Thursday, December 20, 2018

कुणाला घाबरायचं नाही: रुबी मेरी

रुबी तेव्हा पंधरा वर्षांची होती. ती आपल्या कुटुंबासह ब्रिटनमधल्या वेल्स प्रदेशात राहत होती. शाळेचे दिवस अगदी मस्त आणि आनंदात जात होते. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक कुटुंबात भूकंप झाला. तिची मोठी बहीण कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. संपूर्ण कुटुंब तिच्या शोधासाठी बाहेर पडलं. नंतर कळलं की, तिने तिच्या मित्रासोबत लग्न केलं आहे. हे ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसला. सगळ्यांनाच बदनामीची भीती होती. आई तर फारच काळजीत होती. नातेवाईकांमध्ये तोंड कसं दाखवायचं, हा तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्यांचे कुटुंब बांगलादेशहून आलेले होते. साहजिकच बहुतांश नातेवाईक तिथेच होते. आज समाजसेवा क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारी आणि ब्युटी क्विन विजेती ठरलेली रुबी मेरी हिची कथा आहे.

Saturday, December 8, 2018

यशासाठी व्हावी योग्य सुरुवात


   
 असं म्हणतात की, कोणत्याही कामाची सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवटदेखील चांगला होतो.जर तुम्ही दिवसाची सुरुवातसुद्धा चांगल्या प्रकारे कराल,तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात कशी करावी म्हणजे आपल्याला त्याचा लाभ मिळेल.हे आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्या जीवनात काही ना काही बदल करणं आवश्यक आहे. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये बदल करायला हवा. सकाळच्या रुटीन वर्कवर अधिक फोकस द्यायला हवा. यात बदल करून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत सहज पोहचू शकता. किंवा तुम्हाला यशाचा मार्ग मिळू शकेल. यात तुम्ही रोज करणार्या कार्यांची संख्या वाढवू शकता. सकाळच्यावेळी महत्त्वाची अर्थात गरजेची कामे पूर्ण करावीत. त्यामुळे तुम्हाला नंतरच्या काळात खूप वेळ मिळतो. आणि हा वेळ उपयोगाच्या कामासाठी वापर करू शकता.

प्रतिभावंत लेखकाची परवड


     परवा झुलवाकार उत्तम बंडू तुपे या  प्रतिभावंत लेखकाची दुर्दशा एबीपी माझावर पाहायला मिळाली. खरे तर उत्तम बंडू तुपे हे माझे आवडते लेखक. त्यांची देवदासी प्रथेवरची झुलवा ही कादंबरी वाचल्यानंतर मी त्यांच्या  कादंबरींचा फॅन झालो होतो. एका दुर्लक्षित पण महत्त्वाच्या विषयाला हात घातला होता.  त्यांनी जोगत्याचा वेश घालून महाराष्ट्र आणि कर्नाटकला भाग पिंजून काढला होता. आपल्या जत,कोकटनूर, सौंदती या भागात देवदासी प्रथा मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या कादंबर्यांचं मला भारी अप्रूप होतं. अर्थात लेखक काय करतो, कुठे राहतो, याचं आपल्याला काही देणंघेणं असत नाही. पण परवाच्या एबीपी माझाने त्यांच्यावर केलेल्या स्टोरीमुळे प्रतिभावंत साहित्यिकांची कशी परवड होते, हे पाहायला मिळाले. साहित्य अकादमीसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे उत्तर आयुष्य फारच हलाखीत चालल्याचे दिसत होते. इथे पैशांशिवाय मानसन्मानाला काहीच किंमत नाही,हेच अगदी ठळकपणे दिसून आले.