Monday, February 18, 2019

(लहानशी गोष्ट) मानसिकता


माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. आम्ही पोर्चमध्ये बसून गप्पा मारत होतो. बाजूलाच असलेल्या नळातून पाणी वाहत होतं. जवळ बसलेल्या माझ्या मित्राला मी म्हणालो, “दोस्ता, पाणी बघ किती वाया चाललंय.
 तो बेफिकिरीने म्हणाला, “अरे, त्याचं थोडंच बील येणार आहे?
 मी शांतपणे म्हणालो, “ तू इतकी मोठी चूक का करतो आहेस?
तो चपापला. म्हणाला, “ कसली चूक?

(लहानशी गोष्ट) भिकारी

“काका, दोन रुपये द्या” तो पोरगा प्रतापसमोर उभा राहून उजवा हात पसरत म्हणाला. प्रताप पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लिपिक होता. ऑफिसबाहेरच्या गाड्यावर चहा प्यायला आला होता.
त्या पोराला रागावत प्रताप ओरडला, “गाढवा, लाज नाही वाटत, भीक मागायला?
 तो पोरगा म्हणाला, “ द्या ना साहेब. देव तुमचं भलं करेल! तुमच्या कमाईत देव आणखी भर घालेल.
 प्रतापने त्याला पुन्हा झिडकारलं. “चल, निघ येथून. काही तरी काम करून खा जा.
पोराने त्याला उलटे उत्तर दिले, “ तुम्हीसुद्धा भिकारीच आहात की!

प्रत्येक गोष्टीत चिडचिड होत असेल तर


     
आपले काही दिवस सुरळीत जातात, आणि अचानक पुन्हा संतापाचा,चिडचिडेपणाचा  खेळ पहिल्यासारखा सुरू होतो. समस्येत अडकलेले मन छोट्या छोट्या गोष्टींवरदेखील चिडचिड करतं. पण या गोष्टी एवढ्यावरच थांबत नाहीत, याचा परिणाम आपल्या आजूबाजूवरही व्हायला लागतो. मग पुढे असे रोजच व्हायला लागते. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा काही अडचणीच्या दिवसांसाठी काही अनुभवी लोकांनी आपल्याला उपाय सुचवले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास आपल्यातला चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होतो.

Friday, February 15, 2019

प्रेमाचा पारा


प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रेमी मंडळींची एक सर्वसाधारण तक्रार असते की, त्यांना यात काहीच मिळालं नाही. पण खरे तर प्रेम कधी मिळवण्याचे साधनच नसते, ती तर नेहमी द्यायची वस्तू असते. प्रेम द्यायचं म्हणजेच मिळवायचं, असा त्याचा अर्थ आहे. तत्त्वज्ञ खलील जिब्रान यांनी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याला जाऊ द्या,कारण जर ती परत येते, तेव्हा ती तुमची असते. जर ती आली नाही ती तुमची नाही. खलील यांच्या मतानुसार, तुम्ही त्याला जाऊ दिले, म्हणजेच ते तुमचे देणे आहे. हेच तुमचे ग्रहीत. ओशोसुद्धा आशाच  काहीशा शब्दांमध्ये सांगतात की, प्रेम हे एक दान आहे. प्रेम मागायचं नसतं. ती एक भेट आहे. प्रेम भिकारी नाही, सम्राट आहे. जो प्रेम देतो, वाटतो, त्यालाच प्रेम मिळते.

Tuesday, February 12, 2019

चहावाले ते शाळा मास्तर


     
डी प्रकाश राव यांच्या वडिलांनी दुसर्या विश्व युद्धात भाग घेतला होता. युद्ध संपल्यावर ते आपल्या ओडिशातल्या घरी परतले.त्यांचे कुटुंब कटकमधल्या बक्सी बाजार इलाक्यात राहत होते. त्यांना कामाच्या शोधात इकडे-तिकडे भटकावं लागलं.पण काम काही मिळालं नाही. कुटुंबाजवळ शेती करण्याइतपत जमीनदेखील नव्हती. जवळ पैसा-अडका नव्हता. फक्त पाच रुपये त्यांच्याजवळ होते. कुठेच काम मिळालं नाही,म्हटल्यावर त्यांनी चहाची टपरी टाकली.

सोशल मीडियाने खूप काही हिरावून घेतलं


आज सर्वत्र सोशल मीडियाचा दबदबा आहे. तरुणाई यातच व्यस्त आहे.फार विचार न करता तत्कालीन परिस्थितीवर भाष्य अथवा मत व्यक्त करून मोकळी होणारी ही तरुणाई भविष्याचा फार विचार करताना दिसत नाही. मुलां-बाळांपेक्षा करिअरला महत्त्व देणारी आजची पिढी पैशालाच सर्वस्व मानते आहे. मात्र यामुळे आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने पुढच्या पिढीचेही काही खरे नाही,अशी परिस्थिती आहे. आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आला आहे, त्याच्याशी खेळण्याचा छंद सर्वांना जडला आहे. आज स्मार्टफोनची गरज असली तरी त्याचा किती उपयोग करून घ्यावा, हे आज कळण्याची आवश्यकता आहे. कुणाला कुठे ठेवावे,हे आपल्याला माहीत असले तरी त्याप्रमाणे मोबाईललाही कुठे ठेवावे कळले पाहिजे. आज मोबाईल बेडरूमपासून संडासपर्यंत सर्वत्र वावरत आहे. प्रत्यक्षात समोर असलेली माणसे त्याच्यापासून दूर होत चालली आहेत. नाती-गोती संबंधासह कित्येक गोष्टी त्याने हिरावून नेल्या आहेत. यात महत्त्वाची पुस्तकेदेखील आहेत. 

Friday, February 1, 2019

नाते असे जपा!


     
नात्यामध्ये प्रेम असायला हवं,पण एकमेकांशी सतत जोडून राहणं चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. आपसातील ओढीवर त्याचा परिणाम होऊन असं वाटायला लागतं की, नातं फक्त निभावलं जात आहे. आपल्या नात्यांमध्ये अगदीच जवळीक निर्माण करायची असेल तर अधे-मधे त्यातील दुराव्याचा स्वाददेखील चाखला पाहिजे. अमेरिकेतील वर्तणूक विज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ जे प्लाउड म्हणतात की, आपल्याला वाटतं असतं की, आपली प्रिय व्यक्ती सतत आपल्यासोबत राहायला हवी. पण यात आपण इतके गंभीर होतो की, त्याला अप्रिय बनवून टाकतो. सोबत राहून व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नसेल तर नात्यात बिघाड निश्चित मानायला हवं.