Thursday, September 22, 2011

भारतात पेट्रोल महाग

लेख                         भारतात पेट्रोल महाग
मनमोहनसिंह सरकारने पेट्रोलच्या किंमती गेल्या दोन वर्षात डझनवेळा तरी वाढवल्या आहेत. सरकारने आतापर्यंत आपल्या दुसर्‍या 'इनिंग'मध्ये  पेट्रोलची  २४ रुपयांहून अधिक  वाढ केली आहे. या इंधन भाववाढीच्या ओझ्याने जनता इतकी  दबून गेली आहे की, आता हालचाल करायलासुद्धा  जागा उरलेली नाही. तरीही मनमोहनसिंह सरकार गप्प बसेल असे वाटत नाही. आगामी काळात आणखी झटके देत राहील. त्यांना सांगायला कारणही तयार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा परिणाम्. पैशाचे मूल्य घसरले, इत्यादी इत्यादी. मात्र अन्य देशांध्ये भारतापेक्षा पेट्रोल किती तरी पटीने स्वस्त आहे. यातलं अंतर पाच ते सत्तर टक्क्यांपर्यंत  कमी आहे. वेनेजुएलामध्ये पेट्रोलचा दर फक्त १ रू. १४ पैसे प्रति लिटर आहे.  भारतातल्या जनतेला वेनेजुएलाच्या किंमती इतकी अपेक्षा मुळीच नाही. पण परवडेल असा भाव तरी असायला हवाच नाही का ?
युपीए सरकारवर सर्वाधिक टीका या पेट्रोलजन्य पदार्थांच्या भाववाढीमुळे होत आहे. विरोधी पक्ष  भाजपा तर सरकारवर तुटून पडला आहे. सरकारने आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळात पेट्रोलच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार अटलबिहारी वाजपेयी यांनी मनमोहनसिंह सरकारला चार्ज दिला तेव्हा पेट्रोलचा दर ४० रुपयांपेक्षा कमी होता. पण आज  हाच आकडा  सत्तरी  पार करताना दिसतो  आहे. पेट्रोलच्या किंमतीचा थेट संबंध सगळ्या जीवनावश्यक वस्तूंवर पडत असतो.  कारण पेट्रोलच्या भाववाढीमुळे दळणवळणाचे भाव वाढतात.  त्याचा परिणाम रोजच्या उपभोगाच्या सगळ्या वस्तूंवर होतो. भारतातली ८३ कोटी जनता आजसुद्धा  २० रुपयात रोजची गुजराण करतो. तमाम जनतेला चिंता लागून राहिली आहे, ती अशा प्रकारे मूल्य वृद्धी करून सरकार काय साध्य करीत आहे. 
जनतेचे प्रश्न
ज्या देशांमध्ये पेट्रोलचे उत्पादन होत नाही, त्या देशांमध्ये पेट्रोलचे दर कमी कसे  आहेत ?  आणि आपल्या देशात अमेरिका, चीन, रशिया व जपानच्या तुलनेत  दुप्पट- तिप्पट  महाग का आहेत ? भारतात सगळे टॅक्स लावल्यानंतरही तेल जवळजवळ ५२ रुपयांना पडते. मात्र ते जनतेला ७५ रुपयांना का घ्यावे लागत आहे ? पाकिस्तानात ३५ रुपये, बांगला देशमध्ये २२, क्युबात १९, नेपाळमध्ये ३४ आणि  म्यानमारमध्ये ३० रुपये प्रतिलिटर दराने तेल मिळते कसे ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मुखात आहेत.  सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
रुपायाची घसरण
पेट्रोलची आपली गरज ८० टक्क्यांमध्येच पूर्ण होते.  अगोदर सरकार केवळ कंपन्यांच्या तोट्याची सबब सांगून तेलाच्या किंमती वाढवत असे.  आता रुपायाच्या विनिमय दराच्या गोष्टी सरकार बोलत आहे. . रुपयाची किंमत अन्य  दुसर्‍या देशांच्या मुद्रेच्या  तुलनेत कमी आहे. रुपाया स्वस्त आणि डॉलर महाग होत चालला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढवले आहेत्,असे सांगितले जात आहे. रुपयाचे मूल्य  आंतरराष्ट्रीय बाजारात  घसरल्याने तेल कंपन्या रोज १५ कोटीचा तोटा सहन करीत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत २ हजार ४५० कोटी रुपयांचे  नुकसान तेल कंपन्यानी सोसले असल्याचे  सांगितले जात आहे. ही तूट केवळ पेट्रोलमुळे झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
अन्य देशातील महागाई
@ वाढत्या महागाईला सर्वाधिक तोंड देणार्‍या पाकिस्तान्,श्रीलंका आणि नेपाळ या शेजारच्या देशांपेक्षा भारतात सगळयात अधिक  पेट्रोलवर टॅक्स आणि शुल्क आकारले जातात.  @ देशात पेट्रोलवर ४९ टक्क्यांपर्यत कर आणि शुल्क आकारले जाते. तर आपल्या शेजारील देशांमध्ये हा कर भारतापेक्षा खूपच कमी आहे. @ पाकिस्तानात पेट्रोलवर २९ टक्के, श्रीलंकेत ३९ टक्के आणि नेपाळमध्ये ३२ टक्के कर वसूल केला जातो.  
सोळा रुपयाची अधिक लूट
भारतात  कर लावण्यापूर्वीचा पेट्रोल दर  २६.३६ प्रतिलिटर आहे. यावर केंद्रीय कराच्या रुपाने १.७४ सीमा शुल्क आणि १४.७८ रु. उत्पादन शुल्कच्या रुपाने वसूल केला जातो. पेट्रोलवर राज्ये  कराच्या रुपाने मूल्यवर्धित कर (वॅट) ८. ५७ रु. प्रतिलिटर असा कमी-जास्त प्रमानात लावतात. अशा प्रकारे एकूण २५.०९ रु. इतके पेट्रोलच्या मूळ किंमतीवर आकारले जातात. जे ग्राहकांना चुकते करावे लागतात. पण तरीही जनतेला सोळा रुपये अधिक मोजावे लागतात. याचे गौडबंगाल काय, असा स्वाल उपस्थित केला जात आहे.
 अन्य देशाच्या तुलनेत पेट्रोलवर अधिक खर्च
जगातल्या बहुतांश देशातल्या नागरिकांच्या तुलनेत भारतातल्या जनतेला पेट्रोलवर अधिक पैसा खर्च कारावा लागत आहे. उपलब्ध एक्सचेंज रेटवर आधारित बहुतांश देशांमधल्या रिटेल पेट्रोलच्या किंमतींच्या आकडेवारीनुसार भारत  जगात सगळ्यात महाग पेट्रोल विकणार्‍या देशांच्या रांगेत  जाऊन पोहचला आहे. विभिन्न देशांच्या परचेजिंग पावरचा फरक  लक्षात घेतल्यास (पीपीपी मेथडनुसार) भारतात पेट्रोलचा दर सर्वात महाग आहे. या मेथडनुसार भारतात पेट्रोलचा दर अमेरिकेपेक्षा पाचपट तर रशिया आणि जपानच्या तीनपट अधिक आहे. सामान्य तुलनेत ओपेक ( तेल निर्यातीत देशांची  संघटना) च्या देशांमध्ये तर तेल स्वस्त आहेच. ( वेनेजुएलामध्ये १.१४ तर इराणमध्ये ४.८ प्रतिलिटर ) पण अमेरिका आणि इंडोनेशियासारख्या देशांमध्येसुद्धा पेट्रोलचे दर बरेच कमी आहेत. 
विविध देशातील पेट्रोलचे भाव
वेनेजुएला १.१४,    इराण ४.८,     दोहा कतर ८.२५, सौदी अरेबिया ८.५३, यूएआय १८.१४, मलेशिया २४.११, इराक २५.५३, पाकिस्तान ३५.७५, चीन ३७.३१, युएसए ३९.६४, किनिया नैरोबी ४५.५५, श्रीलंका ४७.०७, कॅनडा ५३.०१, दक्षिण आफ्रिका ५५.२४, भारत ५६.५२, बल्गेरिया ५७.२९, न्यूझिलंद ५७.३६, ऑस्ट्रेलिया ६१.६१, पोलंड ६२.४८, स्पेन ६४.५८, स्विझरलंड ६५.५७, चेक गणराज्य ७०.७६, जर्मनी ७३.७५, फ्रान्स ७४.८४, इटली ७५.३४, स्वीडन ७५.८४, फिनलँड ७७.३३, डेनमार्क ७७.९३, हंगरी ७८.४४, युके ८५.०२, नार्वे ९०.३०, फिजी ९४.०९, टर्की १०१.०६ @ सगळे आकडे रुपयात आहेत. @ सगळे आकडे वेगवेगळ्या कालावधीतील आहेत.
                                                - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment