यंदाचा उन्हाळा
मोठा भयंकर आहे. अजून उन्हाळ्याचे
दोन महिने बाकी असताना सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. वेधशाळेदेखील यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता व्यक्त केली होतीच,त्यानुसार सध्या त्याचा प्रत्यय येत आहे. यंदा सगळीकडे
पावसाने समाधान दिले असल्याने विदर्भ,मराठवाडा सोडला राज्यात
सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. मात्र वातावरणातला बदल उष्णतेची
लाट घेऊन येत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असणार आहे.
साहजिकच आपल्याला आपल्या शरीराची आणि अवयवांची काळजी करायलाच हवी.
उन्हाचा पारा चढत चालल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची
शक्यता अधिक आहे. उन्हाळ्यात डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात.
त्या दूर ठेवण्यासाठी नागरिकांना उन्हात फिरताना डोळ्यांची काळजी घ्यायला
हवी आहे.
आपल्या डोळ्यांना
आपल्या शरीराचा सुरक्षा कॅमेरा म्हणतात. या अवयवाची योग्य काळजी न घेतल्यास माणूस परावलंबी होऊ शकतो.
बाहेर फिरण्याशिवाय पर्याय नसलेल्यांनी डोळ्यांची निगा राखायला हवी आहे.
डोळ्यांच्या संसर्गावर वेळीच उपचार घ्यायला हवा आहे. उन्हामुळे अनेक तक्रारी वाढतात. साधारणपणे उष्ण वार्यामुळे डोळ्यांची अॅलर्जी, जंतुसंसर्ग
होण्याची शक्यता असते. धूळ,उष्णता,
सुकलेले गवतकण यांच्यामुळे तक्रारी वाढतात. अॅलर्जीमुळे डोळे खाजवणे, लाल होणे, लालसरपणा दिसणे, पाणी जाणे, कचरा
गेल्यासारखे वाटणे, जळजळ होणे अशा तक्रारी येतात. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे मोतीबिंदू, काचबिंदू,
पडदा कमजोर होणे आणि डोळे कोरडे पडणे अशा तक्रारी या उन्हाळ्याच्या दिवसात
उदभवतात.
उन्हात फिरताना
काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे शक्यतो ब्रँडेड कंपनीचा गॉगल वापरायला
हवा. चेहरा,डोके झाकले जाईल अशा पद्धतीने
रुमाल, दुपट्टा बांधावा. तहान लागल्यास
शक्यतो लिंबू पाणी पिल्यास फायदा होईल. दिवसातून किमान दोन ते
तीन वेळा चेहरा, डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवण्याची गरज आहे.
आहारात जीवनसत्त्व अ असलेले पदार्थ ठेवल्यास उत्तम! एक्य असल्यास घरी रिकाम्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.डोळे गार होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात
काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे आहे. यात शक्यतो भर उन्हात
बाहेर जाणे टाळायला हवे. एसीतून उठून एकदम कडक उन्हात फिरू नका.
टीव्ही, कॉम्प्युटरसमोर सलग दोन तासाम्पेक्षा अधिक
बसणे टाळायला हवे. डोळ्यांत जळजळ, लालसरपणा
आल्यास घरच्याघरी उपचार करण्याचा मोह टाळायला हवा. रिस्क घेऊ
नका. तसे काही वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला
विसरू नका.
No comments:
Post a Comment