Friday, September 30, 2011

बालकथा लागेल धन तर देईल गौरीसेन

बंगालमध्ये एक म्हण चांगली प्रसिद्ध आहे, ती म्हणजे' लागेल धन तर देईल गौरीसेन". ऐकणारा पहिल्यांदा बुचकाळ्यात पडतो. कारण पैशाचा आणि गौरीसेनचा संबंधच काय? पण या मागची कहानी ऐकल्यावर मात्र सारा उलगडा होऊन जातो. तर त्यासंदर्भातीलच ही कथा.
खूप वर्षाम्पूर्वी बंगालमधल्या हुगली जिल्ह्यात हरिकृष्ण मुरलीधर नावाची एक व्यक्ती राहत होती. त्याला एक मुलगा होता, गौरीसेन. वडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर टाकून त्याला कामधंद्याला लागावे लागले होते. आपला स्वतंत्र व्यवसाय करावा इतकीही त्याची ऐपत नव्हती. पण बुद्धीने तल्लख आणि स्वभावाने सत्यवचनी होता. म्हणूनच त्याला लहान वयातच कोलकात्याच्या वैष्णव शेठने आपल्या व्यवसायात भागिदार बनविले होते.
कोलकाता आणि हुगलीमधून माल गोळा करायचा आणि तो मेदिनीपूरला रवाना करायचा, हाच त्याचा व्यवसाय. मेदिनीपूरमध्ये भैरवदत्त नावाचा एजंट होता. तो माल घ्यायचा आणि अन्य एजंटांना विकायचा. भैरवदत्त मोठा प्रामिक होता.
एकदाची गोष्ट. गौरीसेनने सात नौका भरून मालाच्या पेट्या पाठवल्या. नौका मेदिनापूरच्या किनारी लागल्या. भैरवदत्ताने नेहमीप्रमाणे मालाची    खात्री करण्यासाठी पेट्या उघदल्या तर त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. त्यात मालाऐवजी चांदी होती. सगळ्या पेट्या चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या होत्या. मात्र त्याने चांदी मागवली नसल्याने नौका माघारी पाठवून दिल्या.
इकडे रात्री गौरीसेनच्या स्वप्नात त्याच्या नौका माघारी येत असल्याचे दिसले. त्यातल्या पेट्या चांदीने भरल्या असल्याचे त्याला दिसले. सकाळी खात्री करण्यासाठी तो समुद्र किनारी पोहचला. पाहतो तर खरोखरच नौका माघारी परतल्या होत्या. पेट्या चांदीने भरल्या होत्या. चांदी पाहून त्याची शुद्धच हरपली. इतकी चांदी पहून कुणाचे होश उडणार नाहीत? पण गौरीसेन भानावर आला. इश्वरीप्रसाद समजून त्याचा स्वीकार केला.
यानंतर गौरीसेनमध्ये कमालीचे परिवर्तन झाले. पैसा हाती आल्यावर माणसे अहंकाराने पेटून उठतात. पण गौरीसेन त्याविपरित कमालीचा विनयशील बनला. त्याचा देवावरचा विश्वास आणखी दृढ झाला. पाप्-पुण्याबाबत अधिकच सतर्क झाला. तो आपल्या साथीदारांना वेळोवेळी मदत करू लागला. इतकेच नव्हे तर समाजोपयोगी अनेक कामे त्याने केली. किती मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. कित्येक मुलींचे विवाह त्याने केले. याचकाला तो सतत मदत करीत राहिला. यथावकाश गौरीसेन गरजवंतांचा देवता बनला. आर्थिक अडचण आली की, हमखास गौरीसेनकडे लोक जात. त्याचे काम हो ऊन जाई. सगळ्यांचा विश्वास होता की, त्याच्याकडील धनाचे भांडार कधीच संपणार नाही. मदत म्हटली की, गौरीसेन , असे सर्वांच्या मुखी त्याचे नाव होते. पुढे मनात वसलेल्या भावनेला म्हणीचे स्वरूप प्राप्त झाले.
तीनशे वर्षांपूर्वीचा गौरीसेन आजही विसरला गेला नाही. पैशामुळे कुणाचे काम अडले तर त्याला धीर देत म्हणतात, ' घाबएऊ नकोस. लागेल धन तर देईल गौरीसेन. म्हणजे चांगल्या कामाला कुणीतरी गौरीसेनच्या रुपात हातभार लावेल आणि काम होऊन जाईल.  - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Wednesday, September 28, 2011

बँकांनी बेवारस पैशांचा छडा लावायला हवा

देशातल्या अनेक बँकांमध्ये एक कोटीवरील विविध खात्यांवर सुमारे दोन हजार कोटी रुपये बेवारसरित्या पडून आहेत. काही महिने व्यवहार करून नंतर बंद पडलेल्या एक कोटीवर खात्यांवरचा  सामान्य खातेदारांचा हा पैसा राष्ट्रीयीकृत बँकांना बिनव्याजी वापरण्यास मिळत आहे. या पैशाला नामनिर्देशन असले तरी या पैशासाठी कोणी बँकेची पायरी चढलेली नाही.  मागे रिझर्व्ह बँकेने देशातल्या सर्वच बँकांना निर्देश दिले होते की, जर एखाद्या बचत खात्यावर वर्षभर व्यवहार झाला नाही आणि ग्राहकाकडून याबाबत काही हालचाल झाली नाही तर , बँकांनी त्या ग्राहकांपर्यंत पोहचले पाहिजे आणि त्या पैशाची विल्हेवाट लावली पाहिजे. परंतु, बँकांनी या आदेशाला केराचीच टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे. कारण गेल्या दीड वर्षात या रकमेत घट तर झाली नाहीच, उलट ८या बेवारस कोटीत ८  ०० कोटीची आणखी भर पडली आहे. यात मोठा हिस्सा बचत खात्याचा आहे. दीड वर्षापूर्वी ही रक्कम ३०० कोटी होती. आता त्यात आणखी दुपटीने वाढ झाली आहे. आता पुन्हा रिझर्व्ह बँकेने आदेश देताना  अशा खातेदारांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे बंद खाती व त्यातील रकमेचा तपशील खातेदारांना कळू शकेल. व्यवहार ठप्प झालेल्या खात्यांबाबत आधीपासूनच नियमावली आहे. परंतु तिचे पालन केले जात नाही. प्रत्येक बँकेच्या वेबसाइटवर अशा खातेदारांची माहिती दिली जाईल. त्या त्या बँकांच्या वेबसाइटवर आपल्या नावाचा शोध खातेदारांना घेता येईल. 1.34 कोटी  खाती व्यवहार नसल्याने देशभरात बंद आहेत. तर या खात्यांवर 1,723 कोटी रुपयांची रक्कम  पडून आहे. एवढी मोठी रक्कम बँकांमध्ये पडून असताना बँका काहीच हालचाल करायला तयार नाहीत.  बँका ही रक्कम संबंधीत सभासदांना देण्याची उदारता दाखवतील असे वाटत नाही. कारण बँकांना ही रक्कम बिनव्याजी वापरायला मिळत आहे. त्याचा लाभ बँका घेत राहणारच. यासाठी रिझर्व्ह बँकेला कडक धोरण अवलंबवावे लागणार आहे. तर ही रकम संबंधितांना मिळतील.
  एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये पैसा पडून राहण्याला ग्राहक्-सभासही कारणीभूत आहे. विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना लाभार्थ्याला विशिष्ट बँकेतच खाते काढण्यास भाग पाडले जाते. लाभ मिळून झाल्यावर लाभार्थ्याचा त्या बँकेशी फारसा संबंध राहत नाही. त्यामुळे त्या खात्यावर व्यवहार होत नाहीत. आणि खाते उघडण्यासाठी ठेवलेली रक्कम तशीच बँकेत पडून राहते. आताच्या एटीएमच्या जमान्यात अशी खाती हरवून जातात. शिवाय काही ग्राह्क आपण ठेवलेली रक्कम घरच्या लोकांना माहित न होता बँकांमध्ये ठेवतात. त्याच्या पश्चात ती रक्कम तशीच पडून राहते. अशा अनेक कारणांनी इतकी मोठी रक्कम बँकांमध्ये पडून आहे.
अर्थात या बेवारस रकमेला एकटा ग्राहकच जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. बँकांचीसुद्धा आपली जबाबदारी आहे, की ती रक्कम विशिष्ट कालावधीनंतर ग्राहकाला परत करण्याची! बँका ठेवी ठेऊन घ्यायला जितक्या हापापलेल्या असतात, तितक्याच त्या द्यायला बेफिकिरपणा करतात. बँका या बेवारस रकमा संबंधितांना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेच अशा बँकांसाठी  कडक  धोरण राबवावे. वास्तविक  दरवर्षी बंद खात्यांचा अहवाल व त्यावरील रकमांचा हिशोब रिझर्व्ह बँकेला दिला जातो. याबाबत कडक धोरण ठेऊन मुदतीत या रकमा परत करण्यास सांगावे व काही खात्यावरील रकमा कोणी वाली सापडलाच नाही तर ती रक्कम सरकार दरबारी जमा करून घेऊन त्यातून विकास कामे करावीत.
आता बँकांना अशा रकमा व खाती ऑनलाईन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत. यातूनही कार्यवाही न झाल्यास सम्बंधित बँकांवर कारवाई करण्यात यावी. तरच हा प्रश्न निकाली निघणार आहे.

Tuesday, September 27, 2011

बालकथा खेचरानं धडा शिकवला

बालकथा
                                                    खेचरानं  धडा शिकवला
जपानमधील अकानावा शहराजवळील नरसो  गावात सुतोमो   नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू, मेहनती होता. फालतू गोष्टींपेक्षा तो सतत आपल्या कामात व्यस्त असे. सुतोमोच्या कुटुंबात त्याच्याशिवाय आई-वडील, लहान भाऊ आणि त्याची पत्नी सुनारी होती. सुतोमो जितका शांत, मनमिळावू होता, तितकीच विपरीत ती भांडकुदळ, वाचाळ आणि तुसड्या स्वभावाची होती.सुतोमो आहे त्यात समाधान मानणारा तर सुनारी असमाधानी होती.
सुतोमोला सतत टाकून बोलायची. मोकळ्या वेळेत शेजारच्या महिलांनाही त्यांच्या नवर्‍याविरुद्ध भडकवायची. त्यांना नवर्‍याला आणण्यास असमर्थ असलेल्या वस्तू मागवायला लावायची.
सुतोमोकडे काही जनावरे होती. त्यात एक खेचरसुद्धा होते. तो धान्याची गाडी ओढायचा. सुतोमो सगळ्यांची मोठी काळजी घेत असे. तो त्याच्या कामातील त्यांचे महत्त्व जाणून होता. या उलट सुनारीचा स्वभाव. तिला जनावरांविषयी अजिबात आस्था नव्हती. तिला जेव्हा कधी चारा-पाणी करायला सांगितले जाई, तेव्हा ती सारे अर्धवट्च करी. त्यामुळे ती जनावरेसुद्धा तिचा तिटकारा करत. 
एकदा सुतोमोला शेजारच्या गावी जायचं होतं. तिथे त्याला दोन्-तीन दिवस थांबणं भाग होतं. जाताना त्याने सुनारीला बजावलं. जनावरांची काळजी घेण्याविषयी सुनावलं. पण नेहमीसारखं तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या खाण्या-पिण्याची वेळ टळून गेली तरी तिनं त्याची पर्वा केली नाही. खेचर भूकेने व्याकूळ हो ऊन जोरजोराने ओरडू लागले. पण सुनारी मात्र बिनधास्त लोळत पडली होती.
खेचराच्या सततच्या ओरडण्याने तिची झोप उडाली. ती संतापली. त्याच तिरिमिरीत उठली. चुलीतले जळते लाकूड घेऊन खेचराजवळ गेली. त्याने त्याची चांगलीच पाठ शेकवली. खेचर आधीच भूकेलेला होता. त्यात जळत्या लाकडाचा प्रसाद. तो अत्यंत संतापला. त्याने सुनारीकडे पाठ केली आणि एक जोराची लाथ झाडली. त्या लाथेने सुनारी दूर जाऊन पडली. तिचे डोके दगडावर आपटून   जागीच गतप्राण झाली.
बायकोच्या मृत्यूची वार्ता ऐकून सुतोमो गावी परतला. घरासमोर मोठी गर्दी जमली होती. अख्खा गाव तिथे जमला होता. तेथून एक प्रवाशी चालला होता. इतकी मोठी गर्दी पाहून त्याने त्यातल्या एकाला विचारले, ' ही महिला इतकी लोकप्रिय होती?'
'कशाची लोकप्रियता घेऊन बसलात? या बयेनं सार्‍या गावातल्या बायकांना बिघडवलं होतं. या खेचरानं तिला धडा शिकवला. आता आपल्या बायकांना धडा शिकवण्यासाठी त्याच्या खरेदीसाठी ही गर्दी जमली आहे. त्यासाठी मोठी बोली लावली जात आहे', ती व्यक्ती म्हणाली. हे ऐकून तो प्रवाशी चकीत झाला. शेजारी उभा असलेला सुतोमो तर त्यांची बातचित ऐकून स्तंभीतच झाला.                                               _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकथा गुप्त अध्यात्म

एक राजा होता. त्याची राणी मोठी धार्मिक विचारसरणीची होती. तिचा बहुतेक वेळ परमेश्वराच्या भक्तीत जायचा. पूजापाठ तिच्या दिनक्रमातील प्रमुख अंग होते. तिला सर्व काही मिळालं होतं. कशाचीही कमतरता नव्हती. तिचा पती राजासुद्धा प्रेमळ होता. प्रजानुरागी, न्यायप्रिय राजा म्हणून त्याची ख्याती होती. राजा आपल्या कार्यात निपुण होता. फक्त राजा आस्तिक होता, याचंच तिला एकमेव दु:ख होतं. राजाला कुणी पूजापाठ करताना पाहिलं नव्हतं. राणीला याचीच मोठी खंत वाटत होती.
 एका रात्री तिसर्‍या प्रहरी राणीला अचानक जाग आली. तिनं पाहिलं की , महाराज झोपेत ' नारायण नारायण' असे काहीसे पुटपुटताहेत. ते पाहून तिला अत्यानंद झाला. महाराज झोपेत का होईना देवाचे नामस्मरण करत आहेत, ते पाहून तिने देवाचे आभार मानले. दुसर्‍यादिवशी तिने मोठा उत्सव साजरा केला. प्रजेला भोजनाचे निमंत्रण दिले. हा सगळा थाट पाहून राजाने विचारले, ' हा थाटमाट कशाचा? कशासाठी इतका मोठा सोहळा?'
राणी म्हणाली, ' मी काल रात्री तुम्हाला परमेश्वराचे नामस्मरण करताना पाहिले. माझा आनंड गगनात मावेनासा झाला आहे.'
हे ऐकून राजा चमकला. तो पुरता नाराज झाला. त्याचे आयुष्यभर चाललेले गुप्त अध्यात्म उघड्यावर पडले होते. भक्ती म्हणजे काही केवळ दिखाव्याची चीज नाही. ती आंतरिक ओढ आहे. मन निरंतर परमेश्वराच्या चरणी अचल राहावं, पण हात सतत कर्मासाठी झटायला हवेत, अशा विचाराच्या राजाला आता दु:ख वाटत होतं.
                                                                                                           _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

मोबाईलः धोक्याची घंटा

सकाळचे दहा वाजून तीस मिनिट. बॉससोबत मिटिंग. अचानक गर्लफ्रंडचा फोन आला आणि तुमचा फोन वाजू लागला. ऑफचे बटन दाबता-दाबता बॉसबरोबरच बसलेल्या सर्व सहकार्‍यांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या. तुम्ही शरमेने मान खाली घालता.
तुम्ही एक फनी मेसेज आपल्या बॉयफ्रेंडसाठी लिहिले आहे. तेवढ्यात तुमच्या सिनिअरचा मेसेज फ्लॅश होतो. ' कुठे आहेस? रिपोर्ट कर.' तुम्ही घाईघाईत ,गोंधळलेल्या अवस्थेत बॉयफ्रेंडसाठी बनवलेला मेसेज सिनिअरला पाठवून देता. क्लिक झाल्यानंतर तुम्हाला जोराचा झटका बसतो. पण आता त्याचा काही उपयोग नाही.
... अशा उदाहरणांची यादी खूपच मोठी असू शकते. पण तुम्ही या दोन उदाहरणांवरून मी काय म्हणतोय, हे समजला असाल. तंत्रज्ञानाच्याबाबतीत म्हटलं जातं की, ते धारदार असे दुधारी शस्त्र आहे.  तुमच्याकडून  थोडी  जरी चूक झाली तरी  तुम्ही स्वतः घायाळ होता. म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय जगताही येत नाही आणि त्याच्यासोबत जगताना बेसावध  राहूनही  चालत नाही , अशी अवस्था होऊन जाते. अशात प्रेमाची गोष्ट असेल तर मात्र बोलायची सोयच नाही. तिचा (अथवा त्याचा)  फोन येईल किंवा मेसेज येईल  म्हणून तुम्ही सारी रात्र फोन स्वीच ऑफ करत नाही. काही वेळेला अशा फोन किंवा मेसेजच्या प्रतिक्षेत असताना तुम्हाला नेमकी अशी माणसं येऊन चिकटतात की, ती तुमची पाठच सोडत नाहीत. तुम्ही बाथरूममध्ये आहात आणि मोबाईल बाहेर. अशावेळेला मेसेज फ्लॅश होतो. ज्यांच्या नजरेला तो मेसेज पडायला नको, नेमका त्यांच्या दृष्टीलाच पडतो. मग दिवसभराचा प्रोग्रॅम कोलॅप्स होऊ शकतो.
याचा अर्थ तिचा ( अथवा त्याचा) मोबाईल म्हणजे एक नाही, दोन नाही  तर अनेक प्रकारच्या धोक्यांची घंटा आहे. थोडासा जरी बेसावधपणा झाला तरी अपघात व्हायला वेळ लागत नाही. पण आजकाल या गोष्टीची कुणी पर्वाच करत नाही. उपदेश तर केलाच जाऊ शकत नाही, अशी आजची यंग जनरेशन आहे. शिवाय सध्याचं युग मोबाईलचं आहे. सामान्य असो किंवा खास, बाजार असो अथवा कॉलेज, मुलगा असो की मुलगी सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईल म्हणजे केवळ एकमेकांच्या संपर्कासाठी नाही. तर आजकाल लाईफ स्टाईल झाली आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत प्रत्येक गोष्ट मोबाईलद्वारा केली जाते.  कामाची गोष्ट असो किंवा बिझनेस डिल की प्रेमाची बात. प्लॅन बनवायचा असेल किंवा कुणाला एंटरटेन करायचे असेल, मोबाईल नसेल तर सगळे काम जिथल्या तिथे ठप्प.
सांगायची गोष्ट अशी की, आज मोबाईलशिवाय कुठलंही गोष्ट होऊ शकत नाही. मोठ्या संस्थांमध्ये कॉम्प्युटर, इंटरनेटशिवाय काही चालत नाही तसे व्यक्तिगत पातळीवर मोबाईलविना आपण सारे पंगू आहोत. मोबाईलने प्रायवसीला एक नवा आयाम दिला आहे. तुम्ही बसमध्ये, रेल्वेमध्ये आहात तरीही रिंग वाजते. तुम्ही बॉससोबत मिटिंगमध्ये आहात तरीही मोबाईलची घंटी वाजते. पण जर तुम्ही तो स्वीच ऑफ किंवा वायब्रेशन मोडमध्ये केला नाही तर मग तुमच्या 'मूड ऑफ'चे सामान त्याने बांधलेच  समजा.
गेल्या काही वर्षांपासून देशात मोबाईलच्या वापरासंबंधीचा शोध घेतला गेला, यात  अनेक बाबी समोर आल्या आहेत. ज्यांचे अफेयर ताजं आहे किंवा त्यात वादळवार्‍याने प्रवेश केला आहे, असे युवक बॉससमोर अगदी सरळ्सरळ उघडे पडल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमी देशांमध्ये असं जाणवलं आहे की, युवा कर्मचारी आणि  त्यांच्या मोबाईलची घंटी ऑफिसच्या 'वर्क कल्चर'ला नुकसान पोहचवतात. त्यामुळे आता त्या देशांमध्ये मोबाईलच्याबाबतीत काही नियम बनवण्यात आले आहेत. कर्मचारी कंपनी परिसरात आल्यावर आपोआप त्याचा मोबाईल सिग्नल पकडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी कामावर असताना  मोबाईल स्वीच ऑफ करण्यास कर्मचार्‍यांना भाग पाडले आहे. आपल्या इथेही काही कंपन्यांनी हा फार्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. कारण आपल्याकडे मोबाईलच्या बाबतीत आपण फारच बेपर्वा असल्याचे स्पष्ट झाले आहे.मोबाईलची घंटी वाजवण्याच्यासंदर्भात आपण खूपच बिनधास्त आहोत.
जर तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडचा ( अथवा गर्लफ्रेंडचा) ऑफिस अवरमध्ये मनाला वाटले म्हणून मोबाईल वाजवत असाल तर आता सावधान! यामुळे त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते. कारण यामुळे:  १) तुमच्या बॉयफ्रेंडची बॉससमोर चांगली इमेज राहत नाही. २) त्याला कामचुकार किंवा गप्पेबाजसुद्धा समजले जाऊ शकते. ३) यामुळे ऑफिसचं वर्क कल्चर बिघडतं. ४) सहकार्‍यांमध्ये तुम्ही आणि तुमचा बॉयफ्रेंड विनाकारण चर्चेचा विषय ठरता. ५) यामुळे तुमचा बॉयफ्रेंड आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकत नाही. आणि केलाच तर त्याची क्वॉलिटी घसरते. ६) ऑफिसमध्ये तुमच्या बॉयफ्रेंडचा प्रभाव घटतो.
                                                                                                              - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    ..

विज्ञान- तंत्रज्ञान भूत - बित नाही; पण

रं तर भूत-प्रेत आणि विज्ञान्-तंत्रज्ञान यांच्यात कायद्याच्यादृष्टीने  अगदी छतीसचा आकडा. कुठे अंधविश्वासाच्या गप्पा आणि कुठे तर्क आणि प्रमाणाच्या कसोटीवरचा सिद्धांत.... पण  म्हणतात ना, या दुनियेत अशक्य असे काहीच नाही. आता हेच बघा ना....! विज्ञान भूतांच्यामागे हात धुवून लागले आहे. अहो खरंच! पण खर्‍या अर्थानं हात धुवून काही नाही परंतु विविध प्रकारची उपकरणं घेऊन लागला आहे, हे नक्की!
गंमतीचा भाग असा की, भूत्-प्रेतावर गाढ विश्वास  ठेवणारी माणसंसुद्धा या शोधाचं स्वागत करताना दिसत आहेत. याचा अर्थ विज्ञानवादी आणि अंधश्रद्धाळू यांच्यातील विभाजनसीमा आता पुसट होत चालली आहे, असे म्हणायला हवे. म्हणजे त्याचं असं आहे की, काही उत्साही मंडळींनी वैज्ञानिक सिद्धांत आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने भूतांना पकडून त्यांना जाणून घेण्याचा - समजून घेण्याचा निश्चय केला आहे. जे भूतांवर विश्वास ठेवतात ते असा विचार करून खूश आहेत की, चला, वैज्ञानिक कसोटीवर भूतं असल्याचं सिद्ध झालं तर आमच्यावर लागलेला अंधश्रद्धाळूचा धब्बा आपोआप धुतला जाईल.
भूत पकडण्यासाठी वैज्ञानिक मोहिमेवर निघालेल्या लोकांची संख्या वाढण्याबरोबरच आता त्यातून एक उद्योगही आकाराला येत आहे. हा उद्योग म्हणजेच भूताची शिकार. इतर गोष्टींसारखीच याचीही सुरुवात अमेरिकेपासून झाली आहे. पण आता हा उद्योग अन्य देशांबरोबरच भारतातसुद्धा  येऊन ठेपला आहे. देश-विदेशात बेकायदेशीररित्या अशा काही एजन्सी सुरू असून त्या काही ठिकाणी भुतांचा संचार असल्याचा दावा करत आहेत. या संस्था आपल्या सेवेच्या मोबदल्यात फी आकारतात. या एजन्सी भूताचा पत्ता शोधण्याचा अथवा त्याने कुणाचे घर सोडावे म्हणून एखाद्या तंत्र-मंत्राचा आधार  घेत नाहीत. तर आधुनिक उपकरणांचा वापर करतात. काही एजन्सी संस्था भूत पाहण्याची उत्सुकता  असलेल्यां इच्छुकांनासुद्धा आमंत्रित करतात.  'या, आम्ही तुम्हाला भूत दाखवू', असे म्हणत काही देशांमध्ये " भूत शोध अभियान " चालवले जात आहेत. याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.  "भूत शोध अभियान" या वैज्ञानिक कल्पनेतून केवळ भूत पकडू एजन्सीच आपला बिझनेस चालवत आहेत असा  नाही तर काही वैज्ञानिक उपकरणांची विक्रीसुद्धा झपाट्याने होत आहे. . या उपकरणांचा उपयोग भूत-प्रेतांचा शोध घेण्यासाठी केला जात आहे. अशाच काही उपकरणांविषयी:
 इंफ्रारेड हीट सेंसर
विज्ञान म्हणतं की, कुठलीही  वस्तू अथवा जीव  किमान तापमान   शून्यापेक्षा अधिक असल्यास  इंफ्रारेड तरंग उत्सर्जित करते. हे तरंग इंफ्रारेड हीट सेंसर पकडतं. भूतशोधक सांगतात की, या सेंसरमध्ये अशा काही वस्तूंचे इंफ्रारेड तरंग पकडले जात आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. हे तरंग एखाद्या भूतापासून निघत आहेत , असे समजावे.  भूतं 'थंड' असतात , असंही ही भूतशोधक मम्डळी सांगतात.
इएमएफ मीटर
 हे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक फिल्ड म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्र मोजण्याचे साधन आहे. भूत-शोधकांचं म्हणणं असं की, भूत-पिशाच्च यांच्या सानिध्यात आल्यास वातावरणातील विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये हालचाल होते. ही हालचाल इएमएफ मीटरमध्ये पाहता येते. भूत पकडण्याच्या  मोहिमेवर निघालेले लोक हे साधन आपल्यासोबत आवश्य नेतात.  
इंफ्रारेड थर्मामीटर
हे थर्मामीटर कोणत्याही वस्तूला स्पर्श न करताही त्याचं तापमान सांगू शकतं. जाणकारांचं म्हणणं असं की प्रेतात्म्यांचं तापमान थंड असतं. एखादी भिंत अथवा एखादं कपाट यांचं तापमान जितकं असतं, त्याहीपेक्षा  कमी तापमान भूत-प्रेतांचं असतं. एखाद्या ठिकाणी असं तापमान आढळल्यास  त्यांत  एखाद्या प्रेतात्म्यानं आसरा घेतला आहे, असे  समजावे .                                                                                                                                                                                                 - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

बालकथा गुरुजींचा मंत्र

एकदा एक शेठ आपल्या मुलाच्या वाईट सवयींना  पार वैतागून गेला होता.  आपल्या मुलाच्या  सवयी लवकर सोडवल्या नाहीत तर खूप उशीर होऊन जाईल.यासाठी  काही तरी केले पाहिजे, असा  त्याने विचार केला.त्याने गावातील एका आध्यात्मिक गुरूजींशी याबाबत बोलणी केली. गुरुजी म्हणाले, 'उद्या त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'
दुसर्‍यादिवशी शेठने आपल्या मुलाला गुरुजींकडे पाठवून दिले. मुलगा आल्यावर  गुरुजी त्याला म्हणाले,' आता माझी फिरायची वेळ झाली आहे. चल ,दोघेही मिळून  काही अंतर जाऊन फिरून येऊ.'  दोघे जवळच्या वनात फिरायला गेले. पावसाळ्याचे दिवस होते. आजूबाजूला नुकतीच काही लता- वेली, वनस्पती उगवल्या होत्या. गुरुजींनी त्याला एक छोटेसे रोप उपटून आणायला सांगितले. त्याने लागलीच एक रोप उपटून गुरुजींसमोर धरले.
काही अंतर गेल्यावर गुरुजी एका मोठ्या  रोपाकडे बोट करत म्हणाले, आता ते रोप उखडून दाखव. मुलाने थोडा प्रयत्न केला आणि रोप उपटले. ते  गुरुजींपुढे धरले. गुरुजी म्हणाले,' खूप छान.'  मुलाला वाटले, गुरुजींनी सांगितलेली कामे आपण व्यवस्थितरित्या केली आहेत. त्यालाही समाधान वाटले. 
 दोघेही  चालत होते. पुढे काही अंतर गेल्यावर गुरुजी म्हणाले, 'बाळ, ती वेल उपटून दाखव.'  आता त्याला मघापेक्षा आणखी थोडी मेहनत घ्यावी लागली,  पण त्याने वेल उखडून काढण्यात यश मिळवले.  त्याच्या कपाळावर घाम  गोळा  झाला होता.  दमही लागला होता. गुरुजी म्हाणाले, ' व्वा ! हेही काम तू केलेस तर...'
दोघेही पुढे निघाले. काही अंतरावर  एक आंब्याचे झाड होते. गुरुजी म्हणाले, ' आता या  झाडाला  उखडून दाखव.'  मुलगा म्हणाला,' गुरुजी, हे कसे शक्य आहे ?  मला झाड हलणारसुद्धा नाही. '  गुरुजी म्हणाले,'  लक्षात ठेव, वाईट सवयीसुद्धा अशाच असतात.  सवयींची  प्रारंभीची अवस्था  असेल तर त्या  उखडून टाकता येतात .  पण त्या कमालीच्या   वाढल्या असतील  तर मात्र त्याच्यापासून सुटका करून घेणे खूप  कठीण होऊन  जाते.  म्हणून सांगतो, तुझ्या वाईट सवयी आताच सोडवल्यास तुझ्या हिताचे आहे.'  मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने सवयी सोडण्याचा निर्धार केला. दुसर्‍यादिवसापासूनच त्याच्या वर्तणुकीत फरक दिसून आला.  शेठने गुरुजींना मनापासून धन्यवाद दिले.
तात्पर्यः वाईट सवयींपासून लवकर सुटका करून घ्यावी. एकदा का सवय लागून राहिली,  तर मात्र खूप मोठा त्रास होतो                                                           - मच्छिंद्र ऐनापुरे

अमिताभ आणि त्याच्या नायिका

अमिताभ उदयाला आला सुपरस्टार राजेश खन्नाच्या युगात.पण त्यावेळेला ताडमाड उंचीच्या अमिताभसमोर उभं राहायला,काम करायला  कोणीही अभिनेत्री तयार होत नव्हती. आज तोच साठी ओलांडूनही बॉलीवूडमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे सध्याच्या पिढीच्या नायिका त्याच्याबरोबर काम करायला तयार आहेत. त्याला 'बुढ्ढा' म्हणणार्‍याला त्याने 'बुढ्ढा होगा तेरा बाप' म्हणत आपल्या कामाने सणसणीत चपराक दिली आहे.
१३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अँगी यंग मॅनने त्या त्या जमान्यात सगळ्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत नायक म्हणून काम केले आहे. त्याने केवळ सुमित्रा सान्याल, तनुजा, मालासिन्हा, मुमताज्,झिनत अमान, मौसमी चटर्जी, सायरा बानो, स्मीता पाटील, नीतूसिंग आणि डिंपल कापडियासोबतच काम केले नाही तर मीनाक्षी शेषाद्री, रती अग्निहोत्री, अमृतासिंगपासून रमैया, मनीषा कोईराला, शिल्पा शेट्टी, नंदिता दास, माधुरी दीक्षित, तब्बू, जिया खानपर्यंतच्या  नायकाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आला आहे. आज २० वर्षाच्या मुलीसुद्धा त्याच्यासोबत एका पायावर काम करायला तयार आहेत. पण सुरुवातीला एकसुद्धा अभिनेती त्याच्यासोबत काम करायला धजावत नव्हती.
जंजीरमध्ये खरंतर सुरुवातीला होती मुमताज. पण राजकुमार आणि त्यानंतर देवआनंदने या सिनेमाला नकार दिल्यानंतर तिच्यासमोर अमिताभ आला. तेव्हा तिने या ताडमाड उंचीच्या हिरोसमोर उभं राहायलाही नकार दिला. तेव्हा जया भादुरी पुढे आली. प्रत्यक्ष जीवनातही उत्तम ट्‌युनिंग जुळलेली  ही जोडी त्या सिनेमात पडद्यावरही हीट ठरली. या चित्रपटात संतापाचा कडवट घोट पिताना 'यंग मॅन' च्या रुपात दिसला. " शोले"त विधवा बनलेल्या जयाने आपले दु:ख-दर्द डोंळ्यांनी व्यक्त करताना दिसली. "अभिमान", "मिली" या चित्रपटांमधील जया-अमिताभच्या जोडीची प्रशंसा झाली. 'सिलसिला' तर त्यांच्या जीवनावर बेतलेलाच सिनेमा आहे. दोघे  जवळपास डझनभर चित्रपटात एकत्र आले. अलिकडे ' कभी खुशी कभी गम" या चित्रपटात हे दोघे पून्हा दिसले. पण अमिताभची प्रत्यक्षात सगळ्यात अगोदर नायिका होण्यास तयार झाली होती, अरुणा ईराणी.  पण काही कारणांमुळे ;बॉम्बे टू गोवा" नंतर प्रदर्शित झाला.  
रेखा आणि अमिताभ आज खर्‍या अर्थानं नदीची दोन किनारे असली तरी अमिताभची खऱ्या अर्थाने जोडी जमली होती , ती रेखा बरोबर!  "नमकहराम'मध्ये त्याच्या मित्राची राजेश खन्नाची नायिका असणारी रेखा नंतर सवार्थाने बदलली. नंतरच्या सिनेमांत ती अमिताभची नायिका म्हणून शोभली.  कारण "नमकहराम'च्या काळातल्या काहीशा जाड्या ढब्ब्या रेखाचं रुपांतर रेखीव स्लीम अभिनेत्रीत झालं होतं. 'मुकद्दर का सिकंदर' मधील जोहराबाई ( रेखा) साठी तडपणार्‍या सिकंदरची भूमिका असो अथवा ;सुहाग' मध्ये अमिताभला मिळवण्यासाठी बैचेन असलेली अल्लड युवतीची भूमिका. या दोघांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलं.
'सिलसिला' पर्यंत येता येता त्यांच्या रोमांसची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यापूर्वी दोघांचे 'दो अनजाने', खूनपसीना', 'मि. नटवरलाल' आणि राम बलराम' सारखे काही चित्रपट आले होते. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री मस्तच जुळली. त्यामुळेच अमिताभची सर्वाधिक यशस्वी नायिका म्हणून रेखाला मानले जाते.परवीन बाबीशीही त्याची जोडी चांगलीच जमली. खरंतर रेखाच्या आधी परवीन त्याची नायिका बनली होती. 'मजबूर' पासून. पण तरीही रेखासारखी केमिस्ट्री  जुळली नाही.पण त्यांचे 'रोटी, कपडा और मकान', शान, कालिया, खुद्दार, अमर

अकबर अँथनी, महान आदी सिनेमे हिट ठरले होते. मध्यंतरी याच परवीन बॉबीने अमिताभ आपला जीव घ्यायला उठला होता, अशी मुलाखत देऊन खळबळ उडवून दिली होती.परवीनप्रमाणेच झीनत अमानलाही सिनेमात ग्लॅमर वाढविण्यासाठी घेतले जायचे. कारण अमिताभच्या
सिनेमात नायिकांसठी काही करण्यासाठी असायचंच नाही. द ग्रेट गॅम्बलर, डॉन, लावारिस, दोस्ताना, पुकार आणि महान आदी सिनेमांध्ये ही जोडी दिसली.
आणखी एका जया नावाच्या नायिकेसोबत अमिताभची जोडी जमली. ती नायिका म्हणजे जयाप्रदा. परवीन बॉबी, झीनत अमान, आणि राखी या नायिकेंची जादू ओसरली तेव्हा अमिताभशी जयाप्रदाची जोडी जमली. शराबी, गंगा जमुना सरस्वती, आखरी रास्ता , जादूगार, इंद्रजित आणि आज का अर्जुन या चित्रपटामध्ये ही जोडी दिसली. यातले तीन चित्रपट हिट ठरले.
नायिकाचं पडद्यावरचं आयुष्य अल्पच असतं. "स्त्री' प्रमाणे अभिनेत्रीही क्षणाची नायिका आणि अनंत काळची आई असते! राखीच्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. कारण ती अमिताभची अनेक यशस्वी चित्रपटातली नायिका. (त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, बरसात की एक रात आणि इतर अनेक...) पण अनेक सिनेमानंतरही हा अंग्री यंग मॅन यंगच राहिला पण  राखी त्याची आई बनली. वहिदा रेहमानबाबतीतही तसंच झालं. 'शक्ती' मध्ये राखी, तर  "अदालत' आणि "कभी कभी' मध्ये त्याची नायिका असलेली वहिदा पुढे   'त्रिशुल' मध्ये आई बनली. पण यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते. अमिताभच्या नायिकांचा स्पॅन कितीतरी मोठा आहे. वहिदा रेहमान, नूतन  सारख्या आधीच्या पिढीतल्या अभिनेत्रीही त्याच्या नायिका होत्या आणि जिया खान सारखी अगदी अलिकडच्या  पिढीतली अभिनेत्री'ही त्याची नायिका होती.
'इंकलाब' मध्ये अमिताभ राजकारणी नेतांचा बदला आपल्या स्टाईलने घेतो, त्याला श्रीदेवी मदत करते.  या एकेकाळच्या नंबर वन अभिनेतीसोबत अमिताभचे आनखी दोन सिनेमे आले. 'आखरी रास्ता' आणि 'खुदा गवाह'. आता "इंग्लिश चिंग्लिश' या  चित्रपटात हे दोघेही पुन्हा एकदा एकत्रीत  काम करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीदेवी आणि शहेनशाहा अमिताभ बच्चन तब्बल अठरा वर्षांनी एकत्र येत  आहेत. स्वप्नसुंदरी हेमामालिनीशी कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात त्याची जोडी जमली नाही. सत्ते पे सत्त, देशप्रेमी, नास्तिक आदी सिनेमात ती अमिताभची नायिका बनली. पण तिने अमिताभपेक्षा धर्मेंद्रला अधिक प्राधान्य दिल्याने त्यांचे कमी चित्रपट आले. 'गहरी चाल' मध्ये हेमामालिनीने अमिताभच्या बहिणीची भूमिका केली होती.  दुसऱ्या टप्प्यात मात्र ती जोडी हीट ठरली.या जोडीने 'बाबूल',' बागवान' मध्ये काम केले.  'फरार' या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याची नायिका असलेल्या शर्मिला टागोरबरोबर त्याची 'विरुद्धी' द्वारे  पुन्हा जोडी जुळली.  पण हिट  ठरली नाही. रेवती आणि तब्बुसारख्या वेगळ्या नायिकांसमोरही तो नायक म्हणून उभा राहीला. पण कारकिर्दीचा पहिला टप्पा असो की दुसरा, त्याच्या करिष्म्यासमोर त्याच्या नायिका अनेकदा झाकोळून जाताना दिसल्या. अमिताभची जादूच निराळी आहे. .                                                                                     ..                                                                                                                             _ मच्छिंद्र  ऐनापुरे             

बालकथा भाऊबीजेची ओवाळणी

         गोष्ट खूप जुनी आहे. एका गावात रामधन नावाचा एक मोठा जमिनदार होता. त्याला चार मुलगे आणि एक मुलगी होती. यथावकाश मुलांचे विवाह झाले. जीवन काय असते, याची पक्की जाणीव रामधनला होती. त्यामुळे जसजशी मुलांची लग्ने होत गेली तसतशी त्यांची त्यांना वेगळी चूल मांडून दिली.शिवाय त्यांच्या हिश्श्यातील जमीनही देऊन टाकली. परंतु, त्यांना आपल्यापासून दूर केले नाही. आता मुले आपापल्या संसारात रमून गेली.  सगळ्यांसाठी आंगण एकच होते. अंगणात मुलांची  नातवंडं  प्रेमाने, जिव्हाळ्याने एकत्र खेळताना पाहून रामधनचं मन भरून यायचं. समाधान पावायचा.
       अलिकडे रामधनला एक गोष्ट फार सतावत होती. ती होती, एक जमीनीचा तुकडा. त्याने त्याची काळजी हिरावून घेतली होती. हा तुकडा सगळ्यांना वाटून राहिलेला होता. त्याची वाटणी करता येण्याजोगी नव्हती. त्याची वाटणी करून काही उपयोग होणारही नव्हता. पण इकडे चारही मुलांची नजर त्या छोट्याशा तुकड्यावर होती. प्रत्येकजण त्याच्यावर आपला हक्क सांगत होता.
       रामधनला याचीच काळजी वाटत होती की, हा तुकडाच घराची शांती हिरावून घेईल की काय? जमिनीचा हा तुकडा द्यायचा तर कुणाला, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. या काळजीने त्याची प्रकृती बिघडत चालली. इकडे भावाभावांमध्ये या जमिनीवरून कुरबूर सुरू झाली होती. रामधनच्या घरावर ज्यांची ज्यांची वाईट नजर होती, त्यांनी त्यांनी  भावाभावांना स्वतंत्रपणे  गाठून भडकावत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट  रुंदावत चालले.
      दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस होता. चारही भावांची लाडकी , एकुलती एक धाकटी बहीण माधुरी ओवाळणीसाठी पतीसमवेत गावाकडे आली   होती.  पण वडिलांची खालावत चाललेली तब्येत पाहून ती काळजीत पडली. तिने आपल्या भावांमध्ये झालेला बदलही पाहिला. यावेळी तिला माहेरी आल्यावर पहिल्यासारखी मायेची , प्रेमाची अनुभूती आली नाही. आपल्या पतीशी तिने चर्चा केली. तिला चार दिवस माहेरी सोडून तो माघारी परतला.
     संध्याकाळी माधुरीने सर्व भावांना अंगणात बोलावून घेतले. वडिलांसमक्ष तिने जमिनीच्या तुकड्याचा विषय काढला. पण, त्यावर कुणीच काही बोलले नाही.  उलट विषयाला बगल देत तिला ओवाळणी कुठली द्यायची, हाच प्रश्न ते वारंवार विचारू  लागले.
माधुरी म्हणाली, " आज मी तुमच्याकडून माझ्या आवडीची भेटवस्तू तुमच्याकडून घेणार आहे. "
" बोल तुला कुठली वस्तू हवी आहे? आमच्या लाडक्या बहिणीला मागेल ती वस्तू देऊ." सर्वच भाऊ एकदम म्हणाले.
     माधुरीने तसे त्यांच्याकडून वचन घेतले.  माधुरी म्हणाली, " आपल्या गावात शाळा नाही. " थोरला भाऊ म्हणाला, " यात काय नवीव? आम्हाला तर माहितच आहे. मग पुढं...?"
    माधुरी म्हणाली, " बाबांजवळ जो जमिनीचा तुकडा आहे, तो तुमची इच्छा असल्यास शाळेसाठी पंचायतीला देऊन टाकू."
    माधुरीची ही गोष्ट ऐकून सगळेच भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. माधुरी पुढे म्हणाली, " या शाळेत आपली मुले शिकतील. पुढं शिकून नोकरी  मिळवतील. याचा आपणा सर्वांनाच लाभ होईल."
    इतक्याच धाकटा भाऊ म्हणाला, " माझी काही हरकत नाही." मग सगळ्यांनीच होकारार्थी कौल देऊन टाकला. रामधनला तर अगदी गहिवरून आले. ज्या जमिनीच्या तुकड्यापायी  तो  सुख-चैन हिरावून बसला होता. त्या तुकड्याचा एका झटक्यात निकाल लागला. मनावरची चिंता एखाद्या पाखरासारखी भुर्रकन उडून गेली. रामधन म्हणाला,: पोरी, तू खूप हुशार निघालीस. माझी सारी काळजी एका झटक्यात मिटवलीस."
   दुसर्‍याच दिवशी सरपंच आणि अन्य पंचांना बोलावून घेऊन जमिनीचा तुकडा शाळेच्या नावाव्रर करून देण्यात आला. आता सगळे भाऊ गुण्यागोविंदाने राहू लागली.
   एका वर्षाने गावात शाळा सुरू झाली. शाळेला माधुरीचे नाव देण्यात आले. सुरुवातीला पाचवीपर्यंत वर्ग सुरू केले. आता उच्च माध्यमिक शाळाही सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील मुलेही   इथे शिकतात. माधुरीने आपल्या भावाभावांमधल्या भांडणाचे मूळ उखडून टाकतानाच  एक चांगले, विधायक काम केले. आपल्याही आयुष्यात अशी संकटे येत असतात. पण आपण पैसा, जमीन्-जुमला यापेक्षा आपल्या माणसांना जवळ करायला हवे. होय ना ?   
                                                                                       - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

प्रेरणायी घटना

प्रेरणायी घटना                                        दगड आणि स्त्री
श्रीलंकेत इंग्रजांचं राज्य होतं. तामिळी पंडित आरुमूग नावलर कादिर गामण्मुख मंदिराच्या बाहेर एका दगडावर आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारण्यात दंग होते. एक इंग्रज त्यांच्या दिशेने आला. जवळ येऊन तो आरुमूग नावलरांना म्हणाला," आत काही लोक दगडाची पूजा करताहेत आणि तुम्ही मात्र चक्क दगडावर बसून चकाट्या पिटता आहात? "
काही दिवसांनी त्याच रस्त्यावरून तोच इंग्रज आपल्या कुटुंबासमवेत घोडागाडीतून चालला होता. त्याने नावलर यांना घोडागाडी थांबवली आणि शेजारी बसलेल्या आपल्या पत्नी आणि बहिणीची ओळख करून दिली.
आरुमूग नावलर त्या इंग्रजाला म्हणाले," दोन्ही स्त्रियाच आहेत. मग यातील एक तुमची पत्नी आणि एक बहीण हे कसे काय?" इंग्रज समजून चुकला. त्याने नावलरची माफी मागितली आणि आपला रस्ता धरला.                                                                                                          ..                                                                                                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
वेळ
साबरमती आश्रमात गांधीजींकडे कुठल्याशा गावचे काही लोक आले. त्यांनी गांधींजींना सभेसाठी आमंत्रित केले. बापू म्हणाले," ठीक आहे, उद्या  संध्याकाळी बरोबर पावणे चार वाजता तुम्ही मला न्यायला या. सरपंचाने सभेची वेळ चारची ठेवली होती. दुसर्‍यादिवशी सायंकाळचे पावणे चार वाजले. पण सरपंचांचा कुणी माणूस त्यांना न्यायला आला नाही. मग स्वतः बापूंनी सायकल घेतली आणि त्या गावाच्या दिशेने निघाले.
सरपंचांचा  माणूस बापूंना न्यायला आला, पण बापू त्याला भेटले नाहीत. तो परत गेला, तेव्हा गांधीजी लोकांमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे त्याने पाहिले. भाषण संपल्यावर तो बापूंना भेटला. आपली झालेली चूक त्याने कबूल केली आणि त्यांची माफी मागितली. बापू त्याला म्हणाले, " वेळ खूप मौल्यवान आहे. आपल्याला वेळेचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे."                                             - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
खरा राजा
 विजयी सिकंदरचे सैन्य एका जंगलातून माघारी परतत होते. सिकंदरसुद्धा त्यांच्या समवेत होता. वाटेत त्याने एका वृक्षाखाली एका बेफिकीर भिकार्‍याला पाहिले. तो भिकारी आपल्याच मस्तीत डफली वाजवत गाणे म्हणण्यात दंग झाल्;आ होता. असल्या दारिद्र्यग्रस्त परिस्थितीतही इतक्या धुंदपणे गाणे भिकार्‍याला भिकार्‍याला पाहून सिकंदरला मोठे आश्चर्य वाटले. तो थांबला. भिकार्‍यालात्याने त्याचे नाव विचारले.
भिकारी म्हणाला," मी राजा. " ऐकून चकित झालेल्या सिकंदरने पुन्हा विचारले, " तू कोणत्या देशाचा राजा आहेस? तुझा राजवाडा, तुझे ऐश्वर्य कुठं आहे?" तो बेफिकीर भिकारी तितक्याच बेदरकारपणे म्हणाला, " मनावर विजय मिळवलेला राजा. ही सारी दुनिया माझ्या  परमपित्या परमेश्वराच्या संपत्तीने भरून गेलेली आहे. असे असताना मी बापडा वेगळे असे टिचभर धन घेऊन काय करू? कुठे जाऊ?"
सिकंदरला त्याच्या बोलण्यामागचा गर्भितार्थ समजला. त्याला खर्‍या अर्थाने खर्‍या राजाचे पहिल्यांदा दर्शन घडले.                                                                                                                           - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

गरिबांची क्रूर चेष्टा


लेख                                               
आताची अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी २२ लाखाच्या आसपास आहे. ताज्या आकडेवारीनुसार २००८ च्या जागतिक मंदीनंतर तेथील गरिबांच्या संख्येत वाढ झाली असून ती आता ४६ लाखांवर पोहचली आहे. म्हणजे तिथल्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के गरिबी अमेरिकेत आहे. पण या आकडेवारीने राष्ट्रपती बराक ओबामांची झोप उडवून टाकली आहे. कारण वाढती बेरोजगारी आणि गरिबी आगामी काळात येऊ घातलेल्या राष्ट्रपती निवडणुकीतला मुख्य मुद्दा बनत चालला आहे.  एवढे वाचल्यावर तुम्हाला आपल्या भारतातल्या गरिबीविषयी जाणून घ्यायची इच्छा झाली असेल. तर सांगतो. २०११ च्या जणगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येने  १२१ कोटीचा आकडा पार केला आहे. सरकारी आकडेवारी ग्राह्य धरल्यास चाळीस कोटी जनता गरिबीत आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक या दुर्दैवी कॅटेगिरीत येतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की, सरकार नेमकी कुणाला गरीब म्हणते ? शहरात राहणार्‍याच्या खिशात रोज खर्चायला ३२ रुपये असतील आणि खेड्यात राहणार्‍याजवळ २६ रुपये असतील तर तो गरीब नाही. शहरात राहणारे चार सदस्यीय कुटुंब महिनाकाठी ३ हजार ८६० रुपये कमवत असेल तर दारिद्र्य रेषेखाली येत नाही. अमेरिकेचा विचार केला तर तिथल्या गरिबीचे मापदंड आपल्या विपरित असल्याचे लक्षात येईल. एखादा अमेरिकी रोज १४०० रुपये म्हणजे वार्षिक सरासरी पाच लाख रुपये कमवित नसेल तर त्याला दारिद्र्य रेषेच्याखाली गणले जाते. चार सदस्यीय कुटुंब रोज २ हजार ७३९ रुपये कमवित नसेल तर त्या कुटुंबाला दारिद्र्य रेषेखालील कुटुंब  मानले जाते. म्हणजे वर्षाला दहा लाखाहून अधिक उत्पन्न असणार्‍यांनाच गरिबी रेषेच्या वर मानले जाते.  
भारतात मात्र एखादे चार सदस्यीय कुटुंब ४६ हजार रुपये प्रति वर्ष मिळवत असेल तर ते दारिद्र्य रेषेच्या खाली येत नाही. आणि अमेरिकेत दहा लाख रुपये प्रति वर्ष कमवत नसेल तर ते कुटुंब गरीब. आता आपल्या लक्षात येईल की, एका गरीबाची आपल्या देशात काय पात्रता आहे? आपल्या देशात दहा लाख कमवणार्‍या कुटुंबांची संख्या किती असेल, याची आकडेवारी आपल्याला आयकर विभागाकडूनच मिळू शकते. अमेरिकेच्या मापदंडानुसार आपल्या देशाची गरिबी काढायची झाल्यास ८०  ते ९० कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली जाईल. हे वास्तव आहे. पण आपले सरकार हे वास्तव स्वीकारायला तयार नाही. सरकार म्हणते की, दिल्ली,मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बेंगलुरू सारख्या शहरात राहणारी व्यक्ती ११ हजार ६८०  रुपये वर्षाला कमवत असेल तर त्याला 'बीपीएल'च्या योजनेनुसार ज्या काही सरकारी सवलती मिळतात, त्या घेण्याचा त्याला अधिकार  नाही. त्याला सवलतीत उपचार  करून घेता येणार नाहीत, ना धान्य मिळवता येणार आहे. आवास योजनांसारख्या योजनांचा लाभही त्याला घेता येणार नाही. खेड्यात राहणारा वर्षाकाठी ९ हजार ४९० रुपये मिळवत असेल तर त्यालाही या सर्व गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. गरिबांची यापेक्षा  क्रूर चेष्टा आणखी कोणती असेल ? पण असली चेष्टा फक्त आपले सरकारच करू शकते.
    महागाईच्या जमान्यात केंद्र सरकारने गरिबाचा जो मापदंड निश्चित केला आहे, तो पाहून हसावे की रडावे, हेच कळेनासे झाले आहे. शिवाय आपल्या हातात  हताशपणे पाहण्याव्यतिरिक्त काहीच नाही. असा कुठला महिना गेला आहे, जो सरकारने जनतेवर कुठला बोजा टाकला नाही. कधी पेट्रोलच्या किंमतीत वाढ तर कधी आणखी काही. सातत्याने प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या दराचा बोजा टाकला जात आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले असताना सरकार मात्र त्यांना गरिबी रेषेवर आणून त्यांच्यावर घोर अन्याय करत आहे. देशाच्या विकासासाठी योजना आखणार्‍या सगळ्यात मोठ्या 'योजना आयोग' या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गरिबीची व्याख्या सांगणारी

आकडेवारी  सादर केली आहे. त्यात जी व्यक्ती शहरात ३२ रुपये आणि ग्रामीण भागात २६ रुपये   रोज खर्च करू शकते, तो दारिद्र्य रेषेच्यावर मानली जाईल. गरिबीची नवी परिभाषा स्पष्ट करताना सरकारने म्हटले आहे की, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू किंवा चेन्नईसारख्या शहरात चार सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च ३ हजार ८६० रुपयात भागत असेल तर त्यांना दारिद्र्य रेषेखाली गणले जाणार नाही.
विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, ही योजना  पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील समितीने तयार केली आहे. देशाचे अर्थमंत्री राहिलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे अर्थशास्त्र सांगते की, एका दिवसात एक व्यक्ती रोज ५.५० रु. डाळीवर, १.०२ रु. भात- भाकरीवर, २.३३  रु. दूध ,१.५५ रु. तेल, १.९५ रु. भाजी. ४४ पैसे फळावर. ७० पैसे साखर, ७८ पैसे मीठ-मसाल्यावर , १.५१ रु. अन्य खाद्य पदार्थावर आणि ३.७५ रु. इंधनावर खर्च करू शकतो , तो स्वास्थ्यपूर्ण जीवन जगू शकतो.  ४९.१० रु. मासिक भाडे देऊ शकतो, तो तर अगदी आरामात जीवन घालवू  करू शकतो. त्याला गरीब म्हटले जाणार नाही. सुरेश तेंडुलकर समितीद्वारा तयार केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्वस्थ, आरामात राहण्यासाठी ३९.७० पैसे पुरेसे आहेत. शिक्षणावर ९९ पैसे रोज किंवा २९.६० रु. प्रतिमहिना खर्च, ६१.३० रु. प्रतिमहिना कपड्यासाठी ९.६० रु. चप्पल आणि २८.८०  पैसे अन्य साहित्यावर खर्च करणारा गरीब म्हटला जाणार नाही.
या रिपोर्टवर स्वतः पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली  आहे. देशातल्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये ज्या पंतप्रधानांची गणना होते, तेच गरिबांची अशी थट्टा करतील, असे स्वप्नातही कुणाला वाटले नसेल.  याला आपल्याला  मोठ्या पदावर बसून मौजमजा करणार्‍या लोकांची ही संवेदनहिनतेची पराकाष्ठतेची सीमाच  म्हणावी लागेल. अन्यथा इतकी मोठी गरिबांची थट्टा क्वचितच कुणी असेल. दारिद्र्य रेषेसाठी निर्धारित केलेले आकडे आणि वास्तव मूल्यांची तुलना केल्यास जमीन्-अस्मानचा फरक आपल्या लक्षात येईल. पंतप्रधानांनी स्वाक्षरी  केलेल्या रिपोर्टमध्ये गरिबी रेषेची जी सीमा आखली आहे, त्यावरून असे स्पष्ट होते की, गरीब माणसाला १२० र. किलो दराने विकले जाणारे सफरचंद अथवा १५० रु. किलो दराने विकले  जाणारे डाळिंब खाण्याचा अजिबात हक्क नाही. इतकेच काय तर तीन रुपयाला पडणारे एक केळसुद्धा खाण्याचा अधिकार नाही. जरा विचार करा, अशा गरिबाच्या शरिरात विटामिन ए, बी, सी पासून कॅल्शियम आणि लोहपर्यंत सर्व घटक  कोठून येणार ? अशा कुटुंबाच्या मुलांना चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही. शिवाय या कुटुंबांच्या मुलांना टिव्ही पाहण्याचा हक्कसुद्धा  दिला गेला नाही.                               - मच्छिंद्र ऐनापुरे
surajya, solapur 26/9/2011

Sunday, September 25, 2011

शेपटी नसलेला हत्ती

ए का जंगलात एक जांभळाचे झाड होते. त्यावर खुपशी माकडं राहत होती. माकडं दिवसभर काळी-काळी मोठी जांभळ खायची आणि रात्री झाडावरच झोपी जायची. एकदा एक हत्ती तिथे आला. काही वेळ तो झाडाच्या फांद्या मोडून खाऊ लागला; पण त्याचे पोट भरले. तेव्हा त्याला काय वाटले कोण जाणे. तो फांद्या तोडून मोडून फेकू लागला. नंतर तो आजूबाजूची छोटी छोटी झाडेही उखडून टाकू लागला.

आता माकडं खूप घाबरली. ते आपल्या सरदारकडे गेली. आणि म्हणाली, जर हत्तीने जांभळाच झाड उखडून टाकलं तर काय करायच. आपण कुठं राहायच. सरदार म्हणाला, तुम्ही घाबरू नका. मी आताच त्याचा बंदोबस्त करतो. मी जसे म्हणेल तसंच तुम्ही म्हणायचे. यानंतर माकडांचा सरदार एका उंच फांदीवर जाऊन बसला आणि मोठय़ाने म्हणाला, ‘अरे बघा शेपटी नसलेला हत्ती’. तशी माकडंही जोरजोरान तशीच म्हणू लागली. माकडांचे पाहून झाडावर बसलेली पाखरंही म्हणू लागली, अरे बघा शेपटी नसलेला हत्ती. हत्ती मात्र मागे वळून पाहू शकत नव्हता. कारण त्याची शेपटी छोटी होती. त्याला वाटलं खरोखरच आपल्याल्या शेपटी नाही. त्याला स्वत:ची लाज वाटू लागली. त्याने तेथून लगेच धूम ठोकली. सगळी माकडं आपल्या सरदारच्या हुशारीवर खुश झाले आणि पुन्हा गोड गोड जांभळ तोडून खाऊ लागले.

मच्छिंद्र ऐनापुरे,  जत दिव्य मराठी दि. २५ सप्टेंबर २०११

Friday, September 23, 2011

माणूस होणार अदृश्य...!

विज्ञान्-तंत्रज्ञान
माणूस होणार अदृश्य...!
    माणूस हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरून अदृश्य होतो, तसा प्रत्यक्षात अदृश्य झाला तर ...! असे शक्य होईल काय? पण तशी शक्यता आता दृष्टीक्षेपात आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मीटा मॅटिरियल्स नावाचा खास पदार्थ शोधून काढला आहे. या पदार्थामुळे कोणतीही व्यक्ती क्षणात डोळ्यांआड होण्याची क्षमता प्राप्त करू शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिशिअन कोणत्याही वस्तूला अदृश्य करू शकतो.शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्र्रीय टीमने अशा एका पदार्थाची निर्मिती केली आहे. , प्रकाशयात्रेच्या दिशेवर नियंत्रण मिळवू शकतो.
    अशाप्रकारे प्रकाशाच्या दिशेवर नियंतरण मिळवल्यास मनुष्याबरोबरच मोठ-मोठे टँक आणि जहाजांना अदृश्य करून दहशतवाद्यांवर मात करू शकता येते. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्यामते हा नाविण्यपूर्ण पदार्थ प्रकाशाची दिशा बदलण्यास समक्षा आहे. अमेरिकेच्या नौदलाने २६ ऑक्टोबर १९४३ मध्ये फिलाडेल्फियात या पदार्थाचा गुप्त प्रयोग केला असल्याच्या बातम्या आहेत. या प्रयोगात रडार आणि जहाज प्रकाशापासून अदृश्य अथवा पारदर्शित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मातर बहुतांश तज्ज्ञांच्या मतानुसार अशा प्रकाराचा कथीत प्रयोग म्हणजे केवळ दंतकथा आहे.तर काहींच्या मते मॅटीरियल्सचा फिलाडेफ्लियामध्ये वास्तवात प्रयोग करण्यात आला आहे. आणि आता त्याचा विस्तार करण्याचे कार्य चालू आहे.
    हा फॉर्म्युला प्रत्याक्षात उतरला आणि मनुष्याच्या जीवावर उठलेल्या, माणुसकीला काळिमा फासायला निघालेल्या दहशतवाड्यांच्या हाती लागल्यास त्यांच्या नापाक इराद्याला बळच मिळणार आहे. आजचे दहशतवादीच इअतके चलाख आहेत कि, कधी येतात आणि विद्वंश करून जातात, याचा थांगपत्तासुद्धा कुणाला लागत  नाही. अशा अतिरेक्यांना हा फॉर्म्युला सापडल्यास काय होईल याचा विचार करणेच नको.सुरक्षाकवच सहज भेदणार्‍या या दहशतवाद्यांना राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान कार्यालय, सुरक्षा मंत्रालय,अणुकेंद्र हा परिसर म्हणजे 'किस झाड की पत्ती'समान आहे. आताच त्यांच्याकडे जगातील उच्च , विकसित आणि प्रगत असे तंत्रज्ञान अवगत आहे. जगातील विकसित देशांचे तंत्रज्ञान त्यांच्या कह्यात आहे. त्यामुळे वस्तू किंवा माणसाला अदृश्य करणारे तंत्रज्ञान त्यांच्या हाती लागल्यास मानवाचा अंत अधोरेखितच आहे,असे ग्रहीत धरायला हरकत नाही.
    हा संभ्याव धोका सोडला तर मात्र देशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.सुरक्षा सैनिक अदृश्य हो ऊन आपले कार्य करत राहतील आणि सुरक्षाकवच भेदण्याचा प्रयत्न करणारे त्यांच्या गळाला लागतील. परंतु खरा प्रश्न असा आहे कि, अल-कायदा, दाऊद्सारख्या दहशतवाद्यांच्या नजरेतून हा फॉर्म्युला सुटेल का? म्हणतात ना, कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते.परंतु त्याचे चांगले आणि वाईटपण त्याच्या वापरण्यावर अवलंबून असते. शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान पूर्णत: विकसित व्हायला आणखी काही बरीच वर्षे लागणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर ही दुनिया कसा करेल, हे मात्र येणारा काळच ठरवेल.                           ..                                                                                                                                                                                                _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Thursday, September 22, 2011

चर्चा बड्यांच्या घटस्फोटाची !

घटस्फोट हा प्रकार आता भारतासारख्या संस्कृतीशील देशातही सामान्य झाला आहे. कोण केव्हा घटस्फोट घेईल, सांगता येईनासा झाले आहे. लग्न म्हणजे बाहुला- बाहुलींचा खेळ समजला जात आहे. ग्लॅमरचे वलय असलेल्या लोकांचे तर काही बोलूच नका. अगदी तिखट-मीठ लावून त्यांच्या घटस्फोटाच्या कहाण्या चर्चिल्या जातात. कुणाची किती मोडली ? सध्या कुणाचे कुणाबरोबर अफेअर सुरू आहे. बात कुठवर आली आहे. या सगळ्या गप्पा खंमग चर्चिल्या जातात. अर्थात त्या यापुढेही चवीने चघळल्या जाणार हे सांगायला नको. अझहर-ज्वाला, अरुण नायर- एलिझाबेथ हर्ले, राहूल- श्वेतासिंग आणि अदनान सामी- सबा गलाधारी आदींच्या घटस्फोटांची चर्चा अशीच रंग भरत राहिली.
आता आपल्या अझरुद्दीनचीच गोष्ट घ्या. बिचार्‍याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन अभिनेत्री राहिलेल्या संगिता बिजलानीशी लग्न केले होते. पण  आता चौदा वर्षाच्या सुखी संसारानंतर ग्रहण लागले असून त्यांच्या या लग्नाला  'फूल्-स्टॉप'  लागण्याची वेळ आली आहे. या दोघांच्या संबंधात तणावाचे वातावरण ढवळू लागले ते,  अझहरच्या जीवनात बॅडमिटन चॅम्पियन ज्वाला गुट्टा शिरकाव्यामुळे ! मिडिया त्यांच्या खमंग बातम्या रसरसून द्यायला लागल्याने  अझहर आणि संगीताच्या संबंधात बेबनावाच्या ठिणग्या पडायला लागल्या. याच काळात  ज्वाला गुट्टासुद्धा आपल्या नवर्‍याला - चेतन आनंदला सोडून एकटी वेगळी राहात होती.  अझहरसुद्धा ज्वालाला पसंद करत होता म्हणे कारण आणि  तिच्यासाठी एक बीएमडब्लू गिफ्ट दिली होती अशी चर्चा मिडियात रंगली होती. . खरं खोटे ती दोघेच जाणोत. पण दोघेही चांगले खेळाडू आहेत.  एक ४८ वर्षाचा तर एक २७ वर्षाची. पण काय माहित दोघांचं  वाजणार का नाही ते ? सध्या तरी खासदार अझहर पुत्रशोकात आहे.
अरुण नायर आणि एलिझाबेथ हर्ले यांच्या लग्नाबाबत तर तुम्हाला माहितच आहे. या दोघांचा विवाह बराच काळ गाजत राहिला. लिज एक टॉप मॉडेल आणि अभिनेत्री. तर अरुण नायर एक श्रीमंत एनआरआय. लिज लग्नाअगोदर अभिनेता ह्यूग ग्रांटसोबत १० वर्षांपासून डेटिंग करत होती. अरुण नायरजवळ पैशाचं झाड असताना त्याहीपैक्षा अधिक झाडं लिजजवळ होती. शेन वार्नसोबतच्या संबंधाच्या चर्चेनंतर लिजने नायरकडे लिजने घटस्फोटाची मागणी केली. त्यांचं वैवाहिक जीवन चार वर्षातच संपुष्टात आलं. या  घटस्फोटानंतर लंडन आणि भारतात मोठ्या  धुमधडाक्यात झालेल्या  लग्नाला घटस्फोटाने अखेर पूर्णविराम मिळाला. आता लिजच्या प्रेमप्रकरणाची गाडी ऑस्टेलियाचा क्रिकेटर शेन वॉर्नशी सुरू आहे.
तुम्हाला आपला राहूल तर माहितच आहे. तोच तो महाजनांचा. रिऍलेटी शो ' दुल्हनिया ले जाएंगे' नंतर त्याचं लग्न डिम्पीशी झालं. त्याअगोदर चर्चा करुया त्याच्या पहिल्या लग्नाची. त्याची पहिली बायको श्वेता हिला तो १३ वर्षांसून ओळखत होता. पण त्यांचं लग्न एक वर्षसुद्धा टिकलं नाही. श्वेताला करण्यात आलेल्या मारहाणीच्या खुणा मिडियासमोर आल्या तेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला ऊत आला. त्यातच राहुलसुद्धा  ड्रग्स प्रकरणात पकडला गेला होता. असं कळतं की हा घटस्फोट त्याला मोठा महागात पडला.
अदनान सामी आणि सबा गलाधारी यांच्या घटस्फोटाची बातही अशीच चविष्ट आहे.  अदनान सामी आपली पहिली बायको झेबा बख्तियार हिच्यापासून घटस्फोट घेताना चांगलाच वादात अडकला होता. त्याला  आपल्या मुलाच्या  कस्टडीसाठी बर्‍याच खस्ता खाव्या लागल्या आहेत. कोर्टकचेरी खेळावी लागली.  नंतर त्याचे लग्न सबा गलाधारी हिच्याशी झाला. मात्र दुदैवाने त्याचा हाही विवाह घटस्फोटाने संपुष्टात आला. त्याचा   घटस्फोट गाजला तो त्याच्या 'रॉक'   नावाच्या कुत्र्याच्या कस्टडीवरून.  मिडियाने  तर त्यांचा विषय हास्यास्पद करून टाकला होता.  त्याचबरोबर मुंबईतल्या पाच प्लॅटच्या हक्कावरूनही त्यांचा  घटस्फोट रंगला होता.  शेवटी ते सबाला मिळाले. अदनान सामीला त्याच्या संगीत आणि गाण्याने जेवढी पब्लिसिटी मिळाली नाही, त्याहीपेक्षा अधिक  त्याच्या  घटस्फोट मामल्यामुळे मिळाले.    - मच्छिंद्र ऐनापुरे , जत

भारतात पेट्रोल महाग

लेख                         भारतात पेट्रोल महाग
मनमोहनसिंह सरकारने पेट्रोलच्या किंमती गेल्या दोन वर्षात डझनवेळा तरी वाढवल्या आहेत. सरकारने आतापर्यंत आपल्या दुसर्‍या 'इनिंग'मध्ये  पेट्रोलची  २४ रुपयांहून अधिक  वाढ केली आहे. या इंधन भाववाढीच्या ओझ्याने जनता इतकी  दबून गेली आहे की, आता हालचाल करायलासुद्धा  जागा उरलेली नाही. तरीही मनमोहनसिंह सरकार गप्प बसेल असे वाटत नाही. आगामी काळात आणखी झटके देत राहील. त्यांना सांगायला कारणही तयार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा परिणाम्. पैशाचे मूल्य घसरले, इत्यादी इत्यादी. मात्र अन्य देशांध्ये भारतापेक्षा पेट्रोल किती तरी पटीने स्वस्त आहे. यातलं अंतर पाच ते सत्तर टक्क्यांपर्यंत  कमी आहे. वेनेजुएलामध्ये पेट्रोलचा दर फक्त १ रू. १४ पैसे प्रति लिटर आहे.  भारतातल्या जनतेला वेनेजुएलाच्या किंमती इतकी अपेक्षा मुळीच नाही. पण परवडेल असा भाव तरी असायला हवाच नाही का ?
युपीए सरकारवर सर्वाधिक टीका या पेट्रोलजन्य पदार्थांच्या भाववाढीमुळे होत आहे. विरोधी पक्ष  भाजपा तर सरकारवर तुटून पडला आहे. सरकारने आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळात पेट्रोलच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार अटलबिहारी वाजपेयी यांनी मनमोहनसिंह सरकारला चार्ज दिला तेव्हा पेट्रोलचा दर ४० रुपयांपेक्षा कमी होता. पण आज  हाच आकडा  सत्तरी  पार करताना दिसतो  आहे. पेट्रोलच्या किंमतीचा थेट संबंध सगळ्या जीवनावश्यक वस्तूंवर पडत असतो.  कारण पेट्रोलच्या भाववाढीमुळे दळणवळणाचे भाव वाढतात.  त्याचा परिणाम रोजच्या उपभोगाच्या सगळ्या वस्तूंवर होतो. भारतातली ८३ कोटी जनता आजसुद्धा  २० रुपयात रोजची गुजराण करतो. तमाम जनतेला चिंता लागून राहिली आहे, ती अशा प्रकारे मूल्य वृद्धी करून सरकार काय साध्य करीत आहे. 
जनतेचे प्रश्न
ज्या देशांमध्ये पेट्रोलचे उत्पादन होत नाही, त्या देशांमध्ये पेट्रोलचे दर कमी कसे  आहेत ?  आणि आपल्या देशात अमेरिका, चीन, रशिया व जपानच्या तुलनेत  दुप्पट- तिप्पट  महाग का आहेत ? भारतात सगळे टॅक्स लावल्यानंतरही तेल जवळजवळ ५२ रुपयांना पडते. मात्र ते जनतेला ७५ रुपयांना का घ्यावे लागत आहे ? पाकिस्तानात ३५ रुपये, बांगला देशमध्ये २२, क्युबात १९, नेपाळमध्ये ३४ आणि  म्यानमारमध्ये ३० रुपये प्रतिलिटर दराने तेल मिळते कसे ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मुखात आहेत.  सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
रुपायाची घसरण
पेट्रोलची आपली गरज ८० टक्क्यांमध्येच पूर्ण होते.  अगोदर सरकार केवळ कंपन्यांच्या तोट्याची सबब सांगून तेलाच्या किंमती वाढवत असे.  आता रुपायाच्या विनिमय दराच्या गोष्टी सरकार बोलत आहे. . रुपयाची किंमत अन्य  दुसर्‍या देशांच्या मुद्रेच्या  तुलनेत कमी आहे. रुपाया स्वस्त आणि डॉलर महाग होत चालला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढवले आहेत्,असे सांगितले जात आहे. रुपयाचे मूल्य  आंतरराष्ट्रीय बाजारात  घसरल्याने तेल कंपन्या रोज १५ कोटीचा तोटा सहन करीत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत २ हजार ४५० कोटी रुपयांचे  नुकसान तेल कंपन्यानी सोसले असल्याचे  सांगितले जात आहे. ही तूट केवळ पेट्रोलमुळे झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
अन्य देशातील महागाई
@ वाढत्या महागाईला सर्वाधिक तोंड देणार्‍या पाकिस्तान्,श्रीलंका आणि नेपाळ या शेजारच्या देशांपेक्षा भारतात सगळयात अधिक  पेट्रोलवर टॅक्स आणि शुल्क आकारले जातात.  @ देशात पेट्रोलवर ४९ टक्क्यांपर्यत कर आणि शुल्क आकारले जाते. तर आपल्या शेजारील देशांमध्ये हा कर भारतापेक्षा खूपच कमी आहे. @ पाकिस्तानात पेट्रोलवर २९ टक्के, श्रीलंकेत ३९ टक्के आणि नेपाळमध्ये ३२ टक्के कर वसूल केला जातो.  
सोळा रुपयाची अधिक लूट
भारतात  कर लावण्यापूर्वीचा पेट्रोल दर  २६.३६ प्रतिलिटर आहे. यावर केंद्रीय कराच्या रुपाने १.७४ सीमा शुल्क आणि १४.७८ रु. उत्पादन शुल्कच्या रुपाने वसूल केला जातो. पेट्रोलवर राज्ये  कराच्या रुपाने मूल्यवर्धित कर (वॅट) ८. ५७ रु. प्रतिलिटर असा कमी-जास्त प्रमानात लावतात. अशा प्रकारे एकूण २५.०९ रु. इतके पेट्रोलच्या मूळ किंमतीवर आकारले जातात. जे ग्राहकांना चुकते करावे लागतात. पण तरीही जनतेला सोळा रुपये अधिक मोजावे लागतात. याचे गौडबंगाल काय, असा स्वाल उपस्थित केला जात आहे.
 अन्य देशाच्या तुलनेत पेट्रोलवर अधिक खर्च
जगातल्या बहुतांश देशातल्या नागरिकांच्या तुलनेत भारतातल्या जनतेला पेट्रोलवर अधिक पैसा खर्च कारावा लागत आहे. उपलब्ध एक्सचेंज रेटवर आधारित बहुतांश देशांमधल्या रिटेल पेट्रोलच्या किंमतींच्या आकडेवारीनुसार भारत  जगात सगळ्यात महाग पेट्रोल विकणार्‍या देशांच्या रांगेत  जाऊन पोहचला आहे. विभिन्न देशांच्या परचेजिंग पावरचा फरक  लक्षात घेतल्यास (पीपीपी मेथडनुसार) भारतात पेट्रोलचा दर सर्वात महाग आहे. या मेथडनुसार भारतात पेट्रोलचा दर अमेरिकेपेक्षा पाचपट तर रशिया आणि जपानच्या तीनपट अधिक आहे. सामान्य तुलनेत ओपेक ( तेल निर्यातीत देशांची  संघटना) च्या देशांमध्ये तर तेल स्वस्त आहेच. ( वेनेजुएलामध्ये १.१४ तर इराणमध्ये ४.८ प्रतिलिटर ) पण अमेरिका आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्येसुद्धा पेट्रोलचे दर बरेच कमी आहेत. 
विविध देशातील पेट्रोलचे भाव
वेनेजुएला १.१४,    इराण ४.८,     दोहा कतर ८.२५, सौदी अरेबिया ८.५३, यूएआय १८.१४, मलेशिया २४.११, इराक २५.५३, पाकिस्तान ३५.७५, चीन ३७.३१, युएसए ३९.६४, किनिया नैरोबी ४५.५५, श्रीलंका ४७.०७, कॅनडा ५३.०१, दक्षिण आफ्रिका ५५.२४, भारत ५६.५२, बल्गेरिया ५७.२९, न्यूझिलंद ५७.३६, ऑस्ट्रेलिया ६१.६१, पोलंड ६२.४८, स्पेन ६४.५८, स्विझरलंड ६५.५७, चेक गणराज्य ७०.७६, जर्मनी ७३.७५, फ्रान्स ७४.८४, इटली ७५.३४, स्वीडन ७५.८४, फिनलँड ७७.३३, डेनमार्क ७७.९३, हंगरी ७८.४४, युके ८५.०२, नार्वे ९०.३०, फिजी ९४.०९, टर्की १०१.०६ @ सगळे आकडे रुपयात आहेत. @ सगळे आकडे वेगवेगळ्या कालावधीतील आहेत.
                                                - मच्छिंद्र ऐनापुरे