यामुळे सामान्यांना असल्या गोष्टीत अजिबात रस नाही. आजच्या घडीला रेल्वे असो अथवा परिवहन मंडळाच्या व्यवस्थेची तर्‍हा राजकारण्यांमुळे फारच विचित्र झाली आहे. त्याच्या तोटय़ांचा आकडा फुगतच चालला आहे. त्यामुळे मुसिबत ठरलेल्या व्यवस्था टाळण्याचा मध्यमवर्गीयांचा प्रयत्न अधिक दिसतो. स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यावर त्यांचा अधिक भर दिसतो. पण या व्यवस्थेशिवाय सामान्यांचे काहीच चालत नाही. मग ही माणसे 'बंद'च्या समर्थनासाठी कशाला रस्त्यावर उतरतील. पण राजकीय पक्षांचा बंद त्यांच्याच नावावर पुकारला जातो, हा मोठा विनोद आहे असे म्हणावे लागेल.

     सामान्यजनांची भूमिका बदलत चालली आहे. याला अनेक कारणे असली तरी सामान्यांना बंदबाबत अजिबात रस नाही, हे खरे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील डावे पक्ष सत्तेवरून पायउतार होत असताना शेवटी-शेवटी बंदच्या विरोधात गेले होते. डाव्यांपेक्षा लोकांना लुभावणार्‍या गोष्टी करण्यात आघाडीवर असणार्‍या ममता बॅनर्जीही रॅली, बंदच्या विरोधातच आहेत, पण कालच्या 'बंद'दरम्यान डाव्या आघाडीने पुन्हा आपला रोख बदलला आहे आणि बंदला पाठिंबा दिलाच, नव्हे त्यासाठी आव्हानही केले. परंतु इथे लोकांनी ममता बॅनर्जीनाच साथ दिली आणि बंद धुडकावून लावला.


पुण्यनगरी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर

Tuesday, September 25, 2012

दुष्काळ, महागाई हटू दे, बाप्पा!

     अधिक मासामुळे तू यंदा उशिरा आलास, पण भक्तांचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असा याचा अर्थ नव्हे देवा. ते तुझी वाट पाहतच होते. तू केव्हा येणार याची हुरहूर होतीच.
पण बाप्पा, तुला निरोप देताना मात्र आमची मोठी पंचाईत झालीय. पाऊस नाही. त्यामुळं पाणी नाही. दुष्काळी भागात सरकारनं टँकर सुरू केलेत पण त्यात टँकरवाला खेपा खातोय. पाण्यासाठी आमचे मात्र हाल होतायेत. आता तुला निरोप द्यायचा म्हणजे पाणी पाहिजे. पण पाणीच नाही तर तुला निरोप कसा द्यायचा. पण  बाप्पा, काळजी करू नकोस. तुला इथंच ठेऊन घेत नाही. बादलीत, काहिलीत तुझे विसर्जन करू. पण तुला तुझ्या घरी पाठवू. नाही तर पार्वतीअम्मा रागं करील. शंभो तर आम्हाला जाळून राख करील. पण बाप्पा जाताना वरुणराजाला बरसायला सांगायला विसरू नका. पावसाशिवाय आम्ही कल्पनाच करू शकत नाही.

     बाप्पा, वातावरण कसं आहेतुला ठाऊकच आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर सगळं कसं महाग झालं आहे. इतकंच काय तर तुझ्या आवडीचे मोदकही महागले. तुला खायला देताना आमची पार वाताहत झाली. पण बाप्पा, आम्ही पाहुणचारात कधीच कमी पडलो नाही, आणि पडणारही नाही. भारतीय संस्कृतीची महती तुला काय सांगावी लागते.
     पण आता सारं अवघड झालंय. मासिक बजेटचा पार 'भाजीपाला' झालाय. भाजीपाल्यामुळं आठवलं ! दुष्काळामुळं भाजीपालासुद्धा गायब झालाय. डॉक्टर म्हणतात, भाजीपाला का. आजार-बिजार होणार नाही. पण बाप्पा, आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार? तिकडे वाहतूक खर्च वाढला अन् सगळं महागलं.  विघ्नहर्त्या, तुला वाहण्यात येणारी फुलं अन् दुर्वाही महागल्या. कसं होणार रे सर्वसामान्यांचं
     मर्यादित सिलिंडरच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांनी धसकाच घेतलाय. घरात सात-आठ माणसं असतील तर कसं जाणार रे, एक सिलिंडर दोन महिने.  वर्षाला सहा सिलिंडर.. कसं होणार एकदंता ? वर्षाला १२ सिलिंडर देण्याची सद्बुद्धी सरकारला दे गणनायका. सर्वच तुझ्याकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारला निर्णय फिरवू दे गौरीपुत्रा !
रंग, वाहतूक महाग झाल्यानं मूर्तीच्या किमती वाढल्या, तरीही निस्सीम भावनेनं सर्वांनी तुझी आराधना केली. ही साधना-ही भावना तू स्वीकारशीलच. आता तू म्हणशील एवढं सगळं होतंय नी तुम्ही गप्प कसे? करतो आम्ही कधी-कधी 'बंद'. फुटतो आमच्याही भावनेचा बांध नि बिच्चार्‍या एसटीवर भिरकावली जातात दगडं. यात नुकसान होतं आमचंच. पण बाप्पा,  'बंद'मुळं आम्हा सामान्यांनाच आर्थिक झळ बसते. आम्ही आमचा सगळा राग  एसटीवर काढतो. तीही आमचीच. आमच्या करातूनच तिची दुरुस्ती होते. कात्री शेवटी आमच्याच खिशाला लागते. त्यामुळं बंद, निदर्शनं आमच्या हिताची नाहीत.  याचीही जाण ठेवण्याची बुद्धी संबंधितांना दे रे बाप्पा!  तेवढं पाण्याचं बघ, बाबा! पाण्यावाचून आमचं, आमच्या जित्रापांचं फार हाल चाललेत. परतीच्या मान्सूनमध्ये तरी पाऊस पेर बाप्पा. आणि महागाईच समूळ नष्ट करून, गरिबाला दोन वेळचं पोटभर अन्न आणि पाणी मिळू दे गणनायका !                        .                                                                                                               
 

Thursday, September 20, 2012

AmUr~mUrMm AmYmañV§^ hmo_JmS>©Mr Cnoj

m
     JUoemoËgd Agmo AWdm AÝ` gU -CËgd . nmo{bgm§~amo~a ~§Xmo~ñVmÀ`m doiobm Amnë`mbm AmUIr H$mhr dXuYmar _mUgo ^oQ>VmV, Vr åhUOo hmo_JmS>©g. AmUr~mUrÀ`m H$mimV hr _mUgo nmo{bgm§À`m _XVrbm YmdyZ `oVmV. H$m`Xm d gwì`dñWm A~m{YV amIÊ`mgmR>r AhmoamÌ PQ>Umè`m  `m hmo_JmS>© (J¥hajH$ Xb) g§KQ>ZoH$S>o _mÌ Eadr Hw$Ur nmhmV Zmhr. emgZhr Ë`m§À`mH$S>o Xþb©j H$aV Amho. Ago Agbo Var Ë`m§Mo ho AmUr~mUrVbo Ë`m§Mo `moJXmZ AÝ` `wdH$m§Zm àoaUmXm`r Amho. H$maU hr _§S>ir XoegodogmR>r Amnbo Zoh_rMo H$m_, àm§n{MH$ AS>Mur  ~mOybm gmoSy>Z emgZmÀ`m _XVrbm YmdyZ `oVmV. Ë`m§À`m H$m`m©H$S>o Ago Xþb©j H$ê$Z MmbUma Zmhr.
     VQ>nw§Á`m _mZYZmda hr _§S>ir Xoegodm, H$m`Xm d gwì`dñWMo, gmd©O{ZH$ _mb_ÎmoMo VgoM {d{dY gU - CËgd, {ZdS>UwH$m§_Ü`o  Amnbo H$V©ì` ~OmdVmV. Ë`m§Zm am̧{Xdg nhmam Úmdm bmJVmo. Aem `m hmo_JmS>©gMr n{hbr g§KQ>Zm 6 {S>g|~a 1946 _Ü`o ñWmnZ Pmbr. 66 dfmªnydu bmdÊ`mV Amboë`m `m Bdë`mem amonQ>çmMo énm§Va AmVm _moR>çm dQ>d¥jmV Pmbo Amho. hmo_JmS©  OdmZm§Zm AnmXJ«ñV (nya, Z¡g{J©H$ AmnÎmr) , {d_moMZ, A{¾e_Z, {Z: eó `wÕ, àW_monMma, Jmoir~ma, bmR>r_ma `mgmaIo AË`mdí`H$ gd© à{ejU XoÊ`mV `oVo. `mMr gmo` _w§~BVë`m KmQ>H$mona `oWrb _Ü`dVu à{ejU H|$ÐmV H$aÊ`mV `oVo. {edm` àË`oH$ dfu COiUr à{ejU {e~ra OdmZm§Zm XoÊ`mV `oVo. Ë`mMr gmo` Ë`m Ë`m {OëømÀ`m {R>H$mUr H$aÊ`mV `oVo. `mVyZ OdmZm§Zm AË`mYw{ZH$ amhÊ`mMm n[anmR> {_iV amhVmo.
     A{bH$S>o `m g§KQ>ZoV _moR>çm à_mUmV ~oamoOJma `wdH$ -`wdVr gm{_b hmoV AmhoV. H$mhrOU `mVyZM gamd H$ê$Z nmo{bg ^aVr hmoVmZm {XgV AmhoV. hmo_JmS>© hr godm Ë`mgmR>r Mm§Jbm n`m©` åhUyZ nwT>o Ambm Amho. gÜ`m H$V©ì`mda Agboë`m ehar OdmZm§Zm 150 én`o Am{U 50 én`o Cnhma^Îmm Agm EHy$U 200 én`m§Mm ^Îmm åhUOo _mZYZ {_iVo. J«m_rU ^mJmVrb OdmZm§Zm 150 én`o Am{U 125 én`o Cnhma ^Îmm Ago 275 én`m§Mo _mZYZ {_iVo. _mÌ ~§Xmo~ñV ZgVmo, Voìhm hr _§S>ir Amnbm ImgJr H$mhr Var ì`dgm` H$ê$Z Amnbm Am{U Amnë`m Hw$Qw>§~mMm CXa{Zdm©h H$aVmV. ~§Xmo~ñVmdoir Ë`m§Zm Amnbo ImgJr H$m_ ~mOybm gmoS>mdo bmJVo. EoZdoir Ho$ìhmhr ~mobmdUo `oV Agë`mZo ì`mnmar, CÚmoOH$ AWdm AÝ` ImgJr _mbH$ Ë`m§Zm H$m_mda R>odV ZmhrV. Varhr hr _mUgo Ë`mMr ndm© Z H$aVm Amnbo H$m_ MmoI nma nmS>rV AgVmV. na§Vw, `m _hmJmBÀ`m H$mimV gm_mÝ` _mUgm§~amo~aM hmo_JmS>©hr hmoaniyZ {ZKV Amho. Ë`mbm _moR>çm à_mUmV _hmJmBbm Vm|S> Úmdo bmJV Amho. Aem n[apñWVrV emgZmbm Ë`m§Mr X`m `m`bm hdr Amho. Iao Va AmUr~mUrÀ`m doiobm emgZmMm AmYmañV§^ åhUyZ hmo_JmS>©H$S>o nm{hbo OmVo, Ë`m§Mm CËgmh dmT>{dÊ`mgmaIo H$m_ emgZmZo H$aÊ`mMr Amdí`H$Vm Amho. emgZmZo Ë`m§Mo _mZYZ dmT>dbo nm{hOo.
     Ë`mM~amo~a emgZmZo nmo{bg ^aVrdoir d BVa R>am{dH$ {R>H$mUr hmo_JmS>©_Ü`o g§KQ>ZoV  gbJ  VrZ df} `eñdr[aË`m H$m_ Ho$boë`m OdmZm§Zm Ë`m Ë`m joÌmVrb AQ>r d {Z`_mZwgma 5 Q>¸o$ AmajU {Xbo Amho. ho Iao Va Ë`m§À`m g§KQ>ZoÀ`m àm_m{UH$ XoegodoMo \$i Amho. AmVm hmo_JmS>© ñd`§godH$ åhUyZ H$m_ H$aUmè`m `wdH$m§Zm e¡j{UH$ AQ> Xhmdr CÎmrU© Ho$br Jobr Amho. AJmoXa Vr AmR>dr nmg Aer hmoVr. XhmdrMr AQ> KmVbr Joë`mZo Ë`m§Mm gaH$mar godoV emgZmbm Cn`moJ hmoD$ eH$Vmo. `mMm {dMma emgZmZo {dMma H$aÊ`mMr Amdí`H$Vm Amho. emgZmZo Ë`m§À`m {Z:ñn¥h godoMo \${bV Úm`bm hdo.  Ë`m§À`m OrdZmV ñW¡`© `m`bm hdo, BVH$sM Anojm Amho.                                                 

Wednesday, September 19, 2012

प्रचंड ऊर्जेचं गावः रावळगुंडवाडी

     दुष्काळी जत तालुक्यातलं रावळगुंडवाडी गाव सध्या राज्यात झळकतं आहे. याच वर्षी मे महिन्यात गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. याअगोदर गावाने स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत, तंटामुक्त अभियान, आमच्या गावात आम्ही सरकार, निर्मल ग्राम अशा अनेक योजनांची तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावरची बक्षीसं पटकावली आहेत. गाव नवनव्या योजना राबवायला अजिबात थकत नाही की दमत नाही. गेली सात- आठ वर्षे हे गाव 'सिस्टिमेटिकली' चाललं आहे. इथे कुणाच्यात थकवा दिसत नाही. दमणं जाणवत नाही. गाव अविरत राबतंय. प्रचंड ऊर्जा असलेलं गाव प्रगतीची एक एक शिखरे पादाक्रांत करत आहे. प्रचंड क्रयशक्ती, बक्षीसं यामुळे गावात विकासाची गंगा वाहते आहे. 'स्वावलंबनाचा पाठ' देणारे हे गाव खर्‍या अर्थानं महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला गाव ठरला आहे. सध्या ऐन पावसाळ्यात जत तालुका दुष्काळाने होरपळत आहे. गावे तहानली आहेत. शेती उद्वस्त झाली आहे, असे असताना रावळगुंडवाडी मात्र दुष्काळातले 'ओआसिस' ठरले आहे. शिवकालीन पाणी साठवण योजनेमुळं गाव हिरवाईने नटले आहे. लोकांच्या ऊशाला पाणी आहे.
     आठ वर्षातला गावाचा कायापालट चकीत करणारा, थक्क करणारा आहे. गाव तसं शांततेचं भोक्तं आहे. गावातला भांडणतंटा आजपावेतो कधी पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला नाही. गावातला तंटा गावातच सोडवला जायचा आणि आजही सोडवला जातोय. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून म्हणजे १९६६ पासून गावात कधी निवडणुका झाल्या नाहीत. एकोप्याने गावाचा राज्यकारभार चालला. गावातल्या ग्रामदैवत श्री. महादेवाचे कृपेनं आजही कसं सारं गुण्यागोविंदानं आणि आनंदानं चाललं आहे. म्हणून तर इथली सोसायटी असो किंवा शिक्षण संस्था श्री. महादेवाच्या नावानंच चालल्या आहेत.  असं हे गाव २००४- ०५ पूर्वी मात्र इतर गावांप्रमाणे दुष्काळाला, पाणी टंचाईला तोंड देत होतं. सांगली जिल्ह्यातल्या पूर्वेकडेच्या टोकाला असलेल्या जत तालुक्यावर सदा निसर्गाची अवकृपा राहिली नाही. दुष्काळी पाचवीला पुजलेला. त्यात राजकारण्यांनीही तालुक्यातल्या जनतेला आश्वासनाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवलं. कृष्णेच्या पाण्याची आस लागून राहिलेल्या लोकांना केवळ पाण्याचा मृगजळच दाखवला. त्यामुळे इतर गावांप्रमाणे ऐन उन्हाळ्यात गावाला पाण्याचा टँकर लावलेला असायचा. नेमकी हीच नस पकडून नवख्या ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे यांनी २००४-०५ मध्ये गावातल्या सरकारी इमारतींवर शिवकालीन पाणी साठवण योजना राबवली. ८० हजाराचा हा प्रकल्प गावातल्या शाळा, ग्रामपंचायत, मंदिर यांच्या इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी अडवून गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिर आणि हातपंपांच्या पायथ्याशी सोडून दिले. याचा परिणाम असा झाला की, गावाला २००५-०६ मध्ये पाण्याचा टँकरच लावावा लागला नाही. तेव्हापासून २००९-१० पर्यंत गावाला पाणी कधीच कमी पडले नाही. केवळ चार सरकारी इमारतींवरील पडणार्‍या पावसाच्या पाण्याची अडवणूक करून ही किमया साध्य झाली होती. पण या जोरावर दरम्यानच्या काळात गावाने विकासाची घोडदौड सुरू केली. अनेक योजना गावात साकारल्या. बक्षिसांची खैरात झाली.
     २००६-०७ मध्ये निर्मल ग्राम यशस्वी करून दाखवून २ लाखाचे बक्षीस मिळवले. याच काळात जलस्वराज्य योजनेत गावात पाण्याची टाकी आणि जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. २००८-०९ मध्ये 'आमच्या गावात आम्हीच सरकार' ही योजना आली. यातून गावाने १० लाखाचे बक्षीस पटकावले. यातून ग्रामपंचायत सक्षमीकरणाच्या हेतूने ट्रॅक्टर खरेदी केला. १७ ठिकाणी सौरऊर्जेची पथदिवे उभारली गेली. महादेव मंदिरात २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात आली. यातून सण्-उत्सवाला बहार आला तर गावातल्या शाळकरी मुलांना रात्रीच्या अभ्यासिकेची मोठी सोय झाली.
     विविध विकास योजनांमध्ये हिरीरीने सहभाग घेतानाच बक्षीस पटकवायचेच, ही जिद्द, ईर्षा ऊरात ठेवली. माणसे अविरत काम करत राहिली. भांडण तंट्यांपासून अलिप्त असलेल्या गावाला २००८-०९ मध्ये तंटामुक्त अभियानातून २ लाखाचे बक्षीस मिळाले. यातून गावातले रस्ते, गटारी व अन्य सोयी करत गावाचा कायाकल्प चालला असताना गाव हिरवाईचा शालू नेसून नटलेल्या नवरीसमान दिसू लागले. गावाचा विस्तार, लोकसंख्या वाढ म्हणा किंवा गावाला 'ग्रीन टच' देण्याच्या प्रयत्नात गावाला पाणी कमी पडू लागले. मधल्या काळात आर्थिक, सामाजिक सुबत्तेकडे वाटचाल सुरूच होती. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या गरजेकडे दुर्लक्षच झाले. पण २००९-१० मध्ये गावाला भीषण पाणी टंचाईची झळ बसली तेव्हा गावाचे त्याकडे लक्ष गेले. पुन्हा सगळे पाण्यासाठी काही करण्याचा बेत करू लागले. तेव्हा २००४-०५ मध्ये राबवण्यात आलेला शिवकालीन पाणी साठवण प्रकल्प संपूर्ण गावासाठी राबवण्याची योजना आखली गेली. आणि गावातल्या प्रत्येक घरावर पडणारे पावसाचे पाणी अडवण्याचा प्रकल्प २०१०-११ ला प्रत्यक्षात साकार झाला. सगळ्या घरांवर पाणी अडवून ते पाईपलाईनद्वारा गावातल्या विहिर, कुपनलिकेच्या जवळ भूगर्भात सोडण्यात आले. कुपनलिकेजवळ दहा बाय दहा फुटाचे खड्डे काढून त्यात शोषपद्धतीने पाणी सोडणे आणि शुद्ध पाणी उचलणे असा प्रकल्प राबवला गेला. यासाठी १३ लाखाचा निधी खर्ची पडला. सरकार द्यायला दमत नाही आणि गावही घ्यायला कचरत नाही, असे चित्र राज्यात केवळ रावळगुंडवाडीत पाहायला मिळते. आता त्यामुळे गावाला पाणी कमी पडत नाही. विहिरी आणि कुपनलिकांना पाणी वरच्या पातळीवरच मिळते आहे. तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. १२० पैकी ९० टक्के गावे टँकरच्या पाण्यावर जगताहेत. तर काही गावातल्या लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पण रावळगुंडवाडी मात्र या कटकटीतून मुक्त आहे. केवळ पावसाचे पाणी अडवल्याने आणि ते मुरवल्याने ही किमया घडली आहे.  गावाची लोकसंख्या २ हजार ३१० आहे. गावासह वाड्यावस्त्यांवर नऊ कुपनलिका आहेत. एक विहिर आणि एक आड आहे. या सगळ्यांजवळ पावसाचे पाणी सोडण्यात आले आहे.
     गाव शंभर टक्के शौचालये आहेत. रस्ते चकचकीत आहेत. सध्या गाव 'इको- व्हिलेज' मध्ये आहे. गाव आणि गावाभोवतीचा परिसर हिरवाईने नटला आहे. सांडपाण्याच्या निचर्‍यातून बागा फुलवण्यात आल्या आहेत.  गावातील रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड, सांडपाण्यावर परसबागकचऱ्यापासून खत निर्मिती आणि गावांत सतरा ठिकाणी सौरउर्जा दिवे उभारण्यात आलेत. ग्रामविकासाच्या या कामांमुळे या गावाला अनेक बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे.  दारूबंदी आणि व्यसनमुक्त असलेल्या या गावानं आठ उताऱ्यात पती -पत्नीची संयुक्त नोंद केलीय.
     जलसंधारणाच्या कामांमुळे रावळगुंडवाडी गावातील शेतीही संमृद्ध आहे. १८७३ हेक्टर क्षेत्रफळ असणाऱ्या या गावात शाश्वत पाण्याची सोय झाल्यानं ९३ हेक्टरवर फळबागा उभ्या आहेत. शेततळ्यामुळे शेती पिकली आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलाय. या गावात १९ बचत गट आहेत. बचत गटांमुळे विकासाच्या कामाला जास्त गती मिळालीय.
     दुष्काळातल्या वाळवंटातला हा ओआसिस आता पर्यटकांच्या आकर्षणाचाही केंद्रबिंदू ठरला आहे. यशवंत पंचायत आणि ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाची धडक मारून आलेल्या या गावाने याच वर्षी स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. गावाच्या प्रचंड ऊर्जेची आणि सातत्यपणाची ही पावतीच म्हणावी लागेल. खरे तर अनेक गावे बक्षीसं घेऊन फुल मुरझावे तसे मुरझून गेली पण या गावाने प्रत्येक बक्षीसामागे नवी ऊर्जा धारण केली. आणि नव्या कामाला लागत गेले. गावाला मिळालेलं यश इथल्या लोकांच्या प्रचंड ऊर्जेत आहे, असे खात्रीने म्हणावे लागेल.                                                                                                            - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

बालकथा नरकाचा दरवाजा

एकदा एका सैनिकाला वाट्लं, स्वर्ग आणि नर्क यातला फरक जाणून घ्यावा. तो एका सत्पुरूषाकडे गेला. त्यानं त्यांना विचारलं," बाबा, स्वर्ग -नर्क म्हणतात, ते वास्तवात खरंय का निव्वळ कल्पनांचा खेळ आहे." सत्पुरुषानं विचारलं,'' तू काय करतोस?'' सैनिकाने आपल्या कामासंबंधी माहिती दिली. सत्पुरूष मग त्याला झिडकारत म्हणाला," तू, आणि सैनिक? शक्यच नाही. तुला सैनिक कोण म्हणेल? तू तर मुलखाचा भित्रा दिसतो आहेस. आणि ते तुझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं आहे."
      सत्पुरुषाकडून आपला झालेला अपमान सैनिकाच्या जिव्हारी बसला.  त्याचे पित्त खवळले. त्याने झटक्यात कमरेतली पिस्तुल काढली आणि सत्पुरुषावर रोखली. सत्पुरुष पुन्हा म्हणाला," म्हणजे तू पिस्तुलही  ठेवतोस तर. आणि या खेळण्याने मला का भीती दाखवतोस? मी थोडाच भिणार आहे. अरे मूर्खा, याने लहान मूलंही घाबरत नाही. माझं तर सोडूनच दे. आता मात्र सैनिकाच्या क्रोधाचा लगाम सुटला. त्याने पिस्तुलाच्या घोड्यावर बोट ठेवले आणि तो ओढणारतोच, सत्पुरुष म्हणाला,"थांब! हाच बघ तो नर्काचे प्रवेशद्वार." सत्पुरुषाच्या बोलण्यातला मतितार्थ समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याला घडल्या प्रसंगाचा पश्चाताप झाला. तो पटकन सत्पुरुषाच्या पायाशी बसला. आणि अश्रू ढाळत माफी मागू  लागला.
     त्याच्या पाठीवरून हात फिरवत सत्पुरुष म्हणाला," आणि हे स्वर्गाचे दारही उघडले बघ." स्वर्ग आणि नर्क या आनंद दु:खाच्याच अवस्था आहेत. आपण शांतपणे आपले कार्य करत राहतो, ती स्वर्गाची अनुभूती असते, तर आपण स्वतः ला विसरून  क्रोधाच्या आहारी जातो, तेव्हा नर्काची अनुभूती असते. ज्यावेळेला माणसाला राग येतो, त्यावेळेला मन अशांत होतं. अशांतता ही नरकासारखी क्लेशदायक असते. या अशांततेला आपण स्वतः च जबाबदार असतो. आणि ज्यावेळेला त्याची आपल्याला जाणीव होते, त्यावेळेला आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असतो.                                                                                        

Tuesday, September 18, 2012

एका वर्षाने मला पुष्कळ दिले...

      माझ्या 'ब्लॉग'ला आज एक वर्ष पूर्ण झाले. दिवस कसे गेले कळले नाही. एवढ्या कालावधीत लेखनही भरपूर झाले. तीनशेच्यावर लेख 'ब्लॉग' पडले. हे सगळे पाहिल्यावर माझे मलाच आश्चर्य वाटते आहे. एवढे असूनही खास 'ब्लॉग'साठी म्हणून मुक्त स्वच्छंदी लिहिता आले नाही. किंवा नंतर ते टाळण्याचाच मी प्रयत्न केला. कारण माझ्या 'ब्लॉग'वर जे काही विविध विषयांवर लेखन आहे, ते मी खास वृत्तपत्रांसाठी केलेले आहे. आणि त्या कोषातून मी बाहेर पडू शकलो नाही. मलाही हलकं-फुलकं, दैनंदिन व्यवहारातलं लिहावं, एखाद्या विषयावर चर्चा करावी असं वाटत होतं. पण वृत्तपत्रीय लिखाणात गुंगून गेल्यानं ते राहूनच गेलं. त्यामुळेच 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेखन वृत्तपत्रीय टाईपचे झाले आहे. आणि ते साहजिकच आहे. गेल्या २० वर्षांपासून वृत्तपत्रांशी संबंधीत असल्याने त्यांच्यासाठीच लिखाण होत गेले. 'ब्लॉग' वर प्रसिद्ध झालेले लेख किंवा बालकथा, कथा किंवा विनोदी चुटके कुठल्या ना कुठल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.
      मुळात माझ्या 'ब्लॉग'चा जन्मही त्याचदृष्टीकोनातून झाला. लिहिलेले लिखाण कुठे तरी शाबूत राहावे, या हेतूने ते 'ब्लॉग' वर टाकले गेले. मात्र हे होत असताना वाचकांनी कुठली तक्रार न करता ते वाचले आणि आनंदाने प्रतिक्रियाही दिल्या. कदाचित वाचकांचा माझा वृत्तपत्रीय 'टोन' लक्षात आला असावा. पण त्यांचा प्रतिसाद हुरुप देणारा ठरला. एका वर्षात वाचकांनी कल्पनेपलिकडे प्रतिसाद दिला. विविध वृत्तपत्रांनी आम्ही हा लेख आमच्या दैनिकात घेतोय किंवा मासिकात घेतोय, असे सांगून घेतला. वापरला. मी लिहिलेले लेखन वाचकांसाठी असल्याने तो अधिकाधिक वाचकांपर्यंत जावा, या हेतूने विचारणार्‍यांना सहज होकार देत आलो.
      माझ्या 'ब्लॉग'मुळे माझ्यापासून दूर असलेले माझे मित्र, विद्यार्थी, हितचिंतक भेटत पुन्हा यानिमिताने जवळ आले. आम्ही एकमेकांच्या लांब असलो तरी विविध विषयांवर चर्चा होत आली. त्यामुळे मला लिखाणाला स्फुरण चढले पण ते शेवटी वृत्तपत्राच्या ढंगानेच गेले. शेवटी माझाही नाईलाज होता. कारण मला वृत्तपत्रांसाठीच लिहायचे होते. आता मात्र वळून पाहताना 'ब्लॉग' म्हणून काही लेखन व्हावे, असे मनोमनी वाटत आहे. आणि तसा प्रयत्न यापुढील काळासाठी करणार आहे.
      माझ्या 'ब्लॉग' वर फार दिवस (म्हणजे तीन -चार दिवस) काही नवे दिसले नाही की, औरंगाबादच्या मनीषा चौधरी- वाघ यांच्याकडून हमखास विचारणा होते. त्याचप्रमाणे अनिल निकम (इस्लामपूर), जी. एम. ऐवळे (दरिबडची) ही मंडळीही सतत लिहिण्याविषयी हमखास दरडावयाची. आता तुझ्या 'ब्लॉग' ची सवय लागलीय, म्हणायचे. तर असो. या माझ्या मित्रांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल. वृत्तपत्रीय लिखाण असताना त्या माध्यमातून तर प्रतिसाद मिळतच असतो. पण या माध्यमातून मिळणारा प्रतिसादही माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे. कारण इतका मोठा प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. यातून आणखी एक जाणवते, ते म्हणजे संगणकाचा, मोबाईल नेटचा वापर अगदी खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हेच खरे! आणि माणसाने संगणक साक्षर व्हायलाच हवे. मीही एका खेड्यातला , दुष्काळी भागातला! जिथे औद्योगिकता नाही, रोजगार नाही. 'आयटी'सारख्या प्रशिक्षण संस्था  नाहीत. पण संगणकाने आपल्याला जवळ केले. हा खेड्यातला, शहरातला, देशातला किंवा परदेशातला असा कुठलाही निर्बंध राहिला नाही. जग 'एका हाकेच्या' अंतरावर असल्यासारखे भासते. कुठलीच सीमा आता राहिलेली नाही. घरबसल्या जग पाहता येतं, अनुभवता येतंयातून मला शिकागोतून मित्र मिळाला, तसाच अचकनहळ्ळीसारख्या खेड्यातून मिळाला, हे काय कमी आहे?

Sunday, September 16, 2012

मोठ्या संकटांना आमंत्रण देतेय सरकार

घोटाळे, भ्रष्टाचार आणि राजकीय संकटांनी आधीच घेरलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने डिझेल एकदम पाच रुपये प्रतिलिटर करण्याचे दुस्साहस करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण या सरकारने ते केलेच शिवाय गॅस सिलेंडरला आम आदमीपासून आणखी दूर नेण्याचा बंदोबस्त करून टाकला. एवढ्यावर थांबेल ते आघाडी सरकार कसले म्हणायचे. मल्टी ब्रँड रिटेलमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयालाही हिरवाकंदील दाखवून आपल्या कुठल्या पक्षाची फिकीर नाही, असाच पवित्रा घेतला आहे. आम आदमी महागाईच्या ओझ्याने अक्षरशः वाकला असताना असले आगीत तेल ओतणारे निर्णय घेऊन सरकारने सामान्य लोकांना अगदी भुईसपाट करून सोडले आहे. या सरकारला काय म्हणावे, असाच प्रश्न सगळ्यांपुढे पडला आहे.
     स्वतः सरकार घोटाळ्यांच्या आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांनी पुरली घेरली गेलेली आहे. लोकांची विश्वासाहर्ता पार गमावून बसले आहे. अशा बिकट परिस्थितीत लोकांवर आणखी महागाईचा बाँब टाकण्याचा सरकार उद्देश कळण्यापलिकडचा आहे. एवढे केल्यावर सत्तेतले घटक पक्ष आणि विरोधक कसे गप्प बसतील बरं! विरोधक सरकारला 'खाऊ का गिळू' अशा क्रूर नजरेने पाहात आहेत. जहरीली आग ओकणी सुरू आहे. सरकारात सामिल झालेल्या पक्षांबरोबरच बाहेरून पाठिंबा दिलेल्या समाजवादी पक्षानेही ओरड सुरू केली आहे. गुरुवारी (दि. २०) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यात सत्ताधारी गटातील आणि विरोधकही सामिल होणार आहेत. चोहोबाजूंनी घेरलेल्या 'लांडग्याच्या तावडीत सापदलेल्या शेळी' सारखी अवस्था झालेली असताना डिझेलच्या दरात भरमसाट वाढ आणि गॅसच्या सबसिडीत घट करण्याचा निर्णय सरकार कसे काय करू शकले, याचा आता तर्क्-वितर्क चालवला जात आहे. आजपर्यंत सहकारी पक्षांच्या दबावाला बळी पडत आलेले सरकार अचानक उसळी कशी घेत आहे. काय आहे, यामागचे गमकसामान्य जनांशी काही देणे-घेणे नाही, सत्तेची कुठली लालसा नाही. पुढच्या राजकीय भवितव्याची चिंता नाही, अशा कुठल्याही बाबीचे बंधन नाही, असे दाखवत अर्थ व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  कठोर निर्णय घेतले गेले. यात सर्वसामान्यांचे कंबरडे तर मोडून पडणार आहेच पण स्वतः सरकारची कंबरही शाबूत राहिल की नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे. महागाईचा बकासूर आपली भूक वाढवत चालला असताना दरवाढ करून त्याच्या तोंडी देण्याचा मार्ग सरकारने अवलंबला आहे.   या डिझेल दरवाढीने सर्व स्तरावर विपरीत परिणाम झाले असून विद्यार्थीवाहक गाड्यांनी आपली दरवाढ घोषित केली आहे. याची झळ सर्व अत्यावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर होणार आहे.
     गॅस सिलेंडरवरची सबसिडी उठवून महिलांच्याही शिव्याशाप सरकार घेत आहे. विरोधकांनी कोळसा वाटप प्रकरणावरून संसद चालवू दिली नाही. त्यामुळे जगापुढे आपल्या लोकशाही देशाचा वेगळा संदेश जात असताना सरकारने विरोधकांना आपल्यावर प्रहार करायला आणखी एक संधी दिली आहे. सरकार चालवणारी माणसे महागाई नियंत्रणाचे उपाय शोधायचे सोडून भाववाढीवर विसंबून राहण्याइतकी निडर कशी झाली, हे कळायला मार्ग नाही.
     देशात दुश्काळाच्या झळा आहेत. शेतकर्‍यांना दिलासा देणारा एखादा मार्ग दिसला नाही. त्याचबरोबर देशातल्या टाटा, बिर्ला, अंबानी आणि आमआदमीला एकाच तराजूत तोलत वर्षभरात सहा सिलेंडर सवलतीत देण्याचा निर्णय घेऊन आम आदमीची चेष्टाच चालवली जात आहे. भाकरी मागणार्‍याला मोबाइल देण्याचा घाट घालणार्‍या सरकारने आता त्याच्या घरातील चूलच बंद ठेवण्याचा बंदोबस्त करून टाकला आहे. त्यामुले भाकरी मागण्याचा प्रश्नच येत नाही. १० हजार महिना कमविणार्‍याला आणि गडगंज संपत्ती असणार्‍या उद्योजकांमध्ये काही फरक  आहे, हे जाणून घ्यावे असे सरकारला अजिबात वाटले नाही. फक्त सरकारने सबसिडी हटवून आपला राजकोषीय तोटा कमी करण्याचा उतावीळपणा या निर्णयामुळे केला आहे. हे करताना त्यांनी राजकीय संकटालासुद्धा भीक घातली नाही.
     सामान्य माणूस अगोदरच महागाईने मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारने डिझेलचे भाव एका दणक्यात पाच रुपये प्रतिलिटर करून खाद्य वस्तूंच्या किंमतीत बेशक वाढ करण्याचा बंदोबस्त केला आहे. पेट्रोलच्या दरवाढीवर अजूनही निर्णय झाला नसला तरी आजचे मरण उद्यावर आहे, असे समजायला हरकत नाही. कारण त्याचीही भाववाध अटळ असल्याची अटकळ बांधली जात आहे. सामान्य माणसाला दिलासा द्यायचे सोडून सरकार त्यांना संकटाच्या नजराणेच्या नजराणे देत आहे. गॅसवरची सबसिडी कमी करण्यासाठी नवा फंडा अजमावत सरकारने वर्षाला सहाच सिलेंडरच सबसिडीने देण्याचा फतवा काढला आहे. आता नव्या नियमानुसार वर्षभरात एका कुटुंबाला सहाच सबसिडीने मिळणार आहेत. सातव्या सिलेंडरसाठी त्याला आता ७४६ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे बाजारभावाप्रमाणे सिलेंडर घेऊन त्यांना आपली चूल पेटवावी लागणार आहे. याचा सरळ अर्थ असा  की, कुटुंब कितीही मोठे असो. त्यांचा सिलेंडर दोन महिने चाललाच पाहिजे. सरकारच्याबाबतीत लोकांची प्रतिक्रिया जशी यायला हवी, तशीच येत आहे. अर्थतज्ज्ञ, कृशीतज्ज्ञांपासून राजकीय पक्ष्-जाणकारांपर्यंत सगळ्यंनीच दरवाढ कमी करण्याचा नारा लावला आहे. मालांची वाहतूक करणार्‍या मालमोटारींपासून बस, रेल्वे-पर्यंत भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍याम्ना आणखी आर्थिक झळ बसणार आहे.
  या निर्णयामुळे सामान्यजनांमध्ये कमालीचा असंतोश पसरला आहे. धुमसत चालला आहे. कारण त्यांना वाटते की, एका बाजूला लाखो-कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. सत्तेवर बसलेले लोक दोन्ही हातांनी विकासाच्या नावावर सरकारी खजिन्याची लूट करीत आहेत. आणि दुसर्‍या बाजूला संकटांनी पार पिचलेल्या आमआदमीवर आणखी कर्-भाववाढीचे ओझे टाकून त्याला भुईसपाट केले जात आहे. सरकार सामन्य जनांवर बोझा टाकून सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या लोकांना मात्र कुरण चरायला मोकळे सोडत आहे, अशी भावना लोकांची झाली आहे. ' न्हालीला बोळा, दरवाजा सताड उघडा' असा हा प्रकार झाला. सरकार भाववाढीचे समर्थन करताना कुठलेही तर्क सांगत असले तरी आता सामान्यजनांचा त्यावर विश्वास बसत नाही. त्यांनी लोकांची विश्वासाहर्ता पुरती गमावली आहे. या सततच्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या लोकांचा सहनशीलतेचा अंत सरकार बघत आहे. लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. काँग्रेस आघादीमध्ये सहयोगी असलेल्या तृणमूल काँग्रेसने सरकारला डेड्लाईन दिली आहे. तर बाहेरून पाठिंबा दिलेल्या समाजवादी पार्‍तीने विरोधकांच्या भारत बंदच्या हाकेत सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे.
     काही अर्थतज्ज्ञांच्यामतानुसार चुकीच्या आर्थिक नीतीमुळे आलेल्या अपयशाचा परिणाम लोकांना भोगावा लागत आहे. तर काहींच्यामते सरकारने या ताज्या निर्णयामुळे गॅस सिलेंडरच्या काळ्याबाजाराला प्रोत्साहनच दिले आहे. ही  दरवाढ आणि काही गोष्टीत परदेशी कंपन्यांना थेट गुंतवणूक करण्यास परवानगी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येणार असल्याचे म्हणत असले तरी एकदम इतकी भयानक वाढ समर्थनीय नाही. आधीच दुष्काळामुळे शेतकर्‍यांची वाताहत झाली आहे. आता बी-बियाणे व खते- कीटकनाशके यांच्या दरात वाढ होणार आहे. अनेक संकटांनी कंबर मोदून पडलेल्या शेतकर्‍याच्या पदरी धोंडाच आहे.
      यावर्षाच्या प्रारंभीच पाच राज्याम्च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. यात काँग्रेसला मोठा झटका बसला. केवळ छोट्या दोन राज्यांमध्येच सत्ता प्रस्थापित करता आली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या स्थानिक, नगर पंचायतींमध्येही काँगेसला लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. एका पाठोपाठ एक घोटाळे, भ्रष्टाचार , महागाई आणि काळा पैसा अशा मुद्द्यांवर स्वामी रामदेव बाबा आणि अण्णा हजारे यांनी चालवलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे लोकांना सरकार विरोधात उभे ठाकायला मदत्च मिळाली आहे. मानल्म जात होतं की, सरकार लोकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी 'खुशीचा पिटारा' खोलायला सुरुवात करेल, कारण या वर्शात तीन राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुका जिंकण्यास त्याच्याने मदत होईल. पुढच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये हिंदी पट्ट्यातल्या चार प्रमुख राज्यांसह एकूण सहा राज्यांच्या निवडणुका हो ऊ घातल्या आहेत. यामुळे वाटलं होतं की, सरकार 'आम आदमी'चा विचार करून त्यांना दिलासा देणारे निर्णय घेईल. पण सरकारने दुसरेच संकेत दिले आहेत. सरकारला शेतकर्‍यांपेक्षा आनि आम आदमीपेक्षा आर्थिक सुधारणा महत्त्वाची वाटत आहे. सरकारला पेट्रोलियम कंपन्यांच्या आरोग्याची आणि राजकोशीय तूट कमी करण्याची चिंता वाटते आहे. सरकारला अमेरिकेची काळजी आहे. राष्ट्रपती बराक ओबामा अलिकडेच्म्हणाले होते की, भारत सरकार समग्र आर्थिक सुधारणा लागू करू शकत नसल्याने अनेक संकटे उभी आहेत. याचा अर्थ शेतकर्‍यांसह गरजूंना दिली जाणारी सबसिडी कमी केली जावी. स्वतः पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी आमबजेटनंतर म्हटले होते की, सरकार काही कठोर निर्णय घेईल. बहुतेक सरकार गॅस सिलेंडरवरील सबसिडी थेट कमी न करता दुसर्‍या पद्धतीने आपले आर्थिक सुधारणांचे घोडे दामटत आहे.

     आर्थिक विकास दर रोदावला आहे. बँका स्वस्तात कर्ज उपलब्ध करून द्यायला तयार नाहीत. नोकरदार  आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे हाल चालले आहेत. ते महागाईच्या चक्कीत अक्षरशः पिसले जात आहेत. कारण महागाईची खरी झळ त्यांनाच सोसावी लागत आहे. त्यांना दोन्हीकडून 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' खावा लाग्त आहे. केंद्र सरकारनेही त्यांनाच टारगेट केले आहे. ज्यांनी बँकांचे कर्ज घेऊन आपल्या स्वप्नांचे घर बांधले आहे. त्यांच्या व्याज दरात वाढ होतच चालली आहे. त्यातच सरकारने त्यांच्यावर पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलची दरवाढ करून तर कधी गॅस सिलेंडरचे भाव वाढवून अधिक बोजा टाकत आहे. या ओझ्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. शेवटी या सगळ्यांचा दणका आम आदमीलाच बसत आहे. याचा परिणाम शेवटी काँग्रेसलाच आगामी निवडणुकांमध्ये भोगावा लागणार आहे. काँग्रेसने वास्तविक लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे सरकार जे तर्क लोकांपुढे मांडून भाववाढीचे समर्थन करत आहे, ते मानायला लोक तयार नाहीत. जनापेक्षांचा आदर करायचा पार विसरून गेलेल्या काँग्रेसने  भाववाढीच्या निर्णयामुळे आपल्यापुधे मोठे संकटच वाढून ठेवले आहे.
dainik surajya.solapur

ग्रामविकास नीतीची गरज

     देशात दरवर्षी लाखो लोक पोटा-पाण्याच्या शोधासाठी गावाकडून शहराकडे, परप्रांताकडे धाव घेत असतात. एकिकडे आपले पितृगाव सोडताना मनात आपल्या माणसांचा विरह अतिव दु:ख देतो, तर दुसरीकडे संपन्नतेची इंद्रधनुषी स्वप्नेसुद्धा तरळत असतात. गेल्या दशकभरात उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छतीसगड आणि राजस्थान आदी राज्यांमधून जवळजवळ पन्नास लाखाहून अधिक लोक महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली आदी ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. जागतिक बँकेच्या एक रिपोर्टनुसार भारतातल्या लोकांचे खेड्यांतून शहरांकडे होणारे स्थलांतर ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. लोकांना गरिबीतून बाहेर काढून श्रीमंतीची वाट धरायला लावणारे हे शहरीकरण म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. या रिपोर्टनुसार जगभरातले निम्मे उत्पादन त्याच्या पाच टक्क्याच्या कमी क्षेत्रावर होते. हे क्षेत्र अल्जेरियापेक्षाही छोटे आहे. जगातल्या सर्वात मोठ्या टोकियो या महानगरामध्ये जपानची एक चतुर्थांश लोकसंख्या म्हणजे जवळजवळ साडेतीन कोटी लोकसंख्या राहते. भारतातल्या मुंबईच्या एक चौरस किलोमीटर क्षेत्रात ३० हजार लोक राहतात. ही लोकसंख्या शांघायसारख्या शहरांपेक्षा दुप्पट आहे. २००६ मध्ये चीनमधील ६ कोटी जनता खेड्यांतून शहरात आली आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली.     .   ..             .    अमेरिकेत दरवर्षी सुमारे साडेतीन कोटी लोक आपली जागा बदलतात. तर दरवर्षी ८० लाख लोक एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात. त्यामुळे तिथे स्थलांतर वृत्ती म्हणजे एक चांगले संकेत असल्याचे मानले जाते. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, भारतात ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोक प्रमुख राज्यांमध्ये राहतात. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन नावाच्या आणखी एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतातील शहरीकरणातील वेग जगाच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या शहरीकरणांमुळे रोजगार, शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न जटील होतो. याचाही विचार त्यात करण्यात आला आहे.
दुष्काळामुळे वाढते स्थलांतर
     दुष्काळामुळेसुद्धा स्थलांतर वाढले आहे. कायम दुष्काळी पट्टे असलेल्या भागातून अगोदरपासून स्थलांतर होत असून त्यामुळे या भागातील लोकसंख्येच्या घनतेवर परिणामही झाला असल्याचे दिसून आले आहे. रोजगार, पोटापाण्यासाठी स्थलांतरीत लोकांना मुंबई जास्त भावली आहे. केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर अख्ख्या देशातून इथे लोक आपला रोजीरोटीचा प्रश्न मिटवायला येतात. बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड्सारख्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात लोक इथे आले आहेत. १९९७-१९९९ मध्ये छत्तीसगड
     राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. सवंतनुसार याला ५६ चे वर्ष म्हटले जाते. दुष्काळ इतका भीषण होता की, आजसुद्धा कधी दुष्काळ पडला तर म्हणे तिथे वयोवृद्ध माणसे 'छप्पन परही तईसे लाग थे' असे म्हणतात. छतीसगड स्वतंत्र झाला तरी इथले स्थलांतर थांबले नाही. उलट त्यात वाढच होत चालली आहे.
     आसाममध्येसुद्धा छत्तीसगडमधील लाखो लोक राहतात. आसाममध्ये गेल्या महिन्यात ज्यावेळेला हिंदी भाषिक लोक हिंसेचे शिकार बनले, त्यावेळेला त्यात इथल्या लोकांनाही झळ बसली.  बांगलादेशमध्येही इथले लोक राहतात. ठेकेदार लोक मोठ्या संख्येने मजुरांना आपल्यासोबत दुसर्‍या राज्यांमध्ये नेतात. बिहारमध्ये तर आजही अशी गावे आढळून येतील की, तिथे फक्त म्हातारी -कोतारी, लहान मुले यांच्याशिवाय कुणी नाही. इथले पुरुष लोक दुसर्‍या राज्याम्त काम करतात आणि बहुतांश सणासुदीच्या निमित्तानेच हे लोक आपल्या गावी आप्तेष्टांना भेटायला जातात.
शहरांमह्ये गर्दी वाढली
     मॅकंजी ग्लोबल इंस्टीट्यूटच्या रिपोर्टनुसार २००१ मध्ये २१ कोटी लोक शहरांत राहत होते. ती सम्ख्यां २००८ मध्ये वाढून ३४ कोटी झाली. २०३० मध्ये हीच लोकसंख्या ५९ कोटींवर पोहोचेल, अशी शक्यता व्यक्त केले गेली आहे. एका रिपोर्टनुसार देशात गेल्या दोन दशकांत गावांचेही शहरीकरण वेगाने हो ऊ लागले आहे. आगामी दोन दशकात तामिळनाडूची ७८.१८ टक्के इतकी लोकसंख्या शहरी हो ऊन जाईल. तर महाराष्ट्रात शहरी क्षेत्र वाढून ६१ टक्के होईल. गुजरातमध्ये ५८, पंजाबमध्ये ५२.१५, कर्नाटकमध्ये ४९.१३, हरियाणामध्ये ४६.१३ आणि उत्तराखंडमध्ये ३७. १३ टक्के लोक शहरी भागाचे हिस्सा होतील. अशीच परिस्थिती अरुणाचल प्रदेश, मोझोरम, पश्चिम बंगाल, चंदीगढ, गोवा आणि केरळची होईल. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि आसामचेही शहरीकरण वाढते आहे. मात्र यापूर्वी इथे शहरीकरणाची गती फारच कमी होती.  
औद्योगिकरणामुळे शहरीकरण
     स्वातंत्र्यानंतर वाढलेल्या औद्योगिकरणामुळे शहरीकरणाला प्रोत्साहन मिळाले. १९९१ पासून सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाच्या काळात कृषी क्षेत्र मात्र घाट्याचा सौदा ठरत आले आहे. कृषी- भूमीवर कारखाने, उद्योगधंदे आणि लोकवस्त्या वाढू लागल्या. देशाच्या राजधानी दिल्लीचेच उदाहरण घ्या. या राजधानीला लागून असलेल्या राज्यांचा विकास मोठ्या वेगाने झाला. सांगितलं जातं की, राजधानी दिल्ली क्षेत्रातला नोएडा दिल्लीपेक्षा कुठल्याच गोष्टीबाबत कमी नाही. इथल्या जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत.
स्थलांतरामुळे अडचणी
     शहरी भागात लोकांचा लोंढा वाढला असल्यामुळे इथल्या समस्याही वाढल्या आहेत. शहरीकरणाच्या दवाबाने इथे राहणार्‍या लोकांना मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. विकसनशील देशांमधील ९० टक्के लोक गलिच्छ वस्त्यांमध्ये आपले जीवन कंठीत असतात. यात चीन आणि भारताचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या मुंबईने सगळ्यांना सामावून घेतल्याने त्याला बकाल स्वरुप आले आहे. ज्या प्रमाणात शहरांची लोकसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणात सुविधांचा विस्तार मात्र झाला नाही.
ग्रामविकास नीतीची गरज
     ग्रामविकास नीतीचा स्वीकार करून शहरीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. महात्मा गांधी 'खेड्यांकडे चला...' सांगत राहिले, पण आमच्या राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे कानाडोळा केला. खेड्यात रोजगार उपलब्ध झाले तर लोक शहराकडे धाव घेणार नाहीत. गावातच या रोजगाराबरोबरच शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच मोठ्या उद्योगधंद्यांनाही इथे उभारणीसाठी सरकारी पातळीवर प्रोत्साहन दिले जायला हवे. कृषीबरोबरच बागायती, पशूपालन, मत्स्यपालन, कोंबडीपालन, कुटीर उद्योग आणि हस्तकला उद्योग आदी छोट्या छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन, सवलत देऊन मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाऊ शकतात. महात्मा गांधींनी म्हटले आहे की, " भारत गावांमध्ये वसला आहे. त्यामुळे गावे खुशीत राहतील.''    आणि ही अतिशयोक्ती नाही.          

पारंपारिक शिक्षणाची चौकट मोडायला हवी

     बदलत्या काळाचा वेग लक्षात घेता  पारंपरिक शिक्षण कुचकामी ठरत आहे. आता ही पारंपारिक चौकट मोडण्याची  नितांत गरज असून  आता  येणार्‍या काळात कौशल्याधारित शिक्षण अनिवार्य बनले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्याशाखांच्या बंधनातून मुक्त करून स्वायत्त शिक्षणाची कवाडे खुली करून देणे आवश्यक आहे. शिवाय ज्ञानाचा उपयोग इथेच केला जावा, अशी व्यवस्था, सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत.
सध्या उच्च शिक्षणापुढे अनेक आव्हाने उभी आहेत.  दहा वर्षांतील स्थित्यंतराने सारे काही ढवळून निघाले आहे. पारंपारिक शिक्षणापलिकडे परिस्थिती गेली आहे. त्यादृष्टीने काळाची पावले ओळखून उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल अपेक्षित आहे. खरे तर मुळात उच्च शिक्षणाकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहे.  त्यातच  पायाभूत सुविधांचा अभाव, चांगल्या शिक्षकांची कमतरता, अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याची कसरत आणि  विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षण घेण्याच्या सुविधेचा अभाव अशी अनेक आव्हाने उच्च शिक्षणापुढे आहेत. मात्र, त्यासाठी केवळ विद्यार्थी किंवा प्राध्यापकांना जबाबदार धरता येणार नाही, तर ती सामुहीक जबाबदारी असूनतासाठी सगळ्यांनीच  या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला  हवा.
     सध्या इंग्रजी शिक्षणाचा बाऊ अगदी पूर्वप्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत करण्यात आला आहे. त्याचा दवाब सर्वच स्तरावर आहे. त्याची गरज असली तरी मातृभाषेतूनही पर्याय शोधला जाऊ शकतो. चीनसारख्या देशाने त्याचा चांगला उपयोग केला आहे. आपण त्यादृष्टीने प्रयत्न केलेच नाहीत. इंग्रजी शिकणे म्हणजे उच्चकोटीचे ज्ञान मिळवणे, असा काही तरी चुकीचा समज करून घेतला गेला आहे.   या इंग्रजीच्या प्रभावाखालील शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमद्ये कमालीचे न्यूनत्व निर्माण झाले आहे. पहिल्यांदा त्यातून बाहेर काढन्याची आवश्यकता आहे.  आज मिळणार्‍या उच्च शिक्षणानंतर आपण परदेशांतील समस्या सोडवण्यावर आपले ज्ञान खर्ची घालत आहोत. ही स्थिती बदलून आपल्यासमोरील आव्हानांचा शोध घ्यायला हवा आणि  त्यानुसार शिक्षणपद्धती आखायला हवी.
     प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र अजून तशा भौतिक साधनांच्या सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथून लगेच आऊटपूट निघणार नाही. त्याला थोडा काळ जावा लागणार आहे. महाविद्यालयातसुद्धा   विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. आज तशी व्यवस्था शाळेपासून ते महाविद्यालयांपर्यंत  काही अपवाद सोडले तर फारसा वावच नाही.  

     आज  विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तर त्यांच्यासाठी संधींची वानवा कधीच नाही.  विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची प्रेरणा देण्याऐवजी आपण त्यांना शिकवत बसतो. त्यामुळे प्रवेश, परीक्षा, निकाल या दुष्टचक्रात विद्यार्थी अडकतो व त्याचा विकास खुंटतो. शिक्षणाची नवीन मॉड्युल्स विकसीत होणे गरजेचे आहे. आपल्याकडील  परंपरागत शिक्षणाला आता फाटा देण्याची ही काळाची गरज आहे. आपल्याकडे परदेशातील उदाहरणे दिली जातात. मात्र, त्या प्रकारची पायाभूत सुविधा मात्र उपलब्ध नाहीत. सरकारने यागोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनीही निव्वळ पैसा कमावणे, हे आपले उदिष्ट्य कदापि ठेवता कामा नये. गल्लीबोळातल्या शिक्षण सम्राटांमुळे शिक्षण कमालीचे उथळ झाले आहे. चांगल्या प्राध्यापकांची मोठी कमतरता आहे. कुशल बुद्धीमत्ता असणारे शिक्षकी पेशाकडे आकर्षित होत नाही, ही मोठी समस्या आहे. यावरही विचार व्हायला हवा आहे.
     शिक्षणामध्ये आजकाल फॅशन वाढत चालली असून, त्याचे झपाट्याने व्यावसायिकीकरण होत आहे. ज्ञान, समज, कौशल्य आणि प्रत्यक्ष वापर ही शिक्षणाची तत्त्वे विसरतोय. शिक्षणामध्ये सातत्य, स्थिरता, प्रगती आणि विकास या बाबी येणे गरजेचे आहे. शिक्षण ही आंतरिक गरज बनून त्यातून सर्जनशीलतेचा विकास व्हायला हवा. तरच खर्‍या अर्थाने विद्यार्थी घडविणे शक्य होणार आहे.
     प्राध्यापक आणि पालकांनीही मुलांच्या जडणघडणीत योगदान देणे व डोळस राहणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. हवे ते शिक्षण घेण्यासाठी कर्जाची सुविधा सहजसुलभपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे गुणवत्ता वाया जात आहे. गुणवानांना संधी मिळण्याच्यादृष्टीकोनातून सामाजिक संस्था, सरकारे यांनी अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी नॅशनल फंड उभारावा व माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभारली गेली पाहिजे. .
      महत्त्वाची बाब म्हणजे आपली भारताची  अर्थव्यवस्था आजही कृषीकेंद्रीत आहे. पण या क्षेत्राच्या शिक्षणाकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही.  सध्याचा ट्रेंड फक्त आयटी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी भोवती घुटमळणारा आहे. कृषी क्षेत्रातही आयटीचा वापर करून उच्च शिक्षणात त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.                                        

महाराष्ट्र ‘हार्ट अटॅक’च्या विळख्यात

प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हटले तर आपले महाराष्ट्र राज्य! आणि अशा आजारांचे माहेरघर ‘महाराष्ट्र’च आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण देशभरात हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍या रुग्णांची संख्या येथेच अधिक आणि त्यात मुंबई आणि त्यापाठोपाठ पुणे ही महानगरे आघाडीवर आहेत.     बदलत्या आणि आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी शरीराला विविध आजारांनी विळखा घातला आहे. ग्रामीण भागापेक्षा अधिक स्वस्थ, विनाकष्ट जीवन शहरी भागात आहे. त्यामुळे साहजिकच नव्या जीवनशैलीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही शहरांमध्येच अधिक आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशाचा विचार केला तर प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हटले तर आपले महाराष्ट्र राज्य! आणि अशा आजारांचे माहेरघर ‘महाराष्ट्र’च आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण देशभरात हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍या रुग्णांची संख्या येथेच अधिक आणि त्यात मुंबई आणि त्यापाठोपाठ पुणे ही महानगरे आघाडीवर आहेत.
     नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी)ने गेल्या काही वर्षांचे अनैसर्गिक मृत्यूचे आकडे एकत्रित केले आहेत. देशातल्या ५३ महानगरांमधील एकत्रित हार्ट ऍटॅकचे आकडे या महानगरामंधील राहणीमान आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रकाश टाकतात. या रिपोर्टनुसार उपचाराच्या चांगल्या सुविधा असूनही इथे हृदयविकाराने होणार्‍या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहेत.
२०११ मध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍यांची देशभरातील संख्या १६ हजारांपेक्षा अधिक आहे. २०१० मध्ये १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता. २०१० च्या तुलनेत २०११ मध्ये मृत्यू पडणार्‍या रुग्णांची संख्या कमी असली तरी एकंदरीत आकडेवारी चिंताजनकच म्हणावी लागेल.
     गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि महानगरांचा विचार केला तर सर्वाधिक हृदयविकाराचे बळीही मुंबईत आहेत. ८२९ मुंबईत, ५६८ पुण्यातले बळी असल्याचा हा रिपोर्ट सांगतो. त्याखालोखाल चेन्नई असून तिथे गेल्या वर्षी ४४८ रुग्णांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर राजकोट (२७०), दिल्लीचा (२५७) क्रमांक लागतो.
     नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या या सगळ्या एकत्रित आकडेवारीनुसार उत्तर हिंदुस्थानी लोक तंदुरुस्त असल्याचे दिसते. हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू पावणार्‍यांची संख्या महाराष्ट्रात असावी हे पुरोगामी म्हणवणार्‍या राज्याला भूषणावह नाही. शहरी भाग किती व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीच्या आहारी गेला, आहे हेच या आकडेवारीवरून दिसते. ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जाते, पण या हार्ट ऍटॅकच्या बाबतीतही ते लागू पडते आहे. अर्थात ‘चिल्लर पार्टी’सारख्या घटनाही इथे घडू लागल्याने पुण्याची विद्येची ओळख आता पुसली जात आहे, हे पुण्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
     हृदयविकाराने मृत्यू पावणार्‍यांचे हे आकडे आधुनिक बदलती जीवनशैली अनुसरलेल्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे. आज माणूस व्यस्त आणि तणावपूर्ण जीवन जगत आहे. त्यामुळे त्यांचे राहण्याच्या-खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष राहिलेले नाही. विश्रांतीच्या, झोपांच्या वेळाही बदललेल्या आहेत. माणूस निसर्गचक्राच्या अगदी विरोधात वागतो आहे. त्यामुळे त्याला तसेच नवनवे आजार चिकटत आहेत. नव्या आजारांच्या संशोधनाचा मार्ग शेवटी माणसावर ‘प्रॅक्टिकल’ करण्यावरूनच जातो. त्यामुळे आजारांच्या निर्मूलनाची ‘प्रयोगशाळा’ बनलेल्या माणसाच्या हृदयावर ताण हा राहणारच. बिचारा काय काय म्हणून सोसणार? त्यामुळे या सगळ्यांपेक्षा त्याला ‘मुक्ती’ योग्य वाटू लागली आहे असेच म्हणावे लागेल.
- मच्छिंद्र ऐनापुरे        saamana 16/9/2012

Monday, September 10, 2012

पालकांनो, मुलांचे 'रोल' मॉडेल बना!

     गेल्या आठवड्यात पुण्यातल्या मुंढवा येथे झालेल्या 'चिल्लर पार्टीत' अल्पवयीन मुलं मद्यपान करून झिंगताना सापडली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. मुलांचा हा प्रताप पाहून पालकही बिथरली. आता हीच पालक मंडळी मुलांच्या तक्रारी सांगताना दिसत आहेत. वास्तविक पालक काय करतात, त्याचेच अनुकरण मुले करीत असतात. मुलांच्या डोळ्यादेखात सिगरेट, मद्यपान करत असतील तर मुलांना त्याचे कुतुहल राहणारच!  त्यामुळे पहिल्यांदा पालकांनीच सुधारले पाहिजे.  स्वतः वर काही बंधने घालून घ्यायला हवीत. मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढायला हवा. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. तरच मुले त्यांच्या आवाक्यात राहणार आहेत.
     हल्लीचे पालक 'मधुर' म्हणजे, मद्यात व धुरात रमलेले आहेत. मुलांना वाईट व्यसनापासून दूर रहा, असे सांगताना काही पालक त्यांच्यापुढे स्वत:च सिगारेटचे झुरके घेऊन दारू पितात. पालकांनी हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे. 'पिअर प्रेशर' 'बिअर प्रेशर' याचाही मुलांवर परिणाम होतो. पालकांच्या या वर्तनामुळेच मुले मित्रांच्या संगतीत व्यसनाच्या आहारी जातात. पालकांचा मुलांशी संवाद होत नसेल तर मुले मित्र शोधत असतात. मित्रांच्या संगतीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी घडत राहातात. मैत्रीखातर, उत्सुकतेपोटी मुले वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. किशोरवयीन मुलांनी किती उमलायचे व फुलायचे हे पालकांच्याच हाती असते. कुतुहलापोटी मुले वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत म्हणून त्यांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती घ्यायला हवी, त्यांच्यापुढे व्यसने करू नये, मुलांसाठी वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधावा, एकंदरीत पालकांनीच त्यांचे चांगले 'रोल मॉडेल' बनायला हवे.
     पालक जे सांगतात मुले ते कधीच करीत नाही. याउलट आपल्या पालकांसारखेच वागून मुले प्रत्यक्ष कृती करतात. त्यामुळे मुलांच्या देखत सिगारेट, दारूचे व्यसन करू नये. या वाईट कृतीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. मादक पदार्थांमुळे मुलांच्या मेंदूतील 'सिरेटॉनिक'मध्ये बदल होतात. हळूहळू त्यांच्या मेंदूची क्रयशक्ती कमी होते. व्यसनाशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी भावना निर्माण होऊन ही मुले पराधीन होतात. मुलांना अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहायचे आहे. त्याला समाजाचे काही ऋण फेडायचे आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव पालकांनी करून द्यायला हवी आहे.
     खरे तर या 'चिल्लर पार्टी'ने पालकांना विचार करायला भाग पाडले आहे. पण सगळेच पालक यातून बोध घेतील, यातला भाग नाही. कारण काही पालकांची ही संस्कृतीच झाली आहे. काही पालक आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी राबराब राबतात. पैसा साठवून ठेवतात. यासाठी भ्रष्टाचार, लबाडीचाही अवलंब करतात. पालक काय करतात, हे आजच्या मुलांना सहज कळत असतात. हरामाच्या पैशांमुळे मुलेही हट्टी बनतात. पैसे कमविण्यासाठी काय दिव्ये पार पाडावी लागतात, याची त्यांना कल्पना नसते. मुले बिघडू नयेत, यासाठी पालकांनी घरातले वातावरण खेळीमेळीचे, संस्कारी ठेवायला हवे. आपणही त्याप्रमाणे वागले पाहिजे.
     'चिल्लर पार्टी' हा प्रकार काही एका दिवसात घडलेला नाही. या पाटर्य़ांबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून समाजातील चांगले व वाईट निवडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे.             .                                                                                                                  

Sunday, September 9, 2012

सार्वजनिक मंडळांची उधळपट्टी

      सध्या सगळ्यांनाच गौरी-गणपतीचे वेध लागले आहेत. त्यातल्या त्यात गणेशोत्सव मंडळांना तर अधिकच. ही सार्वजनिक मंडळे उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. वर्गणी, आरास, डेकोरेशन याबाबत सध्या त्यांची धांदल सुरू आहे. मंडळांचा सारा खेळ पैशांवर सुरू असतो. त्यामुळे गल्ली- बोळात अडवून लोकांची एकप्रकारे लुबाडणूक सुरू आहे. या सक्तीच्या वसुलीने सारे बेजार झाले आहेत. तर काहीजण देवाच्या नावावर देणगी देऊन टाकतात आणि मोकळे होतात. हा प्रकार फक्त गणेशोत्सव मंडळांबाबत होत नाही. अन्य महान व्यक्तिंच्या नावावर देणगी गोळा केली जाते. मात्र विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, गणेश, राष्ट्रीय महनीय व्यक्तींच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या विविध मंडळांचा कारभार सध्या 'रामभरोसे'  सुरू आहे.
     राष्ट्रीय अथवा लोकनेत्यांच्या नावावर, देवी- देवतांच्या नावावर  देणग्या उखळल्या जाण्याचा फंडा काही नवा नाही.  मात्र अशा निमित्ताने मोठ्या प्रमाणात देणगी गोळा केली जाते. पण या देणग्यांचा हिशेब सार्वजिक केला जात नाही. किंवा धर्मादाय आयुक्तास सादर केला जात नाही. वास्तविक ज्यांच्याकडून वर्गणी गोळा केली जाते, त्यांना हिशेब मागण्याचा हक्क आहे. पण त्यांच्या तोंडाला  लागणार कोण असे म्हणत सगळेच गप्प बसतात. काहीजणांना आपला चाललेला अवैध प्रकार उघड करायचा नसतो. ते आपल्या मंडळींना  हवी तेवढी मदत  करीत राहतात. त्यामुळे स्वखुशीने, प्रेमाने अथवा जबरदस्तीने जमा झालेल्या पैशाचे काय केले, याचा पत्ता लागत नाही. काही मंडळांचा प्रामाणिक अपवाद वगळता  ही वर्गणी चैनीत उडालेली असते. सार्वजनिक पैशाची ही नासाडी उपयोगाची नाही, याला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे.यासाठी शासनासह सगळ्यांनीच जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.  
      दरवर्षी सार्वजनिक जयंती, पुण्यतिथी, गणेशोत्सव, तसेच नवरात्र उत्सव विविध मंडाळांच्यावतीने अमाप उत्साहात साजरा केला जातो. अर्थात हा अमाप उत्साह म्हणजे टोलेजंग मिरवणूक व त्यासमोर नशापान करून  बीभत्स नाचण्याधिंगाणा घालण्याला म्हटले जाते. हा  असा   किळस आणणारा  प्रकार काही नवा नाही. उलट त्यात नवनव्या गोष्टींची, तंत्रांची भर पडत आहे.  नाही म्हणायला यातला काही पैसा विधायक कामासाठी उपयोगात आणला जातो परंतु, ही रक्कम जमा झालेल्या रकमेपेक्षा खूपच कमी असल्याचा अनुभव आहे. वास्तविक थोर नेत्यांच्या नावावर जबरदस्ती करून , धाकधपटशा दाखवून वर्गणी गोळा केली जाते. त्यांच्या आदर्शतेची तरी बूज राखून मंडळांनी कार्य करायला हवे आहे. धागडधिंगा , नाचून अथवा बारबालासारख्या लोकांना  नाचवून आपण कुठला आदर्श घेणार आहोत आणि पुढच्या पिढीला देणार आहोत, याचा विचार होताना दिसत नाही. देवा-देवीच्या नावावर घातलेला गोंधळ खरेच माणसाला सुख -शांती देणार आहे का? घटकाभराच्या सुखासाठी हा खटाटोप चालवला जातो. यासाठी अमाप पैशाची नासाडी केली जाते. शेवटी डॉल्बीसारख्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.   सध्या न्यायालयच देशाचा कारभार चालवत आहे, त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली म्हणायची. पण आपण स्वतः काही हिताचे निर्णय घेणार आहोत की नाही? आणि हे सण , उत्सव यांच्या पाठीमागचा उद्देश साक्षात आणणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. समाजातला प्रत्येक घटक, मंडळाचे कार्यकर्ते आणि शासन यांची काहीच का जबाबदारी नाही?
     गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजात भ्रष्टाचार फोफावला आहे. रोज नवनवीन घोटाळा उघडकीस येतो आहे. सध्या कोळशाच्या पट्ट्याच्या वाटपावरून लोकसभेचे कामकाज ठप्प आहे. परदेशातल्या काळ्यापैशावरून रामदेवबाबा रस्त्यावर उतरले आहेत. अण्णा हजारे आणि त्यांची टीम लोकपाल विधेयकाची मागणी करून करून थकले आहेत. या लोकांना देशभरात मागे कमालीचा पाठिंबा मिळाला. मिळतो आहे. कारण भ्रष्टाचाराविषयीची चीड माणसांना अस्वस्थ करत आहे.  असे असले तरी समाजातला भ्रष्टाचार तसूभरही कमी झालेला नाहीय. असे असूनही  भ्रष्टाचाराला समाजाचीच  साथ मिळते आहे.  वरती कोट्यवधीचा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यात गल्ली- बोळातल्या भ्रष्टाचाराचे काय घेऊन बसलात, असा सवालही उपस्थित होत आहे. पण शेवटी भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच! स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार करणार्‍याला, अवैध धंदे करणार्‍याला ही सार्वजनिक मंडळे आपल्या वर्गणीचा हिस्सेदार बनवून त्याच्या कृतीला संमती देत असतात. त्यांना मिंदेपणात ठेवायला आवडते. मंडळांचे कार्यकर्ते तरुण असतात. त्यांना साहजिकच अशा फुकटच्या पैसाची सवय लागते. व असा पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक नेता, देव- देवता यांच्या जयंती-पुण्यतिथ्या आणि उत्सव साजरा करण्याचा फंडा तयार होतो. पण या सततच्या कटकटीने वर्गणी देणाराही वैतागून जातो. मग वाद होतात. त्याचे पर्यावसान हाणामारी, खून अशात व्हायला लागतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्या असल्याच्या पोलिस दप्तरी नोंदी आहेत.
     काहींचे  अशा पैसा वसुलीच्या आणि त्याच्या विल्हेवाटीच्या प्रकाराबाबत अजब मत, तर्क  आहे. हरामचा पैसा हरामात घालवायला काय हरकत आहे, असे हे मत काहींना पटण्यासारखे आहे. पण मग हा पैसा समाजाला आदर्श घालून दिलेल्या आणि मनशांती देणार्‍या देवाच्या नावावर मागितला जाऊ नये. विनाकारण अशा थोर माणसांना बदनाम करू नका. देवांना असल्या घाणीत तरी ओढले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. कारण कोणतीच नीतीमत्ता राहिली नसलेल्याकडून अपेक्षा करणे मोठे कठीण काम असते. नीतीवंतांच्या दरबारात नीती मूल्येच शोभून दिसतात. अन्यथा नीतीवान माणसांनाही अन्रीतीवानाच्या पंक्तीला ओढले जाते. त्यामुळे कोणी कसा विचार करावा , हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
     थोर माणसांचे स्मरण करताना त्यांच्या आदर्शानुसार चालण्याचा आपला इरादा असला पाहिजे. त्यांचा आदर्श घेऊन पुढील पिढीने वाटचाल केली पाहिजे. त्यांच्या स्मरणाच्यानिमित्ताने विविध कलागुणांना वाव देणार्‍या कलावृद्धीचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. जेणेकरून यातून उपेक्षित कलाकाराला संधी मिळून त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. कला वाढीला वाट मिळेल. अशा कर्यक्रमांची रेलचेल अशा निमित्तने व्हायला हवी आहे. भ्रष्टाचार आपल्याला नको आहे. भ्रष्टाचाराने सगळ्यांची मने विटली आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. पण समाजासाठी आपण काही चांगले काम करत असू  तर आपणही चोख राहिले पाहिजे, याची जाणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. सार्वजनिक मंडळे मोठ्या प्रमाणात वर्गणीच्यारुपाने पैसा गोळा करतात. पण त्या पैशाचे काय करतात, याचा साधा हिशोब ठेवला जात  नाही की सारवजनिक केले जात  नाही. हजारो मंडळे ही तत्कालीन स्वरुपाची असतात. मंडळांची सरकार दरबारी नोंद नसते. अशा मंडळांच्या या फसवेगिरीला कोण जबाबदार आहेत ? समाजातीलच आपण सारे याला जबाबदार आहोत. मंडळाचे रजिस्ट्रेशन नसेल तर वर्गणी का द्यायची? शिवाय दिलेली वर्गणी आयकर सूटसाठी लागू असल्याने पावती मागणे आवश्यक आहे. पण आता याही पुढचा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक मंडळांनी अनेक वर्षे उत्सवावर खर्च केलेल्या पैशाचे ऍडिट न केल्याचे व हिशोब सादर न केल्याचे   प्रकार उघडकीस आले आहेत. म्हणजे या मंडळाचा कारभार सगळा 'रामभरोसे' सुरू आहे.
     मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 1950 कलम 41 (क) नुसार सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अशी नोंदणी केल्यानंतरच या मंडळांनी सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा करावी असा नियम सांगतो. नोंदणी न करता उत्सव साजरा करणे व उत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी गोळा करणे गुन्हा आहे. त्यामुळे दरवर्षी धर्मादाय कार्यालयात मोठ्या प्रमाणात मंडळांची नोंदणी होत आहे; परंतु ही मंडळे भरमसाठ वर्गणी गोळा करण्यासाठीच नोंदणी करतात. नोंदणी केल्यानंतर या मंडळांनी उत्सवासाठी जमा केलेल्या वर्गणीचा हिशेब पंधरा दिवसांत धर्मादाय कार्यालयात देणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणी केलेल्या मंडळांकडून उत्सवानंतर वर्गणीचा हिशेब धर्मादाय कार्यालयात दिला जात नाही. असा प्रकार सर्वत्रच उघडकीस आला आहे. वास्तविक याची दखल धर्मदाय आयुक्त आणि शासनानेही घ्यायला हवी आहे. तरच सार्वजनिक पैशाची उधळपट्टी थांबणार आहे.
      थोर नेत्यांच्या नावावर, देवी-देवतांच्या नावावर गोळा केलेला पैसा सत्कारणी , विधायक कामासाठी लागला आहे, की नाही , हे वर्गणी देणार्‍याने पाहायला हवे. शासनानेही यासाठी खास पथकाची नियुक्ती करायला हवी. उत्सवाच्यानिमित्ताने होणारा अनाठायी खर्च थांबवायला हवा. मिरवणुकीच्या खर्चावर नियंत्रण असायला हवे. शिवाय मंडळांनी केलेल्या विधायक प्रगतीचा आलेख तपासायला हवा व त्यानुसारच त्यांची नोंदणी कायम ठेवावी अन्यथा त्यांच्या नोंदण्या रद्द करण्यात याव्यात.  त्यामुळे भरमसाठ वाढत चाललेल्या पावसाळातल्या छत्र्यांसारख्या अशा मंडळांवर नियंत्रण राहील आणि आळा बसेल.            mahasatta, ichalakaranji ( tushar- 9/9/2012)

बालकथा पेरूचे झाड

     सोनूच्या अंगणात पेरूचं झाड होतं. बारमाही पेरू. पहिल्यांदा पांढरी पांढरी फुलं उमलायची. काही दिवसांनी मोठ- मोठी फळं दिसायची. गोड गोड, कच्चे-पक्के पेरू. पाहिल्यावर सोनूला कोण तो आनंद व्हायचा.
     सोनूचे अंगण गजबजलेले असायचे. किती तरी प्रकारचे पक्षी अंगणात यायचे. खेळायचे, बागडायचे. झाडावर मस्ती करायचे. अशात बुलबुल पक्षाने झाडाच्या शेंड्यावर घरटे बांधलेले. पेरूच्या सुगंधी दरवळीने कुठले कुठलेसे पोपट यायचे. पिकल्या पेरूचा शोध घ्यायचे. ताव मारायचे. कोकिळाचा 'कुहू... कुहू' नाद त्याला भारी वाटायचा. पक्ष्यांचा खेळ तो तास न तास बसून पाहात राहायचा. दंग हो ऊन जायचा. मग सोनूचं मनही मोरासारखं नाचू लागायचं.
     चिमण्या अंगणात खाली उतरल्या की सोनू त्यांना पकडायला धावायचा. त्यांच्याशी दोस्ती करायला उतावीळ व्हायचा. पण बहाद्दर चिमण्या त्याला चकमा द्यायच्या. त्याच्याशी लपंडाव खेळायच्या. पण सोनूला त्यात गंमत वाटायची. तो आनंदाने उड्या मारायचा. चिमण्या त्याच्याशी खेळायच्या. त्याला दमवायच्या आणि भुर्रकन उडून जायच्या.
     पेरूच्या झाडावर एक चिमुकली खारुताईही यायची. इवल्या इवल्या कांचेची, झुपकेदार शेपटीची मात्र मोठी धटिंगण होती. ती चक्क सोनूच्या अंगाखांद्यावर खेळायची. श्रीरामाचा आशीर्वाद लाभलेल्या या धटिंगण खारुताईच्या अंगावरून सोनूसुद्धा सावकाशीने हात फिरवायचा. तिचे मऊमऊ केस त्याला ऊशीसारखे भासायचे. तिला तो खाऊ-पिऊ घालायचा. तीही त्याच्या डोक्यावर चढून त्याचा माथा कुरवळायची. जणू म्हणायची, 'थँक यू'.
     शाळेत तो मित्रांशी आपल्या या सवंगड्याविषयी बोलायाचा. त्यांच्या नवनव्या कहाण्या सांगायचा. पण तो अंगणातल्या पेरूला धन्यवाद द्यायला विसरायचा नाही. त्याच्यामुळेच तर त्याला सवंगडी मिळाले होते. तो दररोज पेरूच्या झाडाला धन्यवाद द्यायचा. 'धन्यवाद पेरूवृक्षा, धन्यवाद!'  

Saturday, September 8, 2012

कथा कोडे

     "हॅलो! आय एम कविता पाटील, फ्रॉम महाराष्ट्र." खणकत्या सुमधूर आवाजानं अमोलचं ध्यान आकर्षित केलं. त्यानं पाहिलं तर समोर असाधारण अशी सुंदर तरुणी उभी! क्लासरूममधून तो नुकताच आपल्या सहकार्‍यांसोबत 'टी ब्रेक' साठी बाहेर आला होता. तोच त्याची कविताशी गाठ पडली. "हॅलो, मी अमोल सातपुते. महाराष्ट्राचाच." अमोलने हसून आपली ओळख करून दिली. कविता खरेच सुंदर होती. आकर्षक होती. वय आदमासे २६-२७ असावं. उंच अंगकाठी, भारदस्त पण कोमल शरीर. तीक्ष्ण डोळे. डाव्या गालावर पुसटसा काळा तीळ, जो तिच्या सौंदर्यात आणखी भर घालीत होता. 'टी ब्रेक' संपताच सगळे पुन्हा क्लासरूममध्ये पोहचले.
     म्हैसूर या ऐतिहासिक सुंदर नगरीतल्या एक महिन्याच्या प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. भारतातल्या विविध प्रांतांतून प्रशिक्षणासाठी सहभागी होणारे लोक अद्याप येतच होते. कवितासुद्धा दुपारनंतरच आली होती. पाहिल्या दिवसाची औपचारिक ओळख-पाळख आणि प्रशिक्षणाची रुपरेषा संपल्यावर सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना लोकसंगीत आणि नृत्य कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. योगायोगाने अमोलच्या बाजूची सीट रिकामी होती. तेवढ्यात कविता तिथे आली. अमोलने हसतच तिला जवळ बसण्याचा इशारा केला. कविता बसताच ती त्याच्याशी बोलायला लागली. ती सायकॉलॉजी विषयाची लेक्चरर होती. तर अमोल इतिहासाचा. कविताने सांगितलं की तिला विषय खूप आवडतो. तिला त्यात आणखी स्टडी करण्याचा रस होता. हसत तिने विचारलं होतं," तुम्ही मला शिकवणार ना?" तोही हसून म्हणाला होता," अरे, माझा विषय तर भलताच नीरस. मुली तर अगोदरच दूर पळतात." कविता म्हणाली," तुम्हाला ठाऊक आहे, सर! कधी कधी नीरस विषयसुद्धा आम्हाला खूप सरळ वाटतो. अर्थात तो योग्यरित्या समजावून घ्यायला हवा." पहिल्या भेटीतच कविता एका गुढ कोड्यासारखी वाटायला लागली. का कुणासठाऊक, पण अमोलच्या मनात कविताविषयी एक खास असं आकर्षण निर्माण झालं. 
     होस्टेलच्या ग्राऊंड फ्लोरमध्ये महिला प्रशिक्षणार्थींसाठी निवासाची व्यवस्था होती.कविता महाराष्ट्रातून आलेली एकमेव महिला होती. अर्थात एकूण ऐंशी लोकांमध्ये तीस महिला होत्या. कविताने शास्त्रीय संगीत ऐकवलं होतं, त्यामुळे ती संगीतातली चांगलीच जाणकार असल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता. तिचा आवाज तर फारच गोड होता.
     दुसर्‍या दिवशी चहाच्या वेळेला कविताने आपल्या लॅपटॉपवरचे ते सगळे फोटो दाखवले, जे तिने रात्रीच्या कार्यक्रमात काढले होते. अमोलने जे गाणं ऐकवलं होतं, तेसुद्धा खास करून  शुट करण्यात आलं होतं.
     क्लासमध्ये अमोल डाव्या बाजूला पहिल्याच रांगेत बसला होता. तर कविता उजव्या बाजूला दुसर्‍या रांगेत असाम आणि तामिळ महिला प्रशिक्षणार्थ्यांसोबत बसली होती. अमोल ज्या ज्या वेळी तिला पाहायचा, त्या त्या वेळी ती त्याच्याकडेच पाहात असल्याची व निरखत असल्याची दिसायची. दोघांची नजरानजर होई, तेव्हा ती डोळ्यांच्या कोनात हसायची. त्यामुळे त्याच्या मनात सुखद फुलांचा ताटवा फुलायचा. गुदगुदी व्हायची. लंच वेळेत अमोलने कविताला आपल्या टेबललाच जेवायला बोलावले. त्या टेबलला त्याचे तामिळ मित्रसुद्धा होते. कविता कुठलीच भीडभाड न ठेवता टेबलजवळ आली आणि खुर्ची ओढून बसली. जेवताना गप्पा सुरूच होत्या. बोलता बोलता तिनं अमोलला विचारलं," सर, तुमच्या फॅमिलीत कोण कोण आहे?'' अमोल आता खुलला होता. त्याने आपल्या फॅमिलीविषयी सारी माहिती विस्ताराने सांगितली. त्याची वाईफ सरकारी जॉब करते. कुठे तरी बाहेर पोस्टेड आहे. एक छोटी मुलगी आहे, जी चौथ्या इयत्तेत शिकते. ती तिच्या मम्मीसोबतच राहते. अमोलनेही तिच्या कुटुंबाविषयी विचारले. पण तिने ते गप्पांच्या ओघात सफाईदारपणे टाळले. हाँ, पण तिच्या चेहर्‍यावर किंचितसा उदासपणा दिसला. पण ती लगेच नॉर्मल होऊन गप्पांमध्ये मिसळून गेली.  
     रात्रीचे आकरा वाजले होते. होस्टेलच्या हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालला होता. दिवसभराच्या घडामोडी आणि कविताचा चेहरा राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. अचानक त्याच्या मोबाईलवर एका अपरिचित क्रमांकाचा कॉल आला. उत्सुकतेपोटी त्याने कॉल रिसीव केला. पुन्हा तोच सुमधूर आवाज कानी पडला. " हॅलो सर, ओळखलंत?" अमोल बोलणार तोच पलिकडून आवाज आला. " मी कविता बोलतेय. तुम्ही दोन मिनिटांसाठी बाहेर लॉनमध्ये येऊ शकाल का?"
     अमोल लगेच बाहेर आला. कविता बाहेर कॅम्पसमध्ये उभी होती. कविताने विचारले," सर, तुमच्याजवळ डोक्यावरची एखादी गोळी आहे का? डोकं फार दुखतंय. काही सुचेनासं झालं आहे." अमोल घाबरून म्हणाला," तसं काही जास्तीचं असेल तर डॉक्टरांकडे जाऊ." परंतु तिने नकार दिल्यावर तो लगेच आत गेला नी आपले मेडिकल कीट घेऊन आला. त्यातल्या दोन गोळ्या कविताला दिल्या. कविताने आभार मानले आणि ती आपल्या खोलीकडे निघून गेली. अमोल विचार करू लागला, का बरं, ही अनोळखी माणसं कधी कधी इतकी आपलीशी वाटतात की त्यांना दु: खी झाल्याचं आपल्याला पाहावतच नाही.
     प्रशिक्षणाचे दिवस अगदी मजेत चालले होते. त्याची कविताविषयीची ओढ मात्र दिवसेंदिवस वाढत चालली होती. दुसर्‍या दिवशी अमोल एका अनामिक ओढीनं वारंवार मोबाईलकडे पाहात होता. कदाचित पुन्हा फोन येईल. रात्रीचे दहा वाजले होते. त्याचे लक्ष रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे नव्हतंच मुळी! आणि थोड्या वेळातच कॉल आला. अमोल तर जणू काय त्याची अधीरतेने वाटच पाहात होता , त्याने पटकन कॉल रिसीव केला. पुन्हा तोच सुपरिचित सुमधूर आवाज कानावर पडला. " गुड नाईट, सर. त्रास तर दिला नाही ना आपल्याला?" कविता विचारत होती. अमोल गंमतीने म्हणाला," का झोप येत नाही का?" कवितानं बोलणं वाढवत विचारलं, तुम्ही कालच्या प्रोजेक्ट वर्कची तयारी  केली का?"  अमोलही मग तिला प्रोजेक्ट वर्कविषयी समजावून सांगू लागला. आता रोजच फोनवर बोलणं होऊ लागलं. अमोलने एक दिवस जे विचारायचं होतं ते शेवटी विचारलंच. " तुम्हाला माझा फोन नंबर कसा मिळाला?"  कविताने त्याचा नंबर रजिस्ट्रेशन डायरीतून घेतल्याचे सांगून त्याची जिज्ञासा संपवली. तशी ती सामान्य गोष्ट होती, परंतु, ती अमोलसाठी असामान्य होती. कविता आपल्याला महत्त्व देतेय, याचेच त्याला अप्रुप वाटत होते आणि याने तो सुखावूनही जात होते.
     काही दिवसांनी आऊटिंग प्रोग्रॅम होता. दाट जंगलात मेडिशनल प्लांटसच्या अभ्यासासाठी दोन रात्री घालवायच्या होत्या.प्रवासात कविताच्या जोक्स आणि नकलांमुळे वातावरण अगदी पिकनिकमय झालं होतं. तिथे पोहचल्यावर फिल्ड ऑफिसरने सगळ्यांना दोन तास लंच आणि विश्रांतीसाठी मोकळीक दिली होती.अमोल आपले लंच पॉकेट घेऊन सहकार्‍यांसोबत एका झाडाखाली गेला. पण त्याचे सारे लक्ष कविताकडेच खिळले होते. जवळ जाऊन अमोल कविताला म्हणाला," पैठणी किती सुंदर दिसते नई?"  कविता डोळ्यांच्या कोनातून पाहात म्हणाली," फक्त पैठणी?" अमोल भांबावला. " नाही... नाही, आणखी बरेच काही. ही हवा, हे जंगल आणि तुम्ही!"
     कविता हसत म्हणाली," मग त्यासाठी एवढं वाईमार्गे सातारा का जायला हवं?" यावर अमोल काय बोलणार? तो नेहमीच मनातल्या गोष्टी दाबून ठेवायचा.
     प्लांटसची माहिती सांगितली जात होती. अचानक कविता आपल्या ग्रुपपासून बाजूला होत, केक्टस प्लांटसच्या दिशेने जाऊ लागली. अमोलला तिने खुणेने बोलावून घेतले. ती म्हाणाली," बघा ना सर! इथला हा सर्वात धीराचा प्लांट आहे. आपण याला कधी सौंदर्याच्या मापदंडानं मोजत नाही. पण हा आपल्याला जगायला शिकवतो." अमोल तिच्या बोलण्याचा अर्थ शोधत राहिला. बाकीचा ग्रुप बराच पुढे निघून गेला होता. तेवढ्यात फोटोग्राफरने दोघांचा फोटो घेतला. अमोलला वाटले, कदाचित हा फोटोग्राफर आपल्या मनातल्या भावना जाणत असावा. कविता पुढे म्हणाली," हा आपल्याला संदेश तर देत नाही? या सगळ्यांमध्ये  स्वतःचं एक  अस्तित्व आहे आणि ते आपल्याला गमावण्याची अजिबात भीती नाही." अमोलला कविता पुन्हा एकदा गुढ कोड्यासारखी भासली.   
     दुसर्‍या दिवशी रेस्ट हाऊसमध्ये कविताने रात्री फिरायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या रात्री पहिल्यांदा अमोलला कविता दिसते तशी नाही, याचा उलगडा झाला. कविताचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षाचा मुलगासुद्धा आहे. पण तिने जीवनात खूप काही सोसलं आहे, जे एका स्त्रीसाठी फारच क्लेशकारक असतं. तिचा नवरा असा ऐयासखोर निघाला की त्याने तिची कदरच केली नाही. कायद्यानं घटस्फोट घेऊन आता तो तिच्यापासून मुक्त झाला होता. कवितानेही या कठोर सत्याचा स्वीकार केला होता. आणि हसत हसतच जगण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या सतत खळाळत्या झर्‍याप्रमाणच्या वागण्यामुळे तिच्याविषयी मत बनविण्यात गफलत होतेच. तशी अमोलचीही झाली होती.
     दुसर्‍या दिवशी औपचारिक निरोपाचा समारंभ होता. सगळेच खूप भाऊक झाले होते. अनोळखी माणसे इतकी जवळ आली होती की, आता एकमेकांपासून दूर होताना त्यांना मोठे कष्ट पडत होते. ग्रुप फोटोच आता काय तो या मधूर आठवणीचा हिस्सा बनणार होता. जड अंतः करणाने एकमेकांची गळाभेट घेत निरोप घेतले- दिले जात होते. अमोलने कविताच्या डायरीत आपल्या हस्ताक्षरात आपला एक संदेश लिहिला होता,' विसर पडू देऊ नकोस.' का कुणास ठाऊक, पण तो अजूनही मनातली गोष्ट कविताला सांगू शकला नव्हता.
     कवितानेही अमोलच्या डायरीत लिहिलं होतं," मी इतिहासावर खूप प्रेम करते. खूप म्हणजे खूप. पण इतिहासाची  पुनर्रावृत्ती करत नाही. - कविता पाटील"
     या विचित्र वाक्याचा अर्थ अमोलला समजला नव्हता. निरोपाच्या वेळी आज  पुन्हा एकदा ती अमोलसाठी एक गुढ कोडे बनून राहिली होती.