Tuesday, March 31, 2020

भारतातील आरोग्य यंत्रणेची काय परिस्थिती आहे?


कोरोना संक्रमण तिसर्या स्तरावर (सामुदायिक संक्रमण) जाण्याची शक्यता कमी असल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. संचार बंदी आणि सामाजिक अंतरचा परिणाम दिसू लागला आहे. पण अशा अनेक दाव्यांमध्येच एक प्रश्न उपस्थित होत आहेत.तो म्हणजे कोरोना संक्रमण निपटण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य सेवा यंत्रणा सक्षम आहे का? आपल्यापेक्षा अधिक मजबूत अशी आरोग्य सेवा यंत्रणा इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये आहे. मात्र तेथील यंत्रणा पार आता हडबडून गेली आहे. वेंटिलेटर आणि आयसीयू कमी पडू लागल्या आहेत. इटलीमधील परिस्थिती तर मोठी विदारक आहे. तिथे कुणाचा जीव वाचवायचा आणि कुणाचा नाही, हेच कळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत भारत कुठे आहे? आज मोठ्या संख्येने मजूर, कामगार लोक आपापल्या गावाक़डे झुंडीने जाताना दिसत आहेत.अनेक मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Friday, March 27, 2020

नंदाला शिकायचं होतं पण...


चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींना नाइलाज म्हणून काम करावं लागलं आहे. मीनाकुमारी, मधुबाला, नर्गीससारख्या अभिनेत्रींना आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चेहर्यावर मेकअप चढवावा लागला. कॅमेर्यासमोर उभे राहावे लागले. त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढलेच शिवाय समाजात प्रतिष्ठाही मिळवली. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नंदा. नंदाचे कुटुंब चित्रपटसृष्टीशी निगडीत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे 19 ऑगस्ट 1947 रोजी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या नंदाच्या वडिलांचे म्हणजे मास्टर विनायक यांचे निधन झाले.  नंदाला शिकायचं होतं. 1947 मध्ये तिचे वडील मास्टर विनायक मंदिर नावाचा मराठी चित्रपट बनवत होते. चित्रपटात एका मुलाची भूमिका होती, ती नंदाने करावी, अशी त्यांची इच्छा होती. पण नंदाला अॅक्टिंगमध्ये रस नव्हता. तिच्या वडिलांनी तिच्यावर आपली इच्छा लादली. शेवटी रडत रडत तिने आपल्या आईला म्हणजे सुशिला यांना सांगितली. मास्टर विनायक माघार घ्यायला तयार नाहीत म्हटल्यावर त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितले की, हा तुझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल. यानंतर तू कधीच चित्रपटात काम करणार नाहीस. शेवटी या चित्रपटात नंदाने मुलाची भूमिका साकारली.

Thursday, March 26, 2020

भारतीय प्रेक्षकांच्या तिरस्काराचा धनी: बॉब क्रिस्टो


बॉब क्रिस्टोयाला आपण नेहमी पडद्यावर नायकाकडून मार खाताना पाहिलं आहे. त्याला मार खाताना पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. पण या माणसाच्या आयुष्याचा प्रवास रंजक आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये जन्मलेल्या रॉबर्ट जॉन क्रिस्टो ऊर्फ बॉब क्रिस्टोच्या नशिबात भारत आणि इथेच शेवटचा श्वास लिहिले होते. भारतीय प्रेक्षकांच्या मनातील चीड मनात साठवून बॉब इथलाच झाला. इतकेच नव्हे तर त्याने मधल्या काळात लोकांना फिटनेसचे धडे दिले. अनेकांच्या तब्येती त्याने बनवल्या. वास्तविक परवीन बॉबीच्या सौंदर्यावर फिदा होऊन तो तिच्यासाठी भारतात आला होता. अशा या कलाकाराने 20 मार्च 2011 मध्ये बेंगळुरूमध्ये आपला देह ठेवला.

आजची फोटोग्राफी सामान्यांसाठी वरदानच


आज आपण एकाद्या सुंदर ठिकाणी गेलो नसलो तरी ती दृश्ये कुठली आहेत, हे आपण पटकन सांगू शकतो. कारण अशी सौंदर्यपूर्ण दृश्ये, छायाचित्रे आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर पाहायला मिळतात. ही दृश्ये पाहिली की, आपल्याला तिथले सौंदर्य लक्षात येते आणि आपल्यालाही त्याठिकाणी जावं, अशी अनावर इच्छा होते. पण आपण जिथे आहोत,तिथली छायाचित्रेही आपल्याला पाहिजे तशी काढता आणि बनवता येतात. कारण ते सगळं आता आपल्या हातात आहे. आज फोटोग्राफीचं विश्वच पार बदलून गेलं आहे. मोबाईलवरच्या फोटोंचे मोबाइलवरील विविध अॅपद्वारा शेडस बदलू शकतो. मोबाईलमधील उपलब्ध फिल्टरच्या माध्यमातून आपण छायाचित्रांचे रंग बदलू शकतो. रंगीत छायाचित्रांना जुन्या फोटोंसारखा लूक देऊ शकतो. किंवा विविध पृष्ठभूमिशी जोडू शकतो. छायाचित्रांना जुन्या जमान्यातील ब्लॅक अँड व्हाइट फोटोसारखे एडिटसुद्धा करू शकतो. वास्तविक , छायाचित्रांच्या दुनियेत मोठा बदल अगदी ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यापासून होत आला आहे.

Tuesday, March 24, 2020

जीवनाचा अमृत रस: कांति

कधी कधी असं होतं की, एकाद्या व्यक्तीजवळ बसल्यावर तिथून उठण्याची इच्छाच होत नाही तर कधी  एकाद्याजवळ बसण्याची इच्छाही होत नाही. याचे उत्तर आहे-मनाची भावना. ज्याच्या मनात समष्टीभाव आहे,तो उदारमनाचा असतो. तो दया,करुणा आणि स्नेहाचा प्रतीक असतो. तो कुणाच्या हिताच्या गोष्टींचा विचार करत नाही आणि तसाच तो स्वतः च्या स्वार्थालाही महत्त्व देत नाही.त्याच्या चेहऱ्यावर एक विशेष ओज पाहायला मिळतो. हाच ओज अथवा कांती त्याच्याविषयीच्या विशेष आकर्षणाचा केंद्र बनतो. जसं जसं माणसाचं शुद्ध ज्ञान वाढत जातं, तसं विश्वकल्याणाचा भावदेखील वाढत जातो. त्याच्या कांतीचे क्षेत्रदेखील त्यानुसार वाढत जाते. ज्यावेळेला एकादी व्यक्ती या प्रभावक्षेत्रात प्रवेश करते, तेव्हा ती सहजच आकर्षिली जाते.

यश मिळवायचं ना तर... डोकं चालवा आणि तोंडाला कुलूप लावा

कोणत्याही खास योजनेवर काम करायचं असेल किंवा नेहमीचंच रहाट गाडगे चालवायचं असेल पण या दोन्ही ठिकाणी यश अपेक्षितच आहे.  यासाठी आपल्याकडे प्रचंड ऊर्जा असायला हवी. उद्देश सफल करायचा असेल तर प्रेरणा कामाला आलीच पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांत या विषयावर खूप काही आपल्याला ऐकावं किंवा ऐकून घ्यावं लागत आहे. मॅनेजमेंट किंवा मोटावेशनल स्पीकर्स  मोठमोठ्याने आणि जोरजोराने नवनवे फॅंडे - फॉर्मुल्ये सांगत सुटले आहेत. त्यांचं एकच सांगणं आपल्यासाठी इथे महत्त्वाचे आहे,कारण ते आपल्याला एकच सांगत आहेत की, 'तोंडाला कुलूप लावा आणि डोक्याने धावा'. अर्थात हा विचार पारंपरिक विचारांच्या विपरीत आहे. आपलं यश आपल्या जवळच्या लोकांना सांगायला हवं, त्यामुळे आपल्यात आणखी ऊर्जा मिळत राहते. मात्र आजकालची परिस्थिती फार वेगळी आहे. यश मिळेपर्यंत किंवा योजना यशस्वीरीत्या पूर्ण होइपर्यंत तोंडाला कुलूप लावणं आवश्यक आहे. कारण या तुमच्या यशाला खोडा घालायला तुमचे सहकारी टपून बसलेले असतात.त्यामुळे यश मिळेपर्यंत तुम्हाला काही गप्प बसावे लागते. कार्य पूर्ण झाल्यावर त्याचा आनंद साजरा करायला हवा.