"हॅलो! आय एम कविता पाटील, फ्रॉम महाराष्ट्र." खणकत्या सुमधूर आवाजानं अमोलचं ध्यान आकर्षित केलं. त्यानं पाहिलं तर समोर असाधारण अशी सुंदर तरुणी उभी! क्लासरूममधून तो नुकताच आपल्या सहकार्यांसोबत 'टी ब्रेक' साठी बाहेर आला होता. तोच त्याची कविताशी गाठ पडली. "हॅलो, मी अमोल सातपुते. महाराष्ट्राचाच." अमोलने हसून आपली ओळख करून दिली. कविता खरेच सुंदर होती. आकर्षक होती. वय आदमासे २६-२७ असावं. उंच अंगकाठी, भारदस्त पण कोमल शरीर. तीक्ष्ण डोळे. डाव्या गालावर पुसटसा काळा तीळ, जो तिच्या सौंदर्यात आणखी भर घालीत होता. 'टी ब्रेक' संपताच सगळे पुन्हा क्लासरूममध्ये पोहचले.
म्हैसूर या ऐतिहासिक सुंदर नगरीतल्या एक महिन्याच्या प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. भारतातल्या विविध प्रांतांतून प्रशिक्षणासाठी सहभागी होणारे लोक अद्याप येतच होते. कवितासुद्धा दुपारनंतरच आली होती. पाहिल्या दिवसाची औपचारिक ओळख-पाळख आणि प्रशिक्षणाची रुपरेषा संपल्यावर सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना लोकसंगीत आणि नृत्य कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. योगायोगाने अमोलच्या बाजूची सीट रिकामी होती. तेवढ्यात कविता तिथे आली. अमोलने हसतच तिला जवळ बसण्याचा इशारा केला. कविता बसताच ती त्याच्याशी बोलायला लागली. ती सायकॉलॉजी विषयाची लेक्चरर होती. तर अमोल इतिहासाचा. कविताने सांगितलं की तिला विषय खूप आवडतो. तिला त्यात आणखी स्टडी करण्याचा रस होता. हसत तिने विचारलं होतं," तुम्ही मला शिकवणार ना?" तोही हसून म्हणाला होता," अरे, माझा विषय तर भलताच नीरस. मुली तर अगोदरच दूर पळतात." कविता म्हणाली," तुम्हाला ठाऊक आहे, सर! कधी कधी नीरस विषयसुद्धा आम्हाला खूप सरळ वाटतो. अर्थात तो योग्यरित्या समजावून घ्यायला हवा." पहिल्या भेटीतच कविता एका गुढ कोड्यासारखी वाटायला लागली. का कुणासठाऊक, पण अमोलच्या मनात कविताविषयी एक खास असं आकर्षण निर्माण झालं.
होस्टेलच्या ग्राऊंड फ्लोरमध्ये महिला प्रशिक्षणार्थींसाठी निवासाची व्यवस्था होती.कविता महाराष्ट्रातून आलेली एकमेव महिला होती. अर्थात एकूण ऐंशी लोकांमध्ये तीस महिला होत्या. कविताने शास्त्रीय संगीत ऐकवलं होतं, त्यामुळे ती संगीतातली चांगलीच जाणकार असल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता. तिचा आवाज तर फारच गोड होता.
दुसर्या दिवशी चहाच्या वेळेला कविताने आपल्या लॅपटॉपवरचे ते सगळे फोटो दाखवले, जे तिने रात्रीच्या कार्यक्रमात काढले होते. अमोलने जे गाणं ऐकवलं होतं, तेसुद्धा खास करून शुट करण्यात आलं होतं.
क्लासमध्ये अमोल डाव्या बाजूला पहिल्याच रांगेत बसला होता. तर कविता उजव्या बाजूला दुसर्या रांगेत असाम आणि तामिळ महिला प्रशिक्षणार्थ्यांसोबत बसली होती. अमोल ज्या ज्या वेळी तिला पाहायचा, त्या त्या वेळी ती त्याच्याकडेच पाहात असल्याची व निरखत असल्याची दिसायची. दोघांची नजरानजर होई, तेव्हा ती डोळ्यांच्या कोनात हसायची. त्यामुळे त्याच्या मनात सुखद फुलांचा ताटवा फुलायचा. गुदगुदी व्हायची. लंच वेळेत अमोलने कविताला आपल्या टेबललाच जेवायला बोलावले. त्या टेबलला त्याचे तामिळ मित्रसुद्धा होते. कविता कुठलीच भीडभाड न ठेवता टेबलजवळ आली आणि खुर्ची ओढून बसली. जेवताना गप्पा सुरूच होत्या. बोलता बोलता तिनं अमोलला विचारलं," सर, तुमच्या फॅमिलीत कोण कोण आहे?'' अमोल आता खुलला होता. त्याने आपल्या फॅमिलीविषयी सारी माहिती विस्ताराने सांगितली. त्याची वाईफ सरकारी जॉब करते. कुठे तरी बाहेर पोस्टेड आहे. एक छोटी मुलगी आहे, जी चौथ्या इयत्तेत शिकते. ती तिच्या मम्मीसोबतच राहते. अमोलनेही तिच्या कुटुंबाविषयी विचारले. पण तिने ते गप्पांच्या ओघात सफाईदारपणे टाळले. हाँ, पण तिच्या चेहर्यावर किंचितसा उदासपणा दिसला. पण ती लगेच नॉर्मल होऊन गप्पांमध्ये मिसळून गेली.
रात्रीचे आकरा वाजले होते. होस्टेलच्या हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालला होता. दिवसभराच्या घडामोडी आणि कविताचा चेहरा राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. अचानक त्याच्या मोबाईलवर एका अपरिचित क्रमांकाचा कॉल आला. उत्सुकतेपोटी त्याने कॉल रिसीव केला. पुन्हा तोच सुमधूर आवाज कानी पडला. " हॅलो सर, ओळखलंत?" अमोल बोलणार तोच पलिकडून आवाज आला. " मी कविता बोलतेय. तुम्ही दोन मिनिटांसाठी बाहेर लॉनमध्ये येऊ शकाल का?"
अमोल लगेच बाहेर आला. कविता बाहेर कॅम्पसमध्ये उभी होती. कविताने विचारले," सर, तुमच्याजवळ डोक्यावरची एखादी गोळी आहे का? डोकं फार दुखतंय. काही सुचेनासं झालं आहे." अमोल घाबरून म्हणाला," तसं काही जास्तीचं असेल तर डॉक्टरांकडे जाऊ." परंतु तिने नकार दिल्यावर तो लगेच आत गेला नी आपले मेडिकल कीट घेऊन आला. त्यातल्या दोन गोळ्या कविताला दिल्या. कविताने आभार मानले आणि ती आपल्या खोलीकडे निघून गेली. अमोल विचार करू लागला, का बरं, ही अनोळखी माणसं कधी कधी इतकी आपलीशी वाटतात की त्यांना दु: खी झाल्याचं आपल्याला पाहावतच नाही.
प्रशिक्षणाचे दिवस अगदी मजेत चालले होते. त्याची कविताविषयीची ओढ मात्र दिवसेंदिवस वाढत चालली होती. दुसर्या दिवशी अमोल एका अनामिक ओढीनं वारंवार मोबाईलकडे पाहात होता. कदाचित पुन्हा फोन येईल. रात्रीचे दहा वाजले होते. त्याचे लक्ष रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे नव्हतंच मुळी! आणि थोड्या वेळातच कॉल आला. अमोल तर जणू काय त्याची अधीरतेने वाटच पाहात होता , त्याने पटकन कॉल रिसीव केला. पुन्हा तोच सुपरिचित सुमधूर आवाज कानावर पडला. " गुड नाईट, सर. त्रास तर दिला नाही ना आपल्याला?" कविता विचारत होती. अमोल गंमतीने म्हणाला," का झोप येत नाही का?" कवितानं बोलणं वाढवत विचारलं, तुम्ही कालच्या प्रोजेक्ट वर्कची तयारी केली का?" अमोलही मग तिला प्रोजेक्ट वर्कविषयी समजावून सांगू लागला. आता रोजच फोनवर बोलणं होऊ लागलं. अमोलने एक दिवस जे विचारायचं होतं ते शेवटी विचारलंच. " तुम्हाला माझा फोन नंबर कसा मिळाला?" कविताने त्याचा नंबर रजिस्ट्रेशन डायरीतून घेतल्याचे सांगून त्याची जिज्ञासा संपवली. तशी ती सामान्य गोष्ट होती, परंतु, ती अमोलसाठी असामान्य होती. कविता आपल्याला महत्त्व देतेय, याचेच त्याला अप्रुप वाटत होते आणि याने तो सुखावूनही जात होते.
काही दिवसांनी आऊटिंग प्रोग्रॅम होता. दाट जंगलात मेडिशनल प्लांटसच्या अभ्यासासाठी दोन रात्री घालवायच्या होत्या.प्रवासात कविताच्या जोक्स आणि नकलांमुळे वातावरण अगदी पिकनिकमय झालं होतं. तिथे पोहचल्यावर फिल्ड ऑफिसरने सगळ्यांना दोन तास लंच आणि विश्रांतीसाठी मोकळीक दिली होती.अमोल आपले लंच पॉकेट घेऊन सहकार्यांसोबत एका झाडाखाली गेला. पण त्याचे सारे लक्ष कविताकडेच खिळले होते. जवळ जाऊन अमोल कविताला म्हणाला," पैठणी किती सुंदर दिसते नई?" कविता डोळ्यांच्या कोनातून पाहात म्हणाली," फक्त पैठणी?" अमोल भांबावला. " नाही... नाही, आणखी बरेच काही. ही हवा, हे जंगल आणि तुम्ही!"
कविता हसत म्हणाली," मग त्यासाठी एवढं वाईमार्गे सातारा का जायला हवं?" यावर अमोल काय बोलणार? तो नेहमीच मनातल्या गोष्टी दाबून ठेवायचा.
प्लांटसची माहिती सांगितली जात होती. अचानक कविता आपल्या ग्रुपपासून बाजूला होत, केक्टस प्लांटसच्या दिशेने जाऊ लागली. अमोलला तिने खुणेने बोलावून घेतले. ती म्हाणाली," बघा ना सर! इथला हा सर्वात धीराचा प्लांट आहे. आपण याला कधी सौंदर्याच्या मापदंडानं मोजत नाही. पण हा आपल्याला जगायला शिकवतो." अमोल तिच्या बोलण्याचा अर्थ शोधत राहिला. बाकीचा ग्रुप बराच पुढे निघून गेला होता. तेवढ्यात फोटोग्राफरने दोघांचा फोटो घेतला. अमोलला वाटले, कदाचित हा फोटोग्राफर आपल्या मनातल्या भावना जाणत असावा. कविता पुढे म्हणाली," हा आपल्याला संदेश तर देत नाही? या सगळ्यांमध्ये स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि ते आपल्याला गमावण्याची अजिबात भीती नाही." अमोलला कविता पुन्हा एकदा गुढ कोड्यासारखी भासली.
दुसर्या दिवशी रेस्ट हाऊसमध्ये कविताने रात्री फिरायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या रात्री पहिल्यांदा अमोलला कविता दिसते तशी नाही, याचा उलगडा झाला. कविताचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षाचा मुलगासुद्धा आहे. पण तिने जीवनात खूप काही सोसलं आहे, जे एका स्त्रीसाठी फारच क्लेशकारक असतं. तिचा नवरा असा ऐयासखोर निघाला की त्याने तिची कदरच केली नाही. कायद्यानं घटस्फोट घेऊन आता तो तिच्यापासून मुक्त झाला होता. कवितानेही या कठोर सत्याचा स्वीकार केला होता. आणि हसत हसतच जगण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या सतत खळाळत्या झर्याप्रमाणच्या वागण्यामुळे तिच्याविषयी मत बनविण्यात गफलत होतेच. तशी अमोलचीही झाली होती.
दुसर्या दिवशी औपचारिक निरोपाचा समारंभ होता. सगळेच खूप भाऊक झाले होते. अनोळखी माणसे इतकी जवळ आली होती की, आता एकमेकांपासून दूर होताना त्यांना मोठे कष्ट पडत होते. ग्रुप फोटोच आता काय तो या मधूर आठवणीचा हिस्सा बनणार होता. जड अंतः करणाने एकमेकांची गळाभेट घेत निरोप घेतले- दिले जात होते. अमोलने कविताच्या डायरीत आपल्या हस्ताक्षरात आपला एक संदेश लिहिला होता,' विसर पडू देऊ नकोस.' का कुणास ठाऊक, पण तो अजूनही मनातली गोष्ट कविताला सांगू शकला नव्हता.
कवितानेही अमोलच्या डायरीत लिहिलं होतं," मी इतिहासावर खूप प्रेम करते. खूप म्हणजे खूप. पण इतिहासाची पुनर्रावृत्ती करत नाही. - कविता पाटील"
या विचित्र वाक्याचा अर्थ अमोलला समजला नव्हता. निरोपाच्या वेळी आज पुन्हा एकदा ती अमोलसाठी एक गुढ कोडे बनून राहिली होती.

No comments:
Post a Comment