Saturday, August 31, 2019

(लघुकथा) अलका


मंगलाबाई सोफ्यावर बसून 'राम जप' लिहीत होत्या. रामराव सकाळपासून चारदा वाचलेला पेपर हातात घेऊन टाईमपास करत होते. तेवढ्यात एका खांद्यावर पर्स लटकवलेली दुसऱ्या हातात मोठ्या पिशवीचे ओझे सावरत अलका आत आली. सासुकडे हास्य नजर टाकून  तशीच ती आत गेली. मंगलाबाईच्या रागाचा पारा चढला. त्या रामरावांकडे  तीक्ष्ण नजर टाकत म्हणाल्या,"पाहिलंत का? कार चालवायची आणि टॉप जीन्स घालण्याची काही गरज होती  का?''

(बालकथा) अब आया उंट पहाड के नीचे

उंटानं पहाड कधी पाहिला नव्हता. त्याच्या बाबतीत कधी काही ऐकलं नव्हतं. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठा आणि उंच कोणी नाही, या पौढीत होता. एक दिवस झाडांची पानं खातं तो एका खुल्या मैदानात आला.  एक शेळीही  झाडांची पानं खात खात तिथे आली. आपल्या शरीराचा गर्व  बागळणारा उंट म्हणाला, "बघ, माझं शरीर किती बलाढ्य आणि उंच आहे."

Thursday, August 29, 2019

प्राथमिक शाळेत खेळ अनिवार्य हवा


अलीकडे विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू जागतिक स्तरावर चमकत असताना दिसत आहेत. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली. हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २0१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. गेल्या महिन्यात  चीनमध्ये पार पडलेल्या  स्पर्धेत तिने पुन्हा पाच सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावण्याचे काम केले आहे.

Tuesday, August 27, 2019

(बालकथा) फेकू उंट


एक उंट होता. पण तो मोठा फेकू होता. मोठं मोठं फेकायचा, मोठ्या मोठ्या बाता मारायचा. एक दिवस तो असाच फिरायला निघाला. नदीच्या काठाला उंदीर, खारुताई, माकड आणि ससा गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या आणि ते मोठमोठ्याने हसत होते. तिथे उंट गेला आणि तोही मोठमोठ्याने हसू लागला. सशाने विचारलं,"उंटदादा, तू का हसतो आहेस?"
उंट म्हणाला,"तुला पाहून हसतोय. माझ्या समोर तुम्ही काहीच नाही आहात. अगदी चिल्लर आहात."
"उंदराने विचारले,"म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे?"
उंट आपली मान झटकून म्हणाला," याचा अर्थ असा की, माझं एक दिवसाचं राशन-पाणी तुमच्या सर्वांसाठी महिनाभर चालतं. जिथंपर्यंत तुमची नजर जाते,तिथं पर्यंत तर माझी मान जाते. मी वाळवंटातला जहाज आहे. मी तिथे अगदी सहजरित्या न थांबता, न थकता धावू शकतो. तुम्ही तिथे चार पावलं टाकली तरी दमून जाल. कळलं?"

(बालकथा) खरी यात्रा

प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत तीर्थयात्रा करत करत गंगोत्रीला पोहचले. वाटेत त्यांनी हरिद्वार आणि उत्तर काशीमध्येदेखील स्नान केले. मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले आणि तिथेच व्हरांड्यात आडवे झाले. थकले होते, त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली.
झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांनी दिव्य पुरुषांचे संभाषण ऐकले. एक दिव्य पुरुष विचारत होता, "या वर्षी किती तीर्थयात्री आले आहेत?"
"जवळपास दहा हजार यात्री आले असतील?"
"मग परमेश्वराने सर्वांची सेवा स्वीकारली का?"
दुसरा म्हणाला,"नाही!त्यातील काही मोजक्याच लोकांच्या सेवा स्वीकारल्या गेल्या."
"असं का?"

(बालकथा) दुसरा स्वर्ग


एक होते आत्रेय ऋषी. अत्यंत ज्ञानी आणि तपस्वी. त्यांचा आश्रम गौतमी नदीजवळच्या वनात होता. तिथे ते आपल्या पत्नीसोबत राहत होते. वनात आणखीही काही ऋषी आश्रम करून राहत होते.
एकदा आत्रेय ऋषींनी सर्वांसोबत मिळून यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञाची पूर्ण तयारी झाली. गौतमी नदीच्या उत्तर काठावर यज्ञाला सुरुवात झाली. कित्येक दिवस तिथे मंत्रोच्चार गुंजत राहिले.
यज्ञ पूर्ण झाला. सर्व ऋषीगण आपापल्या तपोवनात निघून गेले. पण अजूनही आत्रेय ऋषींचे मन संतुष्ट पावले नव्हते. ते पुन्हा यज्ञ करण्याच्या तयारीला लागले. यज्ञ यावेळेला फारच दिवस चालला. ऋषी तन, मन साधना करत राहिले. 
शेवटी एक दिवस यज्ञ पूर्ण झाला. तेव्हा एक आकाशवाणी झाली,' देवता तुमच्या साधनेवर प्रसन्न झाले आहेत. आपल्याला आठ प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आता आपण तुमच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ -येऊ शकता.'
आत्रेय संतुष्ट होऊन आपल्या आश्रमात परतले. त्यांना त्यांच्या साधनेचे फळ मिळाले होते. 

(बालकथा) हुशार शिकारी


एका गावातला एक जमीनदार फार रागीट होता. त्याला लोकांना विनाकारण त्रास द्यायला आवडायचे. तो काहीसा मठ्ठ डोक्याचाही होता,त्यामुळे कोणतीही गोष्ट लक्षात यायला त्याला उशीर लागायचा. गावाजवळ दाट जंगल होतं. जमीनदार या जंगलात नेहमी शिकार खेळायला जायचा.
एकदा जमीनदार जंगलात शिकार करायला गेला. तिथे एका हरणाला पाहून त्याने बंदुकीचा निशाणा साधला. पण इतक्यात तिथेच असलेल्या एका शिकाऱ्याने अचूक निशाणा साधून त्या हरणाची शिकार केली. हरीण खाली कोसळले. 
हे पाहून जमीनदार भयंकर संतापला. तो शिकाऱ्याला म्हणाला,"ही शिकार माझी होती, तू का त्याला मारलंस?" त्याने संतापाने आपल्या माणसांकरवी त्या शिकाऱ्याला खूप मारहाण केली.
शिकाऱ्याला विनाकारण मारहाण झाल्याने तोही संतापला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला,"आता या गावात राहायचे नाही,पण जमीनदाराला मोठी अद्दल घडवायची."
शिकारी रात्रभर काय करायचे,याची योजना आखत राहिला. सकाळी उठल्यावर जमीनदाराच्या वाड्याच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला कळले की, थोड्याच वेळात जमीनदार पुन्हा शिकारीला जाणार आहे.
मग काय! तो लगेच माघारी फिरला. घरातून बंदूक घेऊन जंगलात गेला. वाटेत त्याने एका सशाची शिकार केली. ती शिकार त्याने एका झाडाखाली झाकून ठेवली. पुढे गेल्यावर त्याने काही कावळ्यांची शिकार केली. तीही तिथेच एका झाडाखाली झाकून ठेवली. या नंतर शिकारी लपून जमीनदाराची प्रतीक्षा करू लागला.

(कथा) खचलेले मन


ही हकीकत मी सातवीचा विद्यार्थी असतानाची आहे. आम्हाला गणिताला नवीन सर आले होते, सुरेश केंगार. मी गणितात हुशार नव्हतो. प्रयत्न खूप करायचो,पण मार्क मात्र किमान पासिंगच्या मार्कांजवळच घुटमळायचे. हा विषय माझ्या डोक्यावरूनच जायचा. आमच्या गणिताच्या शिक्षकांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा  आम्ही काहीसे चकित झालो होतो. कारण ते दिसायला थोडे विचित्रच होते. त्यांचा चेहरा मोठा होता आणि बाकी धड थोडे ठेंगणे होते. त्यांची उंची पाच फुटाच्या खालीच होती. सगळे त्यांना पाहण्यापेक्षा अधिक निरखून पाहात होते. याच दरम्यान, काही खोडकर मुलांच्या तोंडून हसू फुटले.
मला ही हरकत काही आवडली नाही. सर दिसायला थोडे विचित्र होते,पण शेवटी ते आमचे गुरू होते. सुरेश सर यांच्यासोबतचा पहिला दिवस काही खास गेला नाही. ओळखी करण्यात आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेला. त्यांनी सांगितले की,त्यांचे घर खेड्यात आहे आणि ते एकटेच इथे शहरात राहतात. 

(बालकथा) मधाची विहीर


चारी बाजूंनी रेतीचे तुफान उठले होते आणि वर प्रखर सूर्य आग ओकत होता. महालाच्या बुरुजावर सुलतान विमनस्कपणे उभा होता. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला," या खुदा, या प्रखर उन्हाने माझ्या राज्याचं काय होईल?"
तेवढ्यात त्याची पत्नी उसासे टाकत आली आणि म्हणाली,"शहजादेला काय झालंय कोण जाणे,पण उठल्यापासून रडतो आहे. "
सुलतान आपल्या मुलाच्या खोलीत गेला. प्रेमानं विचारलं," बेटा, काय झालं? का रडतो आहेस?" 
तो म्हणाला,"अब्बाजान, स्वप्नात मी दुधाच्या आणि मधाच्या विहिरी पाहिल्या. मला त्या हव्यात." असे म्हणून तो पुन्हा रडायला लागला. सुलतानने त्याला खूप समजावलं, परंतु तो रडायचा काही थांबला नाही.
सुलतान प्रखर उन्हाच्या झळा विसरून गेला. तो वजीरला सोबत घेऊन त्या विहिरींच्या शोधात निघाला. पुढे अंतर चालल्यावर त्यांना एका खजुराच्या झाडाजवळ एक उंट दिसला.जवळच एक वृद्ध नमाज पडत होता. नमाज पडून झाला. वृद्ध व्यक्तीने सुलतान आणि वजीराला विचारलं,"खूप भुकेले दिसता?"  मग त्याने उत्तराची वाट न पाहता हवेत हात फिरवला . चार सुंदर तबकांमधून फळे आणि मेवा समोर आला. दोघेही चकित झाले. 

(बालकथा) झोपडपट्टीतला संजू


संजू वर्गात याच वर्षी आला होता. त्याच्या येण्याने विराट, अनय आणि चित्रांश यांची अडचण झाली होती, कारण हे तिघेही वर्गातले टॉपर्स होते आणि पहिल्याच टेस्टमध्ये संजूने थर्ड रँक मिळवले होते. त्या दिवसापासूनच या तिघांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. कधी त्याच्या दप्तरावरून तर कधी त्याने डोक्याला लावलेल्या तेलावरून त्याची थट्टा चालवली जात होती. संजूला आपण एकटे पडल्याची जाणीव होत होती. तो एका कोपऱ्यात बसून एकटाच डबा  खायचा. एके दिवशी संजू एकटाच बसून लंच बॉक्स उघडून जेवण खाणार इतक्यात चित्रांशने त्याची शिळी भाकरी उचलली आणि सगळ्यांना दाखवू लागला. सगळी मुले त्याची टर उडवू लागले. त्याची मस्करी करू लागले. संजूच्या डोळ्यांतून आसवे टपकू लागली. 

(बालकथा) मंटू आणि बबलू अडकले


लहानग्या मंटू माकड आणि बबलू अस्वलामध्ये दाट मैत्री होती. मंगल वनात ते एकाच कॉलनीत राहत होते. 
एक दिवस ते घराबाहेर खेळत होते. तिथे मदारी राजू कोल्हा आला. त्याने त्यांना केळे दाखवले,ते पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ते उड्या मारतच त्याच्याजवळ पोहचले. दोघांनाही मदारीने एक एक केळ दिले.
"आणखी?" बबलूने मदारीपुढे हात पसरला.
"आणखी हवेत तर, माझ्यासोबत चला.जवळच माझी केळीची बाग आहे.तिथे हवी तेवढी केळी खा." मदारीने लालूच दाखवले.
मंटू आणि बबलूचे नशीबच खोटे होते. ते घरात काही न सांगता मदारीसोबत निघाले. पुढे आणखी एक कोल्हा होता. राजुने त्याला मदतीला बोलावले होते. दोघांनी मिळून मंटू आणि बबलूचे हात बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. फक्त एवढेच करून थांबले नाहीत तर ,त्यांच्या डोळ्यांवर पट्टीही बांधली. 

(बालकथा) वाटण्यातला आनंद


विनायकने सकाळी लवकरच आईला उठवलं आणि हाताला धरून बाहेर अंगणात  जिथे काही दिवसांपूर्वी पपईच्या बिया लावल्या होत्या, तिथे आणलं. "बघ आई,मी ज्या बिया पेरल्या होत्या, आता त्या उगवून आल्या आहेत." हे सांगताना त्याला फार आनंद झाला होता.
"खूप छान बाळा,आता तुला यांची काळजी घ्यावी लागेल.आता कुठे अंकुर फुटले आहेत. नंतर त्यांचे रोपटे होईल. पुढे ती मोठी होतील आणि मग फळं लगडतील." आई म्हणाली.

(बालकथा) भूक लागल्यावर...!


"आई,मी जाते गं!" म्हणून आपले दप्तर पाठीला टाकत निकिता घरातून बाहेर पडली.
"नाष्टा केलीस का?" आईने आतून आवाज देत विचारलं,पण तिला काही परत आवाज आला नाही. रस्त्यावर धावत येत तिने स्कुल बसच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. खरं तर आज सकाळी उठायला उशीर झाल्यानं तिला आवराआवरी करायलाही उशीर झाला. या गडबडतीत ती  नाष्टासुद्धा  करू शकली नाही. त्यात सकाळपासून पावसाचंच वातावरण होतं. काळे ढग भरून आले होते. बसमध्ये बसल्यावर तिने दप्तरात डोकावून पाहिलं तर त्यात तिला लंच बॉक्सच दिसला नाही. "बरं झालं." ती मनातल्या मनात म्हणाली. तिला आनंद झाला. खरं तर तिला लंच बॉक्स आवडायचा नाही. आई जबरदस्तीने लंच बॉक्स दप्तरात ठेवते, असे तिला वाटायचं. तिला तिच्या शाळेच्या कँटीनमधले गरम गरम सामोसे,,वडापाव,भजी, पॅन्टीज असले पदार्थ खूप आवडायचे. ती आपला लंच बॉक्स इतर मैत्रिणींना द्यायची आणि कँटीनमधले पदार्थ खायची. तिचे बाबा तिला आईची नजर चुकवून वर खर्चाला पैसे द्यायचे.

मोबाईलचा वापर व दुरुपयोग

आज मोबाईल आपला अविभाज्य घटक बनला आहेअन्नवस्त्रनिवारा याबरोबरच मोबाईलसुद्धा मूलभूत गरज बनला आहेत्याने आपल्या कित्येक गोष्टी सोप्या केल्या आहेतत्यामुळे आणखी काही वर्षात मोबाईलशिवाय जगणं प्रत्येकालाच अशक्य होणार आहेआजची परिस्थिती पाहाएकवेळ जेवायला नसले तरी चालतेपण मोबाईलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी लोकांकडे पैसा आहेअगदी हमालापासून ते भाजीवाल्या बाईकडेही मोबाईल दिसतो आहेफक्त ग्रामीण भागातल्या भिकार्यांकडे तेवढा मोबाईल नाहीनाही तर पुण्या-मुंबईसारख्या भिकार्यांकडेत्यांच्या नेत्यांकडेत्यांची एजंटगिरी करण्यांकडे मोबाईल आहेइतका हा मोबाईल माणसाशी फेव्हिकॉलसारखा चिकटला आहे.

(बालकथा) देशाच्या भल्याचा विचार


ग्रामीण भागातल्या एका हायस्कूलमध्ये काऊंसलिंग प्रोग्रॅम सुरू होता. काउंसलर प्रत्येक विद्यार्थ्याला,'भविष्यात मोठे झाल्यावर तू काय होणार?' असा प्रश्न तो विचारत  होता. करून त्याची इच्छा विचार होता. प्रत्येक मुलगा उभे राहून आपापली स्वप्नं सांगत होता. कोणी म्हणत होतं, मी इंजिनिअर बनणार, कोणी म्हणत होतं डॉक्टर. कुणाला बँक मॅनेजर, कुणाला आयएसआय ऑफिसर. कुणाला उद्योजक बनायचं होतं. प्रत्येकजण आपापल्या इच्छा मनमोकळेपणाने सांगत होता. हे सगळे त्या कार्यक्रमात बसलेला एक विद्यार्थी शांतपणे ऐकत होता.  त्याचा नंबर आल्यावर काउंसलरने त्याला विचारलं,"भविष्यात तुला कोण व्हावंसं वाटतं?" 

(बालकथा)आळशी राजा


एकदा गोवळकोंडा राज्यात मोठा दुष्काळ पडला. पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. जनता घागरी घेऊन वणवण फिरू लागली. पाण्यासाठी लोकांमध्ये भांडणे होऊ लागली. शेवटी जनतेने राजाकडे तक्रार केली.
राज्यावर राजा गोळायुद्ध राज्य करीत होता. तो प्रत्येक गोष्ट मंत्री आणि अधिकाऱयांना विचारत असे. ते जे काही सांगत,तेवढेच तो करे, तेवढेच पोपटासारखा बोले. काय चांगलं,काय वाईट याची काहीच माहिती नसे. तो खूप आळशी होता. सकाळी दात घासायलाही तो आळस करायचा. आठ आठ दिवस आंघोळ करत नसे. तासनतास झोपलेला असे. कधी डोळे उघडे असतात,तेव्हा मंत्री आणि अधिकारी राजकीय कागदपत्रांवर सह्या घेत. राजा पेंगत पेंगतच सह्या करत असे.

(बालकथा) आळसी गॅरी


'गुटर गु' ... लवकर ऊठ." जेली कबुतरीण आपल्या मुलाला- गॅरीला सकाळपासून उठवत होती. "आपल्या पार्कमध्ये दाणे टिपायला चल, नाही तर उपाशी राहावं लागेल."
"मम्मी, खूप झोप आलीय,थोडा वेळ झोपू दे ना." असं म्हणून गॅरी पुन्हा झोपून जाई. सर्व पक्षी रोज सकाळी लवकर उठून दाणे टिपायला जायचे.  तो मात्र झोपून राहायचा. पार्कमध्ये पौष्टिक अन्न मिळायचे. सकाळी लोक पक्ष्यांसाठी गहू, बाजरी, ज्वारी,मका, कडधान्यांची दाणे आणून द्यायची. सर्व पक्षी नाश्त्यानंतर सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारायचे. याचा शारीरिक आणि मानसिक फायदा व्हायचा.
जेरी परत येताना काही दाणे चोचीत टिपून आणायची. ग्लो कबूतर तिला म्हणायचा,"असं करून तू आपल्या मुलाला बिघडवते आहेस."
सकाळी उशिरा उठत असल्याने गॅरी आपली दिवस भराची कामदेखील व्यवस्थितरित्या करू शकत नव्हता. यामुळे आपल्या सहकारयांच्या तुलनेत तो कमजोर बनला होता.

(बालकथा) जॉन अंकल


गल्लीत सर्वात वयस्कर आहेत जॉन अंकल. तरीही सगळे त्यांना जॉन अंकलच म्हणतात. जॉन अंकल   स्वभावाने खेळकर आहेत. ते नेहमी आनंदी असतात. थोडे गप्पीष्ट आहेत. त्यांच्या गप्पा ऐकायला मुलांना फार आवडतं. रोज संध्याकाळी मुलं त्यांच्या घराच्या व्हरांड्यात जमा होतात,कारण त्यांच्याकडून मनोरंजक गोष्टी, विनोद ऐकायला मिळतात. एक दिवस मुलं संध्याकाळी जायची ती, सकाळीच जाऊन बसली. त्यांना पाहून जॉन अंकल चकित झाले. जॉन अंकल बाहेर आल्यावर सगळी मुलं एकदम म्हणाली,"हॅपी बर्थ डे अंकल."
अंकल पुन्हा चकित झाले,"अरे, तुम्हाला माझा वाढदिवसदेखील माहीत आहे?"

Saturday, August 24, 2019

अनेक ट्रेंडची सुरुवात करणारा एकमेवाद्वितीय: अमिताभ

आज कौन बनेगा करोडपतीआणि अमिताभ बच्चन हे एक घट्ट समीकरण झालं आहे. त्यामुळे या शोच्या अकराव्या पर्वातही सूत्रसंचालक म्हणून अमिताभ त्याच उत्साहाने प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र नुकताच अमिताभनं एक मोठा खुलासा केला आहे. जेव्हा या शोचं सूत्रसंचालन करण्याविषयी पहिल्यांदा त्यांना विचारणा झाली तेव्हा ते लगेचच तयार झाला नव्हता. त्या काळात म्हणजे साधारण 19 वर्षांपूर्वी अमिताभ यांचे चित्रपट रुपेरी पडद्यावर सपशेल आपटत होते. नेमकं काय करायचं, याबद्दल स्पष्टता नसताना या शोसाठीचा निर्णय घेणंही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. मुळातच चित्रपट यशस्वी होवोत किंवा न होवोत, त्यांच्यासारख्या महानायकाने टीव्हीवर काम करू नये, असाच सल्ला त्यांना कुटुंबीयांकडून आणि परिचितांकडून मिळाला होता.

(बालकथा) डाव उलटला


गोष्ट जुनीच आहे. एक राज्य होतं सुंदरनगर. या राज्यावर प्रामाणिक आणि दयाळू राजा सज्जनसिंह राज्य करीत होता. जनता राजावर खूप खुश होती. महामंत्री प्रियबदावर त्याचा खूप विश्वास होता. 
एक दिवस शेजारील दुष्टपूर राज्याचा बदनाम सिंह नावाचा एक व्यक्ती शरणार्थी म्हणून सुंदरपूर राज्यात दाखल झाला.  त्याने सुंदरपूर राज्यात राहण्याची परवानगी मागितली. राजा प्रामाणिक, स्वच्छ मनाचा होता,त्याने त्याला परवानगी दिली. मात्र महामंत्री प्रियबदा यांना ही गोष्ट खटकली. परंतु, राजाचा निर्णय बदलू शकले नाहीत.

Saturday, August 17, 2019

ताप अंगावर काढू नका


ताप हा आजार सामान्य आजार असला तरी त्याकडे आजच्या काळात दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. वास्तविक ताप हे अनेक आजारांचे लक्षण आहे.  त्यामुळे ताप आला की ,त्याच्याकडे लक्ष द्या. लवकर आटोक्यात येत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. त्याला अंगावर काढू नका. त्यावर वेळेत उपचार केले नाहीत तर जीवावर बेतू शकते, हे लक्षात ठेवा. आपला भारत देश उष्णकटीबंधीय क्षेत्रात असल्याने थोडी चिंतेचीच   बाब म्हटली पाहिजे. जर याचे लवकर निदान झाले तर पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, अन्य विकृती व जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.

Friday, August 16, 2019

सोशल मिडिया आणि आम्ही


सोशल मीडियाने माणसाच्या विचार करण्याच्या कृतीला ब्रेक लावला आहे. एकादी घटना घडली,कुणी काही वक्तव्य केलं की, प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागतो. आणि या प्रतिक्रियांना आपल्या सभ्य संस्कृतीचा कसलाच आधार राहिलेला नाही. सोशल मिडीयाला फिल्टर लावणं अशक्य झाल्याने चोहीकडे असभ्य संस्कृतीच माजली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे 'बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.' हा सुविचार शाळेच्या फलकावरच राहिला आहे. फेसबुक,व्हॉट्स अप,ट्विटर यांच्यासह अनेक सोशल माध्यमं लोकांना खुणावत आहेत. क्रिया-प्रतिक्रिया पटकन होता असल्याने सगळं काही क्षणात घडून जातं. समज-गैरसमज होऊन जातात. पण यातल्या प्रतिक्रिया या तत्कालीन असतात. भडकावू असतात. त्यामुळे वातावरण मात्र विनाकारण गढूळ होतं. कारण त्या व्यक्त करताना विचारांना थारा दिलेला नसतो.

Tuesday, August 13, 2019

(कथा) रिकामे हात


शेजारचा रिकामा प्लॉट कुणी तरी विकत घेतल्याचं माझ्या  बायकोनं जेवण करताना मला सांगितलं. दररोज सकाळी मी जेवायला बसलो की, ती मला शेजाऱ्या पाजारयांच्या, गल्लीतल्या  बातम्या सांगत असते. या ताज्या ताज्या बातम्यांबरोबरच मला गरम गरम जेवणही जेवू घालत असते. सकाळच्या जेवणावेळी तिच्याकडून ताज्या ताज्या बातम्या ऐकायला मला छान वाटतं. कधी कधी त्यावर प्रतिक्रिया देऊन तिला खूश करून टाकतो.

Friday, August 9, 2019

गावात समृद्धी आणायची तर...

आपला देश समृद्ध व्हायचा असेल तर पहिल्यांदा आपली खेडी समृद्ध व्हायला हवीत. गावातच रोजगार आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तर कमी रोजगारीत  पोटापाण्यासाठी हाल अपेष्टा  सहन करत शहरात राहणारा माणूस सहज खेड्यात राहायला असता. पण आपल्या देशात फक्त शहरीकरणाकडेच अधिक लक्ष दिले जात असल्याने देशात ग्रामीण भागाचा विचारच केला जात नाही. त्यामुळे आज खेडी आणि शहरी भागाचा जो असमतोल वाढत चालला आहे, तो असाच वाढत जाणार आहे. आणि खेडी भकास होत जाणार आहे.

Sunday, August 4, 2019

पंजाबी ढंगाचे संगीत आणणारे गुलाम हैदर

हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी बंगाली संगीतकारांचाच बोलबाला होता. मात्र त्यांना यशस्वी टक्कर देण्याचं काम आर.सी. बोराल(लाहोर),पंकज मलिक (मुंबई) आणि तिमिर बरन या 'न्यू थिएटर्स' च्या तिघांनी केलं. चालीसच दशक सुरू झाल्यानंतर पंजाबी विशेषतः मुस्लीम ढंगाचं संगीत देणाऱ्या संगीतकारांनी आपली चुणूक दाखवली आणि अवघ्या चार-पाच वर्षात च त्यांच्या 'फडकत्या' संगीतापुढं बंगाली संगीताची जादू चालायची बंद झाली.

(बालकथा) अजयचा समजूतदारपणा



अनंतपूर गावात एक प्राथमिक शाळा होती. सातवीपर्यंतच तिथं शिक्षण होतं. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना जवळपास सहा किलोमीटर दूर जावं लागायचं. याच गावात अजय राहत होता. तो चांगल्या मार्कांनी सातवी पास झाला होता. त्याला पुढं खूप शिकायचं होतं. पण घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. अजयचे वडील भीमाशंकरदेखील त्याला शिकवू इच्छित होते. परंतु, अडचण अशी की, अजयला इतक्या लांब चालत आणि एकटं कसं पाठवायचं. सहा किलोमीटर चालत जायचं आणि यायचं अशक्य होतं. शेवटी गावातल्या जयवंतरावांकडून दोन हजार रुपये हात उसने घेतले आणि अजयला एक सायकल घेऊन दिली.

Thursday, August 1, 2019

प्लास्टिक कचऱ्यापासून हायड्रोजन गॅस?


'प्लास्टिक कचरा' ही एक मोठी डोकेदुखी आपल्यासह सगळ्याच देशांना भेडसावत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे मुंबई शहराची 2005 मध्ये आणि त्यानंतर दरवर्षी काय अवस्था होते आहे,हे आपण पाहात आहोतच. प्लास्टिक कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणारा विषारी दूर आजूबाजूच्या रहिवाशांना आजाराने  बाधित करून टाकत आहे. शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था मात्र याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपल्या देशात खूप मोठा प्लास्टिक कचरा जमा होत असून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्या देशातल्या बहुतांश राज्यांनी प्लास्टिक पिशव्यांना वापरास बंदी घातली आहे. पण तरीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला नाही. साहजिकच आपल्याकडील कित्येक कायदे फक्त कागदावरच आहे. 

असंक्रमण आजारांचे आव्हान


आपल्या देशात हृदय विकाराने मृत्यू पावणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, ही मोठी चिंताजनक बाब म्हटली पाहिजे. एका आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला देशात 54 लाख लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत. हृदयरुग्णांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. शिवाय हाच आजार अन्य आजारांनाही आता आमंत्रण देत आहे. म्हणजे याच्यामुळे आणखीही काही आजार रुग्णांना चिकटत आहेत. पुणे येथील चेस्ट रिसर्च फौंडेशन आणि नवी दिल्ली येथील इन्स्टीट्यूट् ऑफ जिनेमिक्स अँड इंटीग्रेटेड बायोलॉजी यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे कि, भारतातील निम्म्यापेक्षा अधिक लोक श्वासासंबंधीच्या आणि फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत. या संबंधीच्या आजारामुळे रोज साडे तीन कोटी रुग्ण आजाराच्या निदानासाठी डॉक्टरांकडे जात आहेत. हा निष्कर्ष आठशे पेक्षा अधिक शहरांचा व्यापकस्वरुपात अभ्यास करून काढण्यात आला आहे.