हिरवंगार एक जंगल
होतं.तिथे सगळे प्राणी आनंदाने राहत होते.एक हरीण मोना आणि तिचे पिल्लू सोन्याही तिथे राहत होते.
एक दिवस सोन्या
म्हणाला, “ आई, मी
खेळायला जातो आणि लवकर परत येतो. ”
“ शहाणा झाला
रे! मी म्हणायच्या अगोदरच सांगून टाकलंस,लवकर येईन म्हणून!बरं जा,पण जाताना
मोबाईल घेऊन जा.काही लागलं तर फोन कर. ” आईने मोबाईल त्याच्या गळ्यात अडकवला.
“ आई,खेळताना गं कशाला मोबाईल? ”
“तुला माहित
नाही,जंगलात पावला-पावलाला धोके आहेत.कधी कशाची गरज भासेल सांगता यायचे नाही. मोबाईल गळ्यात
असू दे.काही होत नाही. ” आई म्हणाली.
“बरं ठीक आहे,
मी जातो. ”
“जा पण,
कुणाशी भांडू नकोस. ”
सोन्या गेला. आईदेखील तिच्या कामाला लागली.
संध्याकाळ झाली. सोन्या अजून परतला नाही,
मोनाला काळजी वाटू लागली. कुठे अडचणीत तर सापडला
नसेल? मोनाने सोन्याला फोन लावला, “बाळा,
कुठायस तू? किती उशीर झालाय.लवकर परत ये. ”
“ आई,
मी तर मांजरीण मावशीसोबत खेळतोय. ”
“इथे जंगलात
कुठे आलीय मांजरीण मावशी? तुझा काही तरी गैरसमज झालाय.
”
“ खरंच आई,
त्यांच्यासोबतच आहे. तिला आणखी
तीन बहिणी आहेत. आम्ही सगळे
एकत्रच खेळतोय. थोड्या वेळाने येतो. ”
“ तुझी त्यांना
ओळखण्यात काही तरी चूक होतेय.ते वाघाचे बछडे तर नाहीत ना?
”
“ थांब,
मी आताच त्यांचा फोटो पाठवतो. ” लगेच त्याने फोटो
पाठवला.
फोटो पाहून मोनाचे
तर होशच उडाले.ती घाबरून म्हणाली,
” तू ज्यांना मांजरीचे पिल्ले म्हणतोयस ना,ते वाघाचे
बछडे आहेत.माझं नीट ऐक, काही तरी सांगून
तिथून निसटून ये.नाही तर त्यांची आई येईल आणि तुला खाऊन टाकील.
”
“ आई,
उगाच मला भिती घालू नकोस. की हे तर खूप चांगली
आहेत. माझे मित्र बनले आहेत. ”
“ तुझी काळजी
वाटतेय, बाळा. आज तुझं काय होईल?
”
“माझी काही काळजी
करू नकोस.हे खूप चांगले आहेत.वाघाचे बछडे
असले तरी काय झाले. आता आम्ही आहोत. मैत्री
तर कुणाशीही होऊ शकते ना, आई? ”
“ बाळा,
मैत्री करण्यापूर्वी समोरच्याविषयी संपूर्ण माहिती घ्यायला हवी.
मैत्री आपल्या बरोबरच्याशी केली जाते.तू लवकर निघून
ये बस्स! ”
इतक्यात सोन्याला
वाघीण दिसली.. म्हणाला,
“खरेच आई., समोरून वाघीण येतेय. आणि हे सगळे आई आई म्हणत तिच्याकडे पळाले. ”
“ बाळा,
तिथून लवकर पळ काढ. आता कसला विचार करू नकोस.
”
“ आई,
मी तर पळालो,फोन बंद कर. ” त्याने धूम ठोकली आणि आईच्या पुढ्यात येऊनच सुटकेचा श्वास सोडला.
No comments:
Post a Comment