रुग्ण आणि बिडी
डॉक्टर : तू एका दिवसात किती बिड्या ओढतोस? रुग्ण : दिवसातून जवळपास वीसएक बिड्या होतात. डॉक्टर : माझ्याकडून इलाज करून घ्यायचा असेल तर बिड्या ओढणं बंद करावे लागेल.आजपासूनच स्वता: ला एक बंधन पाळून घे. जेवल्यावर केवळ एकच बिडी ओढायची. समजलं?
(रुग्णाने डॉक्टरचं म्हणणं मान्य केलं त्यानुसार त्याने उपचार सुरू केले. काही महिन्यातच याची तब्येत सुधारली.)
डॉक्टरः बघितलसं! माझ्या उपचारानुसार तुझ्या तब्येतीत किती फरक पडला.
रुग्णः पण डॉक्टरसाहेब, एका दिवसात वीस वेळा जेवायचं काही सोपी गोष्ट नाही.
लाँड्री
बायकोने लाँड्रीच्या दुकानासमोर लावलेला बोर्ड वाचला. बनारसी साडी १० रुपये नायलॉन साडी ८ रुपये
कॉटन साडी ५ रुपये
बायको पटकन म्हणाली, " मला लवकर पाचशे रुपये द्या.मला पन्नस साड्या खरेदी करायच्या आहेत." नवरा: अगं ,ते काही साड्यांच्या सेलचं दुकान नाही. नीट वाच, ते लोंड्रीचे दुकान आहे.
माझ्या मागे मागे
डॉक्टरः बेड नंबर आठचा रुग्ण कुठे आहे? नर्स : त्याला खूप दम लागला आहे. त्याचा श्वास फुलला असून मोठ्या मुश्किलीने पकडून त्याचे पाय बांधले आहेत.
डॉक्टरः काय! त्याला दम लागला आहे? तर मग त्याचा आणि त्याचे पाय बांधण्याचा संबंध काय? ताबडतोब सोडा त्याला....
नर्सः सर, त्याला सोडले तर ना तो माझ्या मागे मागे सार्या वार्डभर धावत राहील ......आणि पुन्हा त्याचा श्वास फुलेल. त्याला दम लागेल.
हुज्जत
एका अधिकार्याला दुकानदाराशी खूप उशिरा हुज्जत घातल्यानंतर फर्निचरची किंमत कमी करण्यात यश आले.त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने त्याला घरी आल्यावर विचारलं, ' अरे, तुला उधारच घ्यायचं होतं तर त्याच्याशी इतका वेळ हुज्जत घालत बसण्याची काय गरज होती ? आणि तू तर कुणाचे उधार परत करतच नाहीस!' तो अधिकारी म्हणाला,' तो दुकानदार खूपच प्रामाणिक आहे रे ! त्याचं कमीत कमी नुकसान व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.'
लग्न
बायको: अहो, एखादी वस्तू खराब झाली किंवा त्यात काही फरक पडला तर ती बदलायची असती ना?नवरा: ( आनंदाने) खरचं! तुला बदलावसं वाटत ना ? बायको: हो, पण तुम्हाला इतका आनंद का
" तर मी दुसरं लग्न करू?" नवर्याने गदी खुशीत विचारलं
मधुमेह
एक डास दुसर्याला: मित्रा , तू असा गपगप का? दुसरा डासः काय करू, माणसला चावायचं सोडून दिल्यापासून मला आणखी अधिकच भूक लागू लागली आहे.
पहिला डासः अरे, पण माणसाला चावायचं सोडून का दिलंस?
दुसरा डासः पेपरमध्ये वाचलं नाहीस ? रोज मधुमेहाने लाखो लोक मरताहेत. माणसाला चावून त्या मधुमेहाची ब्याद अंगावर कोण घेणार?
गाढ्व बाप
एक गाढव दुसर्याला:" देवाने माणसाला किती बुद्धी दिली. त्याला सार्या जगातला बुद्धिमान प्राणी बनवलं. त्यांना त्यांच्या बापाचं नाव ठाऊक असतं, त्यांच्या मुलाचं नावसुद्धा माहित असतं , पण आपलं ! ......आपला बाप गाढव आणि आपला मुलगाही गाढवच....."
No comments:
Post a Comment