आज सोशल मिडियावर
भारत सरकार निर्बंध आणण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. ज्या सोशल मिडियाच्या जोरावर भाजप
सरकार सत्तेवर आले आहे,तेच सरकार आता सोशल मिडिया त्यांच्या विरोधात
बोलू लागल्यावर त्याच्यावर निर्बंध आणण्याची भाषा करत आहे, हे
जरा खटणारेच आहे. सोशल मिडिया झट के पट आपला निर्णय देऊन मोकळा
होत असते. सोशल मिडियावर कार्यरत असणारी मंडळी आपल्याला काय रुचते,काय नको किंवा पाहिजे आहे,याचा लगेच कंडका पाडून मोकळे
होत असते. अर्थात त्यात दूरचा विचार कमीच असतो. त्यामुळे या सोशल मिडियावर किती आणि कोणी विश्वास ठेवायचा,याचा ज्याने त्याने विचार करायचा आहे. सोशल मिडिया म्हणजे
प्रसार माध्यमे नाहीत,याचाही विचार झाला पाहिजे.मात्र आजकाल प्रसारमाध्यमे सोशल मिडियाचा आपल्या बातमीपत्रात वापर करून घेत
आहे. सोशल मिडियावर चाललेल्या गोष्टींचा,विषयांचा विचार इथे होताना दिसत आहे. म्हणजे प्रसारमाध्यमांनाही
याची दखल घ्यावी लागत आहे. साहजिकच सोशल मिडियाचे महत्त्व वाढत
आहे.
सोशल मिडियावर
अनेक फ्लॅटफॉर्म आहेत. या मिडियामध्ये फेसबूक आघाडीवर आहे, नव्हे तो या मिडियाचा
बादशहा ठरला आहे.कारण फेसबूकवर तब्बल दोनशे कोटीच्यावर लोक कार्यरत
आहेत. दुसर्या क्रमांकावर ऑनलाइन व्हिडीओ
सेवा देणारा युट्युब आहे. या मिडियाशी जोडल्या गेलेल्या लोकांची
संख्या दीडशे कोटी आहे. फेसबूक आणि युट्युब यांच्यातील संख्येचा
फरक 50 कोटीचा आहे. बाकी फ्लॅटफॉर्म लोकप्रियतेच्याबाबतीत
फारच मागे आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडे जास्त लोकप्रिय असलेला
वॉट्स अॅप पहिल्या पाचातसुद्धा नाही. त्यामुळे
थोडे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
जगभराची लोकसंख्याही
सात अब्ज आहे. या जागतिक
लोकसंख्येपैकी दोन अब्जपेक्षा अधिक लोक फेसबूकशी निगडीत आहेत. सुरुवातीपासूनच फेसबूकने आपले सोशल मिडियातले बादशहापद कायम ठेवले आहे.फेसबूक नवनवे फिचर्स आणि कल्पना लढवून लोकांना कायम जोडून राहण्यासाठी सतत
प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्या आसपासही कोणी
फिरकेल असे वाटत नाही. मात्र दुसर्या क्रमांकावर
दीडशे कोटी लोकांशी जोडला गेलेला युट्युब लोकांच्या पसंदीला उतरत आहे,याचे समाधान आहे.कारण अनेक प्रश्नांचे उत्तर यावर लोकांना मिळत आहे. वेबसिरीज हा प्रकार
यावर जोरात सुरू आहे.त्यामुळे याचे प्रेक्षकसंख्या वाढत आहे.
तिसर्या क्रमांकावर इस्टाग्राम आहे.याची सदस्यसंख्या 80 कोटी आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ट्विटर आणि रेडिट आहे.या सोशल मिडियाशी अनुक्रमे 33 आणि 25 कोटी लोक जोडले गेले आहेत. 20 कोटी लोकांसह वाइन सहाव्या
तर पिंटारेस्ट साडेसतरा कोटी लोकांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारतात सेलिब्रेटी ट्विटरवर अधिक कार्यरत असले तरी त्यांना फॉलो करणार्या लोकांची संख्या कमी आहे. एकूण काय तर अजूनही फेसबूक
बादशहाचे बिरुद निर्विवाद मिरवत आहे.(संकेत टाइम्स: संपादकीय)
No comments:
Post a Comment