आपल्याकडे आईची
महती गायिली जाते. तिचा त्याग सांगितला जातो. तिने आपल्या मुलांसाठी घेतलेल्या
कष्टाचे वर्णन केले जाते. काही नोकरदार महिला मुलांचा सांभाळ
करण्यासाठी म्हणून नोकरीवर तुळशीपत्र ठेवतात. आपल्या मुलांवर
होणार्या संस्कारात, पालनपोषणात कुठे कमतरता
पडू नये म्हणून काही आया रात्रंदिवस कष्ट उपसतात. अशा आया एकिकडे
असताना कलियुगातही काही आया अशा आहेत की,त्यांना मुलांचे,
त्यांच्या पालनपोषणातचे काहीच वाटत नाही. त्यांचा
सांभाळ करायचे तर दूरच पण त्याचा जीवच घेणार्या आयांच्या घटना
ऐकल्या की मन सुन्न होऊन जाते. आई या नावाला कलंक लावणारी घटना
उत्तर प्रदेशातल्या जशपूरनगरात घडली आहे. तरुणांबरोबर मौजमज्जा
करायला सोकावलेल्या जिविता रवाणी नावाच्या महिलेने दारूच्या नशेत आपल्या अवघ्या दहा
महिन्याच्या मुलीला यमसदनाला पाठवून दिले.
23 संप्टेंबर
2016 हा दिवस खरे तर आई म्हणवणार्या महिलांसाठी
खास होता. कारण या दिवशी जीतिया पूजा होती. आया आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून व्रत धरतात. दिवसभर पाणीदेखील पीत नाहीत. अन्य आया जिथे आपल्या मुलांच्या
दीर्घायुष्यासाठी भक्तीभावात मग्न होत्या,तिथेच शहरातल्या बालाजीटोली
नावाच्या उपनगारात जिविता नावाची क्रूर आई आपल्या मित्रांसोबत दारूची पार्टी करत मज्जा
मारत होती. इकडे 10 महिन्याचा लहानगा जीव
रडायला लागला. इकडे दारूच्या नशेत द्यूत झालेली जिविता मित्रांबरोबरच
मज्जा मारण्यातच दंग होती. तिला आपल्या रडणार्या बाळाची फिकिरच नव्हती. नंतर नंतर तिच्या रडण्याचा
आवाज तिला अडसर वाटू लागला. त्यामुळे चिडलेल्या जिविताने लहानग्या
मुलीला चापटा मारल्या. पण ती रडायचे थांबण्यापेक्षा आणखीणच मोठ्या
रडायला लागली.
मित्र गेल्यावर
रडण्याला वैतागलेल्या जिविताने बाजूला पडलेल्या काठीने कपाळावर टोला हाणला.यात ती जागीच मरण पावली.
दारूची नशा उतरल्यावर दुसर्यादिवशी जिविताने शहरातच
दुसर्या टोकाला मधुवन कॉलनीत राहणार्या
तिच्या बहिणीला सचिताला
बोलावून घेतले. तिला सगळा घडला प्रकार सांगितला. मग त्यांनी खून पचवण्यासाठी मांजराने आपल्या मुलीला चावून,ओरबाडून मारल्याचा बनाव केला. जिविताची बहीण सचिता हिने
तशी तक्रार 24 सप्टेंबर 2016 रोजी पोलिसांत
दाखल केली. आजूबाजूच्या लोकांनादेखील तसेच सांगण्यात आले.पोलिस मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आले. पंचनामा
करताना पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. मुलीचे
रक्त मच्छरदाणी आणि आईच्या म्हणजेच जिविताच्या कपड्यांना लागल्याचे आढळून आले.
मग पोलिसांनी मुलीच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून विचारपूस करायला सुरुवात
केली. पोलिशी खाक्या पडताच तिने गुन्हा कबूल केला. जितियाने पोलिसांना सांगितले की,23 सप्टेंबरच्या रात्री
तिचे दोन मित्र तिच्या घरी आले होते. तिघांनी मिळून दारू पिली.ते दोघे निघून गेले तेव्हा, तिने विचार केला की,
घरात कमावणारा कोणी नाही. मग या मुलीचा सांभाळ
कसा करायचा? तिने मुलीकडे
पाहिले,ती रडत होती. तिने आणखी दोन चपटा
गालावर मारल्या. त्यामुळे ती आणखी मोठ्या रडू लागली. तिचा आवाज बंद करण्यासाठी तिने घरात ठेवलेल्या काठीने डोक्यावर,कपाळावर मारून ठार मारले.
पोलिसांना कारण
पटले नाही
10 महिन्याच्या
मुलीला यमसदनाला पाठवल्यानंतर या आरोपी महिलेने आपल्या शेजारीपाजारी असलेल्या लोकांना
मांजराने आपल्या मुलीला मारल्याचे सांगितले. पोलिसांनादेखील तिने
हीच गोष्ट सांगितली. ठाण्याचे पोलिस अधिकारी गौरीशंकर दुबे यांना
ही गोष्ट पटली नाही.कारण आजपर्यंत मांजराने मुलाला मारून टाकल्याची
अशी घटना कधीच घडली नव्हती. किंवा ऐकिवातही आली नव्हती.
दुबे यांनी आपल्या विशेष पथकाला संशयीत आरोपी महिलेच्या चारित्र्याविषयी
माहिती काढायला लावली. त्यात त्या महिलेला दारूचे व्यसन आहे आणि
तिच्या घरी अनेक पुरुषांचे जाणे-येणे असते,याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिच्या काळ्या
कृत्याचा भांडाफोड केला. सध्या ती तुरुंगात असून तिची दोन्ही
मुले आजी- आजोबांकडे आहेत.
No comments:
Post a Comment