उत्तम आरोग्यासाठी
आहाराची भूमिका महत्त्वाची आहे. सकस आणि संतुलित आहार आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल काहीही आणि कसंही खाल्लं जात आहे.जंकफूडवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुले पोटाच्या तक्रारी
वाढल्या आहेतच शिवाय खाण्या-पिण्याच्या संबंधित अनेक आजारही बळावत
आहेत. त्यामुळे याचा परिणाम माणसाच्या कामांवर होत आहे.
शारीरिक,मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खाण्या-पिण्याच्या सवयी, अनियमितपणा, सकस आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे आरोग्य
बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच सकस आणि संतुलित आहाराचे सेवन,
खाण्या-पिण्याच्या सवयी याबाबतीत लोकांना मार्गदर्शनाची
गरज आहे. आजकाल याबाबत जागृतीही वाढली आहे,त्यामुळे डायटिशियन ( आहार तज्ज्ञ) ची आवश्यकता भासू लागली आहे. या क्षेत्रात करिअर करायला
मोठी संधी असून वेतनही चांगले मिळत आहे.
आरोग्य चांगले
राहण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत जागरुकता वाढत आहे. संतुलित आणि सकस आहार म्हणजे
काय? त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा? खाण्या-पिण्याच्या वेळा कशा पाळाव्यात याबाबत अधिक माहिती
आहार तज्ज्ञाला अधिक असते. आहार तज्ज्ञ आपला आहार आपल्या आरोग्यास
अनुकूल असावा, याबाबतची काळजी घेतात. अर्थात
शिक्षण घेतल्याशिवाय, वाचल्याशिवाय कोणी आहार तज्ज्ञ होऊ शकत
नाही. काळ वेगाने बदलतो आहे. लोक आपल्या
आरोग्याची काळजी घेत आहेत. आपल्या आरोग्याबाबत लोकांची वाढत असलेली
जागरुकता पाहता आज डायटिशियन ( आहार तज्ज्ञ) ची मागणी पहिल्यापेक्षा अधिक वाढली आहे.
डायटिशियनचे काम
एका डायटिशियनचे
महत्त्वाचे काम म्हणजे लोकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारासंबंधीची माहिती आणि
मार्गदर्शन करण्याचे आहे.एकाद्या माणसाचे वय , आजार इत्यादी गोष्टींचा विचार करून
त्यांचे आरोग्य कसे उत्तम राहील यासंबंधी योग्य स्वरुपाचा आहार निश्चित केला जातो. त्याचबरोबर याही गोष्टीचा विचार केला
जातो की, आहार कशाप्रकारे तयार करायला हवा. सगळ्या न्यूट्रिशनल वॅल्यू आणि प्रिंसिपलनुसार आहार असावा,याकडे लक्ष दिले जाते.कोणत्या आहारात कोणते पौष्टीक तत्त्व
(विटामिन आणि मिनरल्स) किती प्रमाणात असतात,यावरही त्यांचे संशोधन सुरू असते. सांगण्याचे तात्पर्य
असे की, आहार तज्ज्ञ आपले आरोग्य चांगले राहण्याबरोबरच काळानुरूप
तंदरुस्त राहण्याचा मंत्रही सांगतात.
शैक्षणिक पात्रता
आहार तज्ज्ञ बनून
आपले भविष्य बनवण्याची आणि दुसर्यांना योग्य आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला द्यायची इच्छा असेल तर तुम्हाला
बारावी उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यानंतर दोन वर्षांची न्यूट्रिशियनचा
पदवी कोर्स करू शकता.जर बारावीला होम सायन्स किंवा विज्ञान विषय
असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम म्इलतो. याशिवाय यात बीएसस्सी
(होम सायन्स), एमएसस्सी (फूड अँड न्यूट्रिशियन) आणि डायटेटीक्समध्येदेखील पदवी
मिळते.
नोकरीची संधी
या क्षेत्रात पुष्कळ
नोकरीच्या शक्यता आहेत. अगोदर फक्त हॉस्पीटल्समध्ये आहार तज्ज्ञांना मागणी होती. मात्र आता एयरलाइन्स,रेल्वेला भोजन सप्लाय करण्याच्या
ठिकाणी,कॉर्पोरेट,हॉटेल्स, हेल्थ आणि फिटनेस सेंटर्ससारख्याठिकाणी जीम,कॉलेज आणि
विद्यापीठात अध्यापक म्हणून करता येते. याशिवाय केटरिंग विभाग,फूड मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च लॅब, चाइल्ड हेल्थ केयर सेंटर,
ब्युटी क्लिनिक, सरकारी आरोग्य विभाग आदी ठिकाणीदेखील
काम करण्याची संधी मिळते.कन्सल्टेंटमध्येसुद्धा करिअरची सुरुवात
करता येते. तसे पाहायला गेले तर डायटिशियनची सगळ्यात जास्त मागणी
हेल्थ केअर सर्विसमध्ये असते. आपल्यासाठी हॉस्पीटल आणि क्लिनिकमध्ये
चांगल्या शक्यता आहेत.सरकारी विभागातही डायटिशियन म्हणून काम
करण्याची संधी मिळू शकते. या सरकारी संस्थांमध्ये आपल्याला लोकांच्यात
जाऊन त्यांना खाण्या-पिण्याच्या सवयीसंबंधी जागृती करण्याची संधी
मिळू शकते.
वेतनसंबंधी
या क्षेत्रात मिळकतदेखील
चांगली आहे.ट्रेनी टायटिशियन
20 ते 25 हजार रुपये प्रतिमहिना कमावतात.
दोन-तीन वर्षाच्या अनुभवानम्तर संधीबरोबरच वेतनदेखील
चांगल्या प्रकारे वाढत जाते.स्वत:चे क्लिनिक
काढून प्रॅक्टिसदेखील करता येते.
प्रशिक्षण संस्था:
युनिव्हर्सिटी
ऑफ दिल्ली (दिल्ली)
बुंदेलखंड युनिव्हर्सिटी,झांशी (उत्तरप्रदेश)
कोलकाता विद्यापीठ,कोलकाता
गुरु नानकदेव युनिव्हर्सिटी, अमृतसर(पंजाब)