Wednesday, December 4, 2019

न्याहारी,स्मृतिभ्रंश आणि ब्रेन सफाई

आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. उत्साह येतो. ऊर्जा खर्च होते. त्यामुळे डॉक्टर मंडळी नेहमी व्यायाम करा,फिरायला जात जा असा सल्ला आपल्या रुग्णांना देत असतात. व्यायामाबरोबरच सकाळी नाश्ता केला जावा, असे सांगितले जाते. आपल्या आयुर्वेदातसुद्धा व्यायाम करण्याची वेळ सकाळी नाश्त्याच्या अगोदर योग्य असल्याचे म्हटले आहे. याला एका संशोधनाने पुष्टी मिळाली आहे. 'द जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्राइनोलॉजी एन्ड मेटाबोलीजम' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधात म्हटले आहे की, व्यायाम केल्याने इन्सुलिन लेव्हल योग्य राहते आणि हार्मोन्स सुद्धा योग्यरीत्या स्त्रावतात. त्याचबरोबर ऊर्जा योग्यप्रकारे खर्च होते. 

ज्यांचे वजन वाढले आहे,त्यांनाही व्यायाम आणि सकाळच्या नाश्त्याचा योग्य उपयोग होतो. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. संशोधक जेवीयर यांचे म्हणणे आहे की, पूर्ण रात्र पोट रिकामे असल्याने शरीर व्यायामासाठी चांगल्या प्रकारे तयार होते.  शरीराला रात्रभर आराम मिळतो. दिवसाची सुरुवात सकाळपासून होत असल्याने अधिक ऊर्जा आपल्याला सकाळीच मिळते. सकाळच्यावेळी प्रदूषणही कमी असते.
दुसऱ्या एका संशोधनानुसार अँटिबायोटिक औषधांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्यास आपल्या स्मृतीवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.विसरण्याचा आजार होण्याचा संभव अधिक आहे. पार्किन्सन्स आजाराचा संबध थेट पोटात आढळणाऱ्या बॅक्टेरियाशी आहे. ज्यावेळेला रुग्णांना  अँटिबायोटिक औषधे दिली जातात तेव्हा यातील स्मरणशक्ती वाढवणारे बॅक्टेरियासुद्धा मारले जातात. यामुळे विस्मरणाचा आजार जडू शकतो. हा शोध फिनलँड च्या हेलिसिंकी विश्व विद्यापीठाच्या संशोधकांनी लावला आहे. हे संशोधन 14 हजारांहून अधिक पार्किन्सन्स रुग्णांवर करण्यात आला आहे. यात सांगण्यात आले आहे की, काही अँटिबायोटिकमुळे पोटात आढळणाऱ्या मायक्रोबायोटा मरतात. नुकसान करणाऱ्या बॅक्टेरिया बरोबरच आपल्याला फायद्याचे असणाऱ्या बॅक्टेरियाचेही नुकसान होत असते. पोटात व्हिटामिन-बी आणि बी कॉम्प्लेक्स बनवणाऱ्या बॅक्टेरिया असतात. यांचा थेट संबंध स्मरणाशी असतो. त्यामुळे अँटिबायोटिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवेत.
तिसरे एक संशोधन पुढे आहे, ते म्हणजे कमी झोपेमुळे  अलजाइमरचा धोका वाढतो. अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटी मध्ये सांगण्यात आले आहे की, कमी झोप घेतल्याने मानसिक आणि वृद्धत्व वाढवणारे आजार वाढतात. अलजाइमरचा धोका वाढतो. या संशोधनात सांगण्यात आले आहे की, ज्यावेळेला आपण गाढ झोपेत असतो म्हणजेच डीप स्लिपमध्ये असतो त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये काही असे इलेक्ट्रिकल सिंगनल निघत असतात, जे ब्रेनची सफाई करतात. त्याला आपण असे म्हणू की, आपल्या मेंदूत अनावश्यक असलेला कचरा साफ करण्याचे काम केले जाते. यावेळेला ही प्रोसेस वेगाने होत असते. यामुळे म्हातारपण उशिराने येते. ब्रेनमध्ये रक्ताची कमतरता आणि टॉकीसंस दूर करणाऱ्या  फ्लूईडसाठी अधिक स्पेस असतो. हे फ्लूईड अलजाइमर करणाऱ्या टॉकीसन्सला मेंदूतून हटविण्याचे काम करतात.
आपल्याला माहीत आहे की, आपण निद्रेत जातो तेव्हा ब्रेनची विचार करण्याची क्षमता रिसेट होत असते. ब्रेन स्वतः देखील मेमोरी स्टोरेजची साफसफाई करत असतो. अशा वेळेला आपल्याला नुकसानदायी असणाऱ्या टॉकीसन्सला हटविण्याचे काम केले जाते. यामुळे अलजाइमरपासून बचाव होतो.
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम, योग्य आहार, चिंतामुक्त जीवन, स्वच्छता महत्त्वाचे आहे. कोणताही आजार होऊ नये,यासाठी स्वतः ची काळजी घेण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 9423368970

No comments:

Post a Comment