Tuesday, September 27, 2011

विज्ञान- तंत्रज्ञान भूत - बित नाही; पण

रं तर भूत-प्रेत आणि विज्ञान्-तंत्रज्ञान यांच्यात कायद्याच्यादृष्टीने  अगदी छतीसचा आकडा. कुठे अंधविश्वासाच्या गप्पा आणि कुठे तर्क आणि प्रमाणाच्या कसोटीवरचा सिद्धांत.... पण  म्हणतात ना, या दुनियेत अशक्य असे काहीच नाही. आता हेच बघा ना....! विज्ञान भूतांच्यामागे हात धुवून लागले आहे. अहो खरंच! पण खर्‍या अर्थानं हात धुवून काही नाही परंतु विविध प्रकारची उपकरणं घेऊन लागला आहे, हे नक्की!
गंमतीचा भाग असा की, भूत्-प्रेतावर गाढ विश्वास  ठेवणारी माणसंसुद्धा या शोधाचं स्वागत करताना दिसत आहेत. याचा अर्थ विज्ञानवादी आणि अंधश्रद्धाळू यांच्यातील विभाजनसीमा आता पुसट होत चालली आहे, असे म्हणायला हवे. म्हणजे त्याचं असं आहे की, काही उत्साही मंडळींनी वैज्ञानिक सिद्धांत आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने भूतांना पकडून त्यांना जाणून घेण्याचा - समजून घेण्याचा निश्चय केला आहे. जे भूतांवर विश्वास ठेवतात ते असा विचार करून खूश आहेत की, चला, वैज्ञानिक कसोटीवर भूतं असल्याचं सिद्ध झालं तर आमच्यावर लागलेला अंधश्रद्धाळूचा धब्बा आपोआप धुतला जाईल.
भूत पकडण्यासाठी वैज्ञानिक मोहिमेवर निघालेल्या लोकांची संख्या वाढण्याबरोबरच आता त्यातून एक उद्योगही आकाराला येत आहे. हा उद्योग म्हणजेच भूताची शिकार. इतर गोष्टींसारखीच याचीही सुरुवात अमेरिकेपासून झाली आहे. पण आता हा उद्योग अन्य देशांबरोबरच भारतातसुद्धा  येऊन ठेपला आहे. देश-विदेशात बेकायदेशीररित्या अशा काही एजन्सी सुरू असून त्या काही ठिकाणी भुतांचा संचार असल्याचा दावा करत आहेत. या संस्था आपल्या सेवेच्या मोबदल्यात फी आकारतात. या एजन्सी भूताचा पत्ता शोधण्याचा अथवा त्याने कुणाचे घर सोडावे म्हणून एखाद्या तंत्र-मंत्राचा आधार  घेत नाहीत. तर आधुनिक उपकरणांचा वापर करतात. काही एजन्सी संस्था भूत पाहण्याची उत्सुकता  असलेल्यां इच्छुकांनासुद्धा आमंत्रित करतात.  'या, आम्ही तुम्हाला भूत दाखवू', असे म्हणत काही देशांमध्ये " भूत शोध अभियान " चालवले जात आहेत. याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.  "भूत शोध अभियान" या वैज्ञानिक कल्पनेतून केवळ भूत पकडू एजन्सीच आपला बिझनेस चालवत आहेत असा  नाही तर काही वैज्ञानिक उपकरणांची विक्रीसुद्धा झपाट्याने होत आहे. . या उपकरणांचा उपयोग भूत-प्रेतांचा शोध घेण्यासाठी केला जात आहे. अशाच काही उपकरणांविषयी:
 इंफ्रारेड हीट सेंसर
विज्ञान म्हणतं की, कुठलीही  वस्तू अथवा जीव  किमान तापमान   शून्यापेक्षा अधिक असल्यास  इंफ्रारेड तरंग उत्सर्जित करते. हे तरंग इंफ्रारेड हीट सेंसर पकडतं. भूतशोधक सांगतात की, या सेंसरमध्ये अशा काही वस्तूंचे इंफ्रारेड तरंग पकडले जात आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. हे तरंग एखाद्या भूतापासून निघत आहेत , असे समजावे.  भूतं 'थंड' असतात , असंही ही भूतशोधक मम्डळी सांगतात.
इएमएफ मीटर
 हे इलेक्ट्रॉमॅग्नेटिक फिल्ड म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्र मोजण्याचे साधन आहे. भूत-शोधकांचं म्हणणं असं की, भूत-पिशाच्च यांच्या सानिध्यात आल्यास वातावरणातील विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये हालचाल होते. ही हालचाल इएमएफ मीटरमध्ये पाहता येते. भूत पकडण्याच्या  मोहिमेवर निघालेले लोक हे साधन आपल्यासोबत आवश्य नेतात.  
इंफ्रारेड थर्मामीटर
हे थर्मामीटर कोणत्याही वस्तूला स्पर्श न करताही त्याचं तापमान सांगू शकतं. जाणकारांचं म्हणणं असं की प्रेतात्म्यांचं तापमान थंड असतं. एखादी भिंत अथवा एखादं कपाट यांचं तापमान जितकं असतं, त्याहीपेक्षा  कमी तापमान भूत-प्रेतांचं असतं. एखाद्या ठिकाणी असं तापमान आढळल्यास  त्यांत  एखाद्या प्रेतात्म्यानं आसरा घेतला आहे, असे  समजावे .                                                                                                                                                                                                 - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  

No comments:

Post a Comment