Tuesday, December 24, 2019

(तात्पर्य 1) पूर आणि देव


एकेकाळी एका गावात भयंकर पाऊस पडला. ज्यामुळे गावात पूर आला.  गावात एक माणूस राहत होती, ज्याचा देवावर अटल विश्वास होता.  पूर आला तेव्हा सर्व गावकरी सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले.  हे लोक त्या माणसालाही आपल्यासोबत यायला सांगत होते.  परंतु तो म्हणाला की तुम्ही सर्व निघून जा,  देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो मला वाचवायला येईल.  हे ऐकून गावातील लोक निघून गेले.  हळूहळू संपूर्ण गावात पुराचे पाणी पसरले. आता पुराचे पाणी त्याच्या  गुडघ्यावर  येऊ लागले. आता बचावकर्ते नाव घेऊन त्याला न्यायला आले.  पण त्याने पुन्हा तेच उत्तर दिले की माझा देव मला वाचवण्यासाठी येईल.  बचावकर्ते निघून गेले.

तरुणांमध्ये बहिरेपणा वाढला


आज आपण मोबाईलला आपला अविभाज्य घटक मानला आहे. अनेकांच्या त्याच्या शिवाय पान हलत नाही. दिवसभर हातात नाहीतर खिशात आणि रात्री उशाला हा मोबाईल असतो. अर्थात त्याची गरज नाकारता येत नसली तरी त्याला आपण सर्वाधिक मूलभूत गरज मानली आहे. तरुणांनी त्याच्याबरोबरच त्याच्याशी संलग्न असलेले आणखी एक गॅजेट जवळ केले आहे,ते म्हणजे हेडफोन. प्रवास करताना, वाहन चालवताना, रस्त्यावर,बाजारात इकडे तिकडे फिरताना माणसे त्यातल्या त्यात तरुण पिढी कानाला हेडफोन लावून वावरत असते.  हेडफोनचा वापर किती, कसा करावा, यासाठी काही एक मर्यादा असणे आवश्यक आहे. अर्थात ही मर्यादा स्वत:ची स्वत: घालून घेणे उत्तम.

Wednesday, December 18, 2019

(बालकथा) मैत्रीचा अर्थ


सोनू आणि मोनू आज फारच आनंदात होत्या. आज त्यांना त्यांची वर्गमैत्रीण शुभांगीच्या वाढदिवस पार्टीला जायचं होतं. शुभांगी त्यांच्या वर्गातील सर्वात श्रीमंत मुलगी होती. तिचा वाढदिवस फाइव स्टार हॉटेलमध्ये साजरा केला जात असे. या निमित्ताने तिच्या वर्गातील सर्वच मुले एक दिवस फाइव स्टारच्या मेजवानीची मजा लुटायचे.
संध्याकाळचे चार वाजले होते,पण अजून शुभांगीच्या गाडीचा ड्रायव्हर त्या दोघींना घ्यायला आला नव्हता. सोनू मोनूला म्हणाली, “ ताई, शुभांगी तर म्हणाली होती की, तीन वाजता ड्रायव्हरकाका आपल्याला न्यायला येतील म्हणून...पण आता चार वाजले. असं तर नसेल, शुभांगी तिच्या ड्रायव्हरला आपलं नावच सांगायला विसरली...आपण आता पार्टीला जातोय की नाही कुणासठाऊक? ”
सोनूचे बोलणे ऐकून मोनू म्हणाली, “ तू फार काही काळजी करू नकोस, वाट पाहण्याचे फळ गोडच असते. ”

(बालकथा) संगतीचा परिणाम

भैरूला चोरी करण्याची खूप वाईट सवय लागली होती. त्याची बायको त्याला कित्येकदा समजावून सांगायची आणि वाईट माणसांच्या संगतीपेक्षा चांगल्या माणसांची दोस्ती करा म्हणायची.पण त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम व्हायचा नाही. तो म्हणायचा की,संगत चांगली असो वा वाईट, ती माणसाला बदलू शकत नाही. त्याची बायको आता समजावून सांगून थकली होती.

Tuesday, December 17, 2019

इथे स्वयं गणपती बाप्पाने दिली होती आपली मूर्ती

(चिंतामण गणेश मंदिरसीहोरमध्यप्रदेश)
देशभरातील गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे सीहोर येथील चिंतामण गणेश मंदिर.सांगितलं जातं कीयेथील गणपती बाप्पा आपली प्रार्थना लवकर ऐकून घेतातआपली चिंता दूर करतात आणि इच्छा पूर्ण करतात.येथील चिंतामण गणेश भारतातल्या चार स्वयं मूर्तींपैकी एक आहेसीहोर येथील गणपतीबाबत सांगितलं जातं कीभगवान गणपती आजही इथे साक्षात मूर्तीच्या रुपात वास करतातअसं म्हटलं जात कीबाप्पाचे इथे पवित्र मनाने पूजन केल्यावर कधीही आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाहीतयाच कारणामुळे गणेश उत्सवानंतर भक्तांची अलोट गर्दी असते.

Sunday, December 15, 2019

(बोधकथा) उच्च विचार


एकदा एका व्यक्तीने पाहिले की, एक गरीब मुलगा मोठ्या उत्सुकतेने त्याची किंमती ऑडी कार न्याहळत होता. त्या गरीब मुलावर तरस खाऊन त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला आपल्या कारमध्ये बसवून त्याला फिरायला घेऊन गेला. थोड्या वेळाने फिरून आल्यावर मुलाला त्याने खाऊ-पिऊ घातलं. गाडीतून उतरताना मुलाने विचारलं,  साहेब, तुमची कार खूप चांगली आहे. ही खूपच महाग असेल ना?
श्रीमंत व्यक्ती मोठ्या अभिमानाने म्हणाली,  हो, लाखों रुपयांची कार आहे.
गरीब मुलगा म्हणाला,  कार विकत घेण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागले असतील नाही?

(मोटीवेशन) यशाची ऑनलाईन डिलिव्हरी शक्य नाही


ऑनलाईन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या जमान्यात तुम्ही एकाद्याला विचारलंत की, तुम्हाला आयुष्यात काय हवंय तर उत्तर एकच येईल-कम्फर्टेलबल लाइफ. क्लिक अँड डन आताच्या या काळाने आयुष्याला काही अधिकच कम्पर्टेबल बनवलं आहे. आमच्या गरजा तर केवळ एका क्लिकच्या अंतरावर आहेत पण लक्ष्य, त्याचं काय? कम्पर्टेबल लाईफच्या चक्क्ररमध्ये  आम्ही आमच्या लक्ष्यापासून बाजूला सरकलो आहोत. आम्हाला वाटतं की, प्रत्येक लक्ष्य सहजपणे मिळेल. त्यामुळे आम्ही आता कठोर मेहनतची सवय विसरून गेलो आहे. पण आम्हाला लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्या आरामदायी जीवनशैलीला लगाम घालायला हवा. आपल्याला लक्ष्य गाठण्यासाठी त्यावर फोकस करायला हवं. आपलं लक्ष भटकतं राहिलं तर कधीच सफलता मिळणार नाही. आम्हाला दृढ संकल्पाबरोबरच आपलं ध्येय मिळवण्यासाठी मेहनत करायलाच हवी. यशाला कुठलं शॉर्टकट नाही. तुम्हाला कष्ट करायलाच हवे.धैर्य राखणं आणि नव्या गोष्टी शिकत राहणं महत्त्वाचं आहे.

( बालकथा) समजूतदार सारिका


रविवारचा दिवस होता. सारिका आनंदात होती,कारण ती बाबांबरोबर आज संध्याकाळी चार वाजता रंकाळा बघायला जाणार होती. ती शाळेचा गृहपाठ लवकर पूर्ण करण्याच्या नादात होती. तिसर्या वर्गात शिकणार्या सारिकाने खरोखरच चार वाजेपर्यंत आपला गृहपाठ पूर्ण केला. तेवढ्यात तिच्या बाबांनी तिला हाक मारली, “ सारिका बाळा, तयार हो लवकर. ”
सारिकाच्या आईने बाबांना येताना भाजीपाला आणायला सांगितला. बाबा सारिकाला म्हणाले, “ सारिका जा बरं, जरा स्कूटर पूसून घे.”
ती लगेच आवरून स्कूटर पुसायला निघून गेली. तिने भाजीपाला घ्यायला एक पिशवीही घेतली आणि स्कूटरच्या डिकीत ठेवून दिली. मग आपले हात धूवून बाबांना म्हणाली, “ चला बाबा. ”

Friday, December 13, 2019

(मोटीवेशन) यशासाठी निवडा- लाइफ लाइनी


प्रत्येकजण यशाच्या वाटेवर चालायला तयार असतो. या वाटेत कित्येकदा अशा संधी येतात, त्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल, पण तेव्हा तुम्हाला नेमकं काहीच सुचत नाही. तुम्हाला वाटतं की, अडचणींवरचा मार्ग सुटणार नाही आणि मग तुम्ही निराश व्हायला लागतात. पण कामादरम्यान नेहमी चार लाइफ लाइन तुमच्यासाठी तयार असतात. कौन बनेगा करोडपतीप्रमाणेच या लाइफ लाइनींचा तुम्ही वापर केलात, तर तुमच्या अडचणींवर मार्ग निघू शकेल. कित्येकदा प्रोफेशनल लाइफमध्ये तुम्ही अडचणीत सापडता. कळत नाही की, काय करायचं? पण लक्षात ठेवा- कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर अडचणीच्यावेळीदेखील चार लाइफ लाइनी नेहमी मदतीसाठी धावून येतात.

(मोटीवेशन) आनंदी रहा... आयडिया सुचतील


एकाद्याला विचारून बघा, त्याच्या आयुष्याचे ध्येय काय आहे? कोणी म्हणेल- चांगलं करिअर, तर कोणी म्हणेल चांगलं आयुष्य. आणखीही अशीच काहीतरी उत्तरं येतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सारी ध्येये तेव्हाच पूर्ण होऊ शकतील, जेव्हा माणूस खूश, आनंदी असेल. जर तुम्ही आनंदी राहाल तरच तुमच्या आयुष्यातली सर्व स्वप्ने पूर्ण होतील. नोकरी असेल किंवा बिझनेस, काम करण्याची एनर्जी तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही आनंदी रहाल. आनंदी असाल तेव्हाच तुमचं डोकं मोकळं राहील. आणि चांगल्या चांगल्या आयडियाज येतील. खरोखरच एकादी आयडिया तुमचं लाइफ बदलू शकेल. त्यामुळे आनंदी राहा. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. मग पहा, जगसुद्धा तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहील आणि लोक म्हणतील-मित्रा! इतक्या आयडिया तुझ्या डोक्यात येतात तरी कोठून? आयुष्यात पुढं जायचं असल्यास तुमच्याजवळ युनिक आयडिया असायला हवी. तरच तुम्ही या गर्दीतून वेगळा सिद्ध करू शकाल. आता अडचण अशी आहे की, आयडिया काही झाडाला लागत नाहीत. आयडिया डोक्यात तेव्हाच येतात, जेव्हा माणूस आनंदी राहतो आणि डोकं खुलं ठेवतो.

(बालकथा) वाईट सवय

एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो आपल्या मुलाला ज्या ज्या वेळेला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगतो, तेव्हा त्याचे एकच उत्तर असते," अजून मी खूप लहान आहे. हळूहळू त्या सवयी सोडून देईन." पण तो कधीच सवयी सोडण्याचा प्रयत्न करत नसे.खूप समजावून सांगूनही त्याने सवयी सोडल्या नाहीत. त्याच दिवसांमध्ये एक संत माणूस शहरात एका आश्रमात उतरला होता. त्यांचा खूप नाव लौकिक होता. श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले आणि आपली समस्या सांगितली. संत महात्म्याने आश्रमातल्या बागेतील एका रोपाकडे बोट दाखवून म्हटले," तू ते रोप उपटू शकतोस का?"

(बालकथा) उचला जबाबदारी


एक जमीनदार होता. त्याची खूप शेती होती. शेतात पीक जोमदार होतं. तो रोज सकाळी  उठून शेतावर जायचा.  मजुरांसोबत शेतीच्या विकासावर चर्चा करायचा. काही अडचण आल्यास,ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण गावात सर्वाधिक उत्पन्न तो घ्यायचा.  वय वाढत गेलं तसा तो आजारी पडू लागला. त्याच्या मृत्यूनंतर शेतीवाडीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मुलावर येऊन पडली. खूप संपत्ती असल्याने  त्याला शेतीचे फार काही वाटत नव्हते. त्याला रोज सकाळी शेतावर जायची गरज वाटत नव्हती. यासाठी मजूर लोक ठेवले होते. पण यावेळी त्याला शेतीत घाटा आला. निम्म्यापेक्षा अधिक पीक जनावरांनी खाल्ले होते. काहींना कीड लागली होती.

Thursday, December 5, 2019

आजची मुले रोगाच्या कचाट्यात


आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत चाललेल्या सवयींमुळे आपला देश कुपोषण, लठ्ठपणा आणि बिगर संसर्गरोगांनी ग्रस्त होत चालला आहे. कंप्रिहेसिव नॅशनल न्यूट्रीशन सर्व्हे ( सीएनएनएस) नुसार देशातील बालके आणि किशोरवयीन मुलांच्या अभ्यासादरम्यान ही माहिती समोर आली आहे. हा सर्व्हे गेल्या काही दशकातील आपल्या समाजात होत असलेल्या तीव्र आर्थिक आणि सामाजिक बदलाच्या दिशेने बोट दाखवत आहे. सर्व्हेमध्ये बालकांच्या खाण्यापिण्याविषयी आणि होणार्या रोगांविषयी अभ्यास करण्यात आला आहे. पण खाणपिणं किंवा रोग बर्याच प्रमाणात सामाजिकतेशी सबंधित असतात. यातून आर्थिक परिस्थितीदेखील समोर येते. हा अहवाल भीतीदायक आहे कारण गेल्या काही वर्षांत बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि किडनी संसर्गाचे रोग वाढले आहेत.

Wednesday, December 4, 2019

मायक्रो-प्लास्टिक आणि आपण

आपण आपल्या देशातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी मोठे अभियान चालवत आहोतजगभरात जवळपास सगळ्याच ठिकाणी अशाप्रकारची अभियाने चालवली जात आहेतसध्या तरी आपला पहिला प्रयत्न एकदा वापर केला जाणार्या प्लास्टिकपासून मुक्तता मिळवण्याचा आहेकारण ते जगाच्या प्लास्टिक प्रदूषणामध्ये मोठी भूमिका निभावत आहेया प्लास्टिकबरोबरच आणखी एक आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहेते म्हणजे मायक्रो-प्लास्टिकचेमायक्रो-प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे बारीक बारीक कण.सुक्ष्म कण.  जे सहज डोल्यांना दिसत नाहीतहे कण सर्वत्र आहेतया हवेत आहेतज्या हवेतून आपण श्वास घेतोत्या पाण्यात आहेतज्या पाण्याचा आपण वापर करतोत्या अन्नात आहेजे आपण खातो.

रस्ते अपघातांमध्ये घट

रस्ते अपघात आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहेइतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात रस्ते अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहेरस्त्यांवरील मोठमोठे खड्डेदारू पिऊन वाहन चालवणेबेदरकार वाहन चालवणे,वाहतुकीचे नियम मोडणेअधिक काळ वाहन चालवणे अशी अनेक कारणे वाहन अपघातांची आहेतअलिकडच्या काळातील तरुणाई तर वाहनांना खेळणे समजून बेदरकारपणे वाहन चाालवताना दिसत आहे.त्यांना आपल्या जीवाची तर पर्वा नाहीच,पण दुसर्याच्या जीवाचीही काळजी वाटत नाही.

न्याहारी,स्मृतिभ्रंश आणि ब्रेन सफाई

आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. उत्साह येतो. ऊर्जा खर्च होते. त्यामुळे डॉक्टर मंडळी नेहमी व्यायाम करा,फिरायला जात जा असा सल्ला आपल्या रुग्णांना देत असतात. व्यायामाबरोबरच सकाळी नाश्ता केला जावा, असे सांगितले जाते. आपल्या आयुर्वेदातसुद्धा व्यायाम करण्याची वेळ सकाळी नाश्त्याच्या अगोदर योग्य असल्याचे म्हटले आहे. याला एका संशोधनाने पुष्टी मिळाली आहे. 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्राइनोलॉजी एन्ड मेटाबोलीजम' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधात म्हटले आहे की, व्यायाम केल्याने इन्सुलिन लेव्हल योग्य राहते आणि हार्मोन्स सुद्धा योग्यरीत्या स्त्रावतात. त्याचबरोबर ऊर्जा योग्यप्रकारे खर्च होते. 

वैद्यकीय शिक्षण स्वस्त व्हायला हवे

आपल्याकडे वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा रुग्णांना गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने त्याच बरोबर हे शिक्षण कमालीचे महागडे असल्याने अनेक युवकांना वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी मुळात खासगी शिक्षण देणाऱ्या संस्थांना अधिक फी घेण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे. तरच डॉक्टरांची संख्या वाढण्याबरोबरच सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

किशोरवयीन मुले आणि क्रिकेट

आपल्याला माहीत आहे, क्रिकेट हा आपल्या देशातल्या लोकांचा श्वास आहे. सर्वाधिक क्रिकेट वेडे भारतात आहेत. भारतीय क्रिकेट संघ मैदानावर असेल तर देशातले लहान थोर एक तर टीव्ही समोर असतात किंवा क्रिकेट स्कोर जाणून घेण्यासाठी सतत मोबाईलशी खेळत असतात. जिथून कोठून माहीत मिळेल,तिथून सातत्याने ती मिळवण्याचा प्रयत्न करत  असतात. शाळा,कॉलेज, सरकारी,खासगी  कार्यालये इथली कामकाजी यंत्रणा या काळात काहीशी सुस्तावलेली असते. पण क्रिकेटबाबत उत्साह असतो.  याच क्रिकेटचे वेडामुळे भारतातील किशोरवयीन मुले इतर देशातल्या किशोरवयीन मुलांपेक्षा शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे.

प्रिय भक्त कोण?

एकदा नारद मुनी फिरत फिरत विष्णू लोक पोहोचले.  त्यांनी विष्णू देवास विचारले,'परमेश्वरा, तुमचा प्रिय भक्त कोण आहे?'  नारद मुनी यांना त्यांचे नाव घेतले जाईल,अशी अपेक्षा होती, कारण ते प्रत्येक क्षणी 'नारायण' या शब्दाचा जपमाळ करत असत. पण भगवान विष्णू म्हणाले,'पृथ्वीवर राहणारा सुखीराम नावाचा शेतकरी माझा प्रिय भक्त आहे.' सुखीराम यांचे नाव ऐकून नारद मुनी लगेच पृथ्वीवर पोहोचले.  त्यांनी पाहिले, सुखराम सकाळी एकदाच देवाचे नाव घेतो आणि मग बैल घेऊन शेतात निघून जातो.  तेथे तो दिवसभर शेतात नांगरतो  आणि संध्याकाळी घरी येतो.