Sunday, November 3, 2019

महिला सशक्तीकरण: काल आणि आज


भारतीय संस्कृतीमध्ये नारीला सन्मानजनक वागणूक देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपल्या वैदिक शास्त्रांत म्हटलं गेलं आहे,'यत्र नार्यस्तु पूजयंते, रमयंते तत्र देवता'.हिंदू सनातन धर्मात माता दुर्गेला जगाचे पालन करणारी ,त्यांचे कल्याण करणारी आणि दृष्टांचा संहार करणारी अधिष्ठात्री देवी मानली गेली आहे. गार्गी, सावित्री, सीता,कौशल्या आणि कुंतीसारख्या अनेक विदुषी नारींच्या व्यक्तिमत्त्व,त्याग आणि साहसाच्या गाथा आजदेखील आपल्या समाजात ऐकल्या,वाचल्या जातात. भारतीय समाजाच्या विविध कालखंडांवर नजर टाकल्यावर आपल्याला लक्षात येईल की, महिलांना वैदिक काळात कुंटुंबात,समाजात आदराचे स्थान होते. तत्कालीन समाजात अशी धारणा होती की,नारीशिवाय पुरुषाला धर्म,कर्म, अर्थ,काम आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही.

Friday, November 1, 2019

सगळीकडे भानगडीच भानगडी


काही दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, मी कुठल्या भानगडीत तर पडलो नाही ना? खूप विचार केल्यावर मी या निष्कर्षाला आलो की, नाही!आपण कुठल्याच भानगडीमध्ये पडलो नाही. मला माझा अभिमान वाटला. मग पुन्हा विचार केला , का आपण कुठल्या भानगडीत पडलो नाही? हा विचार करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. अर्जून महाभारताच्या रणांगणावर आपल्याच नातेवाईकांविरोधात लढायला उभा होता. त्याच्या पुढे प्रश्न पडला होता की, आपल्याच माणसांचा संहार कसा करायचा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला,'ब्रम्ह सत्य,जगत मिथ्या'. याचा अर्थ हे दिसणारं जग सत्य नाही,ब्रम्हच सत्य आहे. त्यामुळे अर्जुना तू या जगताच्या भानगडीत पडू नकोस. हे सर्व फसवं आहे. आजच्या कलियुगात तर आपल्याला फारच विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहेत. आजची मुलं आईबापांना एक तर आश्रमात पोहचते करत आहेत किंवा वाऱ्यावर सोडत आहेत. माझ्याच परिसरातील एक घटना आहे. आईवडिलांना गावाकडेच टाकून मुले पुण्या-मुंबईला स्थायिक झाले आहेत.

जग उजळेल

दोन दिवे खास मित्र होते.  एकत्र राहायचे.  त्यातील एक दिवा थोडा मोठ्या आकाराचा होता.  दिवाळीच्या रात्री घराचा मालक आला. त्याने मोठा दिवा पेटवला.
 दिव्याने परिसर उजळून निघाला. मोठ्या दिव्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने विचार केला
 की,आपण रात्रभर उजळत राहू  आणि मालकाला आनंदित करून टाकू. कोणताही  दुसरा दिवा माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाही. मी माझ्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून टाकेन.  मग त्याचा मित्र त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
छोटा दिवा म्हणाला, 'मित्रा, मला पण  प्रकाश दे, जेणेकरून मलादेखील अंधार कमी करण्यास हातभार लावता येईल.  मीही यासाठी योगदान देऊ शकतो.  मोठा दिवा बढाई मारत म्हणाला, ' तू काय प्रकाश देशील? यासाठी मी एकटा पुरेसा आहे.'  लहान दिवा गप्प राहिला. मोठा दिवा एकट्याने घर उजळून टाकण्याचा प्रयत्न करू लागला. पण संपूर्ण घर उजळून टाकण्यास तो असमर्थ ठरला.