Thursday, January 31, 2019

प्रसिद्धी कुणाला नकोय!


आपल्याला नेहमी अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. त्यातल्याच काहींना प्रसिद्धी नको असते. कुणी कौतुक केलं तर म्हणतात, मीदेखील असं करू शकतो,पण मला प्रसिद्धी नकोय. अर्थात कुणाला प्रसिद्धी नकोय, ही खरे तर चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. पण त्यामुळे चांगलं काम न करणं मूर्खपणाचं नाही का? मला तर वाटतं, याच्यापेक्षा आणखी कोणी दुसरा मूर्ख असू शकेल. प्रसिद्धी नको म्हणून तो फक्त कामापासून दूर जाण्याचं काम करतो.

Friday, January 18, 2019

मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या


ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमांच्या शाळांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन अध्यापन प्रणाली यासाठी विकसित केली असून यथावकाश अशा प्रकारचे शिक्षण संपूर्ण राज्यात दिले जाणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण देण्याची ही कल्पना मोठी भन्नाट असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यूट्युब आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला तरी त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते.या स्मार्टफोन शिक्षणाचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने याबाबतीत आघाडी घ्यायला हवी होती. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हे शब्द फक्त नावालाच आहेत, असेच शिक्षणाच्याबाबतीत जाणवते.

Wednesday, January 9, 2019

गांजा,हुक्का पार्टीत रमलीय तरुणपिढी


आजच्या तरुणपिढीला गांजा बरबाद करते आहे. आज दुष्काळी भागासह सधन म्हणजेच ऊसक्षेत्रातदेखील गांजा मोठ्या प्रमाणात पिकवला जात असून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा गांजा चक्क वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळू लागला आहे. देशी आणि विदेशी दारू जशी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कंपन्या काढू लागल्या आहेत, तसेच गांजादेखील वेगवेगळा फ्लेवर मारून चोरट्या मार्गाने बाजारात येऊ लागला आहे. त्यातच हुक्का पार्टी करण्याचे फॅड आजच्या तरुणाईमध्ये आलेली आहे. त्यामुळे अशा नवनव्या नशाखोरीमुळे तरुण वर्ग बरबाद होत चालला आहे. त्याला सावरण्याची गरज असून यासाठी शासनाने कडक कायदे करण्याबरोबरच कायद्याची अंमलबजावणी करणार्यांनी डोळ्यांत तेल घालून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधिनता प्रचंड वाढली असून यामुळे अनेकांना अकाली वृद्धत्व आणि कायमस्वरुपी पाठी लागणारे आजार चिकटू लागले आहेत. हा भारतासारख्या तरुण देशाला घातक आणि मारक आहे.