Sunday, May 3, 2020

शिक्षणाचा खरा उद्देश काय?

फक्त पुस्तकी ज्ञान शिक्षणाचा उद्देश नाही. खरे शिक्षण व्यवहार ज्ञान, मानवतेचे गुण आणि तर्क आपल्याला प्रदान करतात.  देश - विदेशातल्या महान लोकांच्या मते शिक्षणाचा अर्थ काय आहे? ते कशाप्रकारे या शिक्षणाला महत्त्व देतात? ते पाहूया.

खरा अर्थ
माझ्या मते शिक्षणातून मुलाच्या किंवा व्यक्तीच्या मस्तिष्क, आत्मा आणि शरीरामध्ये सर्व बाजूने सर्वात चांगल्या गोष्टी आणि वस्तू भरवणे- महात्मा गांधी
सर्वांगीण विकास शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य आहे, असं मत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आहे. ते शिक्षणाला खूप महत्त्व द्यायचे. शिक्षण फक्त आपले मनचं नाहीतर आत्मा आणि शरीर यांनाही प्रभावित करतं. जर शरीर स्वास्थ्य नसेल तर आपल्या आत्म्याचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही. म्हणजे आपले शिक्षण व्यर्थ आहे. खरे शिक्षण सर्व बाजूंनी चांगल्या गोष्टी ग्रहण करायला प्रेरणा देते.

सर्वात मोठे हत्यार
सर्वात ताकतवर हत्यार म्हणजे शिक्षण. याचा उपयोग आपण जग बदल्यासाठी करू शकतो.- नेल्सन मंडेला
शिक्षण आपल्याला इतकं मजबूत बनवतं की तुम्हाला चुकीच्या विरोधात लढायला बळ देतं. हे आपल्यासाठी विविध प्रकारची संसाधने उपलब्ध करून देते. पुढे जाण्याच्या वाटेतील अडथळे दूर करते. याचा हत्यार म्हणून वापर करताना आपण जगालाही बदलू शकतो.

ताळमेळ शिकवते
शिक्षण आपल्याला फक्त माहिती देत नाही तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक अस्तित्वासोबत ताळमेळ घालायला शिकवते.-रवींद्रनाथ टागोर
मोठमोठ्या डिगऱ्या मिळवून देखील जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या आणि जगातल्या दुसऱ्या लोकांशी ताळमेळ घालायला शिकलो नाहीतर तुमच्या या शिक्षणाला काही अर्थ नाही. वास्तविक शिक्षण दुसऱयांची परिस्थिती, अवस्था, दुःख, त्रास आणि आनंद समजून घ्यायला आणि लक्षात ठेवायला शिकवते. शिक्षण एकमेकांना जोडण्याचे काम करते.

मोठ्या बदलाची ताकद
एक मुलगा, एक शिक्षण, एक पेन आणि एक पुस्तक दुनिया बदलू शकते.-मलाला युसुफजाई
शिक्षणाच्या अधिकारासाठी लढणाऱ्या मलालाची ही गोष्ट आपोआप शिक्षणाचे महत्त्व आणि ताकद अधोरेखित करते. शिक्षण मोठमोठे बदल घडविण्यास समर्थ आहे.

आदर्श बनवते
एकाद्या व्यक्तीच्या अंगी त्याचे जे आदर्श रूप त्याच्यात पूर्वीपासूनच उपलब्ध आहे, ते शिक्षण बाहेर काढून आपल्यासमोर ठेवते. -स्वामी विवेकानंद
चांगल्या- वाईट गोष्टी आपल्यामध्ये असतात, बाहेर नाही. आपले कोणते गुण-दोष आपल्यावर हावी आहेत हेआपल्या शिक्षण आणि संगतीवर अवलंबुन आहे. चांगले शिक्षण एखाद्या व्यक्तीला योग्य व्यक्ती बनवते  आणि त्याचे उत्कृष्ट स्वरूप  समोर आणते.

मनाला प्रशिक्षण
तथ्ये जाणून घेणे म्हणजे  शिक्षण नाही, मेंदूला विचार करण्याचे प्रशिक्षण देणे म्हणजे शिक्षण होय.- अल्बर्ट आईस्टआईन
बऱ्याच लोकांना वाटतं की खूप सारी तथ्यं लक्षात ठेवणं किंवा सणवार घोकल्यानं ते विद्वान आहेत,पण असं नाही. घोकंपट्टी केल्याने विद्या फळ देत नाही.

भविष्य निश्चित करते
जर लोक मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवणार असतील तर हे माझ्यासाठी खूपच सन्मानाची गोष्ट आहे. शिक्षण हा असा एक महान व्यवसाय आहे जो एकाद्याच्या चरित्र, सामर्थ्य आणि भविष्याला आकार देतो.-एपीजे अब्दुल कलाम
कलाम सांगतात की, पाचवीच्या त्यांच्या शिक्षकांनी -अय्यरजी यांनी सगळ्या मुलांना संध्याकाळी समुद्र किनारी बोलावलं आणि पक्ष्यांच्या उडण्याची क्रिया समजावून सांगितली. याचा त्याम्च्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला. पुढे जाऊन त्यांनी रॉकेट इंजिनिअर, एयरोस्पेस इंजिनिअर व तंत्रवेत्ता बनले. त्यांचं म्हणणं की सात वर्षे माझया देखरेखीखाली एकादा मुलगा राहिला तर मग कोणी त्याला बदलू शकत नाही.
शिक्षणाचा खरा उद्देश हा की मेंदूला अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे की योग्य दिशेने विचार केला जाईल. एक चांगला शिक्षक या गोष्टीचे महत्त्व समजतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या योग्य दिशेने विचार करण्यासाठी योग्य बनवतो.

No comments:

Post a Comment