Sunday, December 15, 2019

(बोधकथा) उच्च विचार


एकदा एका व्यक्तीने पाहिले की, एक गरीब मुलगा मोठ्या उत्सुकतेने त्याची किंमती ऑडी कार न्याहळत होता. त्या गरीब मुलावर तरस खाऊन त्या श्रीमंत व्यक्तीने त्याला आपल्या कारमध्ये बसवून त्याला फिरायला घेऊन गेला. थोड्या वेळाने फिरून आल्यावर मुलाला त्याने खाऊ-पिऊ घातलं. गाडीतून उतरताना मुलाने विचारलं,  साहेब, तुमची कार खूप चांगली आहे. ही खूपच महाग असेल ना?
श्रीमंत व्यक्ती मोठ्या अभिमानाने म्हणाली,  हो, लाखों रुपयांची कार आहे.
गरीब मुलगा म्हणाला,  कार विकत घेण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागले असतील नाही?

श्रीमंत व्यक्ती हसून म्हणाली,  दोस्ता, प्रत्येक गोष्ट मेहनत करून मिळत नाही. ही कार मला माझ्या भावाने भेट म्हनून दिली आहे.
गरीब मुलगा काही तरी विचार करून म्हणाला,  व्वा! तुमचा भाऊ किती चांगला आहे. ” श्रीमंत व्यक्ती म्हणाली, “ तू असा विचार करत असशील ना की खरंच! आपला भाऊसुद्धा असाच असता तर त्यानेही तुला कार भेट दिली असती. ” त्या गरीब मुलाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. तो मुलगा म्हणाला, “ नाही साहेब, मी तर तुमच्या भावासारखा बनू इच्छितो.
तात्पर्य- आपला विचार नेहमी उच्च ठेवा, तो दुसर्यांच्या अपेक्षेपेक्षा उच्च असावा.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment