Saturday, October 28, 2017

कालबाह्य कॉम्प्युटर शिक्षण

     नव्वदच्या दशकात कॉम्प्युटर शिक्षणाला शालेय शिक्षणात स्थान देण्यात आलेपरिणामस्वरुप या शतकाच्या सुरुवातीलाच या क्षेत्रात  आपल्या देशाचा दबदबा वाढायला लागला.यात मध्यमवर्गीय यशाच्या कित्येक कहाण्या समोर आल्याजसे कीइन्फोसिस आणि अन्य स्वदेशी कंपन्याही होत्याज्या कंपन्यांनी लाखो युवकांना या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी प्रेरित केलेपण हे यश दीर्घकाळापर्यंत टिकू शकले नाही.देशात माहिती तंत्रज्ञानचा बाजार एकशे पन्नास अब्ज डॉलरचा आहे,जो देशाच्या जीडीपी (घरेलू सकल उत्पादन)च्या 9.5 टक्के आहे आणि संपूर्ण जगात 37 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे.अर्थव्यवस्थेला इतके महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे क्षेत्र आज उत्पादकतेच्या दृष्टीकोनातून यासाठी मागे पडले आहे कीकॉम्प्युटर शिक्षणात नवोन्मेषची भारीच कमतरता आहेशिवाय बाजाराच्या मागणीच्या प्रमाणात तर फारच मागे आहेतंत्रज्ञानावर वाढलेले अवलंबन फायद्याचे तेव्हाच होईल,ज्यावेळेला माहिती तंत्रज्ञानचे शिक्षण महाविद्यालय आणि शाळास्तरावर अधिक गांभिर्याने शिकवले जाईल.
      कॉम्प्युटर शिक्षण दोन प्रकारच्या समस्यांचा बळी ठरला आहेपहिला प्रकार म्हणजे शाळांमध्ये अजूनही फोकस एमएस वर्ड,एक्सेल,पावर पॉइंट आदींवर दिला जात आहेदुसरा प्रकार हा कीकॉम्प्युटरची प्राथमिक भाषा शिकवण्याचा संपूर्ण जोर बेसिकसारख्या भाषेवर दिला जात आहेएकेकाळची प्रमुख कॉम्प्युटर भाषाजसे कीसी,लोगो,पास्कलकोबोल बेसिकजावा , या आता व्यवहाराच्या बाहेर फेकल्या गेल्या आहेत,त्याच भाषा आपल्याकडे  अजूनही अभ्यासक्रमाच्या भाग बनून राहिल्या आहेतखरे तर सध्या कॉम्प्युटर तंत्रज्ञानामध्ये प्रमुख देशांनी ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि ओपन सोर्स लँग्वेजचा स्वीकार केला आहेआर,पायथॉन,रुबी ऑन रेललिस्पटाइप स्क्रिप्टकोटलिनस्विफ्ट आणि रस्ट आदी कॉम्प्युटर भाषांचा वापर वाढू लागला आहेया भाषा सी,लोगोपास्कल,कोबोल बेसिकजावा इत्यादीच्या तुलनेत अधिक संक्षिप्त आणि सोप्या आहेत.या भाषांची मागणी  अशा क्षेत्रांमध्ये अधिक कामाच्या आहेतज्यांची आज खूप मागणी आहेउदाहरणच द्यायचे झाले तर आर्टिफिशयल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सचे देता येईल.
     आज प्रत्येक उद्योग माहिती तंत्रज्ञानाच्या भरवशावरच चालले आहेतमग ते निर्मिती,शस्त्रक्रियाभरती क्षेत्र असेल किंवा लेखा-वित्त आदी.सगळेच कॉम्प्युटरकृत होत आहेतग्राहकदेखील पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहेआता कॉम्प्युटर कौशल्य आणि त्याची भाषा अवगत करणं आवश्यक झालं आहेपण आपल्याकडे उच्चशिक्षणाची फारच वाईट अवस्था आहेशिक्षण संस्थांमध्ये प्रायोगिक कार्य आणि वास्तविक कोड निर्मिती करण्यासारखी परिस्थिती नाहीत्यामुळे कोणी कॉम्प्युटर पदवीधारक एखाद्या नोकरीमध्ये जाईल,त्यावेळेला कंपनीला त्याला शिकवावं लागणार आहेत्यामुळे कंपनीवरच अनावश्यक खर्चाचे ओझे वाढणार आहेत्यामुळे वेळही वाया जाणार,हे साहजिक आहे.
     2011 मधील आय नॅस्कॉमच्या एका अहवालानुसार देशातील 25 टक्के आयटी इंजिनिअर पदवी धारण केलेले युवकच फक्त या रोजगाराच्या लायकीचे आहेतआता तर सहा वर्षांनंतर परिस्थिती आणखी वाईट झाली आहेएस्पाएरिंग माइंड स्टडीच्या एका अहवालानुसार देशातील पाच टक्के कॉम्प्युटर इंजिनिअरच उच्च स्तरीय प्रोग्रामिंगसाठी उपयुक्त आहेतवेगाने डिझिटल होणार्या भारतात नवनव्या तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेषांना भारतीय कौशल्य विचारशक्तीमध्ये आणण्यासाठी अधिक मुक्त आणि प्रगत कॉम्प्युटर शिक्षणाच्या दिशेने नेण्यातच भले आहेअन्यथा एकेकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहिलेल्या भारताचा प्रतिस्पर्धेच्या या बाजारात टिकाव लागणे कठीण आहे.


No comments:

Post a Comment