Sunday, December 15, 2019

(मोटीवेशन) यशाची ऑनलाईन डिलिव्हरी शक्य नाही


ऑनलाईन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीच्या जमान्यात तुम्ही एकाद्याला विचारलंत की, तुम्हाला आयुष्यात काय हवंय तर उत्तर एकच येईल-कम्फर्टेलबल लाइफ. क्लिक अँड डन आताच्या या काळाने आयुष्याला काही अधिकच कम्पर्टेबल बनवलं आहे. आमच्या गरजा तर केवळ एका क्लिकच्या अंतरावर आहेत पण लक्ष्य, त्याचं काय? कम्पर्टेबल लाईफच्या चक्क्ररमध्ये  आम्ही आमच्या लक्ष्यापासून बाजूला सरकलो आहोत. आम्हाला वाटतं की, प्रत्येक लक्ष्य सहजपणे मिळेल. त्यामुळे आम्ही आता कठोर मेहनतची सवय विसरून गेलो आहे. पण आम्हाला लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्या आरामदायी जीवनशैलीला लगाम घालायला हवा. आपल्याला लक्ष्य गाठण्यासाठी त्यावर फोकस करायला हवं. आपलं लक्ष भटकतं राहिलं तर कधीच सफलता मिळणार नाही. आम्हाला दृढ संकल्पाबरोबरच आपलं ध्येय मिळवण्यासाठी मेहनत करायलाच हवी. यशाला कुठलं शॉर्टकट नाही. तुम्हाला कष्ट करायलाच हवे.धैर्य राखणं आणि नव्या गोष्टी शिकत राहणं महत्त्वाचं आहे.

जितकं मोठं ध्येय, तितकं अधिक कष्ट
यश कुठल्या अॅपवर उपलब्ध नाही, ज्याला तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरीने मागवू शकता. स्वप्नं क्लिकने नाही तर मेहनतीने पूर्ण केले जाऊ शकतात. कठीण मार्गावरून मार्गक्रमण करावं लागतं, तेव्हा कुठे यशाची फळे चाखता येतात. लक्षात ठेवा-तुम्ही जितकी मेहनत कराल, तितकीच यशाची घागर भरेल. जर ध्येय मोठं असेल तर मेहनतही दुप्पट करावी लागेल. यशासाठी सुरुवात आतापासूनच करायला हवी. तुमचं प्रेम, तुमची आराधना, तुमचा देव सर्व काही तुमचं ध्येय असलं पाहिजे. यासाठी आज आणि आतापासूनच यश मिळवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत यशाच्या शिखरापर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत मेहनत करत राहिलं पाहिजे.
उद्यावर कुठलं काम टाकू नका
आपल्यापैकी खूपच कमी असे लोक आहेत की, जे आपलं ध्येय पूर्ण करू शकतात. बाकीचे लोक ध्येयाच्या दिशेने जायचं सोडून यश सोपं करण्याच्या मागे लागलेले असतात. अशी माणसे दररोज असा विचार करून झोपतात की, आम्ही उद्यापासून ध्येयपूर्तीसाठी सुरुवात करू.पण त्याचा उद्या कधीच येत नाही आणि वेळ गेल्यावर फक्त अफसोस करण्यापलिकडे काही राहत नाही. आज अजूनही काही लोक म्हणत असतातच- खरंच त्यावेळेला मेहनतीकडे लक्ष दिलं असतं तर आज मी इथे नसतो.
रोज चढत रहा, कष्टाच्या पायर्या
जर आयुष्यात तुम्ही लक्ष्य निर्धारित केलं असेल तर तिथंपर्यंत पोहचण्यासाठी रोज कष्टाच्या पायर्या चढणं राहणं आवश्यक आहे. जितकं सुंदर लक्ष्य असेल, तितकंच कठोर मेहनत करणं भाग आहे. जे असा विचार करतात की- हे शक्य नाही, ते चुकीचा विचार करतात. या जगात काहीच अशक्य नाही. लक्ष्य कितीही कठीण असलं तरी आपण संकल्प घेऊन चालत राहिलो तर आपल्याला यशाचं शिखर आपोआप गाठता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment