Wednesday, December 4, 2019

प्रिय भक्त कोण?

एकदा नारद मुनी फिरत फिरत विष्णू लोक पोहोचले.  त्यांनी विष्णू देवास विचारले,'परमेश्वरा, तुमचा प्रिय भक्त कोण आहे?'  नारद मुनी यांना त्यांचे नाव घेतले जाईल,अशी अपेक्षा होती, कारण ते प्रत्येक क्षणी 'नारायण' या शब्दाचा जपमाळ करत असत. पण भगवान विष्णू म्हणाले,'पृथ्वीवर राहणारा सुखीराम नावाचा शेतकरी माझा प्रिय भक्त आहे.' सुखीराम यांचे नाव ऐकून नारद मुनी लगेच पृथ्वीवर पोहोचले.  त्यांनी पाहिले, सुखराम सकाळी एकदाच देवाचे नाव घेतो आणि मग बैल घेऊन शेतात निघून जातो.  तेथे तो दिवसभर शेतात नांगरतो  आणि संध्याकाळी घरी येतो.
जेवण केल्यावर  रात्री झोपेच्या आधी पुन्हा एकदा देवाचे नाव घेऊन त्याचे आभार मानतो.  हे पाहून नारद मुनी तिथे क्षणभरही थांबत नाहीत.  लगेच ते विष्णू लोक  पोहोचले. ते विष्णू देवाला म्हणाले, 'भगवान, सुखराम दिवसांतून फक्त दोन वेळाच तुमचे नाव घेतो तरी तो तुम्हाला प्रिय कसा?'  भगवान विष्णू म्हणाले, 'मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन, परंतु प्रथम तुम्ही हे भांडे पाण्याने भरुन आणा आणि ते घेऊन  पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करून या. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. या भांड्यातून एकही पाण्याचा थेंब खाली नाही पडला पाहिजे. नारद मुनी संपूर्ण मार्ग स्थिरपणे चालत राहिले आणि एक थेंबही पडू दिला नाही.  जेव्हा ते परत आले, तेव्हा भगवान विष्णूने विचारले,'तुम्ही वाटेत माझे नाव किती वेळा घेतले?'  नारद म्हणाले,' आपण माझ्यावर असे काम सोपवले होते की माझे सगळे लक्ष त्याकडे होते. मग आपले नाव कसे घेणार?'  मीसुद्धा सुखीरामला काम दिले आहे. तो जरी माझे नाव सतत घेत नसला तरी तो माझा प्रिय भक्त आहे. माझे नाव घेऊन तो कामाला सुरुवात करतो. आपल्या कामात मनापासून रमतो. खरी भक्ती म्हणजे त्याचे काम योग्यरित्या करणे. 
तात्पर्य-आपले काम मनापासून करून आपण देवाची खरी भक्ती करू शकतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


No comments:

Post a Comment