Wednesday, November 21, 2018

खरेच आपण 'ओके' आहोत?


     अलिकडे एक शब्द फारच प्रचलित झाला आहे. मोबाईल जसा आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे, तसाच हा शब्ददेखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. हा तसा फार छोटा शब्द आहे,परंतु तो आपल्या मनमस्तिष्कमध्ये जाऊन फिट बसला आहे. त्याचा वारंवार होणारा वापर, हेच सांगतो आहे. मोबाईल यायच्या अगोदर हा शब्द तसा कमी प्रचलित होता. पण मोबाईल आला,त्यानंतर स्मार्टफोन आला आणि याची क्रेझ वाढली. एसएमएस पाठवताना हमखास हा तिथे डोकावू लागला. आता तर त्या शब्दाशिवाय काही चालतच नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा कोणता शब्द आपल्या मनमस्तिष्कामध्ये फिट बसला आहे. असो तुमची ही उत्सुकता आता ताणत नाही. तो शब्द आहे 'ओके'!

Monday, November 19, 2018

(बालकथा) वनदेवतेचा आशीर्वाद


     एका गावात नागाप्पा नावाचा एक शेतकरी राहायचा. तो जवळच असलेल्या जंगलात जायचा आणि तिथल्या रंगीबेरंगी आणि सुंदर सुंदर पक्ष्यांना जाळं लावून पकाडायचा. त्या पक्ष्यांना लपूनछपून शहरात जाऊन मोठ्या किंमतीला विकायचा. एके दिवशी नागाप्पाला जंगलात एक सुंदर पक्षी सापडला. तो इतका सुंदर होता की, त्याला आपल्याकडेच ठेवण्याचा मोह झाला. मग काय! त्याने आपल्याच घरातल्या पिंजर्यात त्याला कैद केलं.

Saturday, November 17, 2018

आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन व्हावीत


     दिवसेंदिवस मोबाईल, इंटरनेटचे आकर्षण मुलांत वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला असल्याने मुलांत एकाकीपणा वाढत आहे. त्यामुळे अल्पवयातच मुले एक ना अनेक प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातून निर्माण होणार्या समस्यांचा सामना रोजच लाखो पालकांना करावा लागत आहे. यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर शाळांच्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन केंद्रे चालवण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी मुलांसह पालकांना समुपदेशन द्यायला हवे आहे. कारण अलिकड्च्या काही वर्षात मोबाईल, इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की, त्याकडे कुणाचे ध्यानच गेले नाही. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो, त्याला मोबाईलमधलं सगळं काही जमतं, असे कौतुकाचे शेरे पालक वर्ग मारत होते. मात्र मुलं जसजशी त्यात गुरफटत गेली, तसतशी पालकांची हवा ताईट व्हायला लागली. मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे, असा प्रश्न पडला आहे. आईने मोबाईल हिसकावून घेतला, मोबाईल विकत घेतला नाही, अशा कारणांनी मुलं आत्महत्या करीत आहेत, यावरून मोबाईल,इंटरनेटचं वेड कुठल्या स्तराला गेलं आहे, याचा अंदाज येईल.

यश कसं मिळवाल?


     माणसं यशाच्या मागे धावत असतात. रात्र आणि दिवस यासाठी एक करीत असतात .पण तरीही काही लोकांनाच यश प्राप्त होतं. अनेकांना यशामागे काही तरी रहस्य लपलं आहे, असं वाटत असतं. त्यामुळे यशासाठी आणखी काही उपद्व्याप माणसं करताना दिसतात. खरे तर कोलीन एल पावेल यांच्या म्हणण्यानुसार यशाचं असं काही रहस्य नसतं. ते तुमची तयारी,कठोर मेहनत आणि अपयशापासून शिकण्याचेच परिणाम असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

(हास्य एकांकिका) स्वागत


(ठिकाण: गावातला रस्ता)
(चतुर्भुज एम.. उत्तीर्ण होऊन आपल्या गावात आला आहे. तो हा विचार करतोय की, गावातले लोक आपल्याला पाहून आनंदी होतील. त्याच्या पुढ्यात एक काबुली जातीचे मांजर आहे.)
(नीलरत्नची दृष्टी चतुर्भुजवर पडते.)

Friday, November 16, 2018

स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेणारा माणूस


      वर्ल्ड वाइल्ड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) आणि लंडनच्या जियोलॉजिकल सोसायटीने त्यांच्या लिविंग प्लानेट या अहवालात म्हटले आहे की, गेल्या पन्नास वर्षांत मनुष्याची लोकसंख्या जवळ्पास दुप्पट झाली आहे,पण याच कालावधीत म्हणजे साल 1970 ते 2014 दरम्यान पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची संख्या सुमारे साठ टक्क्याने कमी झाली आहे. यात गायब होणार्या जीवांचा, प्राण्यांचा अजिबात दोष नाही, तर संख्येने दुप्पट झालेल्या मनुष्याचा आहे. या मानवाने आपल्या विकास आणि स्वार्थासाठी या पृथ्वीचा सत्यानाश केला आहे. जल, जंगल, जमीनपासून सर्वच संसाधनावर त्याने आपला कब्जा मिळवला आहे. राहिलेल्या जीव-जंतूंच्यावरही आक्रमण करून त्यांची झोप उडवून टाकली आहे. त्याचे जिणे हराम करून सोडले आहे. त्यांच्या अन्नावरच यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे माणूस सोडला तर अन्य जीव-जंतूंचा मोठ्या वेगाने नायनाट होताना दिसत आहे. ते आगामी वर्षांमध्ये जीवंत राहतील की, नाही, याची शाश्वती देता येत नाही,इतकी परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

Tuesday, November 13, 2018

(बालकथा) ऋत्विकची हुशारी


ऋत्विक पहिलीत शिकत होता. त्याच्या घरात एका छोट्याशा उंदराने घर केले होते. म्हणजे आपलेच घर समजून तो ऋत्विकच्या घरात बिनधास्त राहत होता. ऋत्विकलाही तो आवडायचा. मग काय! उंदराची मज्जाच मज्जा! ऋत्विकनं लाडानं त्याचं नाव टप्पू ठेवलं होतं. टप्पू ऋत्विक असला की, आपलीच इस्टेट समजून घरभर उड्या मारायचा. टप्पू ऋत्विकला चांगला ओळखत होता. ऋत्विक बाहेरून आला की, टप्पू बिळातून बाहेर येऊन त्याच्याभोवती पिंगा घालायचा. आता तर त्या दोघांची चांगली गट्टी जमली होती. दोघं मस्तपैकी एकत्र खेळायची.ऋत्विकचा वेळ मजेत जायचा.

Sunday, November 11, 2018

लहान मुलांसाठी आवडीने लिहणार्‍या: सूधा मूर्ती


सूधा मूर्ती इंग्रजी आणि कन्नड भाषेतल्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी मुलांसाठीदेखील अनेक  पुस्तके लिहिली आहेत. अलिकडेच त्यांचे द अपसाइड डाऊन किंग: अनयुज्वल टेल अबाउट राम अँड कृष्णा हे नवे पुस्तक बाजारात आले आहे. त्यांच्या या सिरीजचे हे तिसरे पुस्तक आहे. या कथा भारतीय पौराणिक ग्रंथांमधून घेतलेल्या आहेत. इन्फोसिस फौंडेशनच्या प्रमुख असलेल्या सूधा मूर्ती यांचा बहुतांश वेळ हा फौंडेशनच्या कामासाठी जातो.

Thursday, November 8, 2018

प्रदूषण समस्या राष्ट्रीय आपत्ती घोषित व्हावी


     ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध घालत फक्त रात्री आठ ते दहा यावेळेत फटाके फोडण्यास परवानगी दिली. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. पण तरीही अनेक शहरांमध्ये या आदेशाची पायमल्ली होताना दिसली. याचा अर्थ असा की, आपण अजूनही प्रदूषण ही समस्या फार मनावर घेतलेली नाही. न्यायालयाने प्रदूषणावर नियंत्रण घालण्यापेक्षा सरकारने याबाबतीत कडक पावले उचलण्याची गरज आहे.पण राजकीय लाभासाठी आपण आपल्याच लोकांचा बळी द्यायला निघालो आहे. यामुळे फक्त माणसांचाच बळी जात नाही तर मोठ्या प्रमाणात देशाचे आर्थिक नुकसानदेखील होत आहे.

Wednesday, November 7, 2018

(बालकथा) लक्ष्मीचा निवास


एकदा भगवान विष्णू शेषनागावर विराजमान होते. वेळ जाता जात नव्हता. मग त्यांनी पृथ्वीवर जाऊन फेरफटका मारून येण्याचे ठरवले. वास्तविक पृथ्वीवर येऊन त्यांना कित्येक वर्षे लोटली होती. ते आपल्या प्रवासाच्या तयारीला लागले. इकडे भगवान विष्णूंची तयारी चालल्यावर लक्ष्मीने विचारले, “ आज सकाळी सकाळी कुठे जाण्याची तयारी चाललीय? ”
विष्णू म्हणाले, “जरा पृथ्वीतलावर फेरफटका मारून यावं म्हणतो. ”

(बालकथा) आनंदाचा प्रकाश


चंदू दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा बेत आखत होता. तेवढ्यात दाराची कडी वाजवण्याचा आवाज झाला.दरवाजा उघडला तर दोन चिमुकली मुलं त्याला दारात उभी असलेली दिसली. तेवढ्यात आईदेखील आली. त्यांना पाहून त्यातला एक मुलगा म्हणाला, “ आम्ही अनाथाश्रामतून आलो आहोत. तुम्हाला काही द्यायचं असेल तर अनाथाश्रमातल्या मुलांसाठी दान देऊ शकता. ”
आईच्या सांगण्यावरून चंदूने कपाटातले पाच रुपये आणून मुलांना दिले. ते गेल्यावर चंदूने आईला विचारले, “ अनाथाश्रम म्हणजे काय गं? ”

विराटकडून काय शिकावं?


विराट कोहलीसाठी गेल्या महिन्यात विशाखापट्टनममध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये कप्तानी करणं खरे तर खासच होतं.कारण यात त्याने एक दिवशीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. खूपच कमी डावांमध्ये आणि कमी वयात त्याने हे लक्ष्य मिळवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर याचा सतरा वर्षांपूर्वीचा जुना जागतिक विक्रमदेखील मोडला आहे. फार कमी वयात विराटने स्वत:ला क्रिकेट विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित केलं आहे.त्याला मिळणारी संधी,यश आणि प्रयत्न आपल्याला खूप काही शिकवून जातात. काम आणि नात्यांविषयी असलेला त्याचा दृष्टीकोन आपल्याला नक्कीच प्रेरणादायी आहे.

Monday, November 5, 2018

(बालकथा) शंभराची नोट


     
अश्विनी उशिराने झोपली. उशिराने झोपली म्हणून उशिराने उठली. उशिराने उठली म्हणून सगळी कामं उशिराने होऊ लागली. ती धावतपळतच शाळेच्या स्कूलबसपर्यंत पोहचली.थोडा जरी वेळ झाला असता तर तिला बससुद्धा सापडली नसती. बसमध्ये चढल्या चढल्या मनीषा म्हणाली, “ एकच सीट राहलीय.शेवटची.जा, बस जा.”
अश्विनी बसमधल्या सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसली.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला महाराष्ट्र


     पूर्वी दुसर्याचं ऋण अंगावर असलं की माणसाला पूर्वी झोप येत नव्हती. माणसे त्याच्या बोझ्याखाली वावरत. चाकरी करत. आणि संपूर्ण आयुष्य त्यांच्या हवाली करत. त्यामुळे कर्ज अंगावर असलं की, लोकांना त्याचा भार वाटत असे. पण आजकाल ऋणाची व्याख्या बदलली आहे. कर्ज काढल्याशिवाय प्रगती होत नाही. भौतिक सोयी-सुविधा होत नाहीत, अशी एक धारणा होऊन बसली आहे. त्यामुळे आजकाल लोकांची कर्ज काढण्यासाठी धडपड सातत्याने सुरू असते. एकादा धंदा, व्यवसाय अथवा उद्योग सुरू करायचा आहे, अशावेळी कर्ज उपयोगाचे ठरू शकते. कारण डोक्यावर कर्ज आहे, याची जाणीव होऊन माणूस सतत राबत राहतो आणि ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असतो. पण भौतिक सुविधांसाठी काढलेले कर्ज फायद्याचे नक्कीच ठरू शकत नाही. पण कर्जाची कुणाला चिंता राहिलेली नाही. त्यामुळे आजकाल कर्ज हा परवलीचा शब्द झाला आहे. नोकरदार तर त्याच्याशिवाय काही करूच शकत नाहीत. पगाराचे तारण असल्याने बँकाही त्यांनाच कर्ज देत असते. अन्य लोकांना देताना अनेक गोष्टी तपासल्या जातात. कर्ज मागणारा सडाफटिक असेल तर मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. एकाद्याला काही तरी करून दाखवायची हिंमत असते,मात्र त्याला बँकांची साथ मिळत नाही. साहजिकच कित्येक तरुण पैसे जवळ नसल्याने काही करू शकत नाहीत,हीदेखील आपल्याकडची दुसरी पण भयानक बाजू आहे.

Saturday, November 3, 2018

शेतीचे उत्पन्न दुप्पट: आग रामेश्‍वरी,बंब सोमेश्‍वरी


मोदी सरकारने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विढा उचलला आहे. अर्थात मागील चार वर्षात काय केलं,याची उत्तरं मागायची नाहीत.कारण त्याची त्यांच्याकडे उत्तरं आहेत.पण आपण त्यांना शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न कशाच्या आधारावर दुप्पट करणार आहात,याचं उत्तर मागू शकतो. कसलेही ठोस नियोजन किंवा अंमलबजावणी न करता मोदी सरकारने शेतकर्यांना त्यांना आर्थिक हलाखीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच लोकांचा अशा भंपक गोष्टींवर विश्वास बसणं अशक्य आहे. मात्र आंधळा विश्वास ठेवणार्यांचे अवघड आहे. त्यांना अगदी सर्व कसं स्वप्न साकारल्यासारखं वाटत आहे. म्हणतात ना, जसा चश्मा, तसे समोरचे दिसणार. आंधळ्या विश्वासाचंही तसंच होणार! त्यामुळे खरा प्रश्न आहे,तो मात्र बाजूला पडत आहे. शेती शाश्वत कशी होईल आणि शेतकर्याची आर्थिक उन्नती कशी होईल, याचा विचार होत नाही. आणि जोपर्यंत तसा कोणी विचार करत नाही,तोपर्यंत आपल्या देशातील शेतीची परिस्थिती सुधारणार नाही.

Friday, November 2, 2018

पंडवानी गायिका तीजन बाई

 छत्तीसग़डमधील भिलाईपासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गनियारी गावात 24 एप्रिल 1956 मध्ये जन्मलेल्या तीजनबाई या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठ्या.वडील हुनुकलाल परधा आणि आई सुखवती यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तीजन ज्या आदिवासी समाजात जन्मल्या , तो समाज मध गोळा करत असे. पक्षी मारत असे. चटई-झाडू बनवत असे. त्या काळात सामान्य वर्गातील मुलींवर अनेक प्रकारची सामाजिक बंधने होती. अशा परिस्थिती त्या शिकणार कशा? त्यांच्या वाट्यालाही घरातील कामंच होती. लहान भावा-बहिणींचा सांभाळ ही सर्वात मोठी जबाबदारी होती. पण तीजन यांना परमेश्वराने वेगळीच देणगी दिली होती. त्या आपल्या आजोबांना महाभारताच्या कथा ऐकवताना, गाताना ऐकायच्या. ते त्यांना फार आवडायचे. हळूहळू त्याच कथा तीजन यांना पाठ होऊ लागल्या. त्या लपूनछपून गाण्याचा सराव करू लागल्या. पण तीजन यांच्या आईला त्यांचे गाणे अजिबात पसंद नव्हते. आईने ज्या ज्या वेळेला त्यांना गाताना पकडले, त्या त्या वेळेला त्यांना कठोर शिक्षा केली गेली. तीजन सांगतात,मला घरात कोंडलं जायचं, खायला काही दिलं जायचं नाही. कित्येकदा तर आईने त्यांची बोटेदेखील त्यांच्या घशात कोंबली होती. जेणेकरून त्यांनी गाणे बंद करावे. पण मी कुठे थांबणारी होते? मला पंडवानीशिवाय काही सुचतच नव्हते.