Friday, October 20, 2017

(कथा) एक अदभूत कथा

     ऑस्टीनच्या उत्तर प्रांतात कधी काळी स्मोथर्स नावाचे एक प्रामाणिक कुटुंब राहत होते.जर शहरातल्या लोकसंख्येच्या समांतर एखाद्या विशेष लेखासाठी विचार केला तर, कुटुंबात एकूण सहा माणसे होती. या सहा माणसांमध्ये समावेश होता- जॉन स्मोथर्स,त्याची बायको, ती स्वत:,त्यांची एक पाच वर्षांची मुलगी आणि मुलीचे पालक. खरे तर वास्तविक मोजल्यावर ते तीनच होते.
एका रात्रीला जेवण झाल्यावर मुलीच्या पोटात जोराने दुखायला लागले,तेव्हा बाप लगेच औषधे आणायला धावला. तो पुन्हा कधी परत आला नाही.
     
काही दिवसांनी मुलीची तव्येत बरी झाली.पुढे ती मोठी झाली. यौवनात आली. नवर्याच्या जाण्याने आई अगदी कोलमडून पडली होती.
या दु:खातून बाहेर पडण्यासाठी नवर्याच्या मृत्यूनंतर तीन महिन्यानंतर तिने दुसरे लग्न केले आणि सेंट एंटोनियोला निघून गेली.
छोट्या मुलीनेदेखील मोठे झाल्यावर लग्न केले आणि जेव्हा काही वर्षे उलटली,तेव्हा तीदेखील एका पाच वर्षाच्या मुलीची आई म्हणून ओळखली जाऊ लागली. ती आजसुद्धा त्याच घरात राहते,जिथून तिचा बाप एकदा गेला तो गेला, तो पुन्हा कधी परत आला नाही.
एका रात्री योगायोगाने तिच्या लहान मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केली.ही रात्र जॉन स्मोथर्सच्या बेपत्ता होण्याची रात्र होती.याच रात्री काही वर्षांपूर्वी जॉन स्मोथर्स गायब झाले होते,ते आज जिवंत असते तर या लहान मुलीचे आजोबा म्हणून ओळखले असते.
मी शहरात जाऊन हिच्यासाठी औषध आणतो.” जॉन स्मिथ मुलीचा त्रास पाहून म्हणाला.( जॉन स्मिथ आणखी कोणी नाही तर त्या लहानाची मोठी झालेल्या मुलीचा नवरा आहे आणि छोट्या मुलीचा बाप.)
“  नाही, अजिबात नाही,जॉन.” त्याच्या बायकोने तेव्हा त्याला हे सांगून थांबवले की, तोही कायमचा बेपत्ता होईल आणि परत येण्याचे विसरून गेला तर...!
तेव्हा जॉन स्मिथने जायचा विचार सोडून दिला आणि बायकोसोबत छोट्या पैंसीच्या डोक्याजवळ बसून राहिला.( छोट्या पाच वर्षाच्या मुलीचे नाव पैंसी होते.)
काही वेळानंतर पैंसीची तब्येत आणखी बिघडली, तेव्हा जॉन स्मिथ पुन्हा औषध आणायला जाण्याचा प्रयत्न केला,पण त्याच्या बायकोने तिला जाऊ दिले नाही.
पुन्हा अचानक घराचा दरवाजा उघडला, त्यातून एक कमरेतून झुकलेला म्हातारा माणूस आत आला.
आजोबा!”  पैंसी पटकन बोलली. तिने त्या माणसाला घरातल्या बाकी सदस्यांअगोदर ओळखले होते.
म्हातार्या माणसाने आपल्या खिशातून एक औषधाची बाटली बाहेर काढली आणि त्यातले चमचाभर औषध पैंसीला पाजले.
ती झटकन बरी होऊन उठून बसली.
मग जॉन स्मोथर्स म्हणाला, “  मला यायला थोडा उशीर झाला. मी गाडीची वाट पाहात होतो.” (कथा-   ओ हेनरी)
                                                                                                                  अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment