Tuesday, March 24, 2020

यश मिळवायचं ना तर... डोकं चालवा आणि तोंडाला कुलूप लावा

कोणत्याही खास योजनेवर काम करायचं असेल किंवा नेहमीचंच रहाट गाडगे चालवायचं असेल पण या दोन्ही ठिकाणी यश अपेक्षितच आहे.  यासाठी आपल्याकडे प्रचंड ऊर्जा असायला हवी. उद्देश सफल करायचा असेल तर प्रेरणा कामाला आलीच पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांत या विषयावर खूप काही आपल्याला ऐकावं किंवा ऐकून घ्यावं लागत आहे. मॅनेजमेंट किंवा मोटावेशनल स्पीकर्स  मोठमोठ्याने आणि जोरजोराने नवनवे फॅंडे - फॉर्मुल्ये सांगत सुटले आहेत. त्यांचं एकच सांगणं आपल्यासाठी इथे महत्त्वाचे आहे,कारण ते आपल्याला एकच सांगत आहेत की, 'तोंडाला कुलूप लावा आणि डोक्याने धावा'. अर्थात हा विचार पारंपरिक विचारांच्या विपरीत आहे. आपलं यश आपल्या जवळच्या लोकांना सांगायला हवं, त्यामुळे आपल्यात आणखी ऊर्जा मिळत राहते. मात्र आजकालची परिस्थिती फार वेगळी आहे. यश मिळेपर्यंत किंवा योजना यशस्वीरीत्या पूर्ण होइपर्यंत तोंडाला कुलूप लावणं आवश्यक आहे. कारण या तुमच्या यशाला खोडा घालायला तुमचे सहकारी टपून बसलेले असतात.त्यामुळे यश मिळेपर्यंत तुम्हाला काही गप्प बसावे लागते. कार्य पूर्ण झाल्यावर त्याचा आनंद साजरा करायला हवा.

चाणक्य यांचं सॉलिड सूत्र म्हणजे तोंडाला कुलूप

चाणक्य यांनी लक्ष्य आणि त्याच्या प्राप्तीसंदर्भात बरंच काही  व्यावहारिक  ढंगाने सांगितलं आहे.- माणसाने कधीही आपल्या मनातले पत्ते उलगडू नयेत. त्याला कोणतेही कार्य करायचे आहे,ते त्याच्या मनातच ठेवले पाहिजेत. आणि पूर्ण क्षमता तसेच तन्मयतेने योग्य वेळी पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित करायला हवे. चाणक्य यांनी विश्वसनियतेची कसोटी तपासताना जी व्यक्ती आपला चांगला मित्र नाही, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये, ही स्वाभावीकता स्पष्ट केली आहे. याच बरोबर  एकाद्या चांगल्या कार्याबाबत आपल्या जवळच्या मित्रालादेखील विश्वास देऊ नये. जर तो एकाद्या कारणाने नाराज झाला किंवा दुर्भाग्यवश तुमच्याबाबतीत कटुता आली तर तो तुमचे गुपित तुमच्या शत्रूकडे फोडू शकतो. त्यामुळे सावधानता बाळगणे सर्वात महत्त्वाचे आहे. गपचिप राहून आपले लक्ष्य कसे प्राप्त कारायचे याबाबत सांगताना आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कुठल्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला तीन गोष्टी प्रामाणिकपणे विचारायला हव्यात. 1) मी हे का करत आहे? 2) माझ्याकडून होऊ घातलेल्या कार्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात? 3)मी ज्या कार्याला प्रारंभ करायला निघालो आहे,त्यात मी यशस्वी होणार का?

डेरेकचा नवा फन्डा
गेल्या पंचवीस - तीस वर्षांपासून सेपलिंग फाऊंडेशन TED या स्वयंसेवी संघटनेच्या प्लॅटफॉर्मद्वारा जगभरात हजारो इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि विचार समोर आले आहेत TED प्लॅटफॉर्म ची एक कांफ्रेंस सीडी बेबीसारख्या इनोव्हेटिव्ह कन्सेप्टचे संस्थापक डेरेक सोवर्स यांनी 'सकारण चुप्पी'  बाबतीत एक नवीनच गोष्ट समोर ठेवली.या विषयावर त्यांनी शेकडो श्रोत्यांसमोर सांगितले- मित्रांनो,  तुमच्या जीवनातल्या एका महत्त्वपूर्ण लक्ष्याच्याबाबतीत विचार करा. जे खरं लक्ष्य. काही क्षण घ्या आणि विचार करा. तुम्ही विचार करा,तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करणारच.आता तुम्ही कल्पना करा की,तुम्ही तुमच्या या लक्ष्याच्या बाबतीत एकाद्या व्यक्तीला, एकाद्या विश्वस्ताकडे किंवा अगदी जवळच्या माणसाला सांगता आहात. आता त्या माणसाच्या शुभेच्छा आणि त्याच्या मनात तुमच्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाची कल्पना करा. आपले लक्ष्य सांगितल्याने तुम्हाला चांगले वाटते आहे ना? असं वाटत नाही का की, तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. आणि आता ही तुमची ओळख बनली आहे? पण दुर्दैवाने तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. तुम्ही तोंड उघडण्यापेक्षा शांत राहायला हवं होतं. कारण दुसऱ्याच्या प्रोत्साहन, प्रसंशेच्या त्या सुखद भावनेमुळे कदाचित तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकणार नाही.

मानसशास्त्रीय परीक्षण
मानस शास्त्रीय परीक्षण किंवा संशोधनाने सिद्ध झालं आहे की, कोणापुढे तरी आपले लक्ष्य जाहीर केल्याने ते मिळवण्याची शक्यता कमी होते. 1982 मध्ये पीटर गोल्लवीतजर यांनी यावर एक पुस्तक लिहिले आहे.2009 मध्ये त्यांनी काही परीक्षण केले जे नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले. त्यांनी 163 व्यक्तींवर चार वेगवेगळे परीक्षण केले. परीक्षणमध्ये सगळ्यांना आपापल्या महत्त्वपूर्ण लक्ष्यावर लिहायला सांगितले. लिहिणाऱ्या पैकी अर्ध्या लोकांनी आपल्या लक्ष्याबाबत प्रतिबद्धता सगळ्यांसमोर जाहीर केली. बाकी म्हणजे उर्वरित लोकांनी तसे केले नाही. मग नंतर त्या सर्वांना आपल्या लक्ष्यावर काम करण्यासाठी 45 मिनिटे देण्यात आली. यातून त्यांना त्यांच्या लक्ष्याक डे जाता येणार होते.  त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले होते की, त्यांनी आपले कार्य केव्हाही समाप्त करू शकत होते. शेवटपर्यंत कार्य करण्याची काही गरज नव्हती. आता ज्यांनी आपले लक्ष्य जाहीर केले नव्हते, त्यांनी  सरासरी 45 मिनिटांपर्यंत आपले कार्य करत राहिले. त्यांना त्यांच्या लक्ष्य प्राप्तीसंदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी आणखी वेळेची आवश्यकता आहे. पण ज्यांनी आपले लक्ष्य जाहीर केले होते,त्यांनी सरासरी 33 मिनिटातच आपले काम अर्धवट सोडले होते. ज्यावेळेला त्यांना लक्ष्य प्राप्तीसंदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशी होती की,त्यांना वाटलं की,ते लक्ष्य प्राप्त करण्याच्या अगदी जवळ होतो.

समस्यांचे समाधान
डेरेक सिव्हर्स सांगतात की, जर हे सत्य असेल तर आपण काय करू शकतो? आपण आपल्या लक्ष्याची घोषणा करण्यापासून , जाहीर करण्यापासून स्वतःला रोखू शकतो.  आपल्या लक्ष्याच्या स्वीकृती पासून मिळणाऱ्या आनंदाला रोखू शकतो. आणि तुम्ही समजू शकता की, आपले मन लक्ष्यासंदर्भात बोलल्याने अगोदरच तुम्हाला त्याचे समाधान मिळालेले असते. आणि हेच लक्ष्य गाठायला अडथळ्याचे ठरते.  परंतु जर तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण करणार असाल तर तो केल्याचा आनंद अगोदरच मनात येऊ देऊ नका. नाही तर हा आनंद तुमच्या लक्ष्याला बाधा आणल्याशिवाय राहणार नाही.- मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012 

1 comment: