चित्रपट सृष्टीची नशा काही औरच असते. आणि त्यात ज्यांच्या चित्रपटांना जबरस्त यश मिळालेले
असते, अशांना त्यापासून दूर राहणं अवघडच असतं. मुमताज, नीतू सिंह, श्रीदेवी यांच्यापासून
माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला
होता. पण त्या काही वर्षांनी पुन्हा परत आल्या. मात्र अशा काही अभिनेत्रीही आहेत, ज्या लग्नानंतर चित्रपट
सृष्टीला कायमचा रामराम ठोकला. परत त्यांनी वळूनही पाहिले नाही.
अशाच अभिनेत्रींपैकी एक मुनव्वर सुलताना! त्यांच्यावर
चिित्रित करण्यात आलेले अफसाना लिख रही हूं... हे गाणे त्यावेळी
फारच गाजले होते. त्यांचा 15 सप्टँबर स्मृतिदिन.
त्यांच्याबद्द्ल थोडेसे...
Friday, September 13, 2019
किमती हास्य
हसायला पैसे पडत नाहीत, असं म्हटलं जातं. या छोट्याशा वा़क्याचे
विश्लेषण केल्यास खरोखरच याचा विस्तृत आणि खोल दडलेला अर्थ निघून
आपल्यासमोर येईल. माणसाचे शरीर संवेदनांनी भरलेले आहे.
हास्यगाणे-रडगाणे, सुख-दु:ख,आनंदाचे आसू- दु:खाचे आसू या माणसाला आतर्बाह्य हेलावून सोडणार्या गोष्टी आपल्या जीवनातले विविध रंग आहेत. या पृथ्वीवर
मनुष्य असा एकमेव प्राणी आहे, जो हसतो, रडतो, गातो आणि गुणगुणतो. प्राणी
आणि पक्ष्यांमध्येदेखील हसण्या-रडण्याचे त्यांचे भाव असतील आणि
त्यांची एक भाषाही असेल पण ज्या अर्थाने आणि भावनेमध्ये आपण मनुष्याला हसताना पाहतो,
तसे हसताना कोणत्या पशू- पक्ष्यांना आपण पाहिले
आहे काय? आपल्या चेहर्यावर ज्या भावमुद्रा
उमटतात, तशा भावमुद्रा इतर प्राण्यांमध्ये-पक्ष्यांमध्ये पाहायला मिळत नाही. हेच आपल्या मनुष्य
प्राण्याचे वैशिष्ट्य आहे.
Friday, September 6, 2019
आपल्या जीवनाला दिशा देणारी माणसं शिक्षकच!
सूचकशैवव वाचको दर्शकतास्तथा।।
शिक्षको बोधकशैव षडेते गुरव: स्मृता:।।
अर्थात प्रेरणा देणारे, माहिती सांगणारे, सत्य सांगणारे, मार्गदर्शन करणारे, शिक्षण देणारे आणि बोध करणारे हे सगळे आपल्याला गुरू समान असतात.
जे आपल्याला अक्षराचे ज्ञान देतात, तेच आपले शिक्षक असतात, असे नाही. जीवनात जे काही योग्य आहे त्याचे मार्गदर्शन करून भव सागर पार करायला मदत करतात ते गुरू. अर्थात हे कोणीही असू शकतात. लहान मोठा, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित. एकादी घटना किंवा अनुभवसुद्धा आपला शिक्षक बनू शकतो. गुरुदेव या नामाने प्रसिध्द असलेले कवी, नाटककार आणि साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं की, प्रत्येक झाड पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं एक बीज असतं.

Thursday, September 5, 2019
सुख-दु:खाचा फेरा...
मानवी जीवन सुख-दु:खाने भरलेलं आहे. कधी सुख तर कधी दु:ख ठरलेलं आहे. सुखासीन फुलांच्या पाकळ्यांवर लोळताना दु:खाचे काटे बोचणारच. सुख-दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डाव घेताना छापा-काटा करायची वेळ येते,तेव्हा आपला मर्जीचा छापा यावा,म्हणून आपण देवाला हात जोडत असतो. छापा आला की, आपण अक्षरश: आनंदाने उड्या मारतो. तो आनंद स्वर्गीय असतो. पण सतत सुखाची अपेक्षा करणं चांगलं असलं तरी वाट्याला दु:ख आलं म्हणून हिरमसून जायचं नाही. त्याला हसत तोंड द्यायचं. हसत तोड देतो, तेव्हा दु:ख हलकं होतं. जर एकादी व्यक्ती दु:खाला तोंड द्यायला घाबरते, रडू लागते,तेव्ह अडचणींचा, समस्यांचा डोंगर वाढायला लागतो.पण ज्यावेळेला व्यक्ती दु:खाला पाहून हसते,तेव्हा अडचणी नाहीशा होतात.
Subscribe to:
Posts (Atom)