Tuesday, December 17, 2019

इथे स्वयं गणपती बाप्पाने दिली होती आपली मूर्ती

(चिंतामण गणेश मंदिरसीहोरमध्यप्रदेश)
देशभरातील गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे सीहोर येथील चिंतामण गणेश मंदिर.सांगितलं जातं कीयेथील गणपती बाप्पा आपली प्रार्थना लवकर ऐकून घेतातआपली चिंता दूर करतात आणि इच्छा पूर्ण करतात.येथील चिंतामण गणेश भारतातल्या चार स्वयं मूर्तींपैकी एक आहेसीहोर येथील गणपतीबाबत सांगितलं जातं कीभगवान गणपती आजही इथे साक्षात मूर्तीच्या रुपात वास करतातअसं म्हटलं जात कीबाप्पाचे इथे पवित्र मनाने पूजन केल्यावर कधीही आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाहीतयाच कारणामुळे गणेश उत्सवानंतर भक्तांची अलोट गर्दी असते.

असं मानलं जातं किया मंदिराची स्थापना राजा विक्रमादित्याने केली होतीप्रचलित कथेनुसार राजा विक्रमादित्य यांना गणपतीची ही मूर्ती स्वयं भगवान गणेशानीच दिलीसांगितलं जातं की,विक्रमादित्य यांच्या भक्तीभावामुळे प्रसन्न होऊन भगवान गणेशजीने त्यांना दर्शन दिले आणि मूर्ती रुपात स्वत:च इथे स्थापित झालेशिवाय सदैव भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद दिला.
स्थानिक लोक सांगतात कीज्या ज्या वेळेला राजा विक्रमादित्य संकटात असत किंवा चिंताग्रस्त असत तेव्हा ते इथे गणपती बाप्पाच्या शरण यायचेयानंतर त्यांना आपल्या समस्येचे समाधान लगेच मिळायचेअशी मान्यता आहे कीलोक इथे आपल्या समस्या घेऊन येतातते बाप्पांकडून आपली चिंता दूर करण्यासाठी नवस मागतातइथे दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान देश-परदेशातील भक्तांची मोठी गर्दी असते.गणेशोत्सवाला सुरू झालेली आणि दहा दिवस चालणारी मोठी यात्रा इथे भरतेचिंतामण गणेश मंदिर भक्तांना दर्शनासाठी सकाळी सूर्योदयापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते.प्रसादाच्या स्वरुपात इथे गणपती बाप्पाला मोदक चढवला जातोयेतील दुकानदार मोठ्या आकाराचा मोदक बनवतात.
चिंतामण गणेशाच्या चार मूर्ती आपल्या देशात आहेतएक सवाई माधोपूर (राजस्थानच्या रणथंभौर येथे आहेदुसरी मूर्ती उज्जैन ,तिसरी गुजरातमधील सिद्धपूरमध्ये आणि चौथी सीहोर येथे आहे.मंदिराला जायला सीहोर बस स्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून रिक्शाने जाता येतेबस स्टँडपासून मंदिर तीन किलो मीटर अंतरावर आहेभोपाळपासून सीहोर 35किलोमीटर अंतरावर आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत7038121012

No comments:

Post a Comment