Tuesday, June 30, 2020

लॉकडावूनला पर्याय आपणच!

महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्र सरकारपुढे याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हताच. जर अशाप्रकारे कोविड-19 चा संसर्ग वाढत राहिला तर आपण 'अनलॉक' ची अपेक्षाच करू शकणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडावूनच्या काळात टप्प्या-टप्प्याने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला शिक्षण संस्था सोडल्या तर जवळपास सर्वच गोष्टींना पूर्ववत मुभा दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली अर्थव्यवस्था मार्गावर आणणं खूप जरुरीचं होतं. आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे, ही समाधानकारक बाब असली तरी दुसरीकडे कोविड-19 चा संसर्ग मात्र कमी होताना दिसत नाही.

Monday, June 29, 2020

शाळा महत्त्वाची की मुलांचे आरोग्य?

कोरोनाचा आपल्या देशात भडका उडाला आहे. रोजचे लागण होण्याचे प्रमाण कमालीचे झपाट्याने आणि चिंताजनाकरित्या वाढत असल्याने स्वतःची काळजी स्वतः घेणं क्रमप्राप्त आहे. सुरक्षित अंतर ,तोंडाला मास्क आणि स्वच्छता या त्रिसूत्रीच्या आधारावर कोरोना संसर्गात जगावं लागणार आहे. अशात शाळा सुरू करण्याच्याबाबतीत शासकीय पातळीसह  विविध स्तरावर उलटसुलट बोललं जातं आहे. आपल्या देशात कुठलीही एक गोष्ट ठामपणे होत नाही.किंवा करता येत नाही. त्याला टोकाच्या दोन दिशा आहेत. लॉकडाऊनसारखा कमालीचा टोकाचा निर्णय घेताना जरी त्याच्या होणाऱ्या परिणामांची काळजी घेतली नसली तरी लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, याची जी अपेक्षा केली होती, तीही पूर्ण झाली नाही.  या काळात जरी संसर्गाला काही प्रमाणात अटकाव घातला तरीही ,त्याला पूर्णतः  नष्ट करण्यात आपल्याला यश आले नाही.

Saturday, June 27, 2020

काळे धंदेवाले,सावकारांना घ्या 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर

सावकारी, काळेधंदे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे शासकीय घटक आणि काळेधंदे करणारे यांच्यात जे 'आर्थिक संबंध'आहेत,ते जगजाहीर आहेत. यामुळे काळेधंदेवाले आणि सरकारीबाबू यांनी आपली घरे भरून घेतली आहेत. सावकार तर गोरगरिबांच्या मुंड्या पिरघळून सुखासीन जगात लोळत आहेत. दोन नंबर करून जगणाऱ्या लोकांची इथे चलती आहे. त्यांना ना 'इन्कम टॅक्स' ची भीती ना कारवाईची! दोन नंबरच्या धंदेवाल्यांना कायद्याची बाजू सांभाळणाऱ्या लोकांना हाताशी धरले की काम झाले. मग ही मंडळी कुणाला भिकच घालत नाहीत. उलट यांची दादागिरी वाढते.

Thursday, June 25, 2020

शिक्षकांच्या पोटात भीतीचा गोळा

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांना 'टाळे' लागले आहेत. ही कुलपे कधी उघडली जातील, हे सांगणं सध्यातरी कठीण आहे. काही दिवसांपूर्वी रोज दहा हजारांनी  वाढणारी कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता 15 हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्याबाबतीत शिक्षकांबरोबर पालकांनाही चिंता सतावू लागली आहे. परंतु, या सगळ्यांत शिक्षकांच्या पोटात मात्र भीतीचा गोळा उठला आहे. 'काम नाही तर दाम नाही',अशी भूमिका सरकार घेऊ शकते. त्यामुळे काही महिने आपल्यालाही विना वेतन काढावे लागतील की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. या अगोदर 75 टक्के पगार अदा करून 25 टक्के पगाराला कात्री लावण्यात आली आहे. अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागणार असल्याचे सूतोवाच मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याने कदाचित उद्या आपल्या पगारावर टाच आणली जाईल की काय, अशी शंका त्यांना सतावू लागली आहे. काही अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रतिष्ठेची कसलीही आब न राखता त्यांना कसल्याही कामावर नेमणूक करून त्यांच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले.

Monday, June 22, 2020

(बालकथा) पिठलं-भाकरी

विराट सातवीत होता. हुशार पण लहरी महंमद. 'आली लहर, केला कहर',असंच काहीसं होतं त्याचं. कुणाशी बोलायचं नाही,कुणाच्यात मिसळायचं नाही. आपण, आपलं घर आणि टीव्ही हेच त्याचं विश्व. मैदानावर जाऊन खेळल्याचं त्याला कुणी पाहिलं नाही आणि काही मदत केल्याचं आईलाही  काही आठवत नाही. विराटच्या तक्रारी मात्र भरपूर!डब्याला हे नको, ते नको. पायी चालत शाळेला जायला नको. परिणाम काय तर गड्याच्या शरीराचं वजन भलतंच वाढलेलं. साहजिकच आईबाबाला आपल्या मुलाची काळजी सतावायला लागली.

स्वावलंबनाचे धडे

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला पायबंद घालता यावा यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. अनेक धडे दिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत सगळ्यांच्या गरजा फारच कमी आल्या. घरात बसून राहिल्याने अधिक काळ हा नवीन खाद्य करण्यात आणि शिकण्यात गेला. मात्र यातून एकमात्र झाले. शिकणाऱ्या मुली छानपैकी स्वयंपाक करायला शिकल्या. त्यांना त्यांची आई किंवा विशेषतः युट्युबने साथ दिली. दहावी, बारावी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली घरात सहसा काही काम करत नव्हत्या. त्यांच्या अभ्यासामुळे त्यांची आई त्यांना कामही लावत नव्हती. पण या कालावधीत या मुली स्वयंपाक खोलीत जाऊ लागल्या आणि आईला मदत करू लागल्या. यात बऱ्याच मुली सुगरणही झाल्या. काहींच्या आयांना मुलींचे भविष्य उज्ज्वल असल्याचा साक्षात्कारही झाला.

Sunday, June 21, 2020

लग्न करताना...


आपल्याकडे लग्न जमले की लगेच बार उडवून देण्याची घाई करतात. याला आपल्याकडे एक पद्धत म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे लग्न ठरले की, आठ-पंधरा दिवसांत किंवा महिन्याभरात लग्नाचा सोहळा उरकून टाकतात. मात्र यामुळे दोन जीवांना समजून घ्यायला वेळ मिळत नाही. आजची पिढी शिकली-सवरलेली आहे. त्यामुळे त्यांनी जोडीदार कसा असावा, याची मनात एक अपेक्षा धरून ठेवलेली असते. जर का त्यांच्या अपेक्षेला तडा गेला की, पुढचं सगळं अवघड होऊन बसतं. त्यामुळे लग्न ठरल्यावर जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. पाच-सहा महिने तरी यासाठी सहज मिळायला हवेत. या कालावधीत दोघेही एकमेकांना भेट राहतील, एकमेकांच्या घरी जातील-येतील साहजिकच घरातले लोक समजून घेता येतील, भीती कमी होईल. या कालावधीत औपचारिकता कमी झाल्याने जोडीदाराच्या, त्यांच्या घरच्या लोकांच्या रुजलेल्या प्रवृत्ती वागण्या-बोलण्यातून दिसायला लागतात.

वाघांची संख्या वाढल्याचा बडेजाव

सर्रासपणे होणारी वाघांची शिकार आणि इतर कारणांमुळे गेल्या आठ वर्षात देशात जवळपास 750 वाघांचा बळी गेला आहे. मात्र असे असले तरी गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2 हजार 226 वरून वाघांची संख्या 2 हजार 976 इतकी झाली आहे. ही माहिती राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे (एनटीसीए) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे.  2010 ते 2020 या दहा वर्षांत किती वाघ दगावले,याची माहिती या माहितीच्या अधिकार कायद्याच्या आधारावर विचारण्यात आले होती विशेष म्हणजे या विभागाकडे फक्त आठ वर्षांचीच माहिती उपलब्ध झाली आहे. यावरून आपण वन्यप्राण्यांच्या संवर्धनावरून किती निष्काळजी आहोत, हेच दिसून येते.

Sunday, June 14, 2020

बोलपटाची पहिली नायिका जुबैदा

भारतीय सिनेमाचा एक स्तंभ असलेल्या जुबैदाचे नाव आजच्या पिढीला ठाऊकही नसेल. भारतीय सिनेमासृष्टीचा पहिला बोलपट 'आलमआरा'. या चित्रपटातील जुबैदा ही पहिली नायिका होती. आज कटरीना कैफ, प्रियांका चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस सारख्या रूपवतीप्रमाणेच जुबैदादेखील त्याकाळातील 'मल्लिका' होती. काही निवडक कलाकारांमध्ये तिचं नाव घेतलं जायचं. मूकपट ते बोलपट असा तिचा यशस्वी सिने प्रवास राहिला आहे.जुबैदा ही 1910 मध्ये एका नवाब घराण्यात जन्मली होती. तिची अम्मी बेगम फातिमा त्या काळात जेव्हा चित्रपटात काम करणं म्हणजे घाणेरडं काम म्हटलं जातं होतं, तेव्हा फातिमा यांनी सगळ्या सीमा ओलांडून अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्या होत्या.

Wednesday, June 10, 2020

शिक्षण देण्याची नको घाई

केंद्राने शाळा-कॉलेज ऑगस्ट मध्ये सुरू करण्याबाबत स्पष्ट केले असतानाच महाराष्ट्र राज्यात मात्र 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यादृष्टीने शिक्षकांना पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहचवावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय  टीव्ही,मोबाईल आणि रेडिओ किती पालकांकडे आहे, याचा सर्व्हे करून त्याचा आकडा दिला जात आहे. म्हणजे प्रत्यक्षात ऑनलाईन, रेडिओ,टीव्हीद्वारा शिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. पण मागील एका सर्व्हेक्षणानुसार 60 ते 70 टक्के पालकांकडे मोबाईल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीव्ही असण्याची आकडेवारीदेखील साधारण मोबाईल इतकीच असणार आहे. ग्रामीण भागात दिवसभर लोकांना राबावे लागते. मग ही टीव्ही घेऊन काय करायचे, असा प्रश्न असल्याने बऱ्याच जणांकडे टीव्ही नाहीए. रेडिओचे म्हणाल तर तो आता 'गुजरा जमाना' झाला आहे. शहरी भागात एफएम रेडिओचे प्रस्थ असले आणि ते मोबाईल, वाहनांमध्ये ऐकायला मिळत असल्याने रेडिओ हा कुणाकडे असायचे कारणच नाही. ग्रामीण भागात तर एफएम स्टेशन लागतच नाहीत. टीव्ही,मोबाईल मुळे रेडिओ हद्दपार झाला आहे.

Tuesday, June 9, 2020

(लघुकथा) हे कसले दुःख

कविताच्या वडिलांचे निधन होऊन पाच दिवस उलटले होते. सर्वकाही आवरल्यावर पाहुणे वगैरे सगळे निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सीमानं सासूबाईंना विचारलं,"मी शाळेला जाऊ का?"
आईनं आजीकडे पाहिलं.आजीनं सक्त ताकीद दिली होती की, बाराव्वा झाल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही.
सीमा गपगुमान आतल्या खोलीत निघून गेली. कविता हे सगळं पाहत होती. सीमा तिची फक्त वयनीच नव्हती तर तिची मैत्रीण,बहीण सर्वकाही होती. तिला तिच्या वयनीची अडचण ठाऊक होती. ती एका शाळेत शिक्षिका होती. शिवाय उद्यापासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. ती परीक्षेची इंचार्ज होती.

(लघुकथा) एकाकीपण

आज पुन्हा प्रभा आणि यशमध्ये वाद झाले. कारण तेच वैचारिक मतभेद. प्रभा कोणतीही गोष्ट सावकाशीने सांगायची. यश मात्र 'एक घाव दोन तुकडे' करायचा. मूळ मुद्दा धरून आपले म्हणणे सिद्ध करून दाखवायचा. आजसुद्धा तसंच झालं.
आपला बिघडलेला मूड सावरण्यासाठी प्रभाने फेसबुक उघडले. तिची नजर एका पोस्टवर पडली. तिनं यशला विचारलं,"जर तुला मला पुन्हा प्रपोज करावं लागलं तर कसं करशील?"

(बालकथा) 28 चपात्या

शाळेत दर शनिवारी बालसभेचं आयोजन करण्यात येतं. शाळा सातवीपर्यंत होती. प्रत्येक वर्गातला एक विद्यार्थी पुढं येऊन आपली कविता,गोष्ट, एकाद सुभाषित, श्लोक, एकाद गाणं सादर करत करत असे.आजही  सभेसाठी विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात एकत्र आले होते. मुलं आपापली रचना पुढे येऊन सादर करत होती. काही प्रेरक गोष्टी,काही कविता विद्यार्थ्यांना भावायच्या.प्रेरणा-उत्साह वाढवायच्या,तेव्हा विद्यार्थी टाळ्या वाजवून दाद द्यायचे.

Monday, June 8, 2020

(बालकथा) आईचा आग्रह

"आई,मी तर डान्स क्लबच जॉईन करणार." पिहू हट्ट करत आपल्या आईला-सुमनला म्हणाली. पिहू पाचवीची विद्यार्थीनी होती. तिच्या प्रशालेत अनेक प्रकारचे क्लब होते. मुलांना आपापल्या इच्छेने हव्या त्या क्लबमध्ये सामील होता येत होते.
आज पिहूच्या क्लास टीचरने सगळ्या मुलांना क्लबचे फॉर्म दिले होते. म्हणजे मुलांनी आपापल्या घरून त्यावर आपल्या पालकांची सही घेऊन येऊ शकतील.पिहूला डान्स क्लब जॉईन करायचा होता,पण पिहूच्या आईचा आग्रह होता की तिने कराटे क्लब जॉईन करावा.

Sunday, June 7, 2020

(बालकथा) दिवूचा विचित्र आजार

दिवू खारुटी उदास बसली होती. तिचा मित्र मक्कू उंदराने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली,"मला कधी कधी दिसायचंच बंद होतं. काहीच दिसत नाही त्यावेळेला.."
" हो का!" मक्कू काळजीच्या स्वरात म्हणाला.  "चल आज संध्याकाळीच तुला डॉक्टरकडे घेऊन जातो."
संध्याकाळी दोघेही डोळ्यांचे डॉक्टर मटरू हत्तीच्या क्लिनिकमध्ये पोहचले. मटरू डॉक्टरने दिवूचे डोळे तपासले. अक्षरंदेखील वाचायला सांगितली. त्यांना दोष काही आढळला नाही.

(लघुकथा) गरीब बिच्चारा!


मनोहर धावतच रेल्वेत चढला. या सामान्य डब्यात समोरासमोरच्या एका सीटवर एक फाळकूटदादा आपल्या चमच्यांसह बसला होता. आणि दुसऱ्या बाजूला एक फटका,मळका प्रवासी झोपला होता. झोपलेल्या प्रवाश्याचे पाय थोडे बाजूला सारून मनोहर तिथे जागा करून बसला. प्रवाश्याच्या पायाचे झटके सारखे सारखे त्याला बसत होते. शेवटी रागाने त्याला दम देत म्हणाला,"ए,हा काही रिझर्व्हेशनचा डबा नाही, उठून बस. झोपायचं असेल तर रिझर्वेशनच्या डब्यात रिझर्वेशन करून झोप जा."
"तुम्ही त्याला जरा मदत करा. त्या बिचाऱ्या गरिबाला बरं वाटत नसेल." फाळकूटदादा  त्याची बाजू घेत म्हणाला.
"हो का! मग तुमची जागा द्या त्याला आराम करायला." मनोहर तिडकीने म्हणाला.

(लघुकथा) काळजी


सीतारामचं वय 55 वर्षांपेक्षा अधिक झालं होतं. शेती करून आपलं आणि कुटुंबाचं कसं तरी पोट भरत होता. कमाई काही फारशी होत नव्हती. पण उपाशी कधी राहावं लागलं नव्हतं. त्याचा नशिबापेक्षा आपल्या कष्टावर अधिक विश्वास होता. 
यावेळेला त्याला वाटलं होतं की, धान्य विकून येणाऱ्या पैशांतून एकुलत्या एक मुलीचं चांगल्या प्रकारे लग्न करावं. लक्ष्मी पाच वर्षांची होती,तेव्हापासून त्याची बायको शेवंता तिच्या लग्नासाठी बारीक-सारीक गोष्टी जमा करून ठेवत होती. शेवटी ती वेळ आली होती, तिचा विवाह पांडुरंगाशी होणार होता.