Wednesday, February 26, 2020

'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाच्यानिमित्ताने मनोगत...


'स्वभावयक्ष' नावाची माझी पहिली बालकथा 'दैनिक पुढारी'मध्ये 1994 मध्ये छापून आली होती. माझं नुकतंच डीएड पूर्ण झालं होतं. एके रविवारी माझी चुलती 'बाळू,तुझी गोष्ट छापून आलीय म्हणत पेपर घेऊन आली. मला पेपरमध्ये गोष्ट आलेली पाहून साहजिकच खूप आनंद झाला. खरं तर ती गोष्ट पेपरला पाठवून मी ती विसरूनही गेलो होतो. कारण काही रविवार वाट पाहिल्यानंतर त्याची आशा सोडली होती. पण वेळाने का असेना गोष्ट छापून आल्यानंतर मला पुन्हा हुरूप आला. मी पुन्हा गोष्टी लिहिण्याकडे वळलो. काही दिवसांनी दैनिक सकाळमध्ये 'मौलिक धन' नावाची कथा प्रसिद्ध झाली. तिथून कथा लिहिण्याचा सपाटा सुरू झाला. 'बेळगाव तरुण भारत'च्या 'अक्षरयात्रा' मध्ये काही बालकथा प्रसिद्ध झाल्या.

Wednesday, February 19, 2020

कालबाह्य कायदे गुंडाळा

ब्रिटिशकालीन किचकट कायदे सुलभ करण्याबरोबरच कालबाह्य कायदे बदलण्याची गरज आहे .इतर खात्याबरोबरच  तलाठ्याच्या चावडीपासून मामलेदार आणि कलेक्टर कचेरीपर्यंतच्या प्रत्येक कागदाचा आणि फाईलचा प्रवास सोपा व्हावा आणि सर्वसामान्यांना त्यांचे काम सुलभपणे झाल्याचे समाधान मिळावे, या विचाराने काही धोरणे राबवण्याची गरज आहे . महसूल खात्यातील काही कायदे कालबाह्य झाल्याचे अधिकार्‍यांच्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. असे कायदे बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करायाला हवी .