Tuesday, May 26, 2020

पोर्नच्या विळख्यातून मुलांना सोडवायचं कसं?

पॉर्नच्या आहारी गेलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागात नुकतीच घडली. ग्रामीण भागातील एका कष्टकरी कुटुंबातील मुलाकडून झालेले हे कृत्य धक्कादायक असून पालक, शिक्षक यांच्यासह सर्वांनाच विचार करायला लावणारी ही घटना आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये, असा मतप्रवाह असतानाच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह जगभरात पडलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे शिक्षण पद्धतीचा नवा विचार समोर येत असताना आणि त्यात मोबाईल हा घटक अंतर्भूत केला जात असताना अशा घटना घडाव्यात, हा प्रकारच सगळ्यांना कोड्यात टाकणारा आहे.

Sunday, May 17, 2020

(बालकथा) तीन शिष्य आणि तीन प्रश्न

एक साधू आजारी पडला. आपला शेवटचा दिवस जवळ आला आहे, हे त्यानं ओळखलं. आपल्या तीन प्रिय शिष्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. तो विचार करू लागला,'यांना ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या योग्य अशा गुरुची आवश्यकता आहे. पण तो कुठे आणि कसा भेटेल?'
साधू काही योग्य अशा विद्वानांना जाणत होता. पण त्याला वाटत होतं की, शिष्यांनीच आपल्यासाठी योग्य गुरू शोधावा. यासाठी त्याने एक उपाय शोधला आणि आपल्या तिन्ही शिष्यांना बोलावून घेत म्हणाला, "आपल्या आश्रमात 17 उंट आहेत. मला यांची वाटणी करायची आहे. तुम्ही तिघांनी उंटांची अशा प्रकारे वाटणी करा की, सर्वात मोठ्या शिष्याला निम्मे, मधल्याला एक तृतीयांश आणि सर्वात लहान शिष्याला नव्वा भाग यायला हवा."

( बालकथा) नदी झोपली

चौपट नगरीच्या काही लोकांना एकदा फेरफटका मारून येण्याची लहर आली. ते आपल्या गावाबाहेर पडले. वाटेत एक नदी आली. याअगोदर त्यांनी नदीविषयी ऐकले होते, पण प्रत्यक्षात कधी पाहिली नव्हती. ते नदीला पाहून घाबरले. सगळे मिळून विचार करू लागले की, आता नदी पार कशी करायची? पण काही आयडिया आली नाही. हळूहळू रात्र होत आली. सगळे नदी काठच्या एका झाडाखाली झोपले. मध्यरात्री अचानक त्यातला एकजण उठला आणि म्हणाला," चला, आता मध्यरात्र झाली आहे. आपण गपचूप नदी पार करू या."

Wednesday, May 13, 2020

(बालकथा) हे खरे नाही

रामरावला गोष्टी ऐकण्याचा भारी नाद होता. पण त्याला एक वाईट खोड होती. एखादा गोष्ट सांगायला लागला की, तो मधेच उठून म्हणायचा,'हे खरे नाही.' यामुळे त्याचे मित्र किंवा आणखी कोणी नाराज व्हायचे. नंतर नंतर तर त्याला गोष्टी सांगण्याच्या भानगडीतच कुणी पडत नसे.
एके दिवशी रामराव आपल्या घरासमोर असाच उभा होता. अचानक त्याला त्याचा शिक्षक मित्र तिथून जाताना दिसला. रामरावने त्याला अडवलं आणि गोष्ट सांगायची विनंती केली. शिक्षक मित्र म्हणाला,"मी तुला गोष्ट सांगेन पण एका अटीवर! तू मधेच 'हे खरे नाही' असं काही म्हणायचं नाही."

आणि चंद्र उगवला...

ही गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा आकाशात फक्त सूर्यच होता. तेव्हा रात्र होत नव्हती. बस!फक्त दिवस आणि दिवसच होता. लोक जोपर्यंत थकवा येत नाही ,तोपर्यंत फक्त काम आणि कामच करायचे. आराम करण्याला कुठला काळ-वेळ नव्हता.

(बालकथा) सोनेरी मासा

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक म्हातारा होता. त्याला मासे पकडण्याचा मोठा छंद होता. तो नेहमी त्याच्या घराजवळ असलेल्या मोठ्या अशा तलावात मासे पकडायला जायचा. एके दिवशी जेवण केल्यावर तो मासे पकडायला निघाला. तलावाजवळ जाताच त्याला तिथे एक नाव दिसली. तो नावेत बसला आणि तलावाच्या मध्यभागी पोहचला. तलावाच्या मध्यभागी गेल्यावर त्याने गळ लावलेली काठी पाण्यात टाकली. पण थोड्याच वेळात त्याला थकवा आल्याने झोप आली. अचानक मासे पकडण्याची त्याची काठी हलू लागली. त्यामुळे तो जागा झाला.

Monday, May 11, 2020

आनंदी राहण्यासाठी...!

जुनी कात्रणं काढून बसलो होतो. लॉकडाऊनचा काळ सदुपयोगाला लावायचं ठरवून काही वाचन, काही लेखन सुरूच आहे. मला कात्रणं काढून ठेवण्याचा छंद आहे. अर्थात आता मोबाईल, लॅपटॉपमुळे यात थोडा आळस आलाय म्हणा,पण शेवटी कात्रणं आपल्याला एकप्रकारची ऊर्जा देतात हे खरेच! सांगायचा मुद्दा असा की आज कात्रण काढून चाळत असताना 2003 मधील 'लोकप्रभा' साप्ताहिक मधील एक कात्रण सापडले. त्याचे शीर्षक होते, "आनंदी राहण्याची कला!'

कोरोना सोबतच जगण्याची हवी मानसिकता

कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. मात्र कोरोनाला घाबरून चालणार नाही तर कोरोनाशी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आरोग्य यंत्रणेने सांगितलेल्या उपाययोजना, 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोर पालन करून आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहून आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्यासोबतच शारीरिक, मानसिक, आर्थिक संकटही उभे ठाकले आहे. कोरोनाचा संसर्ग मानवापासून मानवाला होत आहे. यावर अद्याप लस किंवा औषध तयार झाली नसल्याने सामाजिक अंतर ठेवणे (सोशल डिस्टन्सिंग), स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे, वारंवार हात धुणे, स्वच्छता राखणे हा एकमेव उपाय आहे.

Saturday, May 9, 2020

पावसाळ्यातील पूरनियंत्रण हाताळण्याचा काळ

देश सध्या दुहेरी आपत्तीतून जात आहे.  आम्ही आधीच आर्थिक मंदीशी झुंज देत आहोत. आणि आता कोरोना साथीने देखील कहर  केला आहे.  साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात देशबंदीसारखे कठोर आणि अपरिहार्य पावले उचलावे लागले आहे. याचा थेट परिणाम आर्थिक मंदी आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होणार आहे.  एकामागून एक वाढत्या संकटाच्या या काळात आपण असा विचार केला पाहिजे की यापुढे कोणतीही नवीन आपत्ती येणार नाही.  हवामान खात्याचा विचार केल्यास, अशीच एक संभाव्य आपत्ती  समोर दिसते आहे, ती म्हणजे महापूर! अजून यासाठी वेळ असला तरी त्याबद्दल आज विचार करणे आवश्यक आहे ,कारण एखाद्या पूरसदृश संकटामुळे कोरोनाशी तोंड देताना आणखी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

Wednesday, May 6, 2020

(छोटीशी गोष्ट) कायमचा पत्ता

आईच्या मृत्यूची बातमी मिळाल्या मिळाल्या सुजाता गावाकडे यायला निघाली होती. पण शहरातून इथंपर्यंत येण्याअगोदरच तिच्या भावांनी पावसाचं वातावरण बघून आईच्या मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करून टाकले. तिला जाणवलं की, आईच्या मृत्यूचा घरातल्या कुणावरच काहीच भावनिक परिणाम झाला नाही.  काही दिवसानंतर तिला तिच्या लहान भावाच्या घरातली एक घटना आठवली. यामुळे तिच्या आईच्या  आयुष्याची दिशा आणि दशाच बदलली.

( छोटीशी कथा) फरक

चिंतामणी आणि त्याची पत्नी -सरला रोज चिमणी आपलं घरटं बांधताना पाहत होते. हॉलमध्येच तिनं घरटं बांधायला घेतलं होतं. काही दिवसांनी घरटं बांधून पूर्ण झालं. तिने अंडीही घातली. पिल्लं चिव-चिव करत बाहेरही आली.
बघता बघता चिमणीची पिल्लं मोठी झाली. ते  उडायलाही शिकले. एक दिवस अचानक सरलाने पाहिलं की, चिमणी आपल्या पिलांना बाहेर हुसकावून लावत आहे.

Sunday, May 3, 2020

देशाने दिले जीव वाचवण्याला प्राधान्य

लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतरच्या  दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीस हजारांवर पोहचला आहे.  आणि हजारांवर मृत्यू पावले. इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे. अर्थात याबाबतीत अनेक कारणे सांगितली जात आहेत. परंतु देशाने योग्य वेळी आणि कडक स्वरूपात लॉक डाऊनची अंमलबजावणी केली.  भारतात मृतांची संख्या दुप्पट व्हायला जवळपास नऊ दिवस लागतात, तर न्यूयॉर्कमध्ये दोन ते तीन दिवस. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात.

शिक्षणाचा खरा उद्देश काय?

फक्त पुस्तकी ज्ञान शिक्षणाचा उद्देश नाही. खरे शिक्षण व्यवहार ज्ञान, मानवतेचे गुण आणि तर्क आपल्याला प्रदान करतात.  देश - विदेशातल्या महान लोकांच्या मते शिक्षणाचा अर्थ काय आहे? ते कशाप्रकारे या शिक्षणाला महत्त्व देतात? ते पाहूया.

Saturday, May 2, 2020

हसण्यासाठी जन्म आपुला

दरवर्षी मेच्या पहिल्या रविवारी 'जागतिक लाफ्टर डे' साजरा केला जातो.  याची सुरुवात मुंबईपासून झाली.10 मे 1998 रोजी या दिवसाचा पहिला दिवस डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला होता.  मात्र आज जगभर अनेक देशांमध्ये मेच्या पहिल्या रविवारी 'वर्ल्ड'  लाफ्टर डे साजरा केला जातो.  हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना हसवण्याच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आणि जगात आनंद पसरवणे. यावर्षी हा दिवस 3 मे रोजी साजरा केला जात आहे.

Friday, May 1, 2020

समजूतदार चिकू

दंडक वनात  टिकू गरुड, चिकू ससा, मस्तानी खारूटी, सुवर्ण हरीण, मस्तू अस्वल आणि गब्रू सिंह असे अनेक प्राणी आनंदाने राहत होते. इथल्या उंच डोंगरावर बरीच औषधी वनस्पती होती. एखादा प्राणी आजारी पडला की, प्राणी मोहक हत्ती काकांचा सल्ला घेत आणि  डोंगरावरून वनौषधी आणून खात आणि ठणठणीत बरे होत.