Wednesday, December 18, 2019

(बालकथा) संगतीचा परिणाम

भैरूला चोरी करण्याची खूप वाईट सवय लागली होती. त्याची बायको त्याला कित्येकदा समजावून सांगायची आणि वाईट माणसांच्या संगतीपेक्षा चांगल्या माणसांची दोस्ती करा म्हणायची.पण त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम व्हायचा नाही. तो म्हणायचा की,संगत चांगली असो वा वाईट, ती माणसाला बदलू शकत नाही. त्याची बायको आता समजावून सांगून थकली होती.

एकदा गावातले सगळे लोक सत्संगला गेले होते. परंतु, भैरू घरातच थांबला. त्याला सत्संग, कीर्तन असलं काही आवडायचं नाही. शेजारच्या गावातील सरपंचाच्या घरातून दागिने चोरीला गेले होते.पोलिस भैरूला शोधत गावात आले. त्याने ते दागिने चोरले नव्हते परंतु, तरीही पोलिस पकडतील म्हणून तो पळाला. सत्संगजवळच्या झाडीत जाऊन लपला. त्याच्या कानांवर संताचे शब्द पडले-भूत-प्रेतांना सावली नसते.
पोलिसांनी भैरूला पकडलं. ते त्याला पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्याची चौकशी केली. पुष्कळ मार खावूनही भैरून गुन्हा कबूल केला नाही. मग पोलिसांनी एका हवालदारला भयंकर वेशात भैरूच्या कोठडीत पाठवले. भैरूने घाबरून गुन्हा कबूल करावा, यासाठी पोलिसांनी अशी युक्ती साधली. त्याचे लक्ष भुताच्या सावलीवर पडले. तेवढ्यात त्याला सत्संगमधल्या संताचे शब्द आठवले.सर्व काही त्याच्या लक्षात आले. तो म्हणाला,ङ्घ मी खरंच सांगतो, मी चोरी केली नाही.ङ्घ यामुळे पोलिसांचा त्याच्या बोलण्यावर विश्‍वास बसला. त्यांनी त्याला सोडून दिलं. त्यादिवशी भैरूने विचार केला की, काही मिनिटांच्या चांगल्या संगतीचा इतका परिणाम होत असेल तर आपण नियमित सत्संग़ का करू नये. त्यादिवसापासून त्याने चोरी करण्याचे काम सोडून दिले आणि चांगल्या संगतीच्या लोकांसोबत राहू लागला.
तात्पर्य- चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

 

No comments:

Post a Comment