एकदा एक शेठ आपल्या मुलाच्या वाईट सवयींना पार वैतागून गेला होता. आपल्या मुलाच्या सवयी लवकर सोडवल्या नाहीत तर खूप उशीर होऊन जाईल.यासाठी काही तरी केले पाहिजे, असा त्याने विचार केला.त्याने गावातील एका आध्यात्मिक गुरूजींशी याबाबत बोलणी केली. गुरुजी म्हणाले, 'उद्या त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'
दुसर्यादिवशी शेठने आपल्या मुलाला गुरुजींकडे पाठवून दिले. मुलगा आल्यावर गुरुजी त्याला म्हणाले,' आता माझी फिरायची वेळ झाली आहे. चल ,दोघेही मिळून काही अंतर जाऊन फिरून येऊ.' दोघे जवळच्या वनात फिरायला गेले. पावसाळ्याचे दिवस होते. आजूबाजूला नुकतीच काही लता- वेली, वनस्पती उगवल्या होत्या. गुरुजींनी त्याला एक छोटेसे रोप उपटून आणायला सांगितले. त्याने लागलीच एक रोप उपटून गुरुजींसमोर धरले.
काही अंतर गेल्यावर गुरुजी एका मोठ्या रोपाकडे बोट करत म्हणाले, आता ते रोप उखडून दाखव. मुलाने थोडा प्रयत्न केला आणि रोप उपटले. ते गुरुजींपुढे धरले. गुरुजी म्हणाले,' खूप छान.' मुलाला वाटले, गुरुजींनी सांगितलेली कामे आपण व्यवस्थितरित्या केली आहेत. त्यालाही समाधान वाटले.
दोघेही चालत होते. पुढे काही अंतर गेल्यावर गुरुजी म्हणाले, 'बाळ, ती वेल उपटून दाखव.' आता त्याला मघापेक्षा आणखी थोडी मेहनत घ्यावी लागली, पण त्याने वेल उखडून काढण्यात यश मिळवले. त्याच्या कपाळावर घाम गोळा झाला होता. दमही लागला होता. गुरुजी म्हाणाले, ' व्वा ! हेही काम तू केलेस तर...'
दोघेही पुढे निघाले. काही अंतरावर एक आंब्याचे झाड होते. गुरुजी म्हणाले, ' आता या झाडाला उखडून दाखव.' मुलगा म्हणाला,' गुरुजी, हे कसे शक्य आहे ? मला झाड हलणारसुद्धा नाही. ' गुरुजी म्हणाले,' लक्षात ठेव, वाईट सवयीसुद्धा अशाच असतात. सवयींची प्रारंभीची अवस्था असेल तर त्या उखडून टाकता येतात . पण त्या कमालीच्या वाढल्या असतील तर मात्र त्याच्यापासून सुटका करून घेणे खूप कठीण होऊन जाते. म्हणून सांगतो, तुझ्या वाईट सवयी आताच सोडवल्यास तुझ्या हिताचे आहे.' मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने सवयी सोडण्याचा निर्धार केला. दुसर्यादिवसापासूनच त्याच्या वर्तणुकीत फरक दिसून आला. शेठने गुरुजींना मनापासून धन्यवाद दिले.
तात्पर्यः वाईट सवयींपासून लवकर सुटका करून घ्यावी. एकदा का सवय लागून राहिली, तर मात्र खूप मोठा त्रास होतो - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:
Post a Comment