तामिळनाडूच्या एका गावात रंगनाथन नावाचा सोनार राहत होता. तो खूप सुंदर दागिने बनवायचा. एक दिवस त्याचा मित्र सुंदरराजन त्याच्या दुकानावर आला. रंगनाथन तेव्हा काशुमल्लई ( सोन्याच्या लहान लहान नाण्यांचा हार) बनवत होता. सुंदरराजनला तो अलंकार फार आवडला. त्याने असाच हार आपल्या बायकोसाठी बनवायला सांगितला. रंगनाथनने हार बनवून झाल्यावर घरी पोहचते करण्याचे वचन दिले. मग दोघांनीही इकडंच्या-तिकडंच्या गप्पा मारल्या आणि सुंदरराजन निघून गेला.
काही दिवसांनी हार बनवून झाल्यावर रंगनाथन तो घेऊन सुंदरराजनच्या घरी गेला. दोघांनीही त्याचा यथोचित आदर-सत्कार केला. काशुमल्लई सुंदरराजनच्या बायकोला फार आवडला. गप्पा बर्याच उशीर रमल्या. नंतर सगळे जेवायला बसले. रंगनाथनने एक पदार्थ न खाताच बाजूला ठेवला होता. सुंदरराजनची पत्नी म्हणाली," भाऊजी, या कोयकट्टईची ( भात, गुळ आणि ओल्या नारळापासून बनवलेला पदार्थ) तुम्ही चवसुद्धा चाखली नाहीत. खाऊन तर पहा, पुन्हा मागाल."
खरोखरच कोयकट्टई छान होती. त्याला तर ती इतकी आवडली की, रंगनाथन घरी गेल्यावर बायकोला बनवायला सांगून खाण्याचाच विचार करू लागला. त्याने असा आणि इतका स्वादिष्ट पदार्थ यापूर्वी कधीच चाखला नव्हता. तिथून निघताना तो कोयकट्टईचे नाव घेतच रस्त्यावर आला. घरी जाऊपर्यंत पदार्थाच्या नावाचा विसर पडू नये, हाच त्यामागचा हेतू होता. चालता चालता एके ठिकाणी तो घसरून पडला. समोरून एक व्यक्ती येत होती. तो रंगनाथनला उठवत म्हणाला," पोट्टाकडी!" ( तू तर पडलास!) आता तो कोयकट्टई शब्द विसरला आणि 'पोट्टाकडी'... 'पोट्टाकडी' म्हणत रस्त्याने चालू लागला.
घरी पोहचातच तो बायकोला म्हणाला," सुलभा, मला पोट्टाकडी खावीशी वाटतेय. पटकन बनव बरं." रंगनाथनची बायको म्हणाली," मला हा पदार्थ बनवायला येत नाही. मी तर या पदार्थाचे नाव पहिल्यांदाच ऐकते आहे." बायकोचा नकार ऐकून त्याला खूप संताप आला. रागाच्या भरात तो बायकोला ढकलून देत म्हणाला," त्या सुंदरराजनच्या बायकोला बनवायला येतं, मग तुला का येत नाही?तू काय विलायतेतून टपकलीस?"
जोरात ढकलल्याने रंगनाथनच्या बायकोचे डोके भिंतीवर जाऊन जोरात आदळले. त्याला मोठा टेंगूळ आला. थोड्या वेळाने रंगनाथनची आई बाजारातून परतली. तिने टेंगूळ पाहिला आणि धावतच सुनेजवळ जात म्हणाली," अरं देवा, तुझं डोकं असं का कोयकट्टईसारखं सुजलंय?
कोयकट्टई शब्द ऐकल्यावर रंगनाथनला आपली चूक लक्षात आली. त्याने आपल्या बायकोला सगळी हकिकत सांगितली आणि आपल्या दुर्वर्तनाबद्दल माफीही मागितली. बायको म्हणाली," मी तुम्हाला कोयकट्टई करून खायला घालीन, पण मला एक वचन द्या, यापुढं रागाच्या भरात कुठलाही दुर्व्यवहार करणार नाही." रंगनाथनने पटकन बायकोला वचन देऊन टाकले. मग तिने कोयकट्टई बनवली आणि रंगनाथनला मन भरून खाऊ घातली.

No comments:
Post a Comment