Wednesday, December 4, 2019

रस्ते अपघातांमध्ये घट

रस्ते अपघात आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहेइतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात रस्ते अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहेरस्त्यांवरील मोठमोठे खड्डेदारू पिऊन वाहन चालवणेबेदरकार वाहन चालवणे,वाहतुकीचे नियम मोडणेअधिक काळ वाहन चालवणे अशी अनेक कारणे वाहन अपघातांची आहेतअलिकडच्या काळातील तरुणाई तर वाहनांना खेळणे समजून बेदरकारपणे वाहन चाालवताना दिसत आहे.त्यांना आपल्या जीवाची तर पर्वा नाहीच,पण दुसर्याच्या जीवाचीही काळजी वाटत नाही.
15 ते 29वर्षादरम्यानच्या युवकांचा अपघात सर्वाधिक होत असल्याचे कारण हेच आहेअपघाताने अधू होणेबळी जाण्यांची संख्या यामुळे सगळेच चिंतेत आहेतयावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी फारसा फरक पडताना दिसत नाही.
महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहेगेल्यावर्षी या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्यभर मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलापरिणाम असा झाला किरस्ते दुरुस्तीची मोहीम राज्यभर राबवण्यात आलीफार काही काळजीने ही मोहीम राबवण्यात आली नसली तरी बर्यापैकी खड्डे मुजवण्यात यश आलेसाहजिकच याच्यामुळे राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहेरस्ता सुरक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महामार्गावर होणार्या अपघातांच्या संख्येत 6.8ने घट झाली आहेजानेवारी ते ऑक्टोबर 2019दरम्यान राज्यात 27 हजार 363 अपघात झाले आहेतगेल्यावर्षी याच दहा महिन्यात 29 हजार350 अपघातात झाले होतेयात यंदा 6.8 ने घट झाली आहे.
रस्त्यांवरील बुजवण्याबरोबर अनेक योजना राबवण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेतरस्त्यांवरील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना केली आहेप्रत्येक जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेतया समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकार्यांना नेमण्यात आले आहे.त्यांच्याकडून प्रभावी उपाययोजना करण्याला प्राधान्य देण्यात आले आहेविशेष म्हणजे त्यांना दरवर्षी अपघातांमध्ये दहा टक्के घट करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहेत्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवणे,दिशादर्शक फलक बसवणेदुभाजकांची रंगरंगोटी करणेझेब्रा क्रॉसिंग रंगवणेप्रवाशी मार्गदर्शक फलक लावणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेतत्यामुळे राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी व्हायला मदत झाली आहेखड्डे बुजवणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात दरवर्षी हाती घेण्याची गरज आहेकारण मुळात एक तर रस्त्याची कामे टक्केवारी विसंबून असल्याने रस्त्यांची कामे व्यवस्थित होत नाहीपावसाळ्यात हेच रस्ते पूर्ण उखडल्याचा अनुभव पाहावयास मिळतो.
 रस्ते अपघात होण्याला आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे.दारूच्या रस्ते वाहन चालवल्याने चालकाला स्वत:बाबत काळजी नसतेच शिवाय दुसर्याच्या जीवाचीही पर्वा नसतेसाहजिकच पोलिसांनी वेळोवेळी चालक वाहन चालवताना दारू पिला नाहीयाची खात्री करण्यासाठी मोहीम उघडण्याची आवश्यकता आहेहेल्मेटची सक्ती दुचाकी वाहन चालकांसाठी महत्त्वाची आहे.बेदरकार वाहन चालवणार्यांवर कारवाई व्हायला हवीपोलिसांवर राजकीय हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जातो आणि बेशिस्त वाहन चालकांवरची कारवाई टाळली जातेयामुळे काळ सोकावत चालला आहे.राजकीय हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष करण्यासाठी राज्य शासन आणि वरिष्ठ अधिकार्यांकडून पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 9423368970  

No comments:

Post a Comment